मिपाच्या मुखपृष्ठावर करुणानिधींना श्रद्धांजली? ये बात कुछ हजम नही हुवी!

Primary tabs

रंगीला रतन's picture
रंगीला रतन in काथ्याकूट
9 Aug 2018 - 12:07 pm
गाभा: 

तामिळ भाषेसाठी त्यांचे योगदान कितीही मोठे असले तरी करुणानिधींसारख्या भ्रष्टाचार, घराणेशाही , LTTE शी संबंध असल्याचे आरोप झालेल्या व्यक्तीला मिपा सारख्या मराठी अंतरंग-मराठी अभिव्यक्ती ब्रीदवाक्य असणाऱ्या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर श्रद्धांजली? ये बात कुछ हजम नही हुवी!
चू.भू.द्या.घ्या.

प्रतिक्रिया

नीलकांत's picture

9 Aug 2018 - 1:22 pm | नीलकांत

बहुआयामी लोक असतात. त्यांच्या काही गुणांचे कौतुक करण्यात अडचण नाही. करुणानिधी हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते.
मिपातर्फे त्यांना श्रद्धांजली देण्यात आली ती त्यांच्या आपल्या मातृभाषेचा अभिमान जपणाऱ्या नेत्याच्या स्वरूपात. त्याकाळात जेव्हा केंद्रशासनाच्या शक्तीने हिंदी भारतावर लादण्याचा प्रयत्न केला जात होता तेव्हा अन्य भारतीय भाषांनी त्याला विरोध केला. त्यामध्ये तामिळनाडू , तामिळ जनता व करुणानिधी पुढे होते. आज मराठीला प्रादेशिक व हिंदीला राष्ट्रीय समजणाऱ्या दुर्दैवी काळात मराठीचा अभिमान कसा बाळगावा यासाठी तामिळकडून शिकण्यास काहीच हरकत नाही असे वाटते.
मराठीचा उल्लेख झाल्यावर सावरकरांचा उल्लेख येतो. त्यांच्या उदाहरणानुसार बोलायचे झाल्यास ज्या भावनेने म्हणजे केवळ प्रेरणा मिळावी म्हणून जोसेफ मॅझणी व गॅरीबाल्डी यांचे चरित्र मराठीत लिहिले तश्याच, पण येथे भाषिक अस्मितेच्या संदर्भाने करुणानिधीना श्रद्धांजली.
- मराठी नीलकांत

ते स्वाक्षरीत जरा "एम निलकांथ" केलं तर जास्त संयुक्तिक ना? ;)

ओम शतानन्द's picture

10 Aug 2018 - 1:16 pm | ओम शतानन्द

बहुआयामी लोक असतात. त्यांच्या काही गुणांचे कौतुक करण्यात अडचण नाही. करुणानिधी हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते.
नथुराम गोडसे हे ही बहुआयामी व्यक्तिमत्व होते.
त्यांच्याही गुणांचे कौतुक करण्यात अडचण वाटू नये.

भाषिक अस्मितेचा मुद्दा असला तरीही मलाही करुणानिधी ब्यानर पटलेले नाही. मातृभाषेचा अभिमान आणि भाषेचा अट्टाहास ह्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि तामिळी अभिमान हा अट्टाहास रुपात बघण्यात येतो.

मेजर राणे ह्यांना आठवणीने ब्यानरवर जागा दिलीत, धन्यवाद!

चाणक्य's picture

9 Aug 2018 - 2:19 pm | चाणक्य

+१

रंगीला रतन's picture

9 Aug 2018 - 2:22 pm | रंगीला रतन

+१०१

तेजस आठवले's picture

9 Aug 2018 - 7:18 pm | तेजस आठवले

+१
हेकटपणा, दुराभिमान, आढ्यता, इतर भाषांना तुच्छ लेखणे, आर्यन थिअरी प्रमाण मानून द्रविड नसलेल्यांचा दुस्वास करणे,प्रचंड लॉबिंग करणे, दुसऱ्या देशातील आपल्यासारख्या लोकांसाठी आपल्या संघराज्यातल्या सरकारची स्थिरता धोक्यात आणणे इ.इ. दुर्गुण सर्वसाधारणपणे तामिळ अस्मितेत येतात.
सर्वांशी समरस होऊन काही गोष्टींचा आस्वाद घेणे, माहिती, साहित्य, संस्कृतींची देवाणघेवाण करणे ह्याने आपल्या संस्कृतीच्या कक्षा रुंदावू शकतात हे मान्य नसलेला वर्ग.

शहीद राणे यांना सलाम.

ज्योति अळवणी's picture

10 Aug 2018 - 1:42 pm | ज्योति अळवणी

यशोधराजींना अगदी सहमत

नीलकांत साहेब खुलाशा साठी आभार.
भाषिक अस्मितेच्या संदर्भाने वाहिलेली श्रद्धांजली कितपत पटली हा भाग निराळा पण निदान त्या मागची भूमिका समजली.

प्रसाद_१९८२'s picture

9 Aug 2018 - 3:11 pm | प्रसाद_१९८२

या दिवंगत करुणानिधी यांनी सतत हिंदी भाषेला कडाडून विरोध केला, प्रसंगी हा विरोध हिसंक देखील होता. त्यांच्या ह्या कामगिरीवरुन त्यांना प्रसारमाध्यमे व बुद्धीजीवी लोकांनी "आपल्या मातृभाषेचा अभिमान जपणारा नेता" हे बिरुद दिले मात्र "हिंदी भाषेला" तोच विरोध महाराष्ट्रात करणार्‍या मनसे प्रमुख राज ठाकरे यांना त्याच प्रसारमाध्यमांनी व इतर बुद्धीजीवी लोकांनी खलनायक, प्रांतवादी, गुंडा वगैरे ठरवले.

यव्हढं काय त्यात ? त्यांना बी जागा देवु की !!!!

विजुभाऊ's picture

9 Aug 2018 - 4:05 pm | विजुभाऊ

"आपल्या मातृभाषेचा अभिमान जपणारा नेता" हे बिरुद दिले मात्र "हिंदी भाषेला" तोच विरोध महाराष्ट्रात करणार्‍या मनसे प्रमुख राज ठाकरे यांना त्याच प्रसारमाध्यमांनी व इतर बुद्धीजीवी लोकांनी खलनायक, प्रांतवादी, गुंडा वगैरे ठरवले.
सहमत. द्रविडी अस्मिता म्हणणारे मराठी लोक मराठी च्या आंदोलनाला मात्र प्रादेशीक संकुचित म्हणतात .
राज ठाकरेंच्या हिंदी विरोधाला उत्तर भारतीय चॅनेल्स त्याना खलनायक म्हणून उभे करतात. पण कोणत्याच हिंदी चॅनेल ने हिंदी भाषीक उत्तर भारतीयाना देशोधडीला लावणार्‍या यादवांविरुद्ध एकही वाक्य उच्चारलेले नाहिये.
मूर्ख उत्तर भारतीय विचारसरणीचे ओझे वहाण्यापेक्षा स्वतंत्र बाणा कधीही चांगला.

रामदास२९'s picture

9 Aug 2018 - 8:54 pm | रामदास२९

हे खर आहे .. राज ठाकरेन्ची ही भुमिका योग्य आहे..

जयंत कुलकर्णी's picture

9 Aug 2018 - 5:24 pm | जयंत कुलकर्णी

निलकांत यांना विनंती !

मुखपृष्ठावर डावीकडे दिसणार्‍या माणसाने उजवीकडे दिसणार्‍या माणसांसारख्या अनेक माणसांच्या मृत्यूस हातभार लावला आहे आणि ते सुद्धा प्रभाकरनच्या प्रचाराला बळी पडून. मला वाटते ही दोन्ही छायाचित्रे एकाचवेळी मुखपृष्ठावर झळकवणे हे योग्य होणार नाही.... किंबहुना डावीकडील माणसाचे योगदान द्रविडीस्थान हे आहे तर उजवीकडील माणसाचे योगदान भारत एकसंध ठेवणे हे आहे...

There were several critics of Rajiv Gandhi’s military misadventure. But no one criticised individual soldiers being dragged into a thankless, unwinnable war as Karunanidhi did when he refused to receive the last contingent of the IPKF which was sent packing by then President R. Premadasa after reaching a compact with the Tigers in 1989. Swallowing the LTTE propaganda, Karunanidhi said he could not receive an army that “killed thousands of innocent Tamils and raped Tamil women”.

So outrageous was this statement that a senior army officer of the IPKF, himself a Tamil, wanted to resign and go public against Karunanidhi, but was prevailed upon by his superiors not to do so.

शेवटी तुमची मर्जी.
जयंत कुलकर्णी.

रंगीला रतन's picture

9 Aug 2018 - 6:58 pm | रंगीला रतन

असंच काहिसं म्हणायचं होत मला पण शब्द सामर्थ्यात कमी पडलो. एकवेळ कोणी साहित्यिक लेखक गेला बाजार कवीला इथे स्थान दिले असते तरी वावगे नसते ठरले पण करुणानिधी सारख्या वादग्रस्त राजकारण्याला ब्यानर वर बघून विचित्र वाटले.

नीलकांत's picture

9 Aug 2018 - 11:00 pm | नीलकांत

नमस्कार सर,

करूणानिधी आणि स्व. मेजर राणे यांची तुलना नक्कीच नाही. किंवा त्यांना एका समान पातळीवर मोजन्याचा जरा सुध्दा प्रयत्न नाही. केवळ मागे पुढे घडलेल्या घटनाक्रमामुळे एकाच बॅनरवर आपण दखल घेतली एवढंच. याशिवाय दोघेही एकाच बॅनरवर आहेत याला अन्य काही अर्थ नाही. तसा गैरसमज झाला असल्यास मी दिलगीर आहे.

माहितगार's picture

9 Aug 2018 - 5:38 pm | माहितगार

...पण येथे भाषिक अस्मितेच्या संदर्भाने करुणानिधीना श्रद्धांजली....

प्रतिसादातून नीलकांतजींच्या भावना समजल्या. करुणानिधींच्या तामीळ भाषेवर प्रेम व्यक्त करणार्‍या कवितेचा अनुवाद अभ्यासल्यास त्यातील काही भावना नक्कीच उदात्त आहेत. या लिंकेवर इंग्रजी अनुवाद उपलब्ध आहे पण कॉपीराईट गांभीर्यामुळे इथे च्योप्य्पेस्ट करणे शक्य नाही. तेव्हा काही ओळींचा इंग्रजी ते मराठी अनुवाद मीच करुन देतो.

त्यांच्या Semmozhiyaana Thamizh Mozhiyaam गिताची सुरवात

सर्व सजीवांसाठी ( ते जन्माने समान असतात), त्यांच्या जन्मानंतर प्रत्येक जागा घर आहे, प्रत्येक जण नातेवाईक !

हिंदी विरोधी अंदोलन करणारे करुणानिधी तरुण वयात राज ठाकरेंप्रमाणे मते ठेवत होते का कल्पना नाही. उपरोक्त ओळी त्यांनी बर्‍याच उशीराने लिहिलेल्या काळातील असल्या तरी राज ठाकरेंच्या भूमिकेहून दूर दिसतात. करुणानिधींचा विरोध भाषिक वसाहतवादाला असावा भाषिक समुहांना तेवढा नसावा किंवा असला तरी काळाच्या ओघात मावळला असावा. 'त्यांच्या जन्मानंतर प्रत्येक जागा घर आहे,' मधील विचार श्रीलंकन तामीळांच्या वरील दबावातून बनला असल्यास कल्पना नाही.

