आज मिपावर फिशिंग अलर्ट संदेश वाचला आणि खूप दिवसापासून चुटपुट लागून राहिलेल्या भावनांना वाट मिळाली आणि जी माहिती किंवा लेख सगा सरांनी दाखवला(हा लेख कोणीतरी मायबोलीवर लिहिला आहे) तो पाहून मी उडालेच. कारण मी पण अगदी याच अनुभवातून गेले आहे. सबब समस्त मिपाकरांना सावध करण्यासाठी खासकरून महिला सदस्यांसाठी हा लेख.
डॉ. स्पर्शिका जोशी यांनी मला 7 जुलै च्या आसपास व्यनि केला की त्यांना माझ्या काही पाककृती आवडल्या. त्याला प्रतिसाद देण्यासाठी मी टिचकी मारली पण एक अशा आशयाचा संदेश झळकला कि त्यांना कुणीही प्रति संदेश पाठवू शकत नाही. मला हे विचित्र वाटलं. पण अशी काही सेटिंग करता येत असेल व मला माहित नसेल असं वाटलं. त्यानंतर लगेचच मला मेल आला की आपण बोलू शकतो का ? मला तुमची मदत हवी आहे. त्यावर मी त्यांना मला जमेल तशी करेन असा मेल पाठवला. त्यावर त्यांनी आपण चॅट वर बोलू असं सांगितलं. मी त्यांना शक्य नसल्याचे कळवले. त्यावर दुसरे दिवशी त्यांनी विंडो ओपन करून त्याचा पासवर्ड दिला पण मी त्यांना मला जमणार नाही आपण मेल वर बोलू असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी मी स्त्रीरोगतद्न्य असून वेदना न होणारे जेल शोधून काढले आहे जेणेकरून इंजेक्शन दिल्यावर वेदना जाणवत नाही असे सांगितले. मी या जेलचे काय घटक आहेत व याची काय साईड इफेक्ट आहेत ते विचारले . त्यांनी त्याचे नीट स्पष्टीकरण दिले. त्यांनी मला इंजेक्शन बाबतचे अनुभव विचारले मीही त्याची प्रामाणिकपणे उत्तरे दिली. हे तीन चार दिवस चालू होते कारण मला जमेल तसे मी मेल वर मराठी टाईप करून उत्तरे देत होते. मला त्यांनी कोल्हापुरात त्यांची मावशी राहते व त्यांचे क्लिनिक बांद्रा वेस्ट ला असल्याचे सांगितले. एव्हाना आम्ही बऱ्यापैकी सरावले होतो एकमेकींना. टाइपिंग चा कंटाळा असल्याने व मेल वरचेवर पाहण्याची सवय नसल्याने मी त्यांना माझा मोबाइल नं देऊन त्यावर वॉट्स अँप करा असे सांगितल्यावर माझा फोन मी केवळ imergency ला वापरते असं सांगितलं. मी जरा दुखावले गेले होते . त्यांचं असं वागणं अपेक्षित नव्हतं. कदाचित त्यांनाही हे जाणवलं असेल. त्यानंतर आजतागायत माझा त्यांच्याशी संपर्क नाही. पण खरा धक्का अजून मला बसायचा होता......
आज मी मिपावरचा संदेश वाचताच क्षणात मला स्पर्शिका आठवली. मी सरपंच ना संदेश पाठवला. खफ वर सगा सरानी त्यांचा उल्लेख केल्यावर त्यांनी माबो वरचा लेख जोडलेला वाचला आणि लक्षात आलं की मी पण हेच अनुभवलंय. पण खरं धक्का पुढे आहे.....
हा लेख लिहायचा म्हणून gmail वरचे तिचे reply इथे पेस्टवण्यासाठी शोधले तर आमचे सर्व संभाषण उडवले गेले आहे.........
मी अगदी trash फोल्डर हि तपासले. आमचे संभाषण झालयाचा एकही पुरावा शिल्लक नाही......
केवळ एक draft आहे पण त्यात काहीही लिहिलेले नाही. फक्त तिचा gmail address सापडला sparshika@ gmail.com
...........
| लेखनविषय: |
|---|
वाचने
26817
प्रतिक्रिया
75
मिसळपाव
प्रतिक्रिया
भयंकरच प्रकार दिसतोय,
तातडीने पासवर्ड बदलून घ्या.
In reply to भयंकरच प्रकार दिसतोय, by प्रचेतस
तातडीने पासवर्ड बदलून घ्या.होय. कुणीतरी तुमच्या अपरोक्ष तुमचं जिमेल खाते हाताळत आहे. त्याशिवाय संभाषण आपोआप गायब होणार नाही.रोचक.
