Skip to main content

घे मिठीत

लेखक आकाश५०८९ यांनी मंगळवार, 24/07/2018 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
घे मिठीत, घे मनात जसा असेन मी माझ्यापुरताही सखे माझा नसेन मी रितेपण प्यालातले माझ्यात ओतले ओत लोचनांनी मद्य तेव्हा भरेन मी नको स्पर्धा, नको जीत अन्‌ हारही तू जिंकशील कशी जेव्हा हरेन मी मला विसरल्याचेही विसरलीस तू तू लाग आठवावया तुला सुचेन मी थांबवले मृत्योस तुला भेटण्या मी तू ये सखे लवकरी खोटा ठरेन मी आहे आकाश मी माझ्याचसारखा जसा तुला हवा तसा कसा असेन मी ---- आकाश
लेखनविषय:

वाचने 4779
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

मस्त.. Sandy

छानच खूप आवडली

घेतले मिठीत तेव्हा उमजली उलगडलीस तू जवळ येणे बाकी जोवर छान छान वाटलीस तू

आकाश५०८९, शीर्षक वाचून 'घे मुठीत' असं विडंबन करायचं मनी योजलं होतं. पण कविता वाचल्यावर करावंसं वाटलं नाही. बहुधा भावना सच्च्या असाव्यात. लगे राहो भाय! और आनदो !! ही गझल आहे का की, केवळ कविता आहे ? माझं दोहोंचं आकलन फारसं नाही, म्हणून विचारतोय. आ.न., -गा.पै.

WOW NICE