अजून एक ओळ आहे त्यात ते म्हणतात

चांगले किंवा वाईट इतरांमुळे घडत नाही, ते आपण आपल्यावर लादलेले असते

त्यांची हि ओळ अप्रत्यक्षपणे त्यांच्या हिंदी विरोध आणि आर्यन इन्व्हॅजन थेअरीने बनलेल्या मता सोबत समजून घेता येईल का ? चांगले किंवा वाईट इतरांमुळे घडत नाही या वाक्यात ते दुसर्‍या पक्षास दोष देत नाहीत असे वाटत असतानाच 'ते आपण आपल्यावर लादलेले असते' म्हणत सुप्त संघर्षाची नांदी करत असतात. त्यांची हि पॉलीसी मराठी मराठी प्रेमींना कितपत जमणे दूर समजेल या बाबत ही साशंकता वाटते.

त्याच वेळी ते खालील ओळीतून संघर्षाला मर्यादाही घालताना दिसतात

आमची तामीळ भाषा आम्हाला युद्ध आणि द्वेष मागे सारायला शिकवते, आणि आमची तामीळ भाषा आम्हाला मटेरील वेल्थ सर्वांची कॉमन असल्याचे शिकवते .

मटेरील वेल्थ सर्वांची कॉमन असल्याचे शिकवते . म्हणणारा विचार चक्क साम्यवादी आहे तरी ते कम्युनीस्ट का नव्हते याची कल्पना नाही.

आमची तामीळ भाषा अनादी आणि अनंत आहे

हा विचार तमीळ भाषेस इतर सर्व गोष्टींपेक्षा मोठा करतो . त्याच वेळी भाषाशास्त्रीय दृष्ट्या वस्तुनिष्ठ नाही आणि ह्या वस्तुनिष्ठतेचा अभाव तामीळ आत्मगौरवास आत्मगर्वाच्या पातळीवर केव्हा घेऊन जातो ते त्यांचे त्यांनाही समजत नाही.

तामीळचा आग्रह धरण्यात काहीच चुकीचे नाही. पण तो आग्रह त्यांच्या पद्धतीने टोकास नेताना आपल्याच देशात काही हजार वर्षे विकसीत होत गेलेल्या भाषा आक्रमकांच्या ठरवून , परकीय खंडातील इंग्रजी भाषेचे शारण्य पत्करण्यातील शहाणपण मेकॉलेप्रेमींना समजले तरी माझ्या सारख्या देशप्रेमी अज्ञानी लोकांना उमजत नाही. नेपाळी लोकांनी देवनागरी आणि संस्कृत स्विकारले म्हणून नेपाळी भाषेचे उत्तरप्रदेश बिहार शेजारी असून नेपाळी भाषेस नुकसान झाले नाही (तेच पुर्णच पाणी सोडलेल्या राजस्थानी लोकांना स्थानिक भाषेची ओळख शिल्लक ठेवावी वाटली नाही) तेव्हा दुसर्‍या भाषा स्विकारताना अथवा नाकारताना भाषिक अभिमानाची रेष नेमकी कुठे आणि कशी ओढायची याचे भान असण्याची गरज असावी. प्रत्येक जण कुठेतरी कमी पडतो तमीळ कुठे कमी पडले तर हरकत नाही पण एकुण स्थानिक अस्मिता जपताना देशाच्या एकात्मतेसाठी लागणारी मुरड घालून संवाद भाषा म्हणून आंध्र, कर्नाटक आणि केरळ आणि इतर अहिंदी भाषी राज्ये त्रिभाषा सूत्र म्हणून शैक्षणिक अभ्यासक्रमात स्विकारती झाली तसे तामीळनाडू ने स्विकारलेले नाही.

प्रश्न केवळ एकात्मतेचा नाही, तेलगू, कन्नड मल्याळम मराठी बंगाली, असामी , गुजराथी, पंजाबी आपापल्या वेगळ्या भाषिक अस्मिता जपतात. तामीळीं आणि कन्नडीगांनी वेगळीच टोके गाठल्यामुळे राष्ट्रीय राजकारणात महाराष्ट्रासहीत दक्षिणेची आघाडी करुन राष्ट्रीय राजकारणात समतोल साधण्याची संधी , द्रमुकच्या सवता सुभा राजकाराणाने घालवली का असे बर्‍याचदा वाटून जाते.

असो इन एनी केस माणूस खूपच वाईट होता असे नाही, तरी पण केलेल्या उत्पातमुल्याधारीत सवत्या सुभ्याच्या भाषिक राजकारणाचा एकुण परिणाम भारतात इंग्रजी भाषेचे अधिपत्य टिकून रहाण्यात झाला . व्यक्तिगत स्तरावर परिवारवाद नेपोटीझम मधून हा माणूस इतर बर्‍याच भारतीय आदर्श परिवारवादाप्रमाणे दूर राहू शकला नाही हे वास्तवही कुठे तरी स्विकारावे लागते. आणि मृत्यूपरांत सहानुभूती बाळगून श्रद्धांजली वाहणे योग्य असले तरी मराठी मिपाच्या मथळ्यावर जाण्याच्या करुणानिधींच्या योग्यते बाबत धागा लेखका प्रमाणे हलकीशी साशंकता वाटते. (अर्थात धागा लेखका प्रमाणे श्रीलंकेतील तामीळी अतीरेकाची अंशतः जबाबदारी द्रमुक करुणानिधींच्या वाटेस गेली तरी इंदिरांजींचे शीत युद्धकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणही त्यास अंशतः कारणीभूत असावे)

आज राज ठाकरेंची महाराष्ट्रीय नेत्यात सर्वाधिक शोधप्रीयता असेल (गूगल ट्रेंड) पण त्यांची तुलना प्रबोधनकार ठाकरेंशी करणे जसे उचित होणार नाही तसेच ते करुणानिंधीशी करणेही योग्य नसावे असे वाटते.

रंगीला रतन's picture

9 Aug 2018 - 7:04 pm | रंगीला रतन

अंशतः सहमत.

जेम्स वांड's picture

9 Aug 2018 - 10:11 pm | जेम्स वांड

तरी ते कम्युनीस्ट का नव्हते याची कल्पना नाही.

पोराचं नाव स्टालिन ठेवलंय तरी ही शंका का यावी?

माहितगार's picture

9 Aug 2018 - 10:28 pm | माहितगार

खरचं की, एकदम मान्य

कदाचित सोव्हीएत मॉडेलचे आदर्श आणि रशियनांनी नेहरु - इंदिराशी जमवून घेण्यामुळे करुणानिधींना राष्ट्रीयधारेत सामील करुन घेणे जमले असेल ?

नाखु's picture

9 Aug 2018 - 7:02 pm | नाखु

एकाच फलकावर लावण्यात आले आहेत हे आवडलं नाही

अर्थात हे वैयक्तिक मत म्हणून दुर्लक्ष केले तरी हरकत नाही.

लेख आणि फलकावर जागा ह्या दोनही वेगवेगळ्या प्रकारच्या मानवंदना आहेत असा माझा समज होता.

आडगावचा कंपूहीन नाखु बिनसुपारीवाला

फोटो पाहून वाईट वाटले.भाषिक अस्मिता ही करुणानिधींची मक्तेदारी नव्हे.ते सर्व तमिळांचे यश.

https://amp.scroll.in/article/872338/dmk-leader-mk-stalin-says-he-hopes-...

माहितगार's picture

9 Aug 2018 - 10:00 pm | माहितगार

नेहरु - इंदिरा नेतृत्वातील काँग्रेस फुटीरता वादास कंटोल करण्यात राजकिय दृष्ट्या यशस्वी झाली तरी, आयडीयॉलॉजीतील तार्कीक उणीवा खोडून काढण्यात नेहरु - इंदिरा नेतृत्वातील काँग्रेस सम हाऊ कमी पडत राहीली , किंबहूना भारतीय राष्ट्रवाद मग तो नेहरुंचा असो अथवा सावरकरांचा किंवा त्या आधीचा या आवश्यक युक्तीवादाच्या किंवा जसे राजीव मल्होत्रा म्हणतात तसे इंडियन ग्रँड नॅरेटिव्ह समजून घेणे आणि समजावून देणे किंबहूना पुश करण्याच्या फ्रंटवर बराच कमी पडत रहातो असे वाटत रहाते.

यांच्या हिंदीविरोधाचं खरं कारण हे आहे.

The concept of Dravida Nadu had its root in the anti-Brahminism movement in Tamil Nadu, whose aim was to end the alleged Brahmin dominance in the Tamil society and government. The early demands of this movement were social equality, and greater power and control.[8] However, over the time, it came to include a separatist movement, demanding a sovereign state for the Tamil people. The major political party backing this movement was the Justice Party, which came to power in the Madras Presidency in 1921.

Since the late 19th century, the anti-Brahmin Tamil leaders had stated that the non-Brahmin Tamils were the original inhabitants of the Tamil-speaking region.[9] The Brahmins, on the other hand, were described not only as oppressors, but even as a foreign power, on par with the British colonial rulers.[10]

The prominent Tamil leader, E. V. Ramasami (popularly known as "Periyar") stated that the Tamil society was free of any societal divisions before the arrival of Brahmins, whom he described as Aryan invaders. Periyar was an atheist, and considered the Indian nationalism as "an atavistic desire to endow the Hindu past on a more durable and contemporary basis".[11]

The proponents of Dravida Nadu constructed elaborate historical anthropologies to support their theory that the Dravidian-speaking areas once had a great non-Brahmin polity and civilisation, which had been destroyed by the Aryan conquest and Brahmin hegemony.[10] This led to an idealisation of the ancient Tamil society before its contact with the "Aryan race", and led to a surge in the Tamil nationalism.[9] Periyar expounded the Hindu epic Ramayana as a disguised historical account of how the Aryans subjugated the Tamils ruled by Ravana.[12] Some of the separatists also posed Saivism as an indigenous, even non-Hindu religion.

The Indian National Congress, a majority of whose leaders were Brahmins, came to be identified as a Brahmin party.[8] Periyar, who had joined Congress in 1919, became disillusioned with what he considered as the Brahminic leadership of the party.[9] The link between Brahmins and Congress became a target of the growing Tamil nationalism.

In 1925, E.V.Ramasamy launched the Self-respect movement, and by 1930, he was formulating the most radical "anti-Aryanism".[10] The rapport between the Justice Party and the Self-Respect movement of E.V.Ramasamy (who joined the party in 1935) strengthened the anti-Brahmin and anti-North sentiment. In 1937–38, Hindi and Hindustani were introduced as new subjects in the schools, when C. Rajagopalachari of Congress became the Chief Minister of Madras Presidency. This led to widespread protests in the Tamil-speaking region, which had a strong independent linguistic identity. Periyar saw the Congress imposition of Hindi in government schools as further proof of an Aryan conspiracy.

https://en.m.wikipedia.org/wiki/Dravida_Nadu वरुन

या करुणानिधी आणि त्यांच्या पक्षाला स्वभाषेबद्दल एवढंच प्रेम होतं तर त्रिचनापल्ली आणि चेन्नैत राष्ट्रभाषा प्रचार समितीमार्फत हिंदी शिकवणं अजूनही का सुरु आहे?

माहितगार's picture

9 Aug 2018 - 9:51 pm | माहितगार

राष्ट्रभाषा प्रचार समितीमार्फत हिंदी ला तामीळनाडूत चांगला रिस्पॉन्स असावा.

चौथा कोनाडा's picture

15 Aug 2018 - 12:41 pm | चौथा कोनाडा

चेण्णैजवळ्च्या उपनगरात रहात असताना "स्पोकन हिंदी"च्या काही पाट्या दिसायच्या !
वाटायचं, आपणपण असला एक बोर्ड लावावा !

पिलीयन रायडर's picture

9 Aug 2018 - 7:30 pm | पिलीयन रायडर

स्पष्टीकरण ओढून ताणून वाटलं.. करुणानिधीचें बॅनर आवडले नाही.

उपयोजक's picture

9 Aug 2018 - 7:46 pm | उपयोजक

मिपाला जन्मशताब्दीचे वर्ष असलेल्या सुधीर फडकेंची आठवण आली नाही, पण करूणानिधीला श्रद्धांजली अर्पण कराविशी वाटली.

नाखु's picture

9 Aug 2018 - 7:53 pm | नाखु

योगदान दखलदायक नसावं कदाचित!