तुम्ही लेख लिहीलात हे उत्तम
जालावरच्या बिनचेहर्याच्या
+११
In reply to जालावरच्या बिनचेहर्याच्या by डॉ सुहास म्हात्रे
सहमत
In reply to जालावरच्या बिनचेहर्याच्या by डॉ सुहास म्हात्रे
माझ्या बायकोला मायबोलीवर मेल
हो hangout
उपयुक्त माहिती
हा गुगल + चा पत्ता मिळालाय पण फारशी माहिती मिळत नाही
मलाही व्यनि आला होता,
Same to same शब्दात मलाही आला
In reply to मलाही व्यनि आला होता, by प्राची अश्विनी
हेच..
In reply to मलाही व्यनि आला होता, by प्राची अश्विनी
विकृती दुसरं काय ?
जीमेल अकाउंट हॅक झालेले मी
In reply to विकृती दुसरं काय ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मान्य...!
In reply to जीमेल अकाउंट हॅक झालेले मी by टवाळ कार्टा
Gmail वापरायला खूप सुरक्षित
In reply to मान्य...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरोबर.
In reply to Gmail वापरायला खूप सुरक्षित by अमर विश्वास
इतर वेळी नुस्ते बोलणे सुरु
+१००
In reply to इतर वेळी नुस्ते बोलणे सुरु by टवाळ कार्टा
बळी कुठे पडल्यात? एक ह्या
In reply to इतर वेळी नुस्ते बोलणे सुरु by टवाळ कार्टा
>>बळी कुठे पडल्यात>>
In reply to बळी कुठे पडल्यात? एक ह्या by पिलीयन रायडर
कोणकोण कायकाय टँकतंय
In reply to >>बळी कुठे पडल्यात>> by कंजूस
तेच तर! बळी वगैरे कुणीच
In reply to कोणकोण कायकाय टँकतंय by श्वेता२४
हा प्रतिसाद अस्थानी आहे असं
In reply to इतर वेळी नुस्ते बोलणे सुरु by टवाळ कार्टा
आवडला प्रतिसाद :)
In reply to हा प्रतिसाद अस्थानी आहे असं by सतिश गावडे
पासवड ओळखण्याचे काही कोड
फक्त जीमेल आयडी की .......
आयपी अॅड्रेस् बदला आणि तो
In reply to फक्त जीमेल आयडी की ....... by सुधीर कांदळकर
अधिक माहितीची विनंती
In reply to फक्त जीमेल आयडी की ....... by सुधीर कांदळकर
फ्लांईग कर्सर ,
In reply to अधिक माहितीची विनंती by माहितगार
>>दुरुस्ती करणार्याने कोणती
In reply to अधिक माहितीची विनंती by माहितगार
माझ्या विंडोज होम माझ्या एच
In reply to अधिक माहितीची विनंती by माहितगार
माझ्या विंडोज होम माझ्या एच पी संगणकासोबतच फ्री आलेली.१. तुम्ही तुमच्या संगणकाचे एचपीच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केले असले तर तुम्हाला तेथून तुमच्या संगणकावर मुळात असलेल्या विंडोची ऑफिशियल कॉपी डाऊनलोड करता येईल (निदान डेलमध्ये अशी व्यवस्था आहे). २, प्रथम तुमच्या हार्ड डिस्कवर असलेल्या तुमच्या कामाचा डेटा कॉपी करून घ्या. ३. हार्ड डिस्क फॉर्मॅट (C:) करून डाऊनलोड केलेल्या कॉपीवरून विंडो रिइन्स्टॉल करा. ४. विंडोज अपडेटच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्हाला योग्य असणार्या वेळेमध्ये "ऑटो अपडेट" ऑप्शन स्विकारा. पुढच्या २-३ दिवसांत, विंडोज तुमच्या मूळ कॉपीनंतर तुमच्या संगणकासाठी प्रसिद्ध झालेले सर्व अपडेट इन्टॉल करून, तुमच्या संगणकावरची विंडोज अप-टू-डेट करून देईल. ========================= विंडोज सेटींग्जच्या, विंडोज रिकव्हरी ऑप्शनमध्ये "रिकव्हरी पॉईंट" सेट करता येतो. तो, (अ) विंडोज उत्तम अवस्थेत चालू आहेत अश्या वेळेस सेट करावा व (आ) प्रत्येक