Skip to main content

आणीबाणीतले अनुभव

लेखक मराठी कथालेखक यांनी बुधवार, 27/06/2018 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
आणीबाणी लागू केली त्या दिवसाला नुकतीच ४३ वर्षे पुर्ण झाल्या निमित्ताने अनेक व्यासपीठांवर आणीबाणीचा विषय , त्याबद्दलची मते ई चर्चिली जात आहेत.या चर्चांत भाग घेणारे एकतर नेते, पत्रकार वा विचारवंत आहेत. पण सामान्य जनतेच्या दृष्टीकोनातून आणीबाणी नेमकी कशी होती हे जाणून घेण्याकरिता मी हा धागा काढला आहे. माझा जन्म झालेला नव्हता त्यामुळे माझे स्वतःचे काही अनुभव नाही. माझ्या आई-वडीलांकडून तरी मी आणीबाणीच्या फारशा काही आठवणी ऐकल्या नाहीत (चांगल्या/वाईट कोणत्याही). तरी इतर मिपाकरांनी स्वतःच्या वा जवळील व्यक्तींच्या (त्यांच्याकडून थेट ऐकलेल्या) आणीबाणीसंबंधित आठवणी इथे मांडाव्या ही विनंती. पत्रकार, लेखक मंडळींनी लिहिलेले अनुभव शक्यतो नकोत कारण ते राजकीय हेतुंनी प्रेरित असण्याची बरीच शक्यता वाटते.

वाचने 41880
प्रतिक्रिया 128

प्रतिक्रिया

In reply to by राही

त्यातच १९७२च्या भीषण दुष्काळाने अन्नधान्य परिस्थिती फार बिकट झाली. मग पार्ट्या किंवा लग्नमुंजीच्या जेवणावळींवर निर्बंध घालावे लागले. जास्तीत जास्त पन्नास माणसांनाच जेवण वाढण्याचा नियम केला गेला. शिवाय तांदुळाच्या पदार्थाला मनाई होती. मग काही लोकांनी वरईचा भात वाढला. पन्नास पेक्षा जास्त लोकांसाठी जेवण शिजले आहे अशी शंका आली तरी ते जप्त करून नेले जाई. हे प्रत्यक्ष पाहिलेले आहे इतके दुर्भिक्ष्य आले होते. हि वस्तुस्थिती होती. कोणताही जिन्नस धान्य इ याला जिल्हा बंदी होती. कोकणात स्वतःच्या शेतात पिकणारा तांदूळ सुद्धा लोकांना मुंबईत घरी आणता येत नव्हता. यावरच शाहीर साबळे यांचे विडंबन होते. पोलीस हवालदार एस टी डेपो मध्ये कोपऱ्यात उभ्या असलेल्या माणसाला म्हणतोय चूप चूप खडे हो जरूर कोई बात है पायलीभर भात है ये पायलीभर भात है मात्र लोकांनी हे निर्बंध पाळले पण राजकीय पक्षांनी असंतोष फुलवला. म्हणून आणीबाणी आली हे म्हणणे अतिशयोक्तीच आहे १९७२ चा दुष्काळ आणि तीन वर्षांनी जाहीर केलेली (२६ जून १९७५) आणीबाणी यांचा संबंध फार तर बादरायण म्हणता येईल असा आहे

In reply to by सुबोध खरे

हे एकच कारण होते असे नव्हे. पुढच्या तीन वर्षात सुव्यवस्थेची घडी अधिकच विसकटत गेली. ती सर्व कारणे वर्णन करायचा कंटाळा आला आहे. लोहिया यांचा पक्का कॉंग्रेसद्वेष, (कॉंग्रेसमुक्त भारत वगैरे, पण तशी घोषणा नव्हती) जयप्रकाशजींचे तीव्र आंदोलन, बहुतांशी डाव्या अशा माध्यमांनी केलेली खंबीर पाठराखण, जॉर्जच्या रेल्वे संपामुळे खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था, मुख्यत: अन्नधान्य, इंधन, खाद्यतेले यांची ठप्प झालेली वाहतूक आणि त्यामुळे झालेली टंचाई, बॅंक कर्मचाऱ्यांची सततची आंदोलने अशा अनेक कारणांनी सरकारला जेरीस आणले गेले. लोक कायद्याला न जुमानीतसे झाले. असो.

In reply to by राही

लोक कायद्याला न जुमानीतसे झाले. असो.

