Skip to main content

मिपाच्या मुखपृष्ठावर करुणानिधींना श्रद्धांजली? ये बात कुछ हजम नही हुवी!

लेखक रंगीला रतन यांनी गुरुवार, 09/08/2018 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
तामिळ भाषेसाठी त्यांचे योगदान कितीही मोठे असले तरी करुणानिधींसारख्या भ्रष्टाचार, घराणेशाही , LTTE शी संबंध असल्याचे आरोप झालेल्या व्यक्तीला मिपा सारख्या मराठी अंतरंग-मराठी अभिव्यक्ती ब्रीदवाक्य असणाऱ्या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर श्रद्धांजली? ये बात कुछ हजम नही हुवी! चू.भू.द्या.घ्या.

वाचने 39937
प्रतिक्रिया 134

प्रतिक्रिया

In reply to by रंगीला रतन

>>>>>संपादक मंडळास विनंती: या धाग्यावर येणाऱ्या प्रतिसादांमुळे नवीन वाचनीय धागे बोर्डावर खाली जात असल्याने हा धागा वाचनमात्र केला अथवा मिटवून टाकला तरी काही हरकत नाही. संपादक मंडळास विनंती, धागा राहु द्यावा. मला प्रतिसाद लिहायचे आहेत. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by रंगीला रतन

बाजारात ओरडून विकणारा माती विकू शकतो , पण शांत बसणारा सोने विकू शकत नाही . पन्नास वेळा न सांगणारा मीपा हितचिंतक !!!!!!!!

आमच्या गावात पाण्याचे नळ आले तेव्हा मिपावर नव्हतो. मात्र तेव्हा मिसळपाव होते? असल्यास तेव्हा या ऐतिहासिक घटनेवर मिपावर लेख आला होता का? आला नसल्यास तुम्हा शहरी लोकांना ग्रामिण भागातील जनतेचे सुख बघवत नाही असे मानायचे का? आला असल्यास असाच लेख आमच्या शेजारच्या गावात नळाचे पाणी आले तेव्हा आला होता का? नसल्यास असा दुजाभाव का?

पहिल्यांदा अभ्या चे असे वादग्रस्त बॅनर बनवल्याबद्दल अभिनंदन ! नेहमीसारखे छान बनवले असते तर कोणीही दखल घेतली नसती . बदनाम हुये तो क्या हुवा ? कुछ ना तो हुवा :) या निमित्ताने दखल घेतली हे ही नसे थोडके . बाकी बॅनर , धागे वगैरे : इथे सगळ्यांना धागे काढायचे आणि बॅनर बनवायचे स्वातंत्र्य आहे. गडकरी , फडके असतील किंवा इतर कोणीही असेल , प्रत्येक वेळी अभ्या..ने बॅनर का बनवावे ? ज्याअंना जे बॅनर बनवायचे आहे त्यांनी नीलकांत , संपादक मंडळाशी संपर्क साधून बॅनर पब्लिश करावे . तेच धाग्याबद्दल लागू होते.

पूर्वी असा प्रश्न विचारल्यास 'जे आहे ते असे आहे. आवडले नसल्यास चपला घाला आणि चालू पडा बा***'. असे उत्तर मिळत असे. असो.

In reply to by सतिश गावडे

ज्ञानोबा, तुकारामांच्या जागेवर फटाकडीचे चित्र पाहिल्याचे स्मरते...आता ते मिसळपाव होते का "स्क्रीनशॉट" ते आठवत नाहीये ;)

करुणानिधी यांना मिपावर स्थान मिळाल्याचे पाहून बरे वाटले. तामिळ भाषेला अभिजात दर्जा मिळवून देताना त्यांनी (आणि त्यांचा विरोधी पक्षांनीही) प्रयत्न केले होते. त्यांचे तामिळ साहित्यातील योगदान महत्वाचे आहे. त्यांच्या राजकीय मतांबद्दल सहमत नाही. पण ते एक असो. मातृभाषेवर प्रेम करणाऱ्या आणि त्यासाठी झटणाऱ्या करुणानिधींना श्रद्धांजली.. शहीद मेजर राणे यांना श्रद्धांजली! अवांतर: बरीच वर्षे झाली मराठीला अभिजात दर्जा मिळणार हि अजूनही दरवर्षीच्या २७ फेब्रुवारीची बातमी आहे. बाकी चालू देत ....

