छायाचित्रण कलेचा आस्वाद
नमस्कार मंडळी,
बऱ्याच काळापासून या विषयावर चर्चेचा धागा काढायचे मनात होते. शेवटी आज जागतिक छायाचित्रणकला दिवसाच्या मुहूर्तावर ते प्रत्यक्षात आणतोय. आंतरजाल सहजपणे उपलब्ध होण्यापूर्वी माझ्यासारख्यांच्या दैनदिन आयुष्यात (आस्वाद घेण्याजोग्या) छायाचित्रांची उपलब्धतता आजच्या तुलनेत नगण्यच होती. दर्जेदार कागद अन छपाई असणारी इंग्रजी मासिके, कधी कुणाच्या घरी पोस्टर म्हणून लावलेले एखादे उत्तम छायाचित्र इत्यादी.
गेल्या एक दीड दशकात हे चित्र वेगाने पालटले. इतरांनी काढलेली उत्तमोत्तम छायाचित्रे पाहिली की आपणही कधी अशी छायाचित्रे काढू शकू का हा विचार मनात पूर्वी यायचा. त्या दिशेने थोडे फार प्रयत्न केल्यावर उमजले की उत्तम व दर्जेदार छायाचित्रे काढणे हे त्या प्रकारची चित्रे पाहण्याच्या तुलनेत खूपच अवघड आहे. त्यामुळे स्वतःच्या समाधानासाठी जशी जमतील तशी छायाचित्रे काढावीत अन इतरांच्या उत्तमोत्तम छायाचित्रांचा आस्वाद घेताना 'आपल्याला जमेला का' असे प्रश्न अजिबात मनात आणायचे नाहीत असे मी ठरवले.
अन या मार्गाने उपलब्ध वेळेचा उपयोग उत्तमोत्तम छायाचित्रे पाहण्यात घालवून स्वतःसाठी एक दालनच उघडले. छायाचित्रे हे असे माध्यम आहे की आस्वाद घेणाऱ्याला फार वेळ घालवायची गरज नाही. उपलब्ध असणाऱ्या अन जालाला जोडलेल्या अनेक उपकरणांवर आपण छायाचित्रे बघू शकतो. छायाचित्रांतून इतिहास, भूगोल, संस्कृती, नव्या घडामोडी यांची माहिती आपोआप सहजपणे होत राहते. छायाचित्रणकला स्वतः तर एक कला आहेच पण इतर अनेक कलांचा अन शास्त्रांचा आरसा म्हणूनही ती महत्त्वाची भूमिका पार पाडते.
माझ्या दिवसाची सुरुवात बिंग. कॉमवरचे रोज बदलणारे छायाचित्र पाहून होते. दिवसभरात अन रात्री झोपण्यापूर्वी फेसबुक फोटोग्राफी पेजेस, फ्लिकर, इन्स्टाग्राम इत्यादींवर विविध विषयांवरच्या उत्तमोत्तम छायाचित्रांचा आस्वाद मी घेत असतो. मिपावर देखील अनेक प्रवासवर्णनांमधे , छायाचित्रणकला स्पर्धांमधे अन इतरही लेखनांत मिपाकर छायाचित्रकारांची दर्जेदार छायाचित्रे बघायला मिळतात. मिपावर अन जालावर इतरत्रही अशा कलाकारांचे छायाचित्रणाबाबतचे अनुभवकथन वाचणे ही देखील पर्वणी असते.
माझ्यासारखीच आवड असणाऱ्या मिपाकरांना विनंती करतो की त्यांनी आवडत्या छायाचित्रांचे दुवे प्रतिसादांत द्यावेत. तसेच आवडत्या छायाचित्रांबाबत अन छायाचित्रकारांबाबत लिहावे. मी माझ्या परीने भर घालणार आहेच. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
या विषयावरचे बिंगचे एक होमपेज जालावरून साभार -
या निमित्ताने, आपल्या कलेद्वारे माझ्यासारख्या अनेकांचे अनूभूतीविश्व संपन्न करणाऱ्या ज्ञात व अज्ञात छायाचित्रकारांना वंदन करतो.
या निमित्ताने, आपल्या कलेद्वारे माझ्यासारख्या अनेकांचे अनूभूतीविश्व संपन्न करणाऱ्या ज्ञात व अज्ञात छायाचित्रकारांना वंदन करतो.वर्गीकरण
प्रतिक्रिया
लेख आणि विचार आवडले.उत्तम व
उत्तम धागा.
काही दिवसांपूर्वी बरखाजींनी
सुंदर कल्पना !
बहार !
@ डॉ सुहास म्हात्रे
मस्तं ! सुंदर फुलांचे सुंदर
आभार
- गेल्या महिन्यात जाहिर झालेले यंदाचे आयफोन फोटोग्राफी अवॉर्ड्स
- Adobe Introduces Their “Rising Stars of Photography” for 2018
आजचे बिंगचे होमपेजमी काढलेले एक छायाचित्र...
आवडले
सुंदर !
@ जयंत कुलकर्णी
मला वेळ मिळेल तसा बॉस्टनग्लोब
जीवधन-वानरलिंगी
कडक
@ प्रचेतस
अप्रतिम
चाहे पास हो , चाहे दूर हो .....
ताजा कलम
@ चौकटराजा
भारी प्रयोग, भारी कॅमेरा,
धन्यवाद
@ श्रीरंग_जोशी
विमानातून टिपलेले सूर्यग्रहण
विमानातून टिपलेले सूर्यग्रहण
विमानातून टिपलेले सूर्यग्रहण
निशब्द
Cosmic ‘Winter’ Wonderland
हा तार्यांचा जन्मसोहळा आहे
हा तार्यांचा जन्मसोहळा आहे
हा तार्यांचा जन्मसोहळा आहे काय?होय. अश्याच महामहामहास्फोटात प्रचंड आकाराचे, प्रचंड धगधगते वस्तूमान, एकत्र येऊन तारे जन्मतात... या तर तारे बनवणार्या फॅक्टर्या ! अश्याच एका फॅक्टरीत दिसलेला हा "देवाचा हात (Hand of God)" :)ही विश्वाची फॅक्टरी तशी
मला भावलेले एक छायाचित्र.
मस्तं. ते गवत आता वार्याने
मेघनादजी फोटो दिसत नाहीये.
टर्मिनेटर साहेब आता बघा छायाचित्र दिसतंय का?
मेघनादजी अजूनही छायाचित्र दिसत नाहीये. गुगल फोटोज किंवा फेसबुक
Access to doc-08-7k-docs
आता हा शेवटचा प्रयत्न.
मिपावर चित्रे प्रसिद्ध
मला भावलेले एक छायाचित्र.
स्टिव्ह मॅककरी
भारी आहेत सगळी चित्रे ! अशी
अगदी. निर्विवादपणे देखणी.
अप्रतिम आहेत एकेक फोटो.
आता खरा यौवनात आला हा धागा.
मी काढलेला जुन्नर जवळील धबधब्याचा फोटो
https://photos.app.goo.gl
सुंदर फोटो, लिंक देण्या ऐवजी इथेच टाका ना हा फोटो.
सर्वच फोटो छान आहेत.
धन्यवाद