रंगीला रतन's picture

9 Aug 2018 - 8:03 pm | रंगीला रतन

:-)

केवळ त्यांचा बॅनर नाही म्हणून त्यांचं योगदान अदखलपात्र होतं असं नव्हे. माझ्या आठवणीप्रमाणे मराठी दिनाच्या बॅनर वर सुधीर फडके ह्यांना स्थान मिळालेलं आहे.

तुम्ही काढलेल्या सुधीर फडकेंची आठवण धाग्याची लिंक द्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2018 - 8:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकच प्याला हे राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या मराठी नाटकाला १०० वर्ष झाली पण एक कपभर सुद्धा उल्लेख मिपवर आला नाही की गडक-यांचा कुठे फोटो मिपावर लागला नाही, गूगलवर गडकरी शोधायला गेले तर नितीन गडकरी यांची माहिती सापडते, येत्या पिढीला रा.ग, गडकरी कोण होते त्यांचं काय योगदान होते यावर एक बॅनर आणि लेखन अपेक्षित होतं, तेव्हा कुठे जातो यांचा धर्म काय माहिती.

-दिलीप बिरुटे

रामदास२९'s picture

9 Aug 2018 - 8:50 pm | रामदास२९

राम वगैरे देवतान्ची, हिन्दू सन्स्क्रुतिची यथेच्छ टिन्गल मारणारा, द्रविड सन्स्क्रुति चा (तथाकथित) वारसा चालविणारा, भ्रष्टाचाराचा मेरुमणी, नीतिमत्ताहीन .. हा कसला भाषाभिमानी.. लिट्टे शी सम्बध जोडून निवडणूका जिन्कणारा .. ह्याच्या विषयी कसला आदर

रामदास२९'s picture

9 Aug 2018 - 8:52 pm | रामदास२९

मेजर राणे ह्यांना कोटी कोटी वेळा नमस्कार ..

आपल्या देशाचा पंतप्रधानाच्या हत्या करणार्याच्यां गौरव करणारी कविता लीहिणारांचा फोटो मिसळपावच्या मुखपृष्ठावर पाहुन मनाला यातना होतात. तामिळ अस्मितेपायी आपण किती जवान गमवले ? श्रीलंकेबरोबर आपले संबंध कायमचे बिघडले. देशात प्रांतियवाद वाढला. कोवळ्या वयात देशासाठी सर्वस्व अर्पण करणार्या जवानाच्या फोटो शेजारी, आपल्ल्या नातेवाईकांसाठी देशाचा खजिना लुटु देणारार्याचा फोटो ?

रामदास२९'s picture

9 Aug 2018 - 9:10 pm | रामदास२९

खरय .. जसा काही हे नसताना तमिळ भाषिकान्ना भाषा प्रेम्च नव्हत.. याने फक्त एक केला जाति जातित द्वेष आणि भाषाप्रेमाच व्यापारी करण करून सर्व पदान्वर कुटुम्बीयान्ची भरती ..

जेम्स वांड's picture

9 Aug 2018 - 10:25 pm | जेम्स वांड

तूर्तास जास्त बोलणे इष्ट नाही. बॅनर आवडले नाही , ताज्या घडामोडी धाग्यात संपादक मंडळाच्या वतीने कोणीतरी श्रद्धांजली वाहिली असती तरी भागले नसते.

दुसरं म्हणजे मेजर राणेंचा वेगळा काढून लावलेला फोटोही आवडलेला नाही. मी तेव्हा मिपावर नव्हतो पण कर्नल संतोष महाडीकांचा फोटो बॅनर केला होता का? लावला नसला तर हा फरक का? लावला असला तर असे भाषा प्रांत इत्यादी ओळखी पलीकडे गेलेल्या वीरांचे असे क्षेत्रीय अन भाषिक वर्गीकरण करून चिकटवणे बरे वाटत नाही (मला तरी) एकंदरीतच सैनिकांबद्दल आदर असला तर एक "मार्त्यर विंडो" सुरू करून (दुर्दैवाने) रोज (हकनाक) हुतात्मा होणाऱ्या प्रत्येक सैनिकांचा फोटो अपडेट करता येईल की त्यापेक्षा, किती वीर धारातीर्थी पडले ह्याचा एक कॅटलॉग होईल तो, एक डिजिटल मेमोरियल किंवा कैक लोकांना तरुण तरुणींना स्फूर्तिस्थान असलेलं एक जालीय प्रेरणास्थान.

मिपा हे एक खासगी संस्थळ आहे, हे धावते ठेवायला मालक नुसते झटत नाहीत तर ज्याचं सोंग वठवता येत नसतं असे दामाजीपंत पण खर्च करत असतात.

त्यामुळे त्यांनीच दिलेला मत मांडायचा हक्क वापरून मनातले लाऊड थिंकिंग इथं मांडलं तरी शेवटी त्यांनी त्यांच्या संस्थळांवर काय ठेवायचं हे ठरविणे त्यांचे वैयक्तिक "प्रेरोगेटिव्ह" आहे.

थोडक्यात, मालक म्हणत्याल ती उगवती!

माहितगार's picture

9 Aug 2018 - 10:40 pm | माहितगार

..थोडक्यात, मालक म्हणत्याल ती उगवती!

आपले मिपा मालक अगदीच असे (म्हणजे माझेच खरे म्हणून रेटणार्‍या माहितगार सारखे :) ) नाहीत म्हणूनच तर मिपाकर मनमोकळेपणे मते व्यक्त करत आहेत.

...त्यांचे वैयक्तिक "प्रेरोगेटिव्ह" आहे.

ते मान्य आहेच त्या बाबत शंका नाही. सदस्यांच्या साशंकता मिपा मालकांच्या निर्णयापेक्षा करुणानिधी आणि त्यांच्या मागच्या पार्श्वभूमीबाबत आहेत, ते त्या व्यक्त करत आहेत असे वाटते.

रंगीला रतन's picture

9 Aug 2018 - 11:08 pm | रंगीला रतन

आपले मिपा मालक अगदीच असे (म्हणजे माझेच खरे म्हणून रेटणार्‍या माहितगार सारखे :) ) नाहीत म्हणूनच तर मिपाकर मनमोकळेपणे मते व्यक्त करत आहेत.

पूर्णपणे सहमत. मिपाकर मनमोकळेपणे मते व्यक्त करत आहेत.

रंगीला रतन's picture

9 Aug 2018 - 11:05 pm | रंगीला रतन

भावना पोचल्या! सहमत आहे.

सतिश पाटील's picture

9 Aug 2018 - 11:10 pm | सतिश पाटील

अगदी अगदी आवडले.देशासाठी कामी आलेल्या जवानाला मुखपृष्ठावर श्रद्धांजली. पण दर दिवसाआड जवान अमर होताहेत, मग ही मालिका अखंड चालू ठेवावी.
कलाईनार- एक जाज्वल्य तामिळप्रेमी, बळजबरीने हिंदी प्रचार प्रसार करताना आपल्या तामिळ भाषेचं महत्व जाणून बुजून नेहरू सारखे लोक कमी करणार आणि त्याच अनुषंगाने तामिळ संस्कृतीवर देखील याचा प्रभाव पडलाच असता, हे वेळीच ओळखून भाषेवर होणारे अतिक्रमण अडवले.
राष्ट्रवाद, भाषाप्रेम हे कडवटच असावे.

4 ओळींचे एक वाक्य इंग्रजी आणि हिंदी शब्दांची कुबडी घेतल्या शिवाय बोलून दाखवायचा प्रयत्न करावा. मगच निलकांतवर घसरावे.

जेम्स वांड's picture

9 Aug 2018 - 11:24 pm | जेम्स वांड

4 ओळींचे एक वाक्य इंग्रजी आणि हिंदी शब्दांची कुबडी घेतल्या शिवाय बोलून दाखवायचा प्रयत्न करावा. मगच निलकांतवर घसरावे.

हे कोणाला उद्देशून होते जरा स्पष्ट करता येईल का?

नीलकांत's picture

9 Aug 2018 - 11:21 pm | नीलकांत

नमस्कार,
सहसा दक्षिणेबाबत आपण एवढं बोलत नाही. पण दक्षिणेचा आपल्या भाषेबाबतचा आग्रह मला आवडला त्याची दखल घ्यावी असे मनात होतेच त्याच वेळेस करुणानिधी वारले आणि त्यांना एक भाषाभिमानी असे म्हणून आपण श्रध्दांजली देऊया असे ठरवले. आपल्या भाषेचा अभिमान, त्या भाषेला कुणी दुय्यम म्हणत असेल तर प्रसंगी आपला आग्रह अट्टाहास वाटला तरी त्याची काळजी न करता आपली भुमिका कायम ठेवणारा लोकनेता म्हणून त्यांना श्रध्दांजली देऊया असे मनात होते.

जेव्हा विषय दक्षिणेच्या राजकारणाचा येईल तेव्हा ई पेरीयारस्वामी आणि द्रविड मांडणीशिवाय विषय पुढे जाणारच नाही. द्रविड मांडणी आणि गेल्या जवळपास शतकभरातील दक्षिणेतील हिंदू धर्माविषयीचा जाहीर आविष्कार याबाबत मला वाचून ठाऊक आहे. त्या सर्व प्रकाराशी मी सहमत असण्याची शक्यता नाहीच. करुणानिधी कम्युनिस्ट असतील तर त्याविषयीही मला काहीही ममत्व नाहीच.

मला आवडला तो त्यांचा त्यांच्या भाषेप्रति असलेला अभिमान. त्यासाठी त्यांना श्रध्दांजली.

एखादा मानुस आवडला म्हणजे तो १०० टक्केच आवडावा का? त्याच्यातील चांगलं वाईट निवडता येणार नाही का? मला सावरकर आवडतात म्हणून ते १०० टक्केच आवडले पाहिजेत का? तर तसं होत नाही. आपल्याला एखादे मत, एखादी भुमिका आवडली असे होऊ शकते ना? की अगदी भक्तच होणे आवश्यक आहे?

या धाग्यावर आपले मत मांडणार्‍या सर्व सन्माननिय सदस्यांच्या मताचा आदर आहे तसेच ज्यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यांच्या नाराजीची दखल सुध्दा घेतली आहे. यापुढे बॅनर करताना असे दोन भिन्न क्षेत्रातील लोकांना एकत्रीत न करण्याचा प्रयत्न राहील.
- नीलकांत

रंगीला रतन's picture

9 Aug 2018 - 11:29 pm | रंगीला रतन

आपले मनापासून आभार _/\_

नाखु's picture

10 Aug 2018 - 6:56 am | नाखु

आनंद द्विगुणित झाला

वाचकांची पत्रेवाला नाखु

श्री नीलकांत, आपला प्रतिसाद आवडला. मिपाच्या अग्रभागी करुणानिधींना स्थान दिल्याचेही खटकले नाही. ते आणि शहीद राणे एकाच कालावधीत दिवंगत झाले हा योगायोग.
करुणानिधी याचे स्थान तमीळनाडूत साधारण आपल्या कै बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे आहे. त्यांनी त्यांची प्रादेशिक अस्मिता ठामपणे मांडली. तमीळ ही एक प्राचीन आणि संपन्न भाषा असूनही तिची तितकीशी दखल राष्ट्रीय स्तरावर समाजात
घेतली जात नव्हती हा सल तमीळ जनतेत तीव्र स्वरूपात होता. त्याला त्यांनी तोंड फोडले. विविधतेतून एकता साधणे म्हणजे साऱ्या विविधता एकतेमध्ये विलीन करणे नव्हे. आपल्या देशाचे फेडरल - संघराज्यात्मक स्वरूप टिकण्यासाठी हे आवश्यक आहे.
आपण लिहिलेय त्याप्रमाणे रामस्वामी पेरियार, द्रवीड मुन्नेत्र कळ्हम, करुणानिधी यांच्या उल्लेखाशिवाय भारताचा इतिहास पुढे सरकू शकत नाही.
असों. बॅनरला समर्थन.