In reply to by प्रचेतस

>>>>>नैतरी अजून काय अवांतर व्ह्यायचे राह्यलंय? :( आपल्या मताचा आदर आहे, वेळ मिळाला की लिहितो. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही तरी नक्की होईल. हे वाचून एक श्लोक आठवला यस्य कस्य तरोर्मुलं येन केनापी मर्दितं यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति अर्थात कोणत्या तरी झाडाची मूळे घ्यावीत ती कशाने तरी ठेचावीत कुणालातरी द्यावीत म्हणजे काही तरी नक्की होईल

In reply to by प्रचेतस

प्रा डॉ ची प्रतिक्रिया येईल, त्यात अधिक माहिती असेल पण माझ्या बाजूने ह्या दोन विटा. : प्रा हरी नरके यांचा ब्लॉग हा ब्लॉग लिहिला तेव्हा प्रा हरी नरके अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक होते, आत्ताचे माहिती नाही. Wikilink

In reply to by अनन्त अवधुत

....३.मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी भारत सरकारकडून राज्याला दरवर्षी किमान १००कोटी ते ५०० कोटी रूपये मिळतील.
हा फायदा पण आहे बरकां ! या १००, ५००, १००० कोटींचे नेमके काय करणार हा प्रश्न प्रचेतस रावांच्या बाजूनेअ‍ॅडवान्स मध्येच विचारतो पण प्रचेतस राव किंवा अभिजातराव प्रश्न मागे घ्या म्हणाले तर नक्कीच मागे घेऊ. नाही नाही मागे घेतलाच. पण १००, ५००, १००० कोटी खर्च करण्याची कपॅसिटी तर राज्य सरकारची पण असते पण दानत आणि मतपेटी ची जुळवणूक सुद्धा महत्वाची असते. आता जिथली मतपेटी त्रिशंकु परैस्थिती निर्माण करु शकते अशा भाषांचे अभिजाततत्व लौकर मान्य होते हे.वे.सान.ल. केंद्र सरकार कडून एवढा पैसा आणि बाकी सुविधा प्रत्येक राष्ट्रीय भाषेसाठी मिळण्यास खरे म्हणजे काहीच हरकत नसावी. पण शिक्षण असो नौकरी असो वा अजून कोणते क्षेत्र सर्वांनाच जोजे वांछिल तोते एवजी काहींनाच राक्षण्य आणि दाक्षिण्यच्या तत्वावर वाटले म्हणजे, मोठे झाल्याचे आणि मोठे केल्याचे समाधान जे लाभते ते सर्वात महत्वाचे .

In reply to by माहितगार

मी तो प्रश्न विचारणार नाही. माझे म्हणणे मूळात मराठी ही अभिजात भाषा आहे की नाही ह्याबद्दलचे आहे. माझ्या माहितीप्रमाणे भाषा अभिजाततेचे निकष म्हणजे भाषा प्राचीन हवी, त्या भाषेत विपुल आणि समृद्ध लेखन झालेले असले पाहिजे आणि ती स्वतंत्ररित्या विकसित झालेली असली पाहिजे. ह्या तिन्ही निकषांवर मराठी भाषा उतरत नाही असे माझे मत आहे. नरके वगैरे अभिजाततेचे समर्थक महाराष्ट्री प्राकृतालाच मराठी भाषा असे समजतात जे माझ्यामते चूक आहे. प्राकृतातील कित्येक शब्द मराठीत नाहीत. मराठी विकसित झाली ती संस्कृत, प्राकृत, अरबी, फारसी ह्या भाषांमधून. मराठीत एक ज्ञानेश्वरी सोडता अभिजात लेखन फारसे आढळत नाही. (गाथासप्तशती ही प्राकृतात आहे त्यामुळे त्याचा विचार मी येथे करत नाही.) तुकाराम गाथा, पंडिती काव्ये ही तुलनेने अलीकडची.

