जिरे पन्नास ग्रॅम, त्याला सांग काड्या नकोत!
लेखनप्रकार (Writing Type)
साधारणपणे सात तारखेनंतर दुकानातली गर्दी भयंकर असायची. कारण प्रेसचे पगार व्हायचे. एखाद्या आठवड्याने गर्दी जरा कमी व्हायची. मग आई एका संध्याकाळी हाक मारायची. आणि यादी करायला बसवायची. मी आमच्या दोन खोल्यांच्या घरात स्वयंपाक खोलीमध्ये पाटावर बसून वाट बघायचो. आईकडे तिने काढून ठेवलेला पाठकोरा कागद असायचा. मी खाली धरायला वही घेऊन पेन्सिलिने यादी करायला सुरुवात करायचो.
हं लिही,
स्वच्छ मोहोरी शंभर ग्रॅम
जिरे पन्नास ग्रॅम, त्याला सांग काड्या नकोत!
हरबरा डाळ एक किलो, स्वच्छ हवी, मागच्यावेळी पिवळे खडे निघाले होते.
मुगाची डाळ एक किलो
गुळ अर्धा किलो
शेंगदाणे अर्धा किलो, खवट नको. नाहीतर आई परत करायला येईल म्हणावं!
खोबरे पाव किलो - वास अजिबात नको.
असे सगळे सांगत सांगत यादी तयार होत असे.
यादी व्यवस्थित खिशात ठेव. सुरेशला सांग की सगळे व्यवस्थित दे. नाहीतर आई येईल. अशा सगळ्या धमक्या माझ्याकडून वदवल्या जात.
शेवटी मी न रहावून विचारेच, आई बिस्किट?
बरं लिही एक पारले!
तोवर पाटावर बसून यादी लिहिल्याने घातलेली मांडी दुखायला लागत असे. कारण आईची यादी ही प्रत्येक जिन्नस किती शिल्लक आहे हे पाहात पाहत चाले.
मग तेल. तेलाची आमच्याकडे एक किटली होती. आई तेल संपत आले की उरलेले तेल एका बुटल्यात काढून ठेवत असे आणि मग धुवून वाळवलेली किटली माझ्या हाती येत असे.
सगळी यादी एकदा वदवून सुचना पाठ झाल्या आहे की नाहीत हे पाहून मग आमची स्वारी बाहेर पडे. पैसे वगैरे मिळत नसत. आई ते परस्पर सुरेशला देत असे.
घराबाहेर दादांची त्यांनी त्यांच्या तरुणपणात वापरलेली एक हिरव्या रंगाची सायकल उभीच असे. ही सायकल आजच्या दिवशी मला मिळे.
मग हँडला पांढर्या तिन-चार पिशव्या एकाबाजूला आणि चकचक करणारी धुतलेली किटली दुसर्या बाजूला अडकवून मी सायकल घेऊन निघे. शाहू पथावरून पुढे गेले की साठीबाईंचे घर. त्यासमोर डॉ बर्जेंचा सुरेख टुमदार बंगला. मग भंडारी भवन लागे. पुढे डाव्या बाजूला वळून गेले वास्को हॉटेल लागत असे. त्या चौकात एक खुप छान छोटीशी बाग होती. त्या बागेला उगाच एक फेरी मी मारत असे.
मग एक छोटा रस्ता घेऊन मी सुरेशकडे पोहोचत असे. एका बाजुला सायकल लावून किटली आणि पिशव्या घेऊन दुकानाबाहेर मी उभा रहात असे. दुकानात बहुदा अजुनही गर्दी असेच. पण मला पाहिले की तो हात लांब करून यादी हातातून घेत असे. मी आई ने दिलेल्या सगळ्या सुचना घडाघडा म्हणून दाखवे. त्याकडे त्याचे बहुदा लक्ष नसेच. कारण तो पटापट वर्तमानपत्राचे कागद फाडून मोहोरी बांघण्यात गढलेला असे.
या पुड्या कागदात बांधल्यावर त्यावर तो ज्यावेगाने दोरा गुंडाळून गाठ मारत असे ते अगदी मी पाहात अबसे.
एक मोठा दोर्याचा बिंडा छताला अडकवलेला असे आणि