लोकांचे माहित नाही परंतु श्रीमती इंदिरा गांधी यांनी कायदा पाळणे सोडून दिले इतकेच नव्हे तर पाहिजे तसा कायदा वळवून घेतला. वरिष्ठ तीन न्यायाधीशांना डावलून पाहिजे त्या (अजित नाथ रे) न्यायाधीशांना पदोन्नती देऊन भारताचे सरन्यायाधीश केले. आणि हि आणीबाणीतील गोष्ट नसून १९७३ मधील गोष्ट आहे. This judiciary–executive battle would continue in the landmark Kesavananda Bharati case, where the 24th Amendment was called into question. With a wafer-thin majority of 7 to 6, the bench of the Supreme Court restricted Parliament's amendment power by stating it could not be used to alter the "basic structure" of the Constitution. Subsequently, Prime Minister Gandhi made A. N. Ray—the senior most judge amongst those in the minority in Kesavananda Bharati—Chief Justice of Indiain April 1973. Ray superseded three judges more senior to him—J. M. Shelat, K.S. Hegde and Grover—all members of the majority in Kesavananda Bharati. Indira Gandhi's tendency to control the judiciary met with severe criticism, both from the press and political opponents This appointment superseded three senior judges of the Supreme Court, Jaishanker Manilal Shelat, AN Grover and K. S. Hegde, and was viewed as an attack on the independence of the Judiciary. This was unprecedented in Indian legal history, and has been called the "blackest day in Indian democracy" कशाला आपण लोकशाहीच्या बाता करत आहात On 12 June 1975, Justice Jagmohanlal Sinha of the Allahabad High Court found the prime minister guilty on the charge of misuse of government machinery for her election campaign. The court declared her election null and void and unseated her from her seat in the Lok Sabha. The court also banned her from contesting any election for an additional six years. she was held responsible for misusing government machinery, and found guilty on charges such as using the state police to build a dais, availing herself of the services of a government officer, Yashpal Kapoor, during the elections before he had resigned from his position, and use of electricity from the state electricity department. The persistent efforts of Narain were praised worldwide as it took over four years for Justice Sinha to pass judgement against the prime minister. Indira Gandhi challenged the High Court's decision in the Supreme Court. Justice V. R. Krishna Iyer, on 24 June 1975, upheld the High Court judgement and ordered all privileges Gandhi received as an MP be stopped, and that she be debarred from voting. However, she was allowed to continue as Prime Minister pending the resolution of her appeal. Later that day, Indira Gandhi requested a compliant President Fakhruddin Ali Ahmed to issue a proclamation of a state of emergency. Within three hours, the electricity to all major newspapers was cut and the political opposition arrested. The proposal was sent without discussion with the Union Cabinet, who only learnt of it and ratified it the next morning. Invoking article 352 of the Indian Constitution, Gandhi granted herself extraordinary powers and launched a massive crackdown on civil liberties and political opposition. वा रे अनुशासन पर्व The Government used police forces across the country to place thousands of protestors and strike leaders under preventive detention. In Tamil Nadu, the M. Karunanidhi government was dissolved and the leaders of the DMK were incarcerated. In particular, Karunanidhi's son M. K. Stalin, was arrested under the Maintenance of Internal Security Act. At least nine High Courts pronounced that even after the declaration of an emergency, a person could challenge his detention. The Supreme Court, now under the Indira Gandhi-appointed Chief Justice A. N. Ray, overruled all of them, upholding the state's plea for power to detain a person without the necessity of informing him of the grounds for his arrest, or to suspend his personal liberties, or to deprive him of his right to life, in an absolute manner (the habeas corpus case')राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश आपल्या ताटाखालचे मांजर नियुक्त केले आणि कायद्याचा आपल्याला पाहिजे तसा अर्थ लावला. आणि आपण म्हणताय लोक कायद्याला जुमानेनासे झाले? बढिया है Habeas Corpus case Justice M.H. Beg was also involved in the Habeas Corpus case. This landmark case in Indian democracy, Additional District Magistrate of Jabalpur v. Shiv Kant Shukla, came up in 1975 during the Indian Emergency. The legal question hinged on the citizen's right to judicial scrutiny for arrests under emergency. The five senior most judges of the Supreme court heard the case, and four aligned with the government view that even the right to life stood suspended during emergency (only dissent was H. R. Khanna). In his April 1976 decision, Justice Beg appeared to bend backwards even, when he observed: We understand that the care and concern bestowed by the state authorities upon the welfare of detenues who are well housed, well fed and well treated, is almost maternal.ज्यांना प्रतिबंधात्मक कोठडीत( कोणताही आरोप नसताना) ठेवले आहे त्यांना उत्तम निवास उत्तम खाणे पिणे देऊन त्यांची आईसारखी उत्तम काळजी घेतली गेली आहे A few months later, in January 1977, M.H. Beg, who was junior to H. R. Khanna, was appointed Chief Justice of India by the Indira Gandhi government. This was against legal tradition. हम करेसो कायदा याचे दुसरे उदाहरण भारतीय लोकशाहीच्या इतिहासात मिळणार नाही आपली अंध भक्ती किती आहे हे आपण आपल्याच डोळ्याने वाचून घ्या.

In reply to by सुबोध खरे

लोकशाहीच्या बाता, ताटाखालचे मांजर, हम करेसो कायदा, पाहिजे तसा कायदा वळवून घेणे आणि शेवटी कहर म्हणजे अंधभक्ती वाला सल्ला... याच गोष्टी सध्याच्या प्रधानसेवकांबद्दल म्हणल्या जातात आणि त्याचा विरोध कोण, कसा करतं हे विसरलात वाटत?

In reply to by चिर्कुट

तरीही आणीबाणीचे पहिले पर्व भारतालस अतिशय सुखाचे आणि शिस्तीचे गेले असे मी आताही म्हणेन. पुढे कदाचित लिहीन इथेच. माध्यमांतून आणीबाणीची भलामण फारशी झाली नाही "आणीबाणी मध्ये सामान्य माणसं आनंदात होती आणीबाणीचा पूर्ण काळ हे खरेच अनुशासनपर्व होते. प्रथमार्ध तर उत्तमच होता". लोक कायद्याला न जुमानीतसे झाले. या सर्व विधानांचा परामर्श घेताना लिहिलेली ती विधाने आहेत. विषय आणीबाणीचा चालू आहे. मोदींचा विषय कुठे तरी आला आहे का? त्याचा मोदी यांच्या प्रचार तंत्राशी काय संबंध आहे? आणि मार्मिक गोडसे यांनी दोन वेळेस विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सापडली असल्यास देता का? आणीबाणीत मिसा कायदा आणण्याची गरज का पडली? सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीचा फटका शेतकरी वर्गाला बसला का? समजा नसेल बसला तर निवडणुकीत इतका मोठा वर्ग सत्ताधारी पक्षाच्या विरोधात का गेला? बाकी -- सध्या आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे म्हणणार्यांना एकच विचारणे आहे कि किती लोक विनाचौकशी तुरुंगात आहेत याची काही सांख्यिकी मिळेल का? अंधद्वेष असु नये.

आणिबाणी समर्थक आणि विरोधकांचे आर्ग्युमेण्ट्स वाचुन असं वाटतय कि पिक्चर पहिले रिलीज झाला, ट्रेलर मागाहुन आलं :) तेच कोलॅटरल बेनीफीट्स, तेच बाण मारुन त्या भोवती वर्तुळ बनवणं, तेच मागचे-पुढचे संदर्भ मिक्स करणं, तेच व्यक्ती-विषेशाच्या अहंपणा वि. नि:स्वार्थ भाव वगैरेच्या चर्चा. एक वेगळ्या प्रकारची सायलेण्ट आणिबाणी सध्या सुरु झालीय कि काय असाही विचार मनात येतो... एखाद्या अनोळखी गावी जावे आणि एखाद्या मुलाशी बोलावे... बस्स... खेळ खलास.