In reply to by प्रचेतस

प्रचेतसजी तुमचा प्रश्न तात्वीक दिसतोय आणि मागणी करणार्‍यांची मागणी व्यावहारीक (+ जनतेची भावनिक) अधिक असावी. एकदा जनतेच्या भावनांनी मनावर घेतले आणि मतपेटीला अडले की तत्वतः काय बरोबर ते बाजूस पडून भावना आणि मतपेटी काय म्हणेल ते होत रहाते, त्याला नाईलाज आहे.
प्राकृतातील कित्येक शब्द मराठीत नाहीत. .......... मराठीत एक ज्ञानेश्वरी सोडता अभिजात लेखन फारसे आढळत नाही.
हा प्राडॉसरां नी भाष्य करण्याचा प्रांत झाला पण मानवांच्या वापरातील भाषांसाठी लागणार्‍या व्यवहारातील गरजा विषयक सुविधा मिळवण्यासाठी अभिजात - गैर अभिजात अशा वर्गिकरणावर भर असण्याबद्दलच मी मुळात साशंक आहे. हे जन्माधारीत विषमतेसारखे झाले. केंद्रिय सत्तेच्या साठमारीसाठी दक्षिणी राजकीय पक्षांना विशेष पैसे वाटण्या साठी अस्मिता चुचकारण्यासाठी घातलेला घोळ आहे. इतरांंची मागणी मागे पर्यंत न देता प्रत्येकाचा मागेल तसा मतपेटीशी जुळेल असा इगो आणि राजकीय हितसंबंध चे कारण आहे. अभिजातता हा देखावा आहे. तामिळ अभिजात नसती तरी काही कारणे काढून सत्तेच्या साठमारीसाठी तेवढा वाटा वळता केंद्रसरकारला करावाच लागला असता हि वस्तुनिष्ठ बाजू असावी.
भाषा प्राचीन हवी, ... आणि ती स्वतंत्ररित्या विकसित झालेली असली पाहिजे.
लॉजीकली फॉलशिअय्स अर्ग्यूमेंट वाटते. पृत्वीवर माणूस पहिल्यांदा संवाद साधला असेल तिच भाषा पूर्ण स्वतंत्र आणि प्राचीन असू शकते त्या नंतरच्या भाषा स्वतंत्र विकसित असतात - भाषिक गटांचा फरक सुचित करायचा असेल तरी प्रोटो भाषां पर्यंत जावे लागेल संस्कृत असो वा तमिळ यांच्याही आधी काही प्रोटो भाषा असली पाहीजे ज्याच्या संशोधनाला मदत लागू शकते. सर्वसाधारण ललित साहित्याला आणि जिथे लिहिले जाते आहे तिथे विशेष मदतीची गरजच काय ?
त्या भाषेत विपुल आणि समृद्ध लेखन झालेले असले पाहिजे
या निकषावर विपुल लेखन होणार्‍या भाषांची मदत तोडुन ज्यांच्यात विपुल लेखनाचा अभाव राहीला अशा वंचित भाषांना मदतीची गरज आहे तिकडे निधी वळवावेत. भाषेसाठी पैसा आणि सुविधा हव्या असतील तर त्या भाषा तज्ञांनी सरळ गरज पटवावी पक्के नसलेले आधार शोधू नयेत असे मलाही वाटते. आणि कुणि काही म्हणाले तरी माझी भाषा माझ्या सर्व उणीवांसहित अभिजात आहे ती इतरांसाठी २१व्या शतकातील भेसळयुक्त असली तरीही.

यानिमित्ताने एक आठवण ताजी झाली. अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणारे नरेंद्र दाभोलकर आणि प्रसिद्ध व वलंयाकित ज्योतिषी जयंत साळगावकर यांच्या बातम्यांनी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर एकाच दिवशी मोठी जागा व्यापली (दोघांचा मृत्यू दिनांक २० ऑगस्ट २०१३) विज्ञानवादी लोक ज्योतिषशास्त्र ही अंधश्रद्दा आहे असे मानतात (आता ते तसे आहे की नाही हा वाद बाजूला ठेवूयात) त्यामुळे हा योगायोग मोठाच विचित्र होता.