करुणानिधींनी त्यांचे स्वतंत्र स्थान निर्माण केले, ५ वेळा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले, दुर्दैवाने बाळासाहेब हयात असताना देखील शिवसेनेला तसे स्थान निर्माण करता आले नाहीच

उपयोजक's picture

10 Aug 2018 - 8:16 pm | उपयोजक

या करुणानिधी आणि त्यांच्या पक्षाला स्वभाषेबद्दल एवढंच प्रेम होतं तर त्रिचनापल्ली आणि चेन्नैत राष्ट्रभाषा प्रचार समितीमार्फत हिंदी शिकवणं अजूनही का सुरु आहे?

याचं कारण सांगाल?

राही's picture

10 Aug 2018 - 10:22 pm | राही

त्यांनी हिंदी बॅन करा असं म्हटलेलं नसावं. फक्त कुठूनही तमीळ भाषा आणि संस्कृतीवर कुरघोडी किंवा तिची गळचेपी होऊ नये असंच त्यांचं म्हणणं असावं बहुधा. मात्र त्या काळात त्रिभाषासूत्र जे निघालं होतं ते हिंदी भाषकांना खूपच फायदेशीर आणि अन्य प्रादेशिक भाषा बोलणाऱ्यांना अन्यायकारक होतं. त्याला कडाडून विरोध झाला होता.
राष्ट्रभाषाप्रचार समिती ही दक्षिणेत म्हणजे मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये बऱ्याच वर्षांपासून- अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत आहे. मद्रास प्रेसिडेन्सी हा बराच मोठा इलाका होता आणि तो बहुभाषिक होता. सध्याचा तमीळनाडु हा त्याचा एक भाग होता.

राही's picture

10 Aug 2018 - 10:29 pm | राही

आणि त्या काळात हिंदी पाट्याबाबत ' खळ्ळ खट्याक' कदाचित झालंही असेल पण भाषिक संस्था सक्तीने बंद पाडल्या गेल्या नसाव्यात. आता काळानुरूप किंवा उद्दिष्ट साध्य झाल्यामुळे तमीळ अस्मितेची धार बोथट झाली आहे.

माहितगार's picture

11 Aug 2018 - 7:31 am | माहितगार

@ राही

....फक्त कुठूनही तमीळ भाषा आणि संस्कृतीवर कुरघोडी किंवा तिची गळचेपी होऊ नये असंच त्यांचं म्हणणं असावं बहुधा. मात्र त्या काळात त्रिभाषासूत्र जे निघालं होतं ते हिंदी भाषकांना खूपच फायदेशीर आणि अन्य प्रादेशिक भाषा बोलणाऱ्यांना अन्यायकारक होतं. त्याला कडाडून विरोध झाला होता.

१) हिंदी भाषेस संवाद माध्यम म्हणून स्विकारण्यात इतर भाषिकांच्या साशंकतांमुळेच त्रिभाषासुत्राचा जन्म झाला. त्रिभाषा सुत्रामुळे हिंदी भाषी पाल्यांनाही हिंदी शिवाय एक इतर भारतीय भाषा शिकणे अनिवार्य होणार होते . हिंदी भाषकांनी त्रिभाषा सूत्र स्विकारले पण इतर भारतीय भाषा शिकण्या एवजी संस्कृत शिकण्याची पळवाट निवडली. आक्षेप संस्कृत शिकण्यावर नाही, हिंदी पाल्यांनी तिसरी भाषा हिंदी शिवाय इतर प्रादेशिक भाषा न निवडण्यावर आहे. आणि इतर भाषिकांचा हा आक्षेप एवढाच मर्यादीत ठेऊन आपापसात राजकीय समन्वय करुन हिंदी प्रदेशात इतर प्रादेशिक भाषा शिक्षणासाठी दबाव देता आला असता. द्रविड कळघम आणि त्यांचे तमिळ नेते आक्षेप घेण्यात सर्वात पुढे होते तर हिंदी शिवाय इतर भाषिकांशी समन्वयातही त्यांचा पुढाकार असावयास हवा होता. त्यात द्रविड कळघम आणि त्यांचे तमिळ नेतृत्व कमी पडले असे आपणास वाटत नाही का ?

२) हिंदीचा विरोध मुद्दा काही क्षणासाठी दूर करुन पहा , त्रिभाषा सूत्र घेऊन त्यांना किमान दक्षिणेतील इतर भाषांचे तेलगु/ कन्नड/मल्याळमचे शिक्षण त्यांना शाळातून देता आले असते ते तरी त्यांनी केले का ?

३) हिंदीच्या आक्रमणाला तर एकाच अपभ्रंश कुळातील असल्यामुळे मराठी आणि महाराष्ट्राला सर्वाधीक झेलावे लागते असे कोणते प्रत्यक्ष झेलणे तामीळींच्या वाट्याला आले ? केवळ त्रिभाषा सुत्रीत हिंदी शिकवण्याचे काम केरळ, कर्नाटक, आंध्र तिन्हींनी केले या तिन्हींनी भाषा शुद्धीकरणाच्या मोहीमा तमीळ लेव्हल ला नेल्या नाहीत या तिघांचे नेमके कोणते असे नुकसाने झाले ? तामीळ नाडूचा हिंदी विरोध हिंदीच्या प्रत्यक्ष आक्रमण फारसे न होताच पॅरानॉईआ/फोबीआ स्वरुपाचा नव्हता का ?

४) आपणास भाषा विवादातील काका कालेलकराम्ची भूमिका कल्पना आहे का ? हिंदी शिवाय इतर भाषीयांनी काका कालेलकराम्ची भूमिका का लावून धरली नाही ?

रंगीला रतन's picture

11 Aug 2018 - 1:58 am | रंगीला रतन

करुणानिधी याचे स्थान तमीळनाडूत साधारण आपल्या कै बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे आहे.?

काय बोलताय ह्याचे भान आहे का तुम्हाला ? कोणाची तुलना कोणा बरोबर करताय?
बाळासाहेबांनी तामिळ भाषिकांचे अतिक्रमण रोखण्यासाठी हटाओ लुंगी बजाओ पुंगी चा नारा दिला होता. जर तुमच्या लाडक्या करुणानिधींनी रोजगाराच्या संधी तामिळनाडूमध्ये निर्माण केल्या असत्या तर का त्या बिच्चार्या तामिळ लोकांना एवढे दूर महाराष्ट्रात येऊन स्थयिक व्हायची वेळ आली असती का?

तामीळनाडूतून बाहेर पडलेले लोक मुख्यतः "ब्राम्हण" होते कारण "ग्रेट द्रविडीयन मुव्हमेंट"मुळे ब्राह्मणविरोधी वातावरणात त्यांना नोकऱ्या मिळणे शक्यच नव्हते.

त्यामुळे तेथील उच्च शिक्षित tambram (तामिळ ब्राम्हण) हे सरकारी मुलकी खात्यात गेले आणि पार उच्च पदावर पोहोचले. उदा. इसरो( कस्तुरीरंगन , राधाकृष्णन), भाभा अणुसंशोधन केंद्र /अणुऊर्जा आयोग (राजा रामण्णा, एम आर श्रीनिवासन, पी के अय्यंगार, आर चिदंबरम)

बाकी जे अर्धशिक्षित होते त्यांनी मुंबईत येऊन टायपिस्ट, स्वीय सहाय्यक सारख्या नोकऱ्या धरल्या. यात त्यांना इंग्रजी उत्तम येत होते ही वस्तुस्थिती. या लोकांनीच "माटुंगम" सारख्या ठिकाणी वस्ती केली. यांची दुसरी पिढी अमेरिकेत स्थायिक झाली आहे.

"बाकी हटाव लुंगी बजाव पुंगी" मुळे किती मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या हा एक वादाचा मुद्दा आहे

चिगो's picture

13 Aug 2018 - 1:40 pm | चिगो

विविधतेतून एकता साधणे म्हणजे साऱ्या विविधता एकतेमध्ये विलीन करणे नव्हे.

ह्या वाक्यासाठी टाळ्या, राहीजी.. एवढं जरी नेत्यांना आणी जनतेला कळलं, उमगलं तरी अनेक तंटे, मतभेद आणि प्रश्न मिटतील.

जेम्स वांड's picture

9 Aug 2018 - 11:33 pm | जेम्स वांड

पेरियार/अन्नादुराई/करुणानिधी वगैरे मंडळींचे मराठीबद्दल काय विचार होते ह्यावर काय सांगता येईल कोणाला?

ह्यात जे उत्तर येईल त्यावरून मी (माझ्यापुरते) तामिळ भाषाप्रेमी करुणानिधी ह्यांचा मराठी भाषाप्रेमी वांडो म्हणून आदर करायचा की नाही हे ठरवून घेईन!.

(मराठमोळा) वांडो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2018 - 8:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्यासेठ, धागा पाहिलाच नव्हता. अभ्या म्हटला की काहीतरी कुटाना आहेच. =))

अरे वेगवेगळे फोटो लावायचे ना भो.... भावनिक आणि वैचारिक गोंधळ होतो रे...आणि माणूस टेंपररी हर्ट बीर्ट होतो, तेही इथं व्यक्त येता होतं म्हणून, नाय तर तसंही त्याला काय किंमत बिम्मत नसते. मी तर अभ्या बॅनर आवडलं असा मेसेज करून मोकळाही झालो होतो.

स्व.मेजर कौस्तुभ राणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. स्व. करूणानिधी यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.

अवांतर : अभ्यासेठ, संसार वगैरे काय म्हणतो ? आपण कधी भेटणार ? बसून गप्पा वगैरे करू म्हणतो. सॉरी हं एकाच प्रतिसादात वेगवेगळे विषय घेतल्यामुळे कोणा वाचकांच्या भावना वगैरे दुखावल्या असतील तर दिलगीरी वगैरे आहेच.बाकी चालू द्या....!

-दिलीप बिरुटे
(अभ्याच्या बॅनरचा फ्यान)

अभ्या..'s picture

10 Aug 2018 - 8:35 am | अभ्या..

धन्यवाद हो सर,
आपला कुटाण्याशी कायबी संबंध नसतो, तरी माझी सखी म्हणते तेच खरं बघा. ती म्हणते भानगडीतच पडत जाऊ नको. कशाला लष्कराच्या भाकऱ्या.
तरीबी एक वाचक म्हणून काय म्हणतो, आणलंय मरणाने त्यांना एकत्र तर तो काळ काय चुकीचा का? ही श्रद्धांजली आहे, घटनांची घेतलेली एक दखल. एक नोंद. ती पण वेगवेगळ्या शाईत लिव्हायचा अट्टाहास म्हणजे नवलच. एखाद्या काळविशेषांत दोन वेगवेगळ्या माणसांच्या मृत्यूची नोंद झाली म्हणजे दोघांना एका पंक्तीत बसवले असा अर्थ काढणे म्हणजे अवघड आहे.
येनिवे ते बॅनर बिनर काय नाय, तुम्ही या, मस्त जेवण करू, यासाठी आपल्या धनाजीरावाला कामाला लावू. जाताना आम्हा सुखी संसाराचा आशीर्वाद द्या. लै झाले.
आशीर्वादोच्छूक अभ्या..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2018 - 8:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>आणलंय मरणाने त्यांना एकत्र तर तो काळ काय चुकीचा का?

लै अवघड झालय भो. या पुढे माझ्याशी बोलतांना वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची एकत्र नाव घ्यायची नाहीत. वल्ली उर्फ़ प्रचेतस क्षेत्र आयटी, लेखन गड किल्ले शिल्प व प्रशांत क्षेत्र सायकलवर दिवस रात्र राहणे यांचा एकत्रित उल्लेखकरु नये.

संत तुकारामाच्या अभंगावर बोलणार असाल तर कबीर मी सहन करणार नाही. कमलहसन वर बोलणार असाल तर सैराटच्या मंजूळेच्या दिग्दर्शनावर बोलणार नाही, अजुन मोठी यादी आहे, ती संध्याकाळी टाकतो.

दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

10 Aug 2018 - 7:45 pm | प्रचेतस

आता रात्र होत आली, यादी कधी टाकणार आहात?

चौकटराजा's picture

11 Aug 2018 - 11:37 am | चौकटराजा

ही चूक अभ्याकडून ही असण्याची शक्यता आहे . त्याला सध्या आपण सोलापूरवाला की पुणेवाला अशा गोंधळाचा सामना करावा लागतोय ! :)))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2018 - 9:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रिय मालक, संपादक. सहसंपादक, संचालक. सह संचालक.

स.न.वि.वि

ज्या बॅनरविषयी ही चर्चा चालू आहे त्या बॅनरचे चित्र धाग्यात माळल्यास चित्र आणि चर्चा काय होती हे माझ्या येत्या पिढीला कळेल, तेव्हा चित्र धाग्यात माळुन उपकृत करावे ही नम्र विनंती.

अवांतर : 'तू नभातले तारे माळलेस का तेव्हा' हे गाणे ऐकल्यामुळे माळणे हा शब्द प्रतिसादात आला आहे. दोन वेगवेगळे विषय धागा वाचल्यापासून येत आहे. दिलगीरी आहेच.

-दिलीप बिरुटे

रंगीला रतन's picture

10 Aug 2018 - 10:37 am | रंगीला रतन

कोणाच्या वैयक्तिक धाग्यात किंवा प्रतिसादात फक्त दोनच नाही चाळीस पन्नास विषय एकत्र आले तरी हरकत नाही.
कोणी व्यक्तिगत आयुष्यात त्याच्या आवडत्या , वंदनीय , आदर्श असलेल्या व्यक्तींचे अगदी १० x १२ इंच साईझ चे फोटो लॉकेट बनवून गळ्यात घालून मिरावले तरी कोणाची काही हरकत नाही.
मूळ विषय पब्लिकली डिस्प्ले होणार्या बॅनर वर करुणानिधींना दिलेल्या स्थानाचा आहे तो बॅनर कोणी बनवला हा नाही त्यामुळे उगाच चर्चेला व्यक्तिगत रूप देऊ नका. आधीच्या प्रतीसादाद जेम्स वांड यांनी सांगितल्या प्रमाणे चालू घडामोडींमध्ये संपादक मंडळाने श्रद्धांजलीचा धागा काढून काम भागले असते ज्यांना आहे कळवळा त्या व्यक्ती बद्दल त्यांनी वाहिली असती भावपूर्ण श्रद्धांजली प्रतिसादातून त्यावर. पण बॅनर हा संकेतस्थळाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला इच्छा असो कि नसो दिसतोच दिसतो त्यासाठी कुठलं धागा व प्रतिसाद उघडून वाचायची गरज पडत नाही. तुम्ही प्रतिसादात सांगितलाय कि तुम्हाला बॅनर आवडला तुम्ही तसे कळवून मोकळे झालात. तसेच ज्यांना बॅनर पेक्षा त्याचं काही भाग नाही आवडला ते आणि ज्यांना आवडला तेही इथे व्यक्त झालेत. सदस्यांनी मन मोकळेपणाने आपापली मते माडली आहेत त्याला उगाच व्यक्तिगत बनवू नका.

मिपा हितचिंतक, वाचक - रंगीला रतन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2018 - 11:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>>> सदस्यांनी मन मोकळेपणाने आपापली मते माडली आहेत त्याला उगाच व्यक्तिगत बनवू नका.

ऑ.....! आपण जशी आपली मतं मांडलीत, त्या प्रमाणे मलाही माझं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. आपण हा धागा काढ़ण्याची तशी गरज नव्हतीच असं माझं व्यक्तिगत मत आहअसलं तरी पण मी तसं काही म्हणालेलो नाही, आणि मी ज्यांना काही म्हणालो असे आपणास वाटत आहे त्यांचा अजुन काही तसा आक्षेप दिसला नाही, तसं काही असेल तर माझं मी आणि ते पाहुन घेऊ आपणास त्यांनी किंवा मी मध्यस्थी कारायची सांगितलेले नाही...!

तेव्हा आपण काही काळजी करू नका आपण आपलं मत मांडून मोकळे झालात तेव्हा आम्हाला आमचंही मत मांडू द्यावे आभार...!

-दिलीप बिरुटे

रंगीला रतन's picture

10 Aug 2018 - 2:01 pm | रंगीला रतन

तुम्हीच आवरा जरा!
मिपा हि व्यक्ती नसून एक संस्था आहे असे आजवर मी मानत होतो. हा धागा काढून ब्यानर बद्दलची नाराजी कुणा व्यक्तीला उद्देशून व्यक्त केली नसून संपादक मंडळाकडे व्यक्त केली आहे. असे असताना तुम्ही उगाच तो ब्यानर बनवणाऱ्या कलाकाराला मधे ओढून चर्चा व्यक्तिकेंद्रित करत आहात.
आणि हो! तुमच्या सारख्या “जुन्या” जाणत्या सदस्याच्या प्रतिसादामुळे हा ब्यानर “अभ्या” यांनी बनवल्याची माहिती माझ्या सारख्या नवीन सदस्याला मिळाली त्याबद्दल आभार.
अभ्या साहेब तुमच्या कलेबद्दल कुठलीही टीका करण्याचा उद्देश हा धागा काढण्यामागे नव्हतं हे कृपया समजून घ्या हि विनंती.
संपादक मंडळास विनंती: या धाग्यावर येणाऱ्या प्रतिसादांमुळे नवीन वाचनीय धागे बोर्डावर खाली जात असल्याने हा धागा वाचनमात्र केला अथवा मिटवून टाकला तरी काही हरकत नाही.
मिपा हितचिंतक, वाचक - रंगीला रतन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2018 - 2:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपलं काय म्हणनं होतं ते सांगायचं होतं तरसंपादक मंडळाला व्य नि करायचा ना मग, जाहीर धागा कशाला काढ़ायचा ? आता प्रतिसाद असेच येणार तिरपे तारपे, आणि मी संपादक मंडळाला धाग्यात चित्र टाका म्हणून सांगितले तुम्हाला नाही. कारण सदरील चर्चा कशाबद्दल आहे ते नवख्या माणसाला कळणार नाही म्हणून, तेव्हा तुम्ही उगा मला उपप्रतिसाद लिहायचे कारणच नव्हते. कारण एकदा तुम्ही खिड़कीत आलात आणि कोणी शुक शुक केल्यावर जुने जाणते म्हणून तक्रार नाय करायची. कळलं ना ? की नाही.

-दिलीप बिरुटे

रंगीला रतन's picture

10 Aug 2018 - 3:31 pm | रंगीला रतन

तुम्हीच आवरा जरा! (भाग २)

आपलं काय म्हणनं होतं ते सांगायचं होतं तरसंपादक मंडळाला व्य नि करायचा ना मग, जाहीर धागा कशाला काढ़ायचा ?

मागे कोणीतरी एका धाग्यावर "झेपत नसेल तर वाचू नका. कोणी अक्षता देऊन बोलावल नाहीये तुम्हाला" असा झकास प्रतिसाद दिला होता तोच तुमच्यासाठी पेस्टवतो
झेपत नसेल तर वाचू नका कोणी अक्षता देऊन बोलावल नाहीये तुम्हाला

आता प्रतिसाद असेच येणार तिरपे तारपे, आणि मी संपादक मंडळाला धाग्यात चित्र टाका म्हणून सांगितले तुम्हाला नाही. कारण सदरील चर्चा कशाबद्दल आहे ते नवख्या माणसाला कळणार नाही म्हणून, तेव्हा तुम्ही उगा मला उपप्रतिसाद लिहायचे कारणच नव्हते.

एकतर मी प्रतिसादात किंवा उपप्रतिसादात कुठेही धाग्यात चित्र टाकण्या बद्दल काही लिहील नाही तरी ते तुम्हाला दिव्यदृष्टीने दिसले. राहिली गोष्ट तिरप्या तार्प्या प्रतिसादांची तर त्याबद्दल काहीच आक्षेप नाहीये फक्त ते व्यक्तिकेंद्रित असू नयेत अशी इच्छा होती पण आता तुम्हाला वैयक्तिक पातळीवरच उतरायचय तर नाईलाज आहे.

मिपाच्या मुखपृष्ठावर करुणानिधींना श्रद्धांजली? ये बात कुछ हजम नही हुवी!

हे शिर्षक वाचून “सदरील चर्चा कशाबद्दल आहे ते नवख्या माणसाला कळणार नाही”
वाचक एवढे अनाडी असतात अशा भ्रमात तुम्ही आहात का?

तुम्ही खिड़कीत आलात आणि कोणी शुक शुक केल्यावर जुने जाणते म्हणून तक्रार नाय करायची. कळलं ना ? की नाही.

प्रतिसादात किंवा उपप्रतिसादात तुम्हाला जुन्या जाणत्या विषयी तक्रार कुठे दिसली बुवा? उलट आभार मानलेत तुमचे माहिती बद्दल कदाचित पुन्हा दिव्यदृष्टीने दिसली असेल!
आणि कळायचय काय त्याच्यात मी खिडकीत आल्यावर कोणी शुकशुक केले तर त्याला अभिवादन करायचे कि हाड करून हाकलून द्यायचे हे ठरवायला मी समर्थ आहे तुमच्याकडून ते शिकायची गरज नाही.

कोणीतरी एका धाग्यावर एका डॉक्टरांना “तुम्ही खरंच डॉक्टर आहात का हो?” असा प्रश्न विचारला होता.
तुमच्या साठी असाच प्रश्न दोनदा विचारावा वाटतो

तुम्ही खरंच प्राध्यापक आहात का हो?
तुम्ही खरंच डॉक्टर आहात का हो?

कळावे, लोभ असावा
“अरे ला कारे” संघटना (डोम्बिवली) सदस्य – रंगीला रतन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2018 - 5:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=)) डू आयडी घ्यावा लागला का प्रा.डॉ. कोण आहेत विचारायला

>>>>>>झेपत नसेल तर वाचू नका कोणी अक्षता देऊन बोलावल नाहीये तुम्हाला.

धागा काढल्यावर प्रतिसाद लिहिणारे तर लिहिणारच आणि तुम्हालाच फार त्रास झालाय बॅनरवर करुणानिधी आणि शहीद काणे पाहुन. आम्ही तर तुमचा धागा आणि तुम्हालाही इंजॉय करतोय तेव्हा झेपण्याचा प्रश्न नाय काका ! =))

>>>>आता तुम्हाला वैयक्तिक पातळीवरच उतरायचय तर नाईलाज आहे.

हो हो ! व्यक्तिगत पातळीवरच यायचंय तुम्हाला तेव्हा त्यासाठीच तहेदिलसे शुभेच्छा....! =))

>>>>>>प्रतिसादात किंवा उपप्रतिसादात तुम्हाला जुन्या जाणत्या विषयी तक्रार कुठे दिसली बुवा?

आपणच लिहिलेला प्रतिसाद वाचायचे विसरुन गेले का ? चांगलंय. चांगलंय ! या निमित्ताने डू आयडी लेखन करायला लागले हे काय कमी आहे ! =))

शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

रंगीला रतन's picture

10 Aug 2018 - 5:42 pm | रंगीला रतन

गेट वेल सून मामू!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2018 - 2:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>संपादक मंडळास विनंती: या धाग्यावर येणाऱ्या प्रतिसादांमुळे नवीन वाचनीय धागे बोर्डावर खाली जात असल्याने हा धागा वाचनमात्र केला अथवा मिटवून टाकला तरी काही हरकत नाही.

संपादक मंडळास विनंती, धागा राहु द्यावा. मला प्रतिसाद लिहायचे आहेत. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

बाजारात ओरडून विकणारा माती विकू शकतो , पण शांत बसणारा सोने विकू शकत नाही .

पन्नास वेळा न सांगणारा मीपा हितचिंतक !!!!!!!!