मोठ्या अपडेटनंतर, विंडोज उत्तम अवस्थेत चालू असल्याची खात्री करून, रिसेट करत जावे. विंडोज त्रास देऊ लागल्यास, रिकव्हरी ऑप्शनमध्ये जाऊन, विंडोज जेथवर उत्तम चालू होती त्या "रिकव्हरी पॉईंट"पर्यंत मागे नेता येते. मागे गेल्यामुळे नाहिसे झालेले अपडेट (वर सांगितल्या प्रमाणे "विंडोज अपडेट"चे सेटिंग ठेवल्यास) विंडोज आपोआप परत इन्स्टॉल करते. ========================= ओएस बिघडली व हार्ड डिस्क फॉर्मॅट करायची पाळी आली तरी डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी, ओएस इन्टॉल करताना C: व D: अशी दोन पार्टीशन्स बनवा. ओएस C: वर आणि डेटा D: वर ठेवा. ओएस त्रास देऊ लागल्यास, केवळ C: पार्टीशन फॉर्मॅट करून ओएस रिइन्स्टॉल करता येते व D: वरचा डेटा सुरक्षित राहतो. अर्थातच, हा डेटा बॅकअपचा पर्याय नाही, तर ओएस झटपट रिइन्स्टॉल करण्यासाठी व डेटा वाचवण्यासाठीचा प्राथमिक स्तराचा सुरक्षा उपाय आहे. =========================रैट.
In reply to माझ्या विंडोज होम माझ्या एच by डॉ सुहास म्हात्रे
आयपी अॅड्रेस् बदला आणि तो
In reply to फक्त जीमेल आयडी की ....... by सुधीर कांदळकर
मी रेल्वेचे वाइफाइ वापरतो
मी जालावर वावरताना क्षकिरण
कोणकोण कायकाय टंकतय
+1
In reply to कोणकोण कायकाय टंकतय by श्वेता२४
अर्थातच
In reply to +1 by शब्दबम्बाळ
@ श्वेता२४ ,
नाही कंजुसजी
ते नॉन सेन्स प्रतिसाद तर जाऊच
In reply to नाही कंजुसजी by श्वेता२४
नाही पि.रा.
In reply to ते नॉन सेन्स प्रतिसाद तर जाऊच by पिलीयन रायडर
तुम्चा मेल आयडी दुसर्याकुणी
In reply to नाही पि.रा. by श्वेता२४
।
इथं असं झालेलं नाही
In reply to । by कंजूस
ओके
नमस्कार पियुशा ताई,
hangout बोलण्यासाठी आहे का
हंगआउट
In reply to hangout बोलण्यासाठी आहे का by कंजूस
हँगऑट्स हे गुगलचे "चॅट,
In reply to hangout बोलण्यासाठी आहे का by कंजूस
जीमेल/ गुगलवर लॉगिन असताना ईतर ब्राउसिंग न करणे
>>तुम्चा मेल आयडी दुसर्
काका, हॅक झाल्यावर सेटिंगस
In reply to >>तुम्चा मेल आयडी दुसर् by कंजूस
क्र ५ आणि नोटिफिकेशनबद्दल
@ श्वेता२४
म्हात्रे सर
In reply to @ श्वेता२४ by डॉ सुहास म्हात्रे
म्हणजे स्पर्शिकाने,
In reply to म्हात्रे सर by श्वेता२४
म्हात्रे सर
In reply to म्हणजे स्पर्शिकाने, by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही आधी तुमचा इमेल आयडी
In reply to म्हात्रे सर by श्वेता२४
+१
In reply to तुम्ही आधी तुमचा इमेल आयडी by रुपी
gmail login alert चा संदेश मला कधीही आला नाहीयावरून माझा वरचा अंदाज खरा ठरत आहे.फक्त यांचेच मेल का काढले अथवा
In reply to म्हणजे स्पर्शिकाने, by डॉ सुहास म्हात्रे
कोणी स्पर्शिका जोशींनाच असे
विषाची
In reply to कोणी स्पर्शिका जोशींनाच असे by आदूबाळ
चांस घ्या ना तुम्ही ?
In reply to विषाची by नाखु
थेट
In reply to चांस घ्या ना तुम्ही ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकंदरीत या स्पर्शिका ताईंनी बऱ्याच मिपाकरणींच्या आयडी ला स्पर्श
माबोचा धागा वाचलात का?मी अगदी
In reply to एकंदरीत या स्पर्शिका ताईंनी बऱ्याच मिपाकरणींच्या आयडी ला स्पर्श by चामुंडराय