In reply to by अर्धवटराव

एक वेगळ्या प्रकारची सायलेण्ट आणिबाणी सध्या सुरु झालीय कि काय असाही विचार मनात येतो... एखाद्या अनोळखी गावी जावे आणि एखाद्या मुलाशी बोलावे... बस्स... खेळ खलास.
"आईसक्रीमवाले गंदे अंकल"ची सर्वाधिक तीव्र शोकांतिका. :-(

In reply to by अर्धवटराव

माझ्यामते तुम्ही करताय ती तुलना होऊ शकत नाही. तुमची तयारी असल्यास तटस्थपणे चर्चा करू. एक वेगळ्या प्रकारची सायलेण्ट आणिबाणी सध्या सुरु झालीय कि काय असाही विचार मनात येतो... एखाद्या अनोळखी गावी जावे आणि एखाद्या मुलाशी बोलावे... बस्स... खेळ खलास. हे काही कळलं नाही. कृपया विस्तारून सांगावे. गवि म्हणले तसं आईस्क्रीमवाले गंदे अंकल बद्दल असेल तर तसे लोक्स जागोजागी पूर्वीपार आहेत. आता कदाचित माध्यमे भरपूर झाल्याने बातम्या सहज आणि वेगाने पसरतात, त्यामुळे कदाचित प्रकार वाढले असं वाटत असण्याची शक्यता आहे.

In reply to by ट्रेड मार्क

पण इंदीराजींच्या आणिबाणीबाबत आम्हि केवळ श्रवणभक्ती करु शकतो... त्यांचं ते कर्तुत्व अनुभवायला नाहि मिळालं आम्हाला. आईस्क्रीमवाले गंदे अंकल पुर्वीही होते याबद्दल वाद नाहि. लोकशाही व्यवस्थेत न्याय आणि कायदा व्यवस्था दिवसेंदीवस कुठल्या दिशेने मॅच्युअर होतेय हे कन्फ्युजन आहे.

In reply to by अर्धवटराव

त्यांचं ते कर्तुत्व अनुभवायला नाहि मिळालं आम्हाला म्हणूनच "सायलेण्ट आणिबाणी सध्या सुरु झालीय कि काय असाही विचार मनात येतो" असं म्हणताय. हिंदुबहुल देशात हिंदू देवतांची खिल्ली उडवणारे चित्रपट निघतात आणि असे चित्रपट शेकडो कोटींचा गल्ला जमवतात. पूर्वी तर देवतांची नग्न चित्र पण काढली गेली आहेत पण चित्रकार सुखरूप राहून वर ती चित्रे कोट्यवधींना विकली सुद्धा गेली आहेत. यांचे निर्माते कोण होते ते वेगळं सांगायची गरज नाही. यातल्या कोणाला काय धोका झाला? जर सरकारवरील किंवा पंतप्रधानांवरील टिकेबद्दल म्हणाल तर अतिशय हीन पातळीवरची टीका होऊनही त्या टीकाकारांवर सरकारने कारवाई केल्याची उदाहरणे नाहीत. जसे विरोधक टीका करतात तसेच समर्थक त्या विरोधकांना प्रत्युत्तर करतात. अर्थात टीका खालच्या पातळीवर घसरत जाते तसेच प्रत्युत्तर सुद्धा त्याच पातळीवर जाते. मग टीकाकार अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि गळचेपी होतीये म्हणून ओरडतात. परिस्थिती अशी आहे की पंतप्रधान काही बोलले नाही तरी प्रॉब्लेम असतो आणि बोलले तरी प्रॉब्लेम असतो. याचे कारण म्हणजे विरोधकांना फक्त आरडाओरडाच करायचा असतो. सरकारने सामान्य जनतेला सोडून द्या पण राजकीय विरोधकांना मुद्दाम त्रास दिल्याचे किंवा खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकल्याचे उदाहरण आहे का? मग कुठली आणीबाणी चालू आहे? लोकशाही व्यवस्थेत न्याय आणि कायदा व्यवस्था दिवसेंदीवस कुठल्या दिशेने मॅच्युअर होतेय हे कन्फ्युजन आहे. लोकशाहीत लोकांना, म्हणजेच जनतेला, अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याकडील जनता खरंच मॅच्युअर होतेय का हे सांगा. साधं कचरा व्यवस्थापन लोक वैयक्तिक पातळीवर करू शकत नाहीत. मग कुठे तरी जबरदस्ती, म्हणजे कडक कायदे आणि शिक्षा, करायला लागणारच ना? गुन्ह्यात अडकलेल्या अभिनेत्यांचे फॅन फॉलोइंग बघा. त्यांचे चित्रपट १०० कोटींचा गल्ला सहज पार करतात ते कोणामुळे? पण परिस्थितीमुळे साधा पाव चोरणाऱ्या लहान मुलाला मात्र हेच लोक मारहाण करतात. असो. परत तेच पुराण नको.

मोदींच्या कार्यशैलीवर फिदा असणारांना इंदिरा गांधींची कार्यशैली खटकावी, हे भलतेच रोचक आहे!!!

In reply to by सुनील

विषय आणीबाणीचा आहे. मोदींची कुठली कार्यशैली इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या वेळेस असलेल्या कार्यशैली सारखी वाटतीये ते तुलना करून सांगा बघू.

ज्या कोणाला सध्या अघोषित, सायलेंट टाईप ची आणीबाणी चालू आहे असले भास होत असतील त्यांनी भाऊ तोरसेकारांचा हा लेख वाचावा. ह्या असाध्य रोगावर इलाज उपलब्ध नाहीये , तरी अशा रोगाने बाधित झालेल्या रुग्णांशी कसे वागावे हे समजून घेण्यासाठी हा लेख वाचावा. टीप: बाधित रुग्णांवर हे लेख वाचून काही परिणाम होण्याची शक्यता ०% आहे.

