Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 08/20/2018 - 03:53
नमस्कार मंडळी, बऱ्याच काळापासून या विषयावर चर्चेचा धागा काढायचे मनात होते. शेवटी आज जागतिक छायाचित्रणकला दिवसाच्या मुहूर्तावर ते प्रत्यक्षात आणतोय. आंतरजाल सहजपणे उपलब्ध होण्यापूर्वी माझ्यासारख्यांच्या दैनदिन आयुष्यात (आस्वाद घेण्याजोग्या) छायाचित्रांची उपलब्धतता आजच्या तुलनेत नगण्यच होती. दर्जेदार कागद अन छपाई असणारी इंग्रजी मासिके, कधी कुणाच्या घरी पोस्टर म्हणून लावलेले एखादे उत्तम छायाचित्र इत्यादी. गेल्या एक दीड दशकात हे चित्र वेगाने पालटले. इतरांनी काढलेली उत्तमोत्तम छायाचित्रे पाहिली की आपणही कधी अशी छायाचित्रे काढू शकू का हा विचार मनात पूर्वी यायचा. त्या दिशेने थोडे फार प्रयत्न केल्यावर उमजले की उत्तम व दर्जेदार छायाचित्रे काढणे हे त्या प्रकारची चित्रे पाहण्याच्या तुलनेत खूपच अवघड आहे. त्यामुळे स्वतःच्या समाधानासाठी जशी जमतील तशी छायाचित्रे काढावीत अन इतरांच्या उत्तमोत्तम छायाचित्रांचा आस्वाद घेताना 'आपल्याला जमेला का' असे प्रश्न अजिबात मनात आणायचे नाहीत असे मी ठरवले. अन या मार्गाने उपलब्ध वेळेचा उपयोग उत्तमोत्तम छायाचित्रे पाहण्यात घालवून स्वतःसाठी एक दालनच उघडले. छायाचित्रे हे असे माध्यम आहे की आस्वाद घेणाऱ्याला फार वेळ घालवायची गरज नाही. उपलब्ध असणाऱ्या अन जालाला जोडलेल्या अनेक उपकरणांवर आपण छायाचित्रे बघू शकतो. छायाचित्रांतून इतिहास, भूगोल, संस्कृती, नव्या घडामोडी यांची माहिती आपोआप सहजपणे होत राहते. छायाचित्रणकला स्वतः तर एक कला आहेच पण इतर अनेक कलांचा अन शास्त्रांचा आरसा म्हणूनही ती महत्त्वाची भूमिका पार पाडते. माझ्या दिवसाची सुरुवात बिंग. कॉमवरचे रोज बदलणारे छायाचित्र पाहून होते. दिवसभरात अन रात्री झोपण्यापूर्वी फेसबुक फोटोग्राफी पेजेस, फ्लिकर, इन्स्टाग्राम इत्यादींवर विविध विषयांवरच्या उत्तमोत्तम छायाचित्रांचा आस्वाद मी घेत असतो. मिपावर देखील अनेक प्रवासवर्णनांमधे , छायाचित्रणकला स्पर्धांमधे अन इतरही लेखनांत मिपाकर छायाचित्रकारांची दर्जेदार छायाचित्रे बघायला मिळतात. मिपावर अन जालावर इतरत्रही अशा कलाकारांचे छायाचित्रणाबाबतचे अनुभवकथन वाचणे ही देखील पर्वणी असते. माझ्यासारखीच आवड असणाऱ्या मिपाकरांना विनंती करतो की त्यांनी आवडत्या छायाचित्रांचे दुवे प्रतिसादांत द्यावेत. तसेच आवडत्या छायाचित्रांबाबत अन छायाचित्रकारांबाबत लिहावे. मी माझ्या परीने भर घालणार आहेच. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. या विषयावरचे बिंगचे एक होमपेज जालावरून साभार - या निमित्ताने, आपल्या कलेद्वारे माझ्यासारख्या अनेकांचे अनूभूतीविश्व संपन्न करणाऱ्या ज्ञात व अज्ञात छायाचित्रकारांना वंदन करतो.
  • Log in or register to post comments
  • 41581 views

प्रतिक्रिया

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 09/03/2018 - 13:55

In reply to धन्यवाद by प.पु.

Permalink

मिपावर चित्रे प्रसिद्ध

मिपावर चित्रे प्रसिद्ध करण्याची कृती, हा लेख उपयोगी ठरू शकेल.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 09/04/2018 - 14:22

In reply to धन्यवाद by प.पु.