प्रतिसाद रंगीला साठी होता पण चुकून डॉप्रा कडे गेला

सतिश गावडे's picture

10 Aug 2018 - 9:42 am | सतिश गावडे

आमच्या गावात पाण्याचे नळ आले तेव्हा मिपावर नव्हतो. मात्र तेव्हा मिसळपाव होते? असल्यास तेव्हा या ऐतिहासिक घटनेवर मिपावर लेख आला होता का? आला नसल्यास तुम्हा शहरी लोकांना ग्रामिण भागातील जनतेचे सुख बघवत नाही असे मानायचे का? आला असल्यास असाच लेख आमच्या शेजारच्या गावात नळाचे पाणी आले तेव्हा आला होता का? नसल्यास असा दुजाभाव का?

जाऊ द्या हो , परसोनाल नका घेऊ .

सतिश गावडे's picture

10 Aug 2018 - 8:40 pm | सतिश गावडे

बरोबर. म्हणून तुम्ही धावून आलात. :)

कपिलमुनी's picture

10 Aug 2018 - 11:06 am | कपिलमुनी

पहिल्यांदा अभ्या चे असे वादग्रस्त बॅनर बनवल्याबद्दल अभिनंदन !
नेहमीसारखे छान बनवले असते तर कोणीही दखल घेतली नसती .

बदनाम हुये तो क्या हुवा ? कुछ ना तो हुवा :)
या निमित्ताने दखल घेतली हे ही नसे थोडके .

बाकी बॅनर , धागे वगैरे : इथे सगळ्यांना धागे काढायचे आणि बॅनर बनवायचे स्वातंत्र्य आहे.
गडकरी , फडके असतील किंवा इतर कोणीही असेल , प्रत्येक वेळी अभ्या..ने बॅनर का बनवावे ? ज्याअंना जे बॅनर बनवायचे आहे त्यांनी नीलकांत , संपादक मंडळाशी संपर्क साधून बॅनर पब्लिश करावे . तेच धाग्याबद्दल लागू होते.

ह्या कामाचे श्रेय मला नको,
माझा वाटा अल्पसा, कर्ता करवित्याकडे पोहोचले श्रेय.
धन्यवाद.

आदिजोशी's picture

10 Aug 2018 - 11:53 am | आदिजोशी

पूर्वी असा प्रश्न विचारल्यास 'जे आहे ते असे आहे. आवडले नसल्यास चपला घाला आणि चालू पडा बा***'. असे उत्तर मिळत असे. असो.

टवाळ कार्टा's picture

10 Aug 2018 - 1:47 pm | टवाळ कार्टा

पूर्वीची ब्यानरेसुद्धा अशी नसायचीत ;)

अभ्या..'s picture

10 Aug 2018 - 2:20 pm | अभ्या..

अनुष्कावैणीची आठवण येऊ लागली काय टक्या?

सतिश गावडे's picture

10 Aug 2018 - 8:42 pm | सतिश गावडे

तेव्हा टक्याचा मिपाजन्म झाला नसेल बहुतेक.

टवाळ कार्टा's picture

13 Aug 2018 - 1:49 pm | टवाळ कार्टा

ज्ञानोबा, तुकारामांच्या जागेवर फटाकडीचे चित्र पाहिल्याचे स्मरते...आता ते मिसळपाव होते का "स्क्रीनशॉट" ते आठवत नाहीये ;)

अनन्त अवधुत's picture

10 Aug 2018 - 12:38 pm | अनन्त अवधुत

करुणानिधी यांना मिपावर स्थान मिळाल्याचे पाहून बरे वाटले. तामिळ भाषेला अभिजात दर्जा मिळवून देताना त्यांनी (आणि त्यांचा विरोधी पक्षांनीही) प्रयत्न केले होते. त्यांचे तामिळ साहित्यातील योगदान महत्वाचे आहे.
त्यांच्या राजकीय मतांबद्दल सहमत नाही. पण ते एक असो.

मातृभाषेवर प्रेम करणाऱ्या आणि त्यासाठी झटणाऱ्या करुणानिधींना श्रद्धांजली..

शहीद मेजर राणे यांना श्रद्धांजली!

अवांतर: बरीच वर्षे झाली मराठीला अभिजात दर्जा मिळणार हि अजूनही दरवर्षीच्या २७ फेब्रुवारीची बातमी आहे.

बाकी चालू देत ....

प्रचेतस's picture

10 Aug 2018 - 12:49 pm | प्रचेतस

मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यावर नेमके काय होईल?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2018 - 2:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवांतर होईल म्हणून इथे लिहित नाही. का लिहु ??

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

10 Aug 2018 - 2:49 pm | प्रचेतस

लिहा.

नैतरी अजून काय अवांतर व्ह्यायचे राह्यलंय?

रंगीला रतन's picture

10 Aug 2018 - 3:35 pm | रंगीला रतन

सहमत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2018 - 5:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>नैतरी अजून काय अवांतर व्ह्यायचे राह्यलंय?
:(

आपल्या मताचा आदर आहे, वेळ मिळाला की लिहितो. ;)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

10 Aug 2018 - 7:41 pm | प्रचेतस

कधी वेळ मिळणार तुम्हाला??

सतिश गावडे's picture

10 Aug 2018 - 8:47 pm | सतिश गावडे

प्रा डॉ नी उत्तर दिले की मलाही सांगा हं.

रंगीला रतन's picture

10 Aug 2018 - 3:34 pm | रंगीला रतन

लिहा हो...

सुबोध खरे's picture

10 Aug 2018 - 8:29 pm | सुबोध खरे

काही तरी नक्की होईल.
हे वाचून एक श्लोक आठवला
यस्य कस्य तरोर्मुलं
येन केनापी मर्दितं
यस्मै कस्मै प्रदातव्यं
यद्वा तद्वा भविष्यति

अर्थात
कोणत्या तरी झाडाची मूळे घ्यावीत
ती कशाने तरी ठेचावीत
कुणालातरी द्यावीत
म्हणजे
काही तरी नक्की होईल

सतिश गावडे's picture

10 Aug 2018 - 8:48 pm | सतिश गावडे

हा श्लोक मिपाकर युयुत्सु यांच्या मिपा स्वाक्षरीमध्ये असायचा.

अनन्त अवधुत's picture

14 Aug 2018 - 12:27 pm | अनन्त अवधुत

प्रा डॉ ची प्रतिक्रिया येईल, त्यात अधिक माहिती असेल पण माझ्या बाजूने ह्या दोन विटा. :
प्रा हरी नरके यांचा ब्लॉग
हा ब्लॉग लिहिला तेव्हा प्रा हरी नरके अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक होते, आत्ताचे माहिती नाही.
Wikilink

....३.मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी भारत सरकारकडून राज्याला दरवर्षी किमान १००कोटी ते ५०० कोटी रूपये मिळतील.

हा फायदा पण आहे बरकां ! या १००, ५००, १००० कोटींचे नेमके काय करणार हा प्रश्न प्रचेतस रावांच्या बाजूनेअ‍ॅडवान्स मध्येच विचारतो पण प्रचेतस राव किंवा अभिजातराव प्रश्न मागे घ्या म्हणाले तर नक्कीच मागे घेऊ. नाही नाही मागे घेतलाच.

पण १००, ५००, १००० कोटी खर्च करण्याची कपॅसिटी तर राज्य सरकारची पण असते पण दानत आणि मतपेटी ची जुळवणूक सुद्धा महत्वाची असते. आता जिथली मतपेटी त्रिशंकु परैस्थिती निर्माण करु शकते अशा भाषांचे अभिजाततत्व लौकर मान्य होते हे.वे.सान.ल.

केंद्र सरकार कडून एवढा पैसा आणि बाकी सुविधा प्रत्येक राष्ट्रीय भाषेसाठी मिळण्यास खरे म्हणजे काहीच हरकत नसावी. पण शिक्षण असो नौकरी असो वा अजून कोणते क्षेत्र सर्वांनाच जोजे वांछिल तोते एवजी काहींनाच राक्षण्य आणि दाक्षिण्यच्या तत्वावर वाटले म्हणजे, मोठे झाल्याचे आणि मोठे केल्याचे समाधान जे लाभते ते सर्वात महत्वाचे .

प्रचेतस's picture

14 Aug 2018 - 6:08 pm | प्रचेतस

मी तो प्रश्न विचारणार नाही.

माझे म्हणणे मूळात मराठी ही अभिजात भाषा आहे की नाही ह्याबद्दलचे आहे. माझ्या माहितीप्रमाणे भाषा अभिजाततेचे निकष म्हणजे भाषा प्राचीन हवी, त्या भाषेत विपुल आणि समृद्ध लेखन झालेले असले पाहिजे आणि ती स्वतंत्ररित्या विकसित झालेली असली पाहिजे.

ह्या तिन्ही निकषांवर मराठी भाषा उतरत नाही असे माझे मत आहे. नरके वगैरे अभिजाततेचे समर्थक महाराष्ट्री प्राकृतालाच मराठी भाषा असे समजतात जे माझ्यामते चूक आहे. प्राकृतातील कित्येक शब्द मराठीत नाहीत. मराठी विकसित झाली ती संस्कृत, प्राकृत, अरबी, फारसी ह्या भाषांमधून. मराठीत एक ज्ञानेश्वरी सोडता अभिजात लेखन फारसे आढळत नाही. (गाथासप्तशती ही प्राकृतात आहे त्यामुळे त्याचा विचार मी येथे करत नाही.) तुकाराम गाथा, पंडिती काव्ये ही तुलनेने अलीकडची.

माहितगार's picture

14 Aug 2018 - 7:12 pm | माहितगार

प्रचेतसजी तुमचा प्रश्न तात्वीक दिसतोय आणि मागणी करणार्‍यांची मागणी व्यावहारीक (+ जनतेची भावनिक) अधिक असावी. एकदा जनतेच्या भावनांनी मनावर घेतले आणि मतपेटीला अडले की तत्वतः काय बरोबर ते बाजूस पडून भावना आणि मतपेटी काय म्हणेल ते होत रहाते, त्याला नाईलाज आहे.

प्राकृतातील कित्येक शब्द मराठीत नाहीत. .......... मराठीत एक ज्ञानेश्वरी सोडता अभिजात लेखन फारसे आढळत नाही.

हा प्राडॉसरां नी भाष्य करण्याचा प्रांत झाला पण मानवांच्या वापरातील भाषांसाठी लागणार्‍या व्यवहारातील गरजा विषयक सुविधा मिळवण्यासाठी अभिजात - गैर अभिजात अशा वर्गिकरणावर भर असण्याबद्दलच मी मुळात साशंक आहे. हे जन्माधारीत विषमतेसारखे झाले. केंद्रिय सत्तेच्या साठमारीसाठी दक्षिणी राजकीय पक्षांना विशेष पैसे वाटण्या साठी अस्मिता चुचकारण्यासाठी घातलेला घोळ आहे. इतरांंची मागणी मागे पर्यंत न देता प्रत्येकाचा मागेल तसा मतपेटीशी जुळेल असा इगो आणि राजकीय हितसंबंध चे कारण आहे. अभिजातता हा देखावा आहे. तामिळ अभिजात नसती तरी काही कारणे काढून सत्तेच्या साठमारीसाठी तेवढा वाटा वळता केंद्रसरकारला करावाच लागला असता हि वस्तुनिष्ठ बाजू असावी.

भाषा प्राचीन हवी, ... आणि ती स्वतंत्ररित्या विकसित झालेली असली पाहिजे.

लॉजीकली फॉलशिअय्स अर्ग्यूमेंट वाटते. पृत्वीवर माणूस पहिल्यांदा संवाद साधला असेल तिच भाषा पूर्ण स्वतंत्र आणि प्राचीन असू शकते त्या नंतरच्या भाषा स्वतंत्र विकसित असतात - भाषिक गटांचा फरक सुचित करायचा असेल तरी प्रोटो भाषां पर्यंत जावे लागेल संस्कृत असो वा तमिळ यांच्याही आधी काही प्रोटो भाषा असली पाहीजे ज्याच्या संशोधनाला मदत लागू शकते. सर्वसाधारण ललित साहित्याला आणि जिथे लिहिले जाते आहे तिथे विशेष मदतीची गरजच काय ?