प्राडॉ , तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है !! हम होंगे कामयाब एक दिन !!!ओ ! ओ ! मन में है विश्वास ! हम होंगे कामयाब एक दिन !

बघ लेका अभ्या... आणि तू म्हणतोस की माझ्या ब्यानरकडे कोणी लक्ष देत नाही ! घे आता, मोज टीआरपी =)) =)) =))

मला वाटतंय त्या करुणानिधी चे आपल्याला काही घेणेदेणे नाही , पण शहीद जवान राणे साठी हा विषय आता बंद करा . बस झालं आता !!! तुमच्या सगळ्यांचे इतर धाग्यावरील प्रतिसाद आणि या धाग्यावरील प्रतिसादांची तुलना जर कोणी केली तर त्याला प्रश्न पडेल ' हेच का ते ज्ञानी लोकं ? ' त्यामुळे आता या धाग्यावर पाय ओढणे बंद करा .

बाकी अभ्या शेठ, मी काय म्हणतो की 15 ऑगस्ट चा बॅनर करायचा ठरला असेलच तर आत्ताच सांगून ठेवतोय की त्या दिवशी आमचा बड्डे असतो आणि नेपोलियन बोणापार्ट चा देखील ! तेव्हा भविष्यातील वाद विवाद टाळण्यासाठी बॅनर बनवताना काळजी घ्यावी म्हणून आपली आगाऊ सूचना !! अवांतर : बॅनर वर नेपोलियन चा आल्प्स क्रॉस करतानाचा आणि आमचा अजिंक्यतारा क्रॉस करतानाचा फोटो वापरल्यास उत्तम ! :D

In reply to by प्रसाद गोडबोले

१५ ऑगस्ट हा भारतीय गणराज्याचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो त्या दिवशी देशापुढे तुमच्या सारख्या चिरकुट लोकांचा बड्डे असेल तर तो खिजगणतीत येणार नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी. बाकी ब्यानर वगैरेची काळजी संपादक घेतीलच तुमच्या आगाऊ सूचनेची गरज नाही. कळावे लोभ असावा झाडाच्या फाट्यावर मारणारी संघटना सदस्य - रंगीला रतन ता.क. या पुढे कुठल्याही धाग्यावर उगाच घाण करणाऱ्या लोकांना मग ते जुने असोत कि नवीन ह्याचा मुलाहिजा न बाळगता तिथल्या तिथे झोडपण्यात येईल हि आगाऊ सूचना.

In reply to by रंगीला रतन

ख्या ख्या ख्या एक तर मुळ प्रतिसाद विनोदी , त्यापुढे जाऊन तो स्पष्टपणे आमचे मित्र, अभ्याशेठला उद्देशुन असताना तु त्याला उत्तर दिलेस त्यावरुन बौधिक पातळी कळाली होतीच , (संपादित), चिरकुट , खिजगणती, फाट्यावर मारणे , मुलाहिजा न बाळागणे , झोडपणे वगैरे शब्द पाहुन तुझ्या विषयीही अंदाज बांधला होता , तो खरा निघाला :) मजा आली !! आता ह्या पुढे तुझ्या सारख्याशी बोलण्यात काही अर्थ नाही , त्यामुळे जाऊ दे , खुष रहा !! हां तर अभ्या शेठ , बॅनर साठी कच्चा माल हवा असल्यास कळवणे !

In reply to by प्रसाद गोडबोले

दोन आयडींमधील भांडणे त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर जातात हे काही मिपावर नवीन नाही. पण, मार्कस/प्रगो कि गिरीजा आयडी "बौद्धिक पातळीवरून आणि शब्दांवरून जात ओळखण्याची कला" हे जे असले भाष्य करतो यावरून या तथाकथित उच्चशिक्षित आणि उच्चवर्णीय "नीच" मानसिकता दिसून येते! संपादक या आयडीवरती काय कारवाई करतात हे बघूया! माझ्याकडून मी असल्या मनोवृत्तीचा निषेध करतो... टीप : रंगीला रतन कोणाचा डुआयडी आहे कि नाही हे मला नाहीत नाही... त्याने काही फरक देखील पडत नाही.