माझ्या एका प्रतिसादावरचा श्री सुबोध खरे यांचा प्रतिसाद खूपच तिरका झाला आहे तो इथे लोकांच्या सोयीसाठी समोर पृष्ठमध्यावर नकलला आहे. हे म्हणजे एक महिला मला सांगत होती कि सगळ्या मुलींना १६ व्या वर्षी पाळी सुरु होते असे आहे. कारण तिला १६ व्या वर्षी पाळी आली होती.तसे आहे हे सर्व ठळक बोल्ड टाइपमध्ये आहे. यावर मी काहीच भाष्य करू इच्छित नाही. भद्रं ते... (कल्याण असो)

In reply to by राही

बाई, तुम्ही बाई आहात. गप्प बसा. नाहीतर गप्प बसवण्यात येईल. बघे बघत राहतील. बाकी सांप्रत मिपावर बिकांचा एक फुल्याफुल्यांचा धागा नुकताच वर आलाय. त्यात शेवटी लिहिल्याप्रमाणे दुर्लक्ष हा सर्वोत्तम मार्ग असावा हेच खरे.

In reply to by एस

तुम्ही राही यांना व्यक्तिशः ओळखता का? नसेल तर राही हा आयडी असलेली व्यक्ती स्त्री आहे हे कशावरून ठरवलंत?

In reply to by एस

मी आंतरजालावर नवीन नाही पण तुम्ही म्हणताय त्या आयडी मागील व्यक्तीस मीही ओळखत नाही, इतकेच काय तुम्ही आय डी मागे कोण व्यक्ती आहात हेही मला ठाऊक नाही. त्याने काही फरक पडतो? एखाद्या व्यक्तीस ओळखत नसल्यास फार मोठा गुन्हा आहे का?

In reply to by यशोधरा

तंतोतंत हेच म्हणायचे आहे. आभासी विश्वात एखाद्या सदस्यनामाच्या आभासी अस्तित्त्वाच्या मागील खऱ्याखुऱ्या व्यक्तीचा आंतरजालावरील मतप्रदर्शनाशी संबंध का जोडायचा?

In reply to by एस

एसभाऊ, तसे काही झालेय असे वाटत नाही. प्रथम तुमचीच पोस्ट आहे ना, की बाई आहात तुम्ही, गप्प बसा, अशी? त्यावरून तो प्रश्न आलाय की तुम्ही त्यांना व्यक्तिशः ओळखता का, अशी. असे आपले मला वाटते.

In reply to by यशोधरा

:-) यशोताई, नाही हो. ट्रेडमार्कराव मुद्दाम मला लक्ष्य करण्यासाठी असला बाळबोध प्रश्न विचारताहेत. हा आंतरजालावरील फार जुना फ़ंडा आहे. त्याला मी भीक घालणार नाही. अर्थात, मला थेट शिंगावर घेण्याचं त्यांनी धाडस दाखवलंय याचं नाही म्हटलं तरी कौतुक आहेच. @ट्रेडमार्क, 'भद्रम् ते'! :-) :-) :-)

In reply to by एस

मुद्दाम मला लक्ष्य करण्यासाठी असला बाळबोध प्रश्न विचारताहेत. ही समजूत तुमची तुम्हीच करून घेतलीत. त्यामुळे परत हा प्रश्न उभा राहतोय, 'तुम्ही हे म्हणताय त्याला काही आधार आहे का?'. मला राहींच्या एकूण (फक्त या धाग्यांवरील नव्हे) प्रतिसादांवरून ते स्त्री आहेत असं वाटलं नव्हतं. तुम्ही त्या स्त्री आहेत हे नुसतं जाहीरच नाही केलं तर त्यांना गप्प बसा म्हणून सुद्धा सांगितलं. मला थेट शिंगावर घेण्याचं त्यांनी धाडस दाखवलंय याचं नाही म्हटलं तरी कौतुक आहेच. मला जिथे चुकीचं वाटतं तिथे मी बोलतोच, मग ते कुठल्या व्यक्तीला (आयडीला) आहे याचा काही संबंध नाही. मग त्या व्यक्तीला शिंगावर घेतोय असं वाटू दे नाहीतर दुसरं काही वाटू दे. पण मला याची गम्मत वाटतीये की तुमची स्वतःबद्दल काय समजूत आहे.

In reply to by ट्रेड मार्क

तुम्ही त्या स्त्री आहेत हे नुसतं जाहीरच नाही केलं तर त्यांना गप्प बसा म्हणून सुद्धा सांगितलं.
तो अतिशय उद्वेगाने लिहिलेला उपहास आहे. हे जर का तुमच्या किंवा इतर कोणाच्या लक्षात आले नसेल तर मग गैरसमज होण्याची चांगलीच शक्यता आहे. (बराच विचार केल्यानंतर खाली यशोताईंना का आश्चर्य वाटलं याचा उलगडा झाला.कदाचित माझी मांडणी चुकली असावी. पुढील प्रतिसादांपासून अशा वेळी कंसात स्पष्टपणे 'उपहास', 'विनोद', 'खंत' असे लिहीत जाईन.)

In reply to by एस

नाही, उपहास माझ्या तेव्हाच लक्षात आला एसभाऊ, उलट म्हणूनच तुमच्या ह्या भूमिकेचे मला फार फार वाईट वाटले आहे. इतके जजमेंट पूर्ण, इलाईटी पवित्रा घेऊन लिहिणाऱ्या मिपाकरांपैकी तुम्ही नव्हता, असे मला वाटत होते. परवा परवा एका धाग्यावर सत्य कळल्यावर तुम्ही तसे मोकळेपणे लिहिलेले पाहून तुमच्याबद्दल आदरच वाटला होता, पण हे खटकले. असो. आता ह्यावर अधिक लिहिणार नाही. तुमचेही काही कारण असेलच. मिपा मला अनोळखी होत चालले आहे, हेच खरे असावे बहुधा.