त्या भाषेत विपुल आणि समृद्ध लेखन झालेले असले पाहिजे

या निकषावर विपुल लेखन होणार्‍या भाषांची मदत तोडुन ज्यांच्यात विपुल लेखनाचा अभाव राहीला अशा वंचित भाषांना मदतीची गरज आहे तिकडे निधी वळवावेत.

भाषेसाठी पैसा आणि सुविधा हव्या असतील तर त्या भाषा तज्ञांनी सरळ गरज पटवावी पक्के नसलेले आधार शोधू नयेत असे मलाही वाटते.

आणि कुणि काही म्हणाले तरी माझी भाषा माझ्या सर्व उणीवांसहित अभिजात आहे ती इतरांसाठी २१व्या शतकातील भेसळयुक्त असली तरीही.

मराठी कथालेखक's picture

10 Aug 2018 - 3:02 pm | मराठी कथालेखक

यानिमित्ताने एक आठवण ताजी झाली.
अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणारे नरेंद्र दाभोलकर आणि प्रसिद्ध व वलंयाकित ज्योतिषी जयंत साळगावकर यांच्या बातम्यांनी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर एकाच दिवशी मोठी जागा व्यापली (दोघांचा मृत्यू दिनांक २० ऑगस्ट २०१३)
विज्ञानवादी लोक ज्योतिषशास्त्र ही अंधश्रद्दा आहे असे मानतात (आता ते तसे आहे की नाही हा वाद बाजूला ठेवूयात) त्यामुळे हा योगायोग मोठाच विचित्र होता.

अभ्या..'s picture

10 Aug 2018 - 3:09 pm | अभ्या..

अगदी अगदी

ट्रम्प's picture

10 Aug 2018 - 3:07 pm | ट्रम्प

प्राडॉ ,
तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है !!
हम होंगे कामयाब एक दिन !!!ओ ! ओ !
मन में है विश्वास !
हम होंगे कामयाब एक दिन !

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2018 - 3:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

बघ लेका अभ्या... आणि तू म्हणतोस की माझ्या ब्यानरकडे कोणी लक्ष देत नाही ! घे आता, मोज टीआरपी =)) =)) =))

रंगीला रतन's picture

10 Aug 2018 - 3:36 pm | रंगीला रतन

=)) =)) =))

मला वाटतंय त्या करुणानिधी चे आपल्याला काही घेणेदेणे नाही , पण शहीद जवान राणे साठी हा विषय आता बंद करा . बस झालं आता !!! तुमच्या सगळ्यांचे इतर धाग्यावरील प्रतिसाद आणि या धाग्यावरील प्रतिसादांची तुलना जर कोणी केली तर त्याला प्रश्न पडेल ' हेच का ते ज्ञानी लोकं ? ' त्यामुळे आता या धाग्यावर पाय ओढणे बंद करा .

मार्कस ऑरेलियस's picture

11 Aug 2018 - 1:00 am | मार्कस ऑरेलियस

बाकी अभ्या शेठ,

मी काय म्हणतो की

15 ऑगस्ट चा बॅनर करायचा ठरला असेलच तर आत्ताच सांगून ठेवतोय की त्या दिवशी आमचा बड्डे असतो आणि नेपोलियन बोणापार्ट चा देखील !
तेव्हा भविष्यातील वाद विवाद टाळण्यासाठी बॅनर बनवताना काळजी घ्यावी म्हणून आपली आगाऊ सूचना !!

अवांतर : बॅनर वर नेपोलियन चा आल्प्स क्रॉस करतानाचा आणि आमचा अजिंक्यतारा क्रॉस करतानाचा फोटो वापरल्यास उत्तम !
:D

रंगीला रतन's picture

11 Aug 2018 - 1:25 am | रंगीला रतन

१५ ऑगस्ट हा भारतीय गणराज्याचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो त्या दिवशी देशापुढे तुमच्या सारख्या चिरकुट लोकांचा बड्डे असेल तर तो खिजगणतीत येणार नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी. बाकी ब्यानर वगैरेची काळजी संपादक घेतीलच तुमच्या आगाऊ सूचनेची गरज नाही.
कळावे लोभ असावा

झाडाच्या फाट्यावर मारणारी संघटना सदस्य - रंगीला रतन

ता.क. या पुढे कुठल्याही धाग्यावर उगाच घाण करणाऱ्या लोकांना मग ते जुने असोत कि नवीन ह्याचा मुलाहिजा न बाळगता तिथल्या तिथे झोडपण्यात येईल हि आगाऊ सूचना.

मार्कस ऑरेलियस's picture

11 Aug 2018 - 11:33 am | मार्कस ऑरेलियस

ख्या ख्या ख्या

एक तर मुळ प्रतिसाद विनोदी , त्यापुढे जाऊन तो स्पष्टपणे आमचे मित्र, अभ्याशेठला उद्देशुन असताना तु त्याला उत्तर दिलेस त्यावरुन बौधिक पातळी कळाली होतीच , (संपादित), चिरकुट , खिजगणती, फाट्यावर मारणे , मुलाहिजा न बाळागणे , झोडपणे वगैरे शब्द पाहुन तुझ्या विषयीही अंदाज बांधला होता , तो खरा निघाला :) मजा आली !!
आता ह्या पुढे तुझ्या सारख्याशी बोलण्यात काही अर्थ नाही , त्यामुळे जाऊ दे , खुष रहा !!

हां तर अभ्या शेठ , बॅनर साठी कच्चा माल हवा असल्यास कळवणे !

शब्दबम्बाळ's picture

12 Aug 2018 - 2:01 am | शब्दबम्बाळ

दोन आयडींमधील भांडणे त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर जातात हे काही मिपावर नवीन नाही.

पण, मार्कस/प्रगो कि गिरीजा आयडी "बौद्धिक पातळीवरून आणि शब्दांवरून जात ओळखण्याची कला" हे जे असले भाष्य करतो यावरून या तथाकथित उच्चशिक्षित आणि उच्चवर्णीय "नीच" मानसिकता दिसून येते!
संपादक या आयडीवरती काय कारवाई करतात हे बघूया!
माझ्याकडून मी असल्या मनोवृत्तीचा निषेध करतो...

टीप : रंगीला रतन कोणाचा डुआयडी आहे कि नाही हे मला नाहीत नाही... त्याने काही फरक देखील पडत नाही.

मार्कस ऑरेलियस's picture

12 Aug 2018 - 7:25 am | मार्कस ऑरेलियस

हा हा

ही कला आम्हाला नुकतीच अवगत झाली आहे, तुम्हालाही शिकवतो . फार सोप्पी आहे, फक्त युट्युब उघडून व्हायरल होत असलेली भाषणे ऐका एका दिवसात कळेल तुम्हाला.

आता उदाहरणार्थ परवाच एक भाषण ऐकले : एक तरुण लहान मुलगी तावातावाने भाषण देत म्हणाली - मुख्यमंत्रीसाहेब, आम्ही तुम्हाला आमचा हक्क मागतोय , तुमची बायको नाही मागत !

हसून हसून पुरेवाट झाली =)))) आता हे स्वाभाविक आहे की त्या पोरीला ती काय बोलत आहे ते कळत नाहीये, कोणी तरी लिहून दिलेली पोपटपंची चालू आहे पण तरीही नुसते शब्द पाहून तुम्हालाही कळले असेल ते कोणी लिहिले असावे ते !!

तरी मी तुम्हाला फार मवाळ उदाहरण दिले आहे , अजून एक दोन जहाल उदाहरणे दिली तर तुम्ही काही न सांगताच त्या लोकांच्या झेंड्याचा रंग ओळखाल.

तस्मात आहे हे असं आहे, शब्दांची निवड पाहून माणसाच्या सामाजिक स्थिती बद्दल अंदाज बांधता येतो ही वस्तुस्थिती आहे.

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने |
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु ||
शब्दचि आमुच्या जीवीचे जीवन |
शब्द वाटे धन जनलोका ||
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव |
शब्देचि गौरव पूजा करु ||

असं तुकोबा म्हणून गेलेत.
शब्द हा आपल्या सामाजिक उच्च नीचतेचा आरसा आहे , अतएव शब्द आपण जपुनच वापरले पाहिजेत !

आता धाग्याच्या संदर्भाने सांगतो की करुणानिधी हे व्यक्तीगत पातलीवर कितीही दीर्घद्वेषी असतील, पण एकदा त्यांचे देहावसान झाले की वैर संपले मतभेद संपले - मरणान्तानि वैराणी !!
एकदा माणूस गेल्यावर त्याच्याविषयी कसली चर्चा करताय ? जे जिवंत आहेत त्यांच्या विषयी बोला की !

असो।

माहितगार's picture

12 Aug 2018 - 10:23 pm | माहितगार

आता धाग्याच्या संदर्भाने सांगतो की करुणानिधी हे व्यक्तीगत पातलीवर कितीही दीर्घद्वेषी असतील, पण एकदा त्यांचे देहावसान झाले की वैर संपले मतभेद संपले - मरणान्तानि वैराणी !!
एकदा माणूस गेल्यावर त्याच्याविषयी कसली चर्चा करताय ? जे जिवंत आहेत त्यांच्या विषयी बोला की !

हम्म.. .......... ........... ............. ............... ...

शब्दबम्बाळ's picture

11 Aug 2018 - 2:05 am | शब्दबम्बाळ

मिपावर "फाईट क्लब" म्हणून एक वेगळा टॅब निर्माण करता येईल काय?
म्हणजे तिथे फक्त भांडणेच करायची, कुठलीही चर्चा नाही, लॉजिक नाही! नुसतं एकमेकांच्या प्रतिसादावर तुटून पडायचं! :D
राग जिरून भांडण संपेपर्यंत तिथेच धुळवड चालू द्यायची!
एखाद्या धाग्यावर वातावरण तापलं कि लगेच "भेट तिकडे मग सांगतो" अशी धमकी द्यायची!

सगळी लोक आपला राग तिथे जाऊन शांत करू शकतील, आणि इतर धाग्यांवर शांतता देखील राहील!
याशिवाय अर्थातच प्रसिद्धी देखील भरपूर मिळेल! लांबून लांबून लोक येतील खास "फाईट क्लब" साठी!

मराठी कथालेखक's picture

11 Aug 2018 - 7:54 pm | मराठी कथालेखक

कल्पना आवडली , पण फाईट क्लब ऐवजी आखाडा असे मराठमोळे नाव देवू किंवा 'तांबडी/लाल माती' असे सूचक नाव देता येईल.

भाते's picture

14 Aug 2018 - 11:52 am | भाते

मिपा सदस्यांसाठी खफची सोय आहे याची सगळया मिपा सदस्यांना बहुदा कल्पना असेल अशी अपेक्षा आहे. मिपाकरांना जो काही धिंगाणा, धुडगुस घालायचा आहे तो खफवर करु देत ना! एकमेकांच्या भांडणाची जाहीर वाच्यता कशाला? आता जर नळावरची भांडणे मिपासदस्य नसलेल्या मिपावाचकांसमोर जाहीरपणे करायची हौस असेल तर गोष्ट वेगळी!

तळटीप - जरी मी तुमच्या प्रतिसादाला उत्तर दिले असले तरी ते तुम्हाला उद्देशून नाही आहे याची कृपया नोंद घ्यावी. हा प्रतिसाद समस्त मिपाकर सदस्यांसाठी आहे.

वाचनमात्र
भाते

शब्दबम्बाळ's picture

14 Aug 2018 - 12:08 pm | शब्दबम्बाळ

अहो, खफ वर नीट भांडता येत नाही हो...
जे लोक निवांत गप्पा मारायला तिथे येतात ते इथे भांडू नका म्हणतात, काय तो धिंगाणा धाग्यावर घाला... (इन जनरल हा! मलाच असे नाही, सगळ्यांना)
मग मी म्हणतो लोकांनी मनसोक्त भांडायचं तरी कुठं?!! ;)
#नेशनवॉण्टसटूनो

रंगीला रतन's picture

11 Aug 2018 - 2:17 am | रंगीला रतन

एखाद्या धाग्यावर वातावरण तापलं कि लगेच "भेट तिकडे मग सांगतो" अशी धमकी द्यायची!

