गूगल आणि मायक्रोसॉफ्ट स्पर्धेची क्षेत्रे
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मायक्रोसॉफ्ट आणि गूगल या सध्याच्या सॉफ्टवेअरमधल्या दोन मोठ्या कंपन्या. मायक्रोसॉफ्ट मुख्यतः डॉस नावाच्या ऑपरेटिंग सिस्टीमपासून प्रसिद्धीस यायला सुरुवात झाली. आणि मग पुढे विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम आणि ऑफिस वगैरे प्रॉडक्ट्स आली.
इंटरनेटच्या जमान्यात गूगलचं नाव गाजायला लागलं.
मधल्या काळात मायक्रोसॉफ्टने अमेरिकेतल्या इतर मोठ-मोठ्या कंपन्यांप्रमाणेच साम्राज्यवाद सुरू केला. ज्या गोष्टी आपल्या स्वतःला निर्माण करता येत नाहीत पण उद्या प्रतिस्पर्धी ठरू शकतील अशा गोष्टी ताब्यात घेणं. हॉटमेल ही यशस्वी ठरलेली ई-मेल कंपनी मायक्रोसॉफ्टने ताब्यात घेतली.
सर्च इंजिनच्या बाबतीत मायक्रोसॉफ्टचं कुठे फारसं नाव नव्हतं. याहू आणि अल्टाविस्टा सर्वांना माहीत होते. पुढे पुढे इंटरनेटचा प्रभाव वाढायला लागला. सर्च इंजिन सारखी छोटीशी वाटणारी गोष्ट सुद्धा सर्वतोमुखी व्हायला लागली.
आणि मग 2005 साली गूगलने ई-मेल सर्व्हिस द्यायला सुरुवात केली ती होती जीमेल.
<टाइम प्लीज>
ज्यांना पॉपकॉर्न खाऊन घाण करायची आहे त्यांनी
https://www.misalpav.com/node/41559
इथे व्यक्त व्हावे.
</टाइम प्लीज>
आतापर्यंत दोन्हीही कंपन्यांची काम करण्याची क्षेत्रे वेगवेगळी होती. त्यामुळे तशी थेट स्पर्धा कुठे नव्हती. पण मायक्रोसॉफ्ट आणि गूगल दोघांच्याही ई-मेल सर्व्हिस सुरू झाल्या तिथे स्पर्धा आली.
आज दोघांचीही सर्च इंजिन्स आहेत. मायक्रोसॉफ्ट ऑफिस सारखीच गूगलचीही प्रॉडक्ट्स आहेत. बहुतेक घरगुती यूजर मायक्रोसॉफ्टची विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम वापरतात. डेस्कटॉपसाठी गूगलची क्रोमबुक नावाची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. गूगलची मोबाईल साठी अँड्रॉइड ही ओएस आहे. मायक्रोसॉफ्टच्या मोबाईलवर विंडोज ओएस असायची. मॅपमधे गूगलमॅप आणि मायक्रोसॉफ्टकडे असलेले हियर मॅप. हियर मॅपचे वैशिष्ट म्हणजे ते ऑफलाइन, नेट नसतानाही वापरता येते फक्त जीपीएस हवे.
वेब ब्राउझरमधे मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्सप्लोरर आणि गूगलचा क्रोम आहे. अशाप्रकारे दोघांमधले कॉमन एरिया किंवा स्पर्धेची क्षेत्रे वाढायला लागलेली आहेत.
अशीच अजून काही क्षेत्रे आपल्याला सांगता येतील का आणि पुढच्या काळात मायक्रोसॉफ्टला त्याच्या प्रॉडक्टला एक एक पर्याय उपलब्ध होत जाईल का ? कदाचित मला मोजकीच उदाहरणे दिसली असतील. मिसळीवरचे अनुभवी लोक अधिक भरही घालू शकतील.
ashutoshjog@yahoo.com

प्रतिक्रिया
एक मुद्दा दोघांमधला विशेष फरक
कंजूस
अॅप्स डिवेलपर लोकेशन, कॅाल
या मुळं एमएस स्पर्धेत मागे
खरोखर
सहमत. एआय (कृत्रिम
जुने नेटस्केप नॅवीगेटर आणि
खरंच की राव ! नेटस्केप दोन
...
माइक्रोचे अझुर फॅार बिझनेस ?
या मध्ये आता cloud services
...
१. क्रोमबूक डेस्कटॉपसाठी
...
आता पंधरा दिवसांपुर्वीची
क्यानडाचा ब्लॅकब्री युएसने
ब्लुटुथ आणि मेमरी कार्ड
Netscape Communications
...
हो तसं म्हणता येईल...
सेल्फ गोल...
इथे आंतरजाल ब्राऊझर्सबद्दल
ते अलेक्सा का कुठला एआइ
...
*चालत* नाही.
...