In reply to by एस

गप्प बसा म्हणणे उपहास होता हे जरी समजलं असेल तरी बाई आहात हे म्हणणे हा पण उपहास होता का? मला अगदी मूलभूत प्रश्न पडला होता की ज्यांना तुम्ही बाई म्हणून संबोधताय त्या खरंच बाई आहेत का. म्हणून तसा प्रश्न विचारला. आता दुसऱ्या मुद्द्याकडे... जर बाई आहेत म्हणून त्यांना उपहासाने गप्प बसायचा सल्ला देताय ते कशासाठी? मिपावर कधी कोणाला स्त्री आहे म्हणून कोणी प्रतिसाद देऊ नका किंवा तत्सम काही केले आहे का? जर असे एखाद्या आयडीने केले असेलच तर समस्त (पुरुष) मिपाकर, मिपावरील सगळ्या स्त्री असलेल्या आयडींशी असेच वागतात असं तुमच्या उपहासगर्भ प्रतिसादातून वाटतंय. बराच विचार केल्यानंतर खाली यशोताईंना का आश्चर्य वाटलं याचा उलगडा झाला. तुम्ही विचार कुठल्या दिशेने करताय याला महत्व आहे ना? नुसता बराच विचार करून होणार! पटत असेल तर घ्या नाहीतर सोडून द्या. हाकानाका.

In reply to by एस

एस भाऊ, आपल्या भावना पोचल्या. धन्यवाद. प्रतिसाद देत राहिले की अधिकाधिक लचके तोडले जातील आणि इतर लोकांना फुकटची मजा बघायला मिळेल म्हणून एखाद्या स्त्री आयडीने वाद वाढवत नेऊ नये या म्हणण्यामागची कळकळ आणि स्त्रीत्वाची मानमर्यादा व आदर राखण्याचा सद्भाव समजला. उद्वेगही समजला. ज्या प्रतिसादावर आपण वरील प्रतिसाद लिहिला तो मूळ प्रतिसाद खोडसाळच होता. पण दुसऱ्यावर चिखलफेक करणाऱ्याचे हात आधीच चिखलात बरबटलेले असतात हे जाणून त्यातल्या खोडसाळपणाकडे दुर्लक्ष केले. धन्यवाद.

आमचे कुटुंब आणि गोतावळा सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या जागरुक होता. घरी कडाक्याच्या चर्चा चालत. मीटिंगा असत, शेजारपाजारी, नातेवाईक जमत. अनुभवांची देवाणघेवाण होई. लहानपणापासूनच वाचनाची आवड असल्याने मला ते ऐकायला, त्यात भाग घ्यायला , स्वत:ची मते मांडायला आवडे. घरी खूप मोकळे वातावरण असे. तेव्हा सगळे अभिव्यक्तिस्वतंत्र्याच्या गळचेपीविरुद्ध कडाडून बोलत. आपल्या घरच्या चर्चेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणताय हे जितके हास्यास्पद आहे तितकेच त्या महिलेचे स्वतः च्या शारीरीक अनुभवावरून जगाबद्दल अनुमान काढणे हास्यास्पद आहे. माझे एक तरी म्हणणे आपल्याला पुराव्यानिशी खोडून काढता आले आहे का? श्रीमती इंदिरा गांधी यांनी पूर्ण बहुमताच्या आधारावर जितकी एकाधिकारशाही राबवली -- राज्याचे निवडून आलेले सरकार बरखास्त करण्यापासून मर्जीतील न्यायाधीशांना सर्वोचच न्यायालयातील सेवाज्येष्ठता डावलून पदोन्नती देण्यापासून विरोधकांना २१ महिने विनाचौकशी तुरुंगात डांबण्यापासून ते सर्व वृत्तपत्रांची वीज खंडित करण्यापर्यंत -- तितकी एखाद्या हुकूमशहाने हि केली नव्हती आणि तुम्ही म्हणताय

अभिव्यक्ती स्वातंत्र्य.

बढिया है

आणीबाणीत मिसा कायदा आणण्याची गरज का पडली? सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीचा फटका शेतकरी वर्गाला बसला का? समजा नसेल बसला तर निवडणुकीत इतका मोठा वर्ग सत्ताधारी पक्षाच्या विरोधात का गेला?

In reply to by मार्मिक गोडसे

आणिबाणीनंतरच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सर्वसाधारणपणे महाराष्ट्र आणि दक्षिणेतील राज्यांनी बराच हात दिला असे दिसते. महाराष्ट्रात ४८ पैकी २० जागा काँग्रेसला मिळाल्या. २८ जागांचे विश्लेषण केले तर मुंबईतील सर्वांच्या सर्व जागा जनता पक्षाला मिळाल्या. इतरही ठिकाणी सर्वसाधारणपणे शहरी मतदारांनी काँग्रेसला नाकारले. या ठिकाणी शहरी विचारसरणीचा आपल्याला स्वतंत्रपणे विचार करावा लागेल. सर्वसाधारणपणे सामाजिक प्रश्नांबद्दलची जागरूकता, प्रसारमाध्यमांकडून होणारी एका विशिष्ठ विचारसरणीची भलामण किंवा हेटाळणी याचा शहरी मतदारांवर सहज परिणाम होतो. आतातर प्रचार सोपा झाल्यामुळे शहरी मतदार सहजपणे सरसकटीकरण करतात जसे सहकार म्हणजे खाबुगिरीची कुरणे, काँग्रेस म्हणजे बेगडी धर्मनिरपेक्षता वगैरे. खेड्यात आणि त्यातही महाराष्ट्रातील खेड्यात गावपातळीवर रोजगार, लोकांच्या सहभागातून उद्योग आणि संपत्तीची निर्मिती यात काही गावांनी कमालीची आघाडी घेतली होती. आणि हि सर्व गावे नैसर्गिक दृष्ट्या संपन्न होती असेही नाही. याचे उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्हा. आणि हि गावपातळीवरची प्रगती हे काँग्रेसचे निःसंशय असे यश होते. त्यामुळे शेतकरी सहसा काँग्रेसला नाकारत नाही. उत्तरेत एकूणच लोकांची मानसिकता सरंजामशाहीला अनुकूल अशी आहे. तेथे आजही सरकारी नोकरीचे कमालीचे आकर्षण असते. आणि या मानसिकतेमुळेच तेथे बर्याचवेळेला राजकारणी आणि नोकरशहा यांची भ्रष्ट एकी पाहायला मिळते. नसबंदीची सर्वात जास्त सक्ती आणि अत्याचार यामुळे काँग्रेसचा येथे गावपातळीवर देखील पराभव झाला परंतु जेथे असे प्रकार फारशे झाले नाहीत तेथे जनतेने काँग्रेसला हात दिला.