In reply to by शब्दबम्बाळ

हा हा ही कला आम्हाला नुकतीच अवगत झाली आहे, तुम्हालाही शिकवतो . फार सोप्पी आहे, फक्त युट्युब उघडून व्हायरल होत असलेली भाषणे ऐका एका दिवसात कळेल तुम्हाला. आता उदाहरणार्थ परवाच एक भाषण ऐकले : एक तरुण लहान मुलगी तावातावाने भाषण देत म्हणाली - मुख्यमंत्रीसाहेब, आम्ही तुम्हाला आमचा हक्क मागतोय , तुमची बायको नाही मागत ! हसून हसून पुरेवाट झाली =)))) आता हे स्वाभाविक आहे की त्या पोरीला ती काय बोलत आहे ते कळत नाहीये, कोणी तरी लिहून दिलेली पोपटपंची चालू आहे पण तरीही नुसते शब्द पाहून तुम्हालाही कळले असेल ते कोणी लिहिले असावे ते !! तरी मी तुम्हाला फार मवाळ उदाहरण दिले आहे , अजून एक दोन जहाल उदाहरणे दिली तर तुम्ही काही न सांगताच त्या लोकांच्या झेंड्याचा रंग ओळखाल. तस्मात आहे हे असं आहे, शब्दांची निवड पाहून माणसाच्या सामाजिक स्थिती बद्दल अंदाज बांधता येतो ही वस्तुस्थिती आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने | शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु || शब्दचि आमुच्या जीवीचे जीवन | शब्द वाटे धन जनलोका || तुका म्हणे पहा शब्दचि हा देव | शब्देचि गौरव पूजा करु || असं तुकोबा म्हणून गेलेत. शब्द हा आपल्या सामाजिक उच्च नीचतेचा आरसा आहे , अतएव शब्द आपण जपुनच वापरले पाहिजेत ! आता धाग्याच्या संदर्भाने सांगतो की करुणानिधी हे व्यक्तीगत पातलीवर कितीही दीर्घद्वेषी असतील, पण एकदा त्यांचे देहावसान झाले की वैर संपले मतभेद संपले - मरणान्तानि वैराणी !! एकदा माणूस गेल्यावर त्याच्याविषयी कसली चर्चा करताय ? जे जिवंत आहेत त्यांच्या विषयी बोला की ! असो।

In reply to by प्रसाद गोडबोले

आता धाग्याच्या संदर्भाने सांगतो की करुणानिधी हे व्यक्तीगत पातलीवर कितीही दीर्घद्वेषी असतील, पण एकदा त्यांचे देहावसान झाले की वैर संपले मतभेद संपले - मरणान्तानि वैराणी !! एकदा माणूस गेल्यावर त्याच्याविषयी कसली चर्चा करताय ? जे जिवंत आहेत त्यांच्या विषयी बोला की !
हम्म.. .......... ........... ............. ............... ...

मिपावर "फाईट क्लब" म्हणून एक वेगळा टॅब निर्माण करता येईल काय? म्हणजे तिथे फक्त भांडणेच करायची, कुठलीही चर्चा नाही, लॉजिक नाही! नुसतं एकमेकांच्या प्रतिसादावर तुटून पडायचं! :D राग जिरून भांडण संपेपर्यंत तिथेच धुळवड चालू द्यायची! एखाद्या धाग्यावर वातावरण तापलं कि लगेच "भेट तिकडे मग सांगतो" अशी धमकी द्यायची! सगळी लोक आपला राग तिथे जाऊन शांत करू शकतील, आणि इतर धाग्यांवर शांतता देखील राहील! याशिवाय अर्थातच प्रसिद्धी देखील भरपूर मिळेल! लांबून लांबून लोक येतील खास "फाईट क्लब" साठी!