Permalink

तुम्ही फोटोच्या थंबनेलची लिंक

तुम्ही फोटोच्या थंबनेलची लिंक टाकली होती. फोटो प्रसिद्ध करण्यासाठी, तो (थंबनेलवर डबल क्लिक करून मिळालेल्या) पूर्ण आकारात असताना घेतलेला "इमगे अड्रेस" वापरावा लागतो.
  • Log in or register to post comments

Submitted by एक छायाचित्रकार on Tue, 08/28/2018 - 22:21

Permalink

माझी काही छायाचित्रे येथे टाकु शकतो का?

माझी काही छायाचित्रे येथे टाकु शकतो का? मि एक हौशी छायाचित्रकार आहे. मला माहीत नाही माझि छायाचित्रे लोका॓ना आवडतील की नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Tue, 08/28/2018 - 22:25

In reply to माझी काही छायाचित्रे येथे टाकु शकतो का? by एक छायाचित्रकार

Permalink

जरूर टाका.

जरूर टाका.
  • Log in or register to post comments

Submitted by निशाचर on Wed, 08/29/2018 - 07:18

Permalink

मस्त आहे हा धागा आणि फोटोज.

मस्त आहे हा धागा आणि फोटोज. नाणेघाटाचा फोटो विशेष आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Wed, 08/29/2018 - 12:31

Permalink

मॅग्नम फोटोज या

मॅग्नम फोटोज या प्रकाशचित्रणाला वाहिलेल्या संस्थेच्या वेबसाईटवर अनेक प्रसिद्ध प्रकाशचित्रकारांनी काढलेली ऐतिहासिक प्रकाशचित्रे आहेत. https://www.magnumphotos.com/
  • Log in or register to post comments

Submitted by प.पु. on गुरुवार, 08/30/2018 - 09:59

Permalink

नानेघाट, नानाच्या अंगठ्यावरुन काढलेला फोटो

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल कार्टं on Fri, 08/31/2018 - 10:47

Permalink

सायकलिंग सुरु केल्यापासून

सायकलिंग सुरु केल्यापासून केलेली फोटोग्राफी. यातला शेवटचा फोटो तेवढा DSLR ने काढलाय. बाकी सगळे फोन कॅमेरा वापरून. सगळेच्या सगळे सकाळच्या वेळी काढलेत. मिपाच्या सायकल आणि पुस्तकाच्या कायाप्पा समूहातल्या सदस्यांनी याआधी पाहिलेले आहेतच. Image removed. हा गावाजवळील नदीवर असलेला एक जुना बंधारा कम पूल. Image removed. तानसा धरणात एका मासेमाराकडून तराफा उसना घेऊन एकट्यानेच भटकलो होतो तेव्हा मित्राने काढलेला फोटो. Image removed. Image removed. माहुली-भंडारगड Image removed. तानसा अभयारण्य परिसरात काढलेला एक फोटो.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Sun, 09/02/2018 - 18:34

In reply to सायकलिंग सुरु केल्यापासून by इरसाल कार्टं

Permalink

अभिप्राय ..

एक नम्बर फोटो उत्त्मच ! पुणेकराना असा काधायचा असेल तर येत्या हिवाळ्यात कवडीपाट ला भेट द्या बाकी सर्व लई भारी . माहुलीची स्काय लाईन लाजवाब !
  • Log in or register to post comments

Submitted by मेघनाद on Tue, 09/04/2018 - 02:01

In reply to सायकलिंग सुरु केल्यापासून by इरसाल कार्टं

Permalink

सायकलचा फोटो अप्रतिम

पुलावर काढलेला सायकलचा फोटो अप्रतिम. धुक्यात हरवली वाट सारखं काहीसं
  • Log in or register to post comments

Submitted by लोनली प्लॅनेट on Fri, 08/31/2018 - 12:13

Permalink

हा मी काढलेला माझ्या पुतणीचा

हा मी काढलेला माझ्या पुतणीचा चा फोटो कॅमेरा Nikon D5100 50mmF/1.8 http://i1067.photobucket.com/albums/u437/sandeep4animals/manva_zpsblsuk68z.jpg
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 08/31/2018 - 12:45

In reply to हा मी काढलेला माझ्या पुतणीचा by लोनली प्लॅनेट

Permalink

वरचा फोटो

वरचा 'लोनली प्लॅनेट' यांचा सुंदर "बोलका" फोटो Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by लोनली प्लॅनेट on Sat, 09/01/2018 - 10:56

In reply to वरचा फोटो by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

माझ्या प्रतिसादात तो फोटो

माझ्या प्रतिसादात तो फोटो दिसत नव्हता म्हणून तुम्ही स्वतः तो पुनर्प्रकाशित केलात यासाठी खूप धन्यवाद म्हात्रे काका..
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 09/01/2018 - 21:10

Permalink

न्यूझिलंडमधील फिओर्डलँडमधील

न्यूझिलंडमधील फिओर्डलँडमधील वाटेवरच्या नीरव "आरसी तळ्याचा (मिरर लेक)" एक फोटो...