मिपावर कोणीतरी शेतकरी सदस्य असेलच जो माझ्या वरील प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. मला उत्सुकता आहे, कारण इतका मोठा वर्ग आणीबाणीच्या विरोधात गेल्याशिवाय ते जुल्मी सरकार कोसळणे अशक्य होते.

आणीबाणीचा अनुभव नाही. अगदी दुपट्यात वगैरे असायचा पण संबंध नाही कारण आई बाबाच माध्यमिक मध्ये असतील! पण इथे वाचून अंदाज आला. मोदी आणि त्यांचे समर्थक कितीही मूर्खासारखे वागत असले (असं मानू एक मिनिट) तरी ही आणीबाणी नाहीच. कायदेशीर पद्धतीने सरकार ने नियंत्रण आणणे ही वेगळीच गोष्ट असणार. लोकांना दट्ट्या लागला की सुव्यवस्था आली असेलच, पण लोकशाही मध्ये ही स्वागतार्ह कशी असेल? चीन मध्ये पण लोक शिस्तीत वागत असतीलच. पण तसं जगायचं आहे का आपल्याला. जर्मनीत पण लोक शिस्तीत वागतात आणि त्यासाठी सरकार नीट यंत्रणा राबवते, आणीबाणी किंवा हुकूमशाही आणत नाही. म्हणून तेव्हा लोक धड वागत होते तस्मात आणीबाणी उत्तम हा तर्कच चुकीचा आहे. आणि वर मोदी सरकारशी त्याची तुलना करणं सुद्धा चूक आहे. मोदी पुष्कळ चुकत असतील, माझंही तेच मत होत चाललं आहे, तरी ही काही आणीबाणी नाही. कारण त्याविषयी मी दुनियाभर बोंबलू शकतेय.

इथे धागालेखकाने खास करून आपले अनुभव प्रत्येकाने मांडावेत असे लिहिले होते म्हणून वैयक्तिक अनुभव लिहिले. हे अनुभव सार्वजनिक ठिकाणचे होते. बॅंक, रेल्वे, पोस्टऑफिस बंदर गोदी, बेस्ट बसेस, खाजगी गाड्या व त्यांचे चालक अशा थिकाणचे म्हणजे सामान्य माणसाला रोज सामोरे जावे लागणाच्या ठिकाणचे अनुभव अत्यंत म्हणजे आश्चर्यकारकरीत्या सुखद होते. हे लिहायचे होते ते लिहिले.

माझ्या वडीलांनी नुकत्याच काही आठवणी मला सांगितल्यात माझे आजोबाचे अहमद्नगर जिल्ह्यातील एका काहीशा दुर्गम गावात किराणामालाचे दुकान होते. जोडीला ते काही प्रमाणात सावकारी करत. यात भांडी गहाण ठेवून पैसे कर्जाऊ दिले जात. काही लोकांना कर्ज फेडता न आल्याने अनेक भांडी आजोबांकडे जमा झाली होती. या भांड्यावर सहसा भांड्याच्या मूळ मालकाचे नाव कोरलेले असायचे. आणीबाणी जाहीर झाली तेव्हा माझे वडील पुण्यात होते. ते तातडीने गावी गेलेत. आणि संभाव्य धोका लक्षात घेवून त्यांनी ही भांडी गोळा करुन शहरात आणून विकलीत. पुढे कधीतरी गावातून आजोबांच्या सावकारीबद्दल तक्रार केली गेली पण झडतीस आलेल्या अधिकार्‍यांना कसलाही पुरावा न मिळाल्याने कारवाई करता आली नाही. आणीबाणीच्या काळात माझ्या आई-वडीलांचा विवाह झाला. पण त्यात कसलीही अडचण आली नाही.

मुंबईत एक भिकारी दिसत नव्हता. रस्ते, रेल्वे देवळे कुठेही भिकारी नव्हते. सगळ्या भिकाऱ्यांना पकडून दूर कुठेतरी रस्तेबांधणी वगैरेसारख्या कामाला लावले होते असे बोलले जाई. रेल्वेतले आणि बाहेरचे फेरीवालेसुद्धा नाहीसे झाले होते.रस्ते रोज प्रामाणिकपणे झाडले जात. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाईभत्ता गोठवला होता. गावोगावच्या खाजगी सावकारीवर गदा आली होती. राजकीय क्षेत्रात मात्र अस्वस्थता आणि नापसंती होती. सरकारविरोधी विचारांच्या लेखन भाषण प्रगटनावर सेंसॉरशिप होती. वृत्तपत्रांतला मजकूर सेंसॉर होई. कार्यकर्त्यांची धरपकड झाली. नसबंदीचा अतिरेक झाला हे माझ्यामते सामान्य जनांमध्ये सरकारविरोध तीव्र होण्याचे प्रमुख कारण होते. लोक चवताळले. यामध्ये सर्व थरांतले पुरुष होते. सरकारी वर्तमानपत्रे आणि आकाशवाणीदूरदर्शन यांमध्ये इंदिरा गांधी आणि वीस कलमी कार्यक्रम यांच्या जाहिराती आणि उदो उदो अगदी नकोसा झाला. एलीट वर्ग विरोधात गेला. असे खूपसे.

In reply to by राही

तुमचे ह्या धाग्यावरचे एकुणच सर्व प्रतिसाद वाचून असे दिसते की त्यावेळचा सरकारी कर्मचारी वर्ग, त्यांच्यावर आणिबाणी लादल्यावरच इमानदारीत काम करायला लागला, ऐरवी ते लोक कामाच्या ठिकाणी जाऊन फक्त पाट्या टाकत होते.