In reply to by शब्दबम्बाळ

कल्पना आवडली , पण फाईट क्लब ऐवजी आखाडा असे मराठमोळे नाव देवू किंवा 'तांबडी/लाल माती' असे सूचक नाव देता येईल.

In reply to by शब्दबम्बाळ

मिपा सदस्यांसाठी खफची सोय आहे याची सगळया मिपा सदस्यांना बहुदा कल्पना असेल अशी अपेक्षा आहे. मिपाकरांना जो काही धिंगाणा, धुडगुस घालायचा आहे तो खफवर करु देत ना! एकमेकांच्या भांडणाची जाहीर वाच्यता कशाला? आता जर नळावरची भांडणे मिपासदस्य नसलेल्या मिपावाचकांसमोर जाहीरपणे करायची हौस असेल तर गोष्ट वेगळी! तळटीप - जरी मी तुमच्या प्रतिसादाला उत्तर दिले असले तरी ते तुम्हाला उद्देशून नाही आहे याची कृपया नोंद घ्यावी. हा प्रतिसाद समस्त मिपाकर सदस्यांसाठी आहे. वाचनमात्र भाते

In reply to by भाते

अहो, खफ वर नीट भांडता येत नाही हो... जे लोक निवांत गप्पा मारायला तिथे येतात ते इथे भांडू नका म्हणतात, काय तो धिंगाणा धाग्यावर घाला... (इन जनरल हा! मलाच असे नाही, सगळ्यांना) मग मी म्हणतो लोकांनी मनसोक्त भांडायचं तरी कुठं?!! ;) #नेशनवॉण्टसटूनो

एखाद्या धाग्यावर वातावरण तापलं कि लगेच "भेट तिकडे मग सांगतो" अशी धमकी द्यायची!
कोणी दिली आहे हो अशी धमकी? (आमची ती पद्धत असली तरी) इथे फाईट क्लब करायची कोणाची इच्छा होती? उगाच काही लोकांनी चर्चेला व्यक्तिगत रूप दिले, नाहीतर विषय केव्हाच संपला होता.

In reply to by रंगीला रतन

अहो त्या प्रतिसादातील घटना आणि कल्पना या काल्पनिक आहेत. त्यांचा कुठल्याही जिवंत अथवा मृत धाग्याशी संबंध नाही. तसा संबंध आढळल्यास तो एक योगायोग मानावा! :)

In reply to by शब्दबम्बाळ

हे ठीक आहे. आम्ही तर केव्हाच हा धागा वाचनमात्र करावा किंवा मिटवून टाका हि विनंती संपादकांना केली होती पण काही लोकांना आणखीन प्रतिसाद द्यायची खाज होती. देऊ देत कि त्यांना प्रतिसाद आम्ही बसलोच आहोत वाट बघत त्यांच्या प्रतिसादाची.

In reply to by रंगीला रतन

हे म्हणजे सरकार म्हणते पाणी वाचवा, कागद वाचवा.... अरे मग सामान्य माणसाने धुवायचे कशाने? अश्या टाईपचा प्रश्न वाटतोय =))

In reply to by टवाळ कार्टा

हा आणि नेशन वाला प्रतिसाद वाचून खूप हसलो दोघांचेही आभार

धाग्यावर चर्चा होत असताना खेळत वातावरण ठेवण्याची अलिखित जबाबदारी धागामालकाची असते पण इथं तुम्हीच ज्यास्त पातळी सोडलेली दिसतेय या मुळे हानी मिसळपाव ची होणार आहे . दहा दिवसांपूर्वीच व्हाट्सएप मूळे मिसळपाव ची हानी झाली का या विषयावर मिपा च्या तज्ञ मंडळींनी सभासद वाढवण्यासाठी एक से एक सल्ले ऐकवले होते . अशा पार्श्वभूमीवर मिपा ची हानी होण्याची शक्यता असेल तर विनाकारण वाद घालण्या पेक्षा तात्विक चर्चेवर भर दिला पाहिजे . तुम्हा दोघांनीं शाब्दिक हल्ले करताना पातळी चा विचार केला नाही , खालच्या पातळीवरचे शब्द वापरण्यात कसला आलाय शूरपणा ?. प्रा बिरुटे शांत बसल्यानंतर सुद्धा तुम्ही चारपाच रिप्लाय मध्ये आक्रमक भाषा वापरली , त्या ऐवजी दुर्लक्ष केले असते तर रंगीला भाऊ तुमची महत्ता अजून वाढली असती . मला प्रश्न पडलाय संपादक मंडळ करुणानिधी सारखा काळा चष्म्या घालून बसले आहे का ? या वादा मध्ये संपादकांना आनंद वाटतोय . आता कृपाकरून माझ्यावर पण हल्ला करू नका

