नास्तीकांसाठी मुस्लिम जिवनपद्धती
*** विषयारंभास घडाभर ***
हा विषयारंभ मला तो निटसा जमणे मला स्वतःलाही अपेक्षीत नाही :) नास्तिक मंडळींनी वाचलाच पाहिजे अथवा पटला पाहिजे असा आग्रह नाही. सरळ मुख्य मुद्याला जाण्यास हरकत नसावी.
मी मागे नास्तीकांसाठी हिंदू जिवनपद्धती असा धागा काढला होता. हिंदू धर्मातही नास्तिकतेच्या तात्विक खंडणावर बर्या पैकी भर राहीला असला तरी नास्तिकांनाही आपला स्वतःचा गड सांभाळून रहाता येते. अनेक नास्तिक तत्वज्ञांची सोबत असते एवढेच नाही आस्तीकातले विवेकानंदांसारखे अती रथी महारथी सुद्धा नास्तिकांना सांभाळून घेताना दिसतात. हे केवळ अनुषंगिक तुलना म्हणून पण एनीवे हा ह्या धागाचर्चेचा विषय नाही.
दुसर्या बाजूला दुसरा धर्म आहे ज्यातले, 'अमुक हाच ईश्वर आहे आणि अमुकच त्याचा शेवटचा प्रेषित आहे' तसे नास्तिकांसाठी (ईश्वर न मानणारे या व्याख्येने) काही जागा शिल्लक ठेवत नाही. जिथे आस्तिकतेच्या दुसर्या छटांना निटशी सुरक्षीत जागा नाही तिथे नास्तिकांना ' ब्र' काढणेही दुरापास्त असावे. तुम्ही धर्मा बाहेरचे नास्तिक असाल तर इतर काफीरांप्रमाणे काफीर असता आणि धर्म स्विकारला अथवा जन्मतः मिळाला असेल नंतर नास्तिक झाला तर धर्मद्रोही असता. आणि दोन्ही साठी खूप चांगली मानवीय वागणूक त्या ग्रंथांमधून सांगितली असावी असे प्रथम दर्शनी तरी मत झाले नाही. व्यक्तिगत स्तरावर हिंसा छळ होऊ शकतेच पण सार्वजनिक स्तरावर आपल्या स्वतःच्या देशाचा अफगाणिस्तान किंवा इराक ही बनवून घेण्यात मागे पुढे पाहिले जात नाही. आता हे सर्व माहित असले तरी बाह्य नास्तिकांना दिव्याच्या भोवती घोटाळणार्या सजीवांप्रमाणे आकर्षण वाटत असते, जे अशा दिव्य्या पासून दूर रहातात ते सगळे एकजात फोबीकच असतात असा दृढ विश्वास या नास्तिकतेचा मुख्य गूण असेल तर असो बापडे. शेवटी ज्याला जिथे शितलता लाभते तिथून त्याने घ्यावे.
.
.
* संदर्भ १ , संदर्भ २ , संदर्भ ३
, संदर्भ ४ , संदर्भ ५, संदर्भ ६ संदर्भ ७
* Atheism and secular thought in Islam
*** विषयारंभ संपला ***
मुख्य चर्चा विषय
ईस्लामिक तत्वज्ञान आणि/किंवा मुस्लीम जिवनपद्धतीत नास्तीकांना स्थान आहे का ? कोणत्यास्वरुपाचे आहे आणि त्यांना (नास्तिकांना) त्याज्य असलेल्या गोष्टी नाकारुन उर्वरीत बाबींसाठी मुस्लिम जिवनपद्धतीचा स्विकार त्यांना कशा पद्धतीने करता येऊ शकतो ?
मुख्य उत्तरे अर्थात नास्तिकता वाद्यांकडुन अपेक्षित आहेत, ईतर मंडळींनी त्यांच्या साशंकता मांडण्यास हरकत नसावी .
.
.
.
.
.
.
.
.
.
* धागा लेखकाच्या साशंकतेमुळे विषयारंभ कितपत जमला असेल माहित नाही, पण चर्चा शक्य तेवढी रचनात्मक आणि सकारात्मक अपेक्षित आहे. अर्थात रास्त टिका सभ्यतेने मांडण्यास हरकत नसावी.
* ज्यांना चर्चा विषय झेपत नाहीत त्यांनी चर्चेत सहभाग टाळण्यास हरकत नाही , पण आंगण वाकडे म्हणजे चर्चा धाग्यात अमूक एक नाही असे बहाणे घेऊन येऊ नयेत. ज्यांना चर्चा विषय समजला नाही पण चर्चेत सहभागी व्हायचेय त्यांच्यासाठी धागा शीर्षकही पुरेसे आहे.
* कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु न ठेवता केवळ तात्विक चिकित्सेच्या चर्चेच्या दृष्टीने चर्चा मिपा धोरणाच्या मापदंडात बसणारी अधिकतम सभ्यतेने करावी (चिकित्सक कठोरता चालते) जमेल तेथे ससंदर्भ करावी हि नम्र विनंती.
* अनुषंगिका पलिकडे अवांतरे टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी अनेक आभार.
*** *** ***
* भारतीय माजी मुसलमान (फर्स्टपोस्ट लेख)
* https://en.wikipedia.org/wiki/Hamid_Dalwai
*** ***
ट्विटर हॅशटेग यादी
#atheism
#atheist
#AtheismNotACrime
#rejectingislam
#wheniwasamuslim
#freefromhijab
#ApostasyNotACrime
#ExMuslims
#ExMuslimBecause
#SaveExMuslims
#blasphemylaws
#BlasphemyNotACrime
#FastDefying
#HumanRights
#humanrights
*** ***
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जिथे इतर धर्मीयांचं अस्तित्व
श्रद्धा नसल्या तरी आस्था असू शकतात.....
नास्तीकांसाठी
नाही नाही, केवळ सांस्कृतिक.
एकेश्वरवादी
!
आता याला काय म्हणावे
(काळाची) उबळ + फोबीआ ?
असं काही वाचलं
तसा या गोष्टींवर अनेक
वय वाढते तसे कर्मठ होतो
मला सुद्धा हेच म्हणायचे आहे .
काही समजेना बघा!
आपल्या प्रमाणेच प्रश्न
पुढे विचारतो.
चंद्रावर ठिपक्यास जागा , बद्दल नेमके उत्तर मिळेल का ?
काय राव !! इतकं कळेना होय?
कुणि सहिष्णू होत असेल तर पुरोगामींच्या पोटात का दुखावे ?
मुळात या विषयावर हिंदुनी बोलून काय उपयोग ?
'The left is wrong on Islam. The right is wrong on Muslims'
बिनीचा विदा
कदाचित आपण म्हणताय ते बरोबर आहे.
विषय संबंधीत आणखी संदर्भ
@जयंत नाईकः मी हेच म्हणत आहे!
डॉ. अलि रिझवी यांचे पुस्तक आणि मुलाखत डोळ्या खालून घालावी
धन्यवाद, मागासाहेब !
...कृपया सदर मुलाखतीचे मराठीत
चेतन भगत यांनी सुचवलेला
जबरदस्त विश्लेषण ! आता हा
मुस्लिम समस्या व विवेचन