Image removed.

  • Log in or register to post comments

Submitted by प.पु. on Sun, 09/02/2018 - 11:18

Permalink

खेळ सावल्यांचा...

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 09/02/2018 - 13:18

In reply to खेळ सावल्यांचा... by प.पु.

Permalink

चित्र दिसत नाही. बहुतेक

चित्र दिसत नाही. बहुतेक त्याला "पब्लिक अ‍ॅक्सेस" दिलेला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प.पु. on Sun, 09/02/2018 - 13:45

In reply to चित्र दिसत नाही. बहुतेक by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

दिलेला आहे

दिलेला आहे
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 09/02/2018 - 13:21

Permalink

छायाचित्रण दिन २०१८ निमित्त

छायाचित्रण दिन २०१८ निमित्त प्रसिद्ध झालेले एक चित्र (जालावरून साभार)... Image removed.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 09/02/2018 - 16:36

Permalink

सुंदर धागा... सुंदर

सुंदर धागा... सुंदर प्रकाषचित्रे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- नि मैं वोडका लगा के तेरे नाल नाचना, नि मैं वोडका लगा के तेरे नाल नाचना, होय मैं तेरा ही ना रटना अड्डी मार के वेहदा पट्टना अज्ज मैं टल्ली होक हटना नि... :- Nawabzaade
  • Log in or register to post comments

Submitted by अनिंद्य on Mon, 09/03/2018 - 12:25

In reply to सुंदर धागा... सुंदर by मदनबाण

Permalink

+१

+१ हा धागा खरेतर 'शिफारस' मध्ये हवा.
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on Tue, 09/04/2018 - 11:51

Permalink

छान धागा

मस्त धागा. सकाळी सायकलींगला जाताना माझ्या सारख्या अतिशय टुकार छायाचित्रकाराने काढलेली काही छायाचित्रे कोणाला आवडू ना आवडो स्वतःला आवडायला लागतात . सकाळच्या सुदंर वातावरणाचा आणि मोबाइल मधल्या कॅमेऱ्याचा परिणाम.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 09/04/2018 - 12:03

Permalink

भुलेश्वरच्या पठारावर टिपलेले

भुलेश्वरच्या पठारावर टिपलेले हे छायाचित्र. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Tue, 09/04/2018 - 15:08

In reply to भुलेश्वरच्या पठारावर टिपलेले by प्रचेतस

Permalink

उत्तम ..

रंग , फोकस रचना एक लम्बर !
  • Log in or register to post comments

Submitted by मीता on Mon, 09/10/2018 - 14:15

Permalink

कोराईगडाच्या वाटेवर ..

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Mon, 09/10/2018 - 23:07

Permalink

फ्लॉरेन्स मधील एक राजप्रासाद

फ्लॉरेन्स: आर्नो नदीवरील एक पूल Image removed. इ.स. १४५८ साली बनलेल्या पित्ती/मेदिची-प्रासादातले एक दालनः Image removed. एक शयनकक्ष ऊर्फ बेडरूम (३२०,००० वर्गफुटाच्या घरातील एक खोली) Image removed. एका दालनातील छतावरील चित्रः Image removed. आंघोळीचे संगमरवरी घंगाळ आणि एक घड्याळ Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by फोटोग्राफर243 on Tue, 09/11/2018 - 16:14

Permalink

मागच्या काही वर्षा पासून

मागच्या काही वर्षा पासून छायाचित्रण शिकतो आहे, https://www.flickr.com/photos/ambarishphotography
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 08/19/2021 - 22:58

Permalink

जागतिक छायाचित्रणकला दिवसाच्या शुभेच्छा!!

सर्व मिपाकरांना जागतिक छायाचित्रणकला दिवसाच्या शुभेच्छा!! गेल्या हिवाळ्यात टिपलेली पक्षाची ही मुद्रा. Image removed. अनेक वर्षांनी साहित्य संपादकांनी छायाचित्रणकला स्पर्धा या उपक्रमाचे पुनुरुज्जीवन केल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sat, 08/21/2021 - 15:48

In reply to जागतिक छायाचित्रणकला दिवसाच्या शुभेच्छा!! by श्रीरंग_जोशी

Permalink

वा !

सुंदर आहे
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Sat, 08/21/2021 - 17:01

In reply to जागतिक छायाचित्रणकला दिवसाच्या शुभेच्छा!! by श्रीरंग_जोशी

Permalink

बात

क्या बात हैं !
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com