In reply to by ट्रम्प

उगीचच आक्रस्ताळी भाषा वापरल्याने वातावरण बिघडते.

In reply to by ट्रम्प

धाग्यावर चर्चा होत असताना खेळत वातावरण ठेवण्याची अलिखित जबाबदारी धागामालकाची असते पण इथं तुम्हीच ज्यास्त पातळी सोडलेली दिसतेय मान्य आहे ट्रम्प साहेब , पातळी सोडायची मला काही हौस नव्हती पण समोरची व्यक्ती जर उगाच वैयक्तिक पातळीवर येत असेल तर ते सहन करण्यासाठी आम्ही गांधीवादी असण्याची हि गरज नाही ना. (संपादित) साहेब एक लिमिट असते फालतूपणा सहन करण्याची ती ओलांडली गेली तेव्हाच आक्रमक भाषा वापरली गेली आहे हे लक्षात घ्या. विषय भटकवणे हा काही जणांचा हातखंडा असला तरी त्याला प्रतिबंध करणे आपल्या हातात असते हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय पटला तर स्वीकारा नाही पटला तर फाट्यावर मारा. सभ्य लोकांसाठी सभ्य आणि अति शहाण्यांसाठी महा अतिशाहणा - रंगीला रतन

In reply to by रंगीला रतन

संपादक महाशय जर माझा प्रतिसाद संपादित करत असाल तर माझी जात काढणारा प्रतिसाद का तसाच ठेवला आहे ह्याचे स्पष्टीकरण द्याल का?

In reply to by रंगीला रतन

हा हा हा रंगील्या, प्रतिसाद संपादित झाले म्हणून काय तुझी आयडेंटिटी बदलणार आहे का ? तू जे शब्द वापरलेस ते पुसले म्हणून ते शब्द ज्याचे प्रतिनिधित्व करतात ती वृत्ती पुसली जाणार आहे का ? आज ना उद्या परत काहीतरी लिहिशील तेव्हा ते परत दिसून येणारच आहे, आता कितीही सोज्वळ शब्द वापरल्याने तुझे स्वरूप लपले जाईल काय :D काक: कृष्ण पिक: कृष्ण, को भेद: पिककाकयो: । वसंत समये प्राप्ते, काक काक: पिक पिक: ।।

समोरची व्यक्ती आपल्या पेक्षा वयस्करच आहे असे गृहीत धरून टंकलेखन केले तर मला वाटतंय असे फालतू शब्द वापरण्याची दोघांनाही गरज पडली नसती . सुरवातीला मी सुद्धा मनोरंजना साठी बिरुटे साहेबांच्या बाजूने उतरलो होतो , पण त्यातील फोलपणा ' खिडकीतील शुकशुक ' आणि ' झोडपणे , फाट्यावर मारणे , मुलाहिजा न बाळगणे ' या वापरलेल्या शब्दा मूळे कळला . तुमचे दोघांचे वाद वैयक्तिक पातळी वर पोहचल्या नंतर फक्त ' राही ' चां प्रतिसाद सोडता बाकी सदस्यांनी इकडे न फिरकण्याची काळजी घेतली , बरोबर आहे कशाला झुंजीच्या मध्ये उतरतील ? , सगळ्यांनीच असे एकमेकांना फाट्यावर मारत बसले तर लक्ष्मीनगर , इंदिरानगर मध्ये राहत असल्याचे फील येईल . फक्त आई बहिणी वरून शिव्या घालायच्या बाकी राहिल्या होत्या . श्री जयंत कुलकर्णी , श्री सुहास म्हात्रे , कुमार साहेब , आदित्य जी आणि अजून दोन तीन आदरणीय लेखकांच्या समृद्ध लेखांना मुश्किलीने 30 / 35 प्रतिसाद आणि हा पातळी घसरलेला लेख जर शतक मारत असेल तर संपादकांनीं डोळ्यावरची पट्टी काढून असले वादग्रस्त लेख बुडवले पाहिजेत .