In reply to by प्रसाद_१९८२

सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेविषयी आजही लोकांमध्ये पुष्कळ नाराजी असते. तशीच ती तेव्हाही होती. सगळेच अप्रामाणिक आणि कामचुकार नसतात. पण जेव्हा या अप्रामाणिक आणि कामचुकारांची टक्केवारी घटते तेव्हा सुव्यवस्था आणि शिस्त निर्माण होते. आणीबाणीत ही टक्केवारी धाकाने म्हणा अथवा दपटशामुळे म्हणा, खूपच घटली होती. सर्वसामान्य जनजीवन आश्चर्यकारक रीत्या सुरळीत झाले होते. त्यानंतर आजतागायत इतकी सुव्यवस्था पाहायला मिळालेली नाही. आणीबाणी कळत्या वयात न पाहिलेल्यांचा यावर विश्वासही बसणार नाही. राजकीय क्षेत्रात नाराजी पसरली कारण सरकारविरोधी विचार प्रगटनावर बंदी आली. एलीट वर्गाचा रोष झाला. समाजवाद्यांनी भूमिगत राहून या गळचेपीचा प्रतिकार केला. त्यांना क्विट इंडिया चळवलीतल्यासारखे वलय प्राप्य झालें . हा काळ त्यांच्या लोकप्रियतेचा परमोच्च बिंदू होता. नसबंदीच्या अतिरेकामुळे आणीबाणीविरुद्ध खरा रोष निर्माण झाला. सर्व स्तरातल्या पुरुषांमध्ये मोठाच असंतोष पसरला.

मुंबईतील सर्व धडधाकट भिकार्यांना पकडून जायकवाडी धरणावर "रोजगारासाठी" नेले होते.तेंव्हा त्यांना १२ रुपये रोजगारावर ठेवले होते आणि मुंबईत तेंव्हा भिकार्यांना साधारण ६० रुपये रोज मिळत आणि काही मोलाच्या ठिकाणी २५० रुपये रोज या भिकार्यांना काम करण्याची मुळीच सवय नव्हती. त्यामुळे ते एक एक करून पळून परत मुंबईत आले. तेंव्हा एक वर्ष भरात मुंबईत परत सर्वत्र भिकारी दिसू लागले.

In reply to by सुबोध खरे

धरणाचे काम २४ फेब्रुवारी १९७६ संपले होते. 'काही काम राहिले तर नोंद करून ठेवा, ४ महिन्यात मी आणीबाणी लावतेच आहे' असे बाईंनी शंकरराव चव्हाण यांना सांगितले असल्यास गोष्ट वेगळी.

In reply to by सर टोबी

टोबी सर आणीबाणी २६ जून १९७५ रोजी लावली होती. हि नोंद घ्यावी अशी विनंती आहे. बाकी भिकाऱ्यांना जायकवाडी धरणाच्या कामावर पाठवले होते अशी पेपरात बातमी वाचल्याचे आठवते. मी काही जायकवाडीला पहायला गेलो नव्हतो. अगदी जायकवाडी नसेल फाळके वाडी नाही तर कोळके वाडी असेल काय फरक पडतो. भिकारी एक वर्ष नव्हते हि वस्तुस्थिती आहे. मी जरी आणीबाणीचा विरोधी असलो तरी फुकट्या लोकांना रोजगारावर धाडले हि चांगलीच गोष्ट होती हि वस्तुस्थिती बदलत नाही. जाता जाता -- आणीबाणी नंतर १९८०-८१ च्या सुमारास दादरच्या पुलावरील भिकाऱ्याने आपली मोक्याची जागा आपल्या जावयाला आंदण दिली आणि तो डोंबिवलीला भीक मागायला गेला अशी बातमी पण वाचली होती

In reply to by सुबोध खरे

माझ्या प्रतिसादात थोडी गफलत झाली पण बारकाईने विचार करता अजून काही प्रश्न मनात आले त्यांचा हा उहापोह. १९७५ च्या काळात ६० आणि २५० रुपये म्हणजे काय असावे याचे माझ्या माहितीप्रमाणे वर्णन करीत आहे. सत्तर ते नव्वदच्या दशकामध्ये महागाई वाढीचे प्रमाण बरेच जास्त होते. बऱ्याच वस्तू सहजच वार्षिक १०% वेगाने महाग होत असत. आता या ठिकाणी मी माझा १९८९ सालचा मुंबईतील खर्चाचा मर्यादित तपशील देतो. त्यावरून १९७५ सालच्या किमतीचा अंदाज यावा. मी ८९ साली मुंबईत असताना दररोजचा बाहेरचा खर्च २० रुपयाच्या आत होत असायचा. सहा रुपयात वाशी ते वरळी असा येऊन जाऊन प्रवास, दहा रुपयांपर्यंत बाहेरचे खाणे आणि मित्रांबरोबर दोन-एक वेळा चहा एवढे सर्व त्यात होत असे. सत्तरीच्या दशकात मला कुणाला भिक्षा देण्याचा प्रसंग आला नाही परंतु ८३ च्या दरम्यान मुंबईत सुट्या पैशांची प्रचंड चणचण होती. त्यावेळेला भिकारी १ रुपया दिल्यावर ९० पैसे खळखळ न करता देत असत. म्हणजे ७५ साली १० पैसे भिक्षा दिल्यावरही भिकारी आनंदाने तुमचा पाठलाग थांबवित असावेत असा अंदाज करायला हरकत नाही. म्हणजे ६० रुपये ज्याचे सरासरी उत्पन्न आहे त्याला ३ तासाच्या दोन 'शीफ्टमधे' ६०० लोक भिक्षा देत असावेत. पाच पैसे देणारे पण असतील पण आपल्या उदाहरणाच्या सुटसुटितपणासाठी आपण त्यांचा विचार करायला नको. तर ६ तासात ६०० तर तासाला १०० लोक भिक्षा देत असणार. म्हणजे एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी तासाला १२ वेळेला सिग्नल पडत असेल तर ८ जणांनी टॅक्सी अथवा बसमधून भिक्षेकऱ्यांना पैसे द्यायला हवे. भीक देण्याचे इतके 'आदर्श' प्रमाण आजही, जेंव्हा सर्वसाधारण मध्यमवर्गीयांची क्रयशक्ती सुधारली आहे असे दिसते, त्या काळात दिसत नाहीये. आपले वरील उदाहरण ४ पटीने मोठे केले तर (२५० रुपये उत्पन्नासाठी) तर कायदा आणि सुव्यवस्थेचाच प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणजे सिद्धिविनायकाच्या मंदिराबाहेर तासाला ४०० लोक भिक्षा देण्यासाठी रांगा लावतायत असे दृश्य दिसले असते कि जे अतिशयोक्तीपूर्ण वाटते. एवढे करूनही असा एखादा हायली पेड भिक्षेकरी असेलच तर पांगुळगाड्यावरून साधारण ५ किलो चिल्लरचे बोचके घेऊन बंदे रुपये करण्यासाठी तो चालला आहे असे कोणीतरी पहिले असेलच.