कोणी दिली आहे हो अशी धमकी? (आमची ती पद्धत असली तरी)
इथे फाईट क्लब करायची कोणाची इच्छा होती? उगाच काही लोकांनी चर्चेला व्यक्तिगत रूप दिले, नाहीतर विषय केव्हाच संपला होता.

शब्दबम्बाळ's picture

11 Aug 2018 - 2:45 am | शब्दबम्बाळ

अहो त्या प्रतिसादातील घटना आणि कल्पना या काल्पनिक आहेत. त्यांचा कुठल्याही जिवंत अथवा मृत धाग्याशी संबंध नाही.
तसा संबंध आढळल्यास तो एक योगायोग मानावा! :)

रंगीला रतन's picture

11 Aug 2018 - 3:04 am | रंगीला रतन

हे ठीक आहे.
आम्ही तर केव्हाच हा धागा वाचनमात्र करावा किंवा मिटवून टाका हि विनंती संपादकांना केली होती पण काही लोकांना आणखीन प्रतिसाद द्यायची खाज होती. देऊ देत कि त्यांना प्रतिसाद आम्ही बसलोच आहोत वाट बघत त्यांच्या प्रतिसादाची.

टवाळ कार्टा's picture

14 Aug 2018 - 5:45 pm | टवाळ कार्टा

हे म्हणजे

सरकार म्हणते पाणी वाचवा, कागद वाचवा.... अरे मग सामान्य माणसाने धुवायचे कशाने?

अश्या टाईपचा प्रश्न वाटतोय =))

नाखु's picture

19 Aug 2018 - 7:09 am | नाखु

हा आणि नेशन वाला प्रतिसाद वाचून खूप हसलो

दोघांचेही आभार

ट्रम्प's picture

11 Aug 2018 - 1:51 pm | ट्रम्प

धाग्यावर चर्चा होत असताना खेळत वातावरण ठेवण्याची अलिखित जबाबदारी धागामालकाची असते पण इथं तुम्हीच ज्यास्त पातळी सोडलेली दिसतेय या मुळे हानी मिसळपाव ची होणार आहे . दहा दिवसांपूर्वीच व्हाट्सएप मूळे मिसळपाव ची हानी झाली का या विषयावर मिपा च्या तज्ञ मंडळींनी सभासद वाढवण्यासाठी एक से एक सल्ले ऐकवले होते .
अशा पार्श्वभूमीवर मिपा ची हानी होण्याची शक्यता असेल तर विनाकारण वाद घालण्या पेक्षा तात्विक चर्चेवर भर दिला पाहिजे . तुम्हा दोघांनीं शाब्दिक हल्ले करताना पातळी चा विचार केला नाही , खालच्या पातळीवरचे शब्द वापरण्यात कसला आलाय शूरपणा ?. प्रा बिरुटे शांत बसल्यानंतर सुद्धा तुम्ही चारपाच रिप्लाय मध्ये आक्रमक भाषा वापरली , त्या ऐवजी दुर्लक्ष केले असते तर रंगीला भाऊ तुमची महत्ता अजून वाढली असती .
मला प्रश्न पडलाय संपादक मंडळ करुणानिधी सारखा काळा चष्म्या घालून बसले आहे का ? या वादा मध्ये संपादकांना आनंद वाटतोय .

आता कृपाकरून माझ्यावर पण हल्ला करू नका

राही's picture

11 Aug 2018 - 7:16 pm | राही

उगीचच आक्रस्ताळी भाषा वापरल्याने वातावरण बिघडते.

रंगीला रतन's picture

11 Aug 2018 - 8:58 pm | रंगीला रतन

धाग्यावर चर्चा होत असताना खेळत वातावरण ठेवण्याची अलिखित जबाबदारी धागामालकाची असते पण इथं तुम्हीच ज्यास्त पातळी सोडलेली दिसतेय
मान्य आहे ट्रम्प साहेब , पातळी सोडायची मला काही हौस नव्हती पण समोरची व्यक्ती जर उगाच वैयक्तिक पातळीवर येत असेल तर ते सहन करण्यासाठी आम्ही गांधीवादी असण्याची हि गरज नाही ना. (संपादित)
साहेब एक लिमिट असते फालतूपणा सहन करण्याची ती ओलांडली गेली तेव्हाच आक्रमक भाषा वापरली गेली आहे हे लक्षात घ्या. विषय भटकवणे हा काही जणांचा हातखंडा असला तरी त्याला प्रतिबंध करणे आपल्या हातात असते हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय पटला तर स्वीकारा नाही पटला तर फाट्यावर मारा.

सभ्य लोकांसाठी सभ्य आणि अति शहाण्यांसाठी महा अतिशाहणा - रंगीला रतन

रंगीला रतन's picture

11 Aug 2018 - 9:13 pm | रंगीला रतन

संपादक महाशय जर माझा प्रतिसाद संपादित करत असाल तर माझी जात काढणारा प्रतिसाद का तसाच ठेवला आहे ह्याचे स्पष्टीकरण द्याल का?

मार्कस ऑरेलियस's picture

11 Aug 2018 - 10:44 pm | मार्कस ऑरेलियस

हा हा हा

रंगील्या, प्रतिसाद संपादित झाले म्हणून काय तुझी आयडेंटिटी बदलणार आहे का ? तू जे शब्द वापरलेस ते पुसले म्हणून ते शब्द ज्याचे प्रतिनिधित्व करतात ती वृत्ती पुसली जाणार आहे का ?
आज ना उद्या परत काहीतरी लिहिशील तेव्हा ते परत दिसून येणारच आहे, आता कितीही सोज्वळ शब्द वापरल्याने तुझे स्वरूप लपले जाईल काय :D

काक: कृष्ण पिक: कृष्ण, को भेद: पिककाकयो: ।
वसंत समये प्राप्ते, काक काक: पिक पिक: ।।

रंगीला रतन's picture

11 Aug 2018 - 11:14 pm | रंगीला रतन

छोड ना बे ... अब जाते जाते काहेका गिला और शिकवा?

समोरची व्यक्ती आपल्या पेक्षा वयस्करच आहे असे गृहीत धरून टंकलेखन केले तर मला वाटतंय असे फालतू शब्द वापरण्याची दोघांनाही गरज पडली नसती .
सुरवातीला मी सुद्धा मनोरंजना साठी बिरुटे साहेबांच्या बाजूने उतरलो होतो , पण त्यातील फोलपणा ' खिडकीतील शुकशुक ' आणि ' झोडपणे , फाट्यावर मारणे , मुलाहिजा न बाळगणे ' या वापरलेल्या शब्दा मूळे कळला .
तुमचे दोघांचे वाद वैयक्तिक पातळी वर पोहचल्या नंतर फक्त ' राही ' चां प्रतिसाद सोडता बाकी सदस्यांनी इकडे न फिरकण्याची काळजी घेतली , बरोबर आहे कशाला झुंजीच्या मध्ये उतरतील ? , सगळ्यांनीच असे एकमेकांना फाट्यावर मारत बसले तर लक्ष्मीनगर , इंदिरानगर मध्ये राहत असल्याचे फील येईल . फक्त आई बहिणी वरून शिव्या घालायच्या बाकी राहिल्या होत्या .
श्री जयंत कुलकर्णी , श्री सुहास म्हात्रे , कुमार साहेब , आदित्य जी
आणि अजून दोन तीन आदरणीय लेखकांच्या समृद्ध लेखांना मुश्किलीने 30 / 35 प्रतिसाद आणि हा पातळी घसरलेला लेख जर शतक मारत असेल तर संपादकांनीं डोळ्यावरची पट्टी काढून असले वादग्रस्त लेख बुडवले पाहिजेत .

रंगीला रतन's picture

11 Aug 2018 - 10:57 pm | रंगीला रतन

ट्रम्प साहेब हा माझा मिपा वरचा शेवटचा प्रतिसाद आहे,, कोणालाही व्यक्तिगत पातळीवर दुखावणे हे मला पटत नाही. माझा तसा कुठलाही उद्देश पण नव्हता पण काही गोष्टी अशा घडतात कि तेव्हा तुमच्या हातात कुठलाही नियंत्रण राहत नाही. माझ्याकडून माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठ्या व्यक्तींचा उपमर्द झाला असल्याच्या जाणीवेतून मी कायमस्वरूपी मिसळ पाव या माझ्या आवडत्या संकेतस्थळावरून गमन करत आहे . सदस्य नाही राहिलो तरी वाचक म्हणून कायम मिपाशी निगडीत राहीनच.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे , मार्कस ऑरेलियस आणि राही यांची माफी मागून आपली रजा घेतो.

कळावे लोभ असावा
रंगीला रतन

जेम्स वांड's picture

11 Aug 2018 - 11:41 pm | जेम्स वांड

पण तुम्ही तर गमन करतो म्हणताय,

वर कळावे लोभ असावा पण म्हणताय!

मला पडलेला दुसरा जेन्यूईन प्रश्न हा की

आता नेमकं कळवायचं कुठं? अन लोभ कसा ठेवायचा!

मलाही धक्का बसला होता त्यांचे चित्र मुखपृष्ठावर पाहून.

कपिलमुनी's picture

13 Aug 2018 - 11:44 am | कपिलमुनी

अरेरे ! आचार्य अत्रे यांच्या १२० व्या जयंतीचा सर्वांना विसर पडला .
कोणीही त्यांचे बॅनर केले नाही वगैरे वगैरे ....

करुणानिधीत आणि आचार्य अत्रे, साहित्य लेखन, हजरजवाबी विनोद बुद्धी, मातृभाषा प्रेम , आणि जातीयतेला विरोध, सामान्यांचा कळवळा हि समान वैशिष्ट्ये असावीत. एवढ्या भांडवलावर करुणानिधी राजकारणात यशस्वी झाले तेच गुण प्र.के. अत्रेंकडे होते पण म्हणावे तसे प्रकेंच्या हाती राजकीय यश लागले नाही. कदाचित हिंदी भाषा विरोध टोकाला नेणे, घराणेशाही आणि निवडणूक खर्चाच्या निमित्ताने आर्थीक साशंकीत व्यवहारात गुंतवून घेणे , बाळाला धुतलेल्या पाण्यासोबत उत्क्रांत संस्कृतीतील सकारात्मक गोष्टींचे बाळ फेकणे प्र.के.ंना जमले नसावे. करुणानिधीत आणि प्रकेत एक फरक जन्मतः होता जो प्रकेंना पुसणे शक्यही नव्हते.

प्रके प्रके होते त्यांचे नाव काढले गेलेच आहे तर व्यक्तीपुजा विरहीत अभिवादन __/\__

माहितगार's picture

13 Aug 2018 - 1:41 pm | माहितगार

मार्कस यांचे वाक्य

आता धाग्याच्या संदर्भाने सांगतो की करुणानिधी हे व्यक्तीगत पातलीवर कितीही दीर्घद्वेषी असतील, पण एकदा त्यांचे देहावसान झाले की वैर संपले मतभेद संपले - मरणान्तानि वैराणी !!
एकदा माणूस गेल्यावर त्याच्याविषयी कसली चर्चा करताय ? जे जिवंत आहेत त्यांच्या विषयी बोला की !

दुर्लक्षीत न करता, विचारांच्या सेंसॉरशीपसाठी वापरल्या जाणार्‍या व्यक्तो पुजेच्या या भारतीय स्वरुपाची चर्चा होण्याची गरज असू शकेल का ?

करुणानीधी कुठे राज ठाकरे कुटं? खंजीरवाल्या मानसाच्या नादी लागून रायलाय नव्हं? रमेश किणीला कोणी मारले?