In reply to by ट्रम्प

ट्रम्प साहेब हा माझा मिपा वरचा शेवटचा प्रतिसाद आहे,, कोणालाही व्यक्तिगत पातळीवर दुखावणे हे मला पटत नाही. माझा तसा कुठलाही उद्देश पण नव्हता पण काही गोष्टी अशा घडतात कि तेव्हा तुमच्या हातात कुठलाही नियंत्रण राहत नाही. माझ्याकडून माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठ्या व्यक्तींचा उपमर्द झाला असल्याच्या जाणीवेतून मी कायमस्वरूपी मिसळ पाव या माझ्या आवडत्या संकेतस्थळावरून गमन करत आहे . सदस्य नाही राहिलो तरी वाचक म्हणून कायम मिपाशी निगडीत राहीनच. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे , मार्कस ऑरेलियस आणि राही यांची माफी मागून आपली रजा घेतो. कळावे लोभ असावा रंगीला रतन

In reply to by रंगीला रतन

पण तुम्ही तर गमन करतो म्हणताय, वर कळावे लोभ असावा पण म्हणताय! मला पडलेला दुसरा जेन्यूईन प्रश्न हा की आता नेमकं कळवायचं कुठं? अन लोभ कसा ठेवायचा!

अरेरे ! आचार्य अत्रे यांच्या १२० व्या जयंतीचा सर्वांना विसर पडला . कोणीही त्यांचे बॅनर केले नाही वगैरे वगैरे ....

In reply to by कपिलमुनी

करुणानिधीत आणि आचार्य अत्रे, साहित्य लेखन, हजरजवाबी विनोद बुद्धी, मातृभाषा प्रेम , आणि जातीयतेला विरोध, सामान्यांचा कळवळा हि समान वैशिष्ट्ये असावीत. एवढ्या भांडवलावर करुणानिधी राजकारणात यशस्वी झाले तेच गुण प्र.के. अत्रेंकडे होते पण म्हणावे तसे प्रकेंच्या हाती राजकीय यश लागले नाही. कदाचित हिंदी भाषा विरोध टोकाला नेणे, घराणेशाही आणि निवडणूक खर्चाच्या निमित्ताने आर्थीक साशंकीत व्यवहारात गुंतवून घेणे , बाळाला धुतलेल्या पाण्यासोबत उत्क्रांत संस्कृतीतील सकारात्मक गोष्टींचे बाळ फेकणे प्र.के.ंना जमले नसावे. करुणानिधीत आणि प्रकेत एक फरक जन्मतः होता जो प्रकेंना पुसणे शक्यही नव्हते. प्रके प्रके होते त्यांचे नाव काढले गेलेच आहे तर व्यक्तीपुजा विरहीत अभिवादन __/\__

मार्कस यांचे वाक्य
आता धाग्याच्या संदर्भाने सांगतो की करुणानिधी हे व्यक्तीगत पातलीवर कितीही दीर्घद्वेषी असतील, पण एकदा त्यांचे देहावसान झाले की वैर संपले मतभेद संपले - मरणान्तानि वैराणी !! एकदा माणूस गेल्यावर त्याच्याविषयी कसली चर्चा करताय ? जे जिवंत आहेत त्यांच्या विषयी बोला की !
दुर्लक्षीत न करता, विचारांच्या सेंसॉरशीपसाठी वापरल्या जाणार्‍या व्यक्तो पुजेच्या या भारतीय स्वरुपाची चर्चा होण्याची गरज असू शकेल का ?