In reply to by सर टोबी

१९७२- ७५ या काळात मुंबईत सरकारी नोकरीतील लिपिकांचे सुरुवातीचे पगार २५० -३५० या रेंजमध्ये असत. राज्य सरकारचे कमी, केंद्र सरकारचे जास्त. गोदीमध्ये कमी. बॅंका एल आय सीमध्ये जास्त. सात रुपये, दहा रुपये अशा सुरुवातीच्या वार्षिक वेतनवाढी असत.

In reply to by सर टोबी

6 Professional Beggars In India Who Are Probably Richer Than You & I https://www.storypick.com/professional-beggars-in-india/ Mumbai's beggars earn Rs 180 cr a year http://timesofindia.indiatimes.com/articleshow/1797524.cms?utm_source=c… let me introduce Bharat Jain who begs in Mumbai The 'Richest' beggar of the country, Bharat is the owner ... on an average a beggar can earn Rs. 1500 a day. https://www.quora.com/How-much-money-does-a-beggar-make-in-India सूज्ञांस सांगणे न लगे

माझे आजोबा वय ९३, अजूनही घरी कधी आणीबाणीचा विषय निघाला की तिचे जोरदार समर्थन करतात. गाय वासरु प्रेम इतके की दुसरे कुमार केतकरच. स्वातंत्र्य चळवळीत तुरूंगवास झाला असतानाही स्वातंत्र्य सैनिक म्हणून पेंशन घेतले नाही. आणीबाणीच्या काळात ते BMC मध्ये लिपिक होते. शिस्तबद्ध कामाची सवय असल्यामुळे त्यांना काही अडचण आली नाही, परंतू त्यांचे सहकारी उजव्या विचारसरणीचे व भ्रष्टाचारी असल्यामुळे ते दडपणाखाली काम करत, त्यांना आजोबांची भीती वाटायची. आजोबांच्या मते प्रामाणीकपणे काम करणाऱ्याला काहिही त्रास झाला नाही. भिकाऱ्यांबद्दल मी त्याना विचारले. भिकारी पकडण्याकरता BMC ची वाहने वापरली होती. कुठल्याही धरण प्रकल्पासाठी त्यांना ठेवलं नसावे, कारण त्यांची निवासाची सोय आणि स्थानिकांचा रोजगार हिरावणे हे सरकारला शक्य नव्हते. माझे वडील आणीबाणीच्या काळात विदयार्थीदशेत होते. रेल्वे आणि बसेस वेळेवर धावत , ह्यापेक्षा जास्त माहिती त्यांच्याकडून मिळू शकली नाही. आणीबाणीला जनतेने नाकारले हे सत्य आहे, परंतू आणीबाणीमुळे खरोखरच देशातील प्रत्येक वर्गाला झळ बसली असेल असं मला वाटत नाही. ठराविक वर्गाला झळ पोचली असेल व ते डांगोरा पिटण्यात यशस्वी झाले असावेत.

In reply to by मार्मिक गोडसे

परंतू आणीबाणीमुळे खरोखरच देशातील प्रत्येक वर्गाला झळ बसली असेल असं मला वाटत नाही. ठराविक वर्गाला झळ पोचली असेल व ते डांगोरा पिटण्यात यशस्वी झाले असावेत.
नाझी जर्मनीतपण प्रत्येक वर्गाला झळ नव्हती बसली. ज्यु लोक डांगोरा पिटण्यात यशस्वी झाले असं म्हणणार का?

In reply to by मार्मिक गोडसे

त्या काळी गरीब शहर किंवा खेडेगावातील जनतेचे प्रमाण खूपच असणार आणि त्या गरीब वर्गाला झळ बसली काँग्रेस निवडणुका हरली पण नंतर पुन्हा मुसंडी मारून जनता पार्टी ला चारीमुंड्या चित केले .

In reply to by मार्मिक गोडसे

याच धर्तीवरचे खालील मुद्दे आठवतात - १. नोटाबंदीचा त्रास फक्त काळापैसावाल्यांनाच झाला. २. टॅक्सचोरच जीएसटी ला विरोध करतात, बाकीचे खुश आहेत. :)

चुकीची तुलना. आणीबाणी अत्याचार करणारे पुढील निवडणुकीत पुन्हा निवडून आलेत, नाझींच्या बाबतीत तसे घडले का?

In reply to by मार्मिक गोडसे

मुळात जनता पार्टी हि खिचडीच होती. त्यांची एकसंध अशी विचारसरणी नव्हती. ज्यात विचारसरणीने पार दोन टोकाचे असलेले पक्ष सुद्धा म्हणजे कम्युनिस्ट आणि जनसंघ हे एकत्र आले होते. त्यामुळे ती टिकणारी नव्हतीच. त्यांचा एकच मूळ हेतू होता तो म्हणजे लोकशाहीची पुनर्स्थापना आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाहीला विरोध. काँग्रेस त्या काळातही तळागाळाच्या लोकांमध्ये गांधीबाबाची काँग्रेस म्हणूनच प्रसिद्ध होती. सर्व दूर पसरलेल्या जनतेत इतर पक्षांचे तितके बस्तान बसलेले नव्हते. तेंव्हा काँग्रेस परत निवडून येणार यात कुणाल फारशी शंका नव्हती. एवढच होतं कि जनता पक्ष आपला ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल कि नाही. परंतु समाजवादी लोकांच्या मूळ विचारसरणीमुळे ( ज्यात नेते जास्त आणि अनुयायी कमी) तो तीन वर्षातच आटपला.

वाचतोय. पण राजकीय धाग्यावर काही लिहायच धाडसच होत नाही.

वैयक्तिक टीका टाळून करा सुरवात हळूहळू , स्वतः ला व्यक्त करण्यासाठी असल्या व्यासपीठाचा उपयोग होतो व्हाट्स ऍप तर पोरखेळ च झाला आहे .