"बर्फाचे तट पेटून उठले.." हे गीत हवे आहे!

राघव's picture
राघव in काथ्याकूट
6 Jul 2018 - 3:56 pm
गाभा: 

कुसुमाग्रजांचे हे गीत जालावर बर्‍याच ठिकाणी शोधले.. शब्द सापडले.. पण चाल म्हणजे, एक तर ती नवीन बनवलेली रॅप किंवा साधा कोरस..
पण मला याचीच एक थोडीशी संथ चाल आठवते.. जालावर तर काही सापडली नाही. कुणाजवळ असेल माहिती तर कृपया सांगावे.

राघव

प्रतिक्रिया

खिलजि's picture

6 Jul 2018 - 6:18 pm | खिलजि

शब्द नको आहेत, चाल हवी आहे.

बाजूला एक आकाशवाणीचे संगीत अँप आहे , तिथे चालपण आहे या गाण्याची , मी स्वतः ऐकली आणि मग पाठवली हि लिंक .

जयन्त बा शिम्पि's picture

7 Jul 2018 - 12:12 am | जयन्त बा शिम्पि

आम्ही लहानपणी राष्ट्रसेवादलात नियमित जात असू, त्यावेळी सामुदायिक हे गीत म्हणत होतो. हे गीत कवीवर्य वसंत बापट यांनी लिहिले आहे,ते १९६२ च्या भारत-चीन युध्धाच्या पार्श्वभुमीवर. तुमचा मोबाइल क्रमांक व्यनि केला तर तुम्हाला माझ्या आवाजात गीत ऐकवु शकतो. अन्य कोणता मार्ग असेल तर तुम्हीच सुचवा.

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे >>>>> ही चाल लावा. गाऊन पाहा. त्याच वृत्तात आहे हे. अनंतफंदींचा 'फटका' म्हणजेच 'हरिभगिनी' वृत्तात हे आहे.

उदाहरणार्थ ८+८+८+६ = ३० मात्रांचे हे वृत्त आहे.

बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको |
संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको ||

राही's picture

7 Jul 2018 - 1:15 pm | राही

वृत्तबद्ध पदे एका ठराविक चालीत गेय असतात हे खरे पण त्यांना वेगळ्या चाली लावता येतात. अनेक वृत्तबद्ध कवितांना सुंदर सुंदर चाली लावून त्यांच्या ध्वनिमुद्रिका निघालेल्या आहे. तांबे, बोरकर, वा. रा. कांत, वसंत बापट , सुरेश भट यांच्या अनेक कविता (भटांच्या बाबतीत गझला) वेगवेगळ्या चालीत आज आपण ऐकत असतो. बर्फाचे तट पेटुन उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते.. अशी ही दु:खमय कविता आहे आणि त्याची चाल तशीच संथ आणि हृदयंगम आहे.
त्याच वेळी म्हणजे भारतचीन युद्धाच्या वेळी लिहिली गेलेली
' उत्तुंग आमुची उत्तरसीमा इंच इंच लढवू' ही कवितासुद्धा वीरश्रीगीत म्हणून पुष्कळ प्रसिद्ध झाली होती.

साहेब त्या आकाशवाणीच्या ऍपवर मला वाटत जुन्याच चालीत वरील गाणे गायलेलं आहे ..

पाहिली पहिली रम्य पहाट हेदेखील या प्रकारचं आणि अशा गानवृंदातलं गाणं आठवतं.

फकिरांनी / ने (?) शतयज्ञ मांडले, वेदीवरती रक्त सांडले.
त्या रक्ताची क्षितिजावर ये अरुण मंगल लाट.

पुढचं आठवत नाही.

चौकटराजा's picture

8 Jul 2018 - 5:05 am | चौकटराजा

मला याची मूळ चाल माहीत आहे . पण ती कळवणार कशी ?

चौकटराजा's picture

8 Jul 2018 - 5:11 am | चौकटराजा

साम मंत्र तो सरे रणाची नौबत आता झडझड्ते या ओळी काय सान्गतात ? १९६२ च्या युद्ध काळातील हे एक समरगीत आहे ओ मन्डळी !

प्रतिसादांबद्दल धन्यवाद!

@खिलजि, मी त्या लिंक वर जाऊन बघीतले. पण मला ते गाणे ऐकता आले नाही. कदाचित माझ्या ब्राऊजर चा प्रॉब्लेम आहे. अर्थात् जर ते कोरस असेल तर मी ऐकले आहे. आणि ती चाल मी ऐकलेल्या चालीशी मेळ खात नाही. म्हणूनच तर घोळ आहे! :-)

@जयंत आणि @चौरा, तुम्हाला व्यनी केलाय.

बाकी, ते शब्द पेटवणारेच आहेत. दु:खमय वाटत नाही. उलट स्फूर्तीदायक आहे. कुसुमाग्रजांपुढे आपण काय बोलणार? नि:शब्द नमन _/\_

राघव