तू सांग रे माझ्या प्रीत फुला
शब्दात कसे सांगू मी तुला,
प्रेम हे माझे अवखळ वेडे
कळेल का नजरेत तुला..
तू सांग रे माझ्या प्रीत फुला
नजरेत कसे सांगू मी तुला,
तुझीच स्वप्ने रंगवली मी
दिसेल का स्वप्नात तुला..
तू सांग रे माझ्या प्रीत फुला
स्वप्नात कसे हे दिसेल तुला,
तुझ्याचसाठी झुरणे माझे
कळेल का सत्यात तुला..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4098
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
गेय कविता
गेय ???
In reply to छान by श्वेता२४
गेय ???
म्हणजे
कुणी चांगली चाल लावली तर छानसं गाणं होईल याचं. गाता येईल अशी
अच्छा तशी होय... धन्यवाद..
In reply to म्हणजे by श्वेता२४
अच्छा तशी होय... धन्यवाद..
सुर्व्या आला, तळपूनी गेला
'वाट पाहुनी जीव शिणला'च्या चालीत म्हणता येईल. फक्त 'गडनी सखे गडनी' साठी एखादी ओळ ॲड करावी लागेल :)
धन्यवाद
In reply to सुर्व्या आला, तळपूनी गेला by शाली
धन्यवाद.. नक्कीच प्रयत्न करेन.
मस्त..
या गाण्याला सांग सांग भोलानाथ ची चाल बरोबर बसते आहे...
पैजारबुवा,
धन्यवाद
In reply to मस्त.. by ज्ञानोबाचे पैजार
प्रयत्न करून पाहतो.
व्वा... खुपचं सुंदर
व्वा... खुपचं सुंदर
व्वा... खुपचं सुंदर
व्वा... खुपचं सुंदर
व्वा... खुपचं सुंदर
कविता
कविता
कविता
व्वा... खुपचं सुंदर काव्यपंक्ती..मजा आली..
येऊद्या अजून..प्रतीक्षेत
धन्यवाद
In reply to कविता by Mak Mohan
खूप खूप धन्यवाद.
अजून नक्कीच येतील..
"तुम तो ठेहरे परदेशी" ही चाल
"तुम तो ठेहरे परदेशी" ही चाल पण लागते.
धन्यवाद
In reply to "तुम तो ठेहरे परदेशी" ही चाल by सतिश गावडे
करून पाहतो..