कच्छी दाबेली

मानसी१'s picture
मानसी१ in पाककृती
17 Jun 2018 - 10:44 pm

पावसाळी हवा झाली आणि काही तरी चटपटीत खायची इच्छा झाली. घरी मस्त दाबेली चा बेत केला.
साहित्य
पाव, मसाला दाणे, बारीक शेव
उकडलेले बटाटे। 4-5
चिंच खजूर चटणी
पुदिना कोथिंबीर चटणी
बारीक चिरलेला कांदा
डाळिंब दाणे
बटर
गरम मसाला, पावभाजी मसाला, चाट मसाला, तीखट, मीठ

क्रुती
कढईत तूप गरम करून त्यात 3 पळ्या गोड चटणी घाला. त्यात कुचकरलेले बटाटे, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा पावभाजी मसाला, 1/2 चमचा चाट मसाला , चवीनुसार मीठ आणि तिखट घाला. सर्व नीट मिसळून घ्या. सारण तयार

एक पाव घेऊन मधून चीरा. दोन साइडने. पूर्ण आडवा कापायचा नाही.
एका बाजूला गोड चटणी, एका बाजूला तिखट चटणी. मधे एक चमचा सारण, थोडे दाणे, थोडे डाळिंब दाणे भरून घ्या.
तवा गरम करून बटर सोडून, तयार पाव दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावा
वरुन बारीक शेव घालून खायला द्यावे

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jun 2018 - 1:02 am | अत्रुप्त आत्मा

फोटू दिसत नै!

manguu@mail.com's picture

18 Jun 2018 - 1:31 am | manguu@mail.com

फोटुवर राईट किलीक करून open image करा , मग दिसतो, त्यांनी फोटोचा access सार्वजनिक केला नसेल , किंवा इथे image अपलोड करताना फोटोच्या वेब address ऐवजी त्या पूर्ण पानाचा address घातला असेल.

शाली's picture

18 Jun 2018 - 10:36 am | शाली

फोटो?

धागाकर्तीचा तिकडचा फोटो इथे चिकटवला आहे.
अ

बाकी, दाबेली स्टेप बाय स्टेप जबरदस्त ही सानिकाचीच.
https://www.misalpav.com/node/21166

मानसी१'s picture

18 Jun 2018 - 12:36 pm | मानसी१

ध न्यवाद स्नेहान्कीता .

श्वेता२४'s picture

18 Jun 2018 - 2:01 pm | श्वेता२४

फक्त तुम्ही गरम आणि पावभाजी मसाला जो दिलाय त्याऐवजी तयार दाबेली मसाला मिळतो तो वापरते. तुम्ही दिलेले मसाले घालून वेगळी चव येत असेल असा अंदाज आहे. पाकृ करुन बघते.

शाली's picture

18 Jun 2018 - 6:08 pm | शाली

मस्तच!
बाहेर खान्यापेक्षा अशा पध्दतीने घरी केली तर जास्त छान लागेल.
पण पावसाळ्यात अजिबात नाही.

वन्दना सपकाल's picture

9 Jul 2018 - 11:39 am | वन्दना सपकाल

मी कालच करून बघितली खूप छान झाली. घरातले सगळे खूष. धन्यवाद.

वन्दना सपकाल's picture

9 Jul 2018 - 11:39 am | वन्दना सपकाल

मी कालच करून बघितली खूप छान झाली. घरातले सगळे खूष. धन्यवाद.

वन्दना सपकाल's picture

9 Jul 2018 - 11:39 am | वन्दना सपकाल

मी कालच करून बघितली खूप छान झाली. घरातले सगळे खूष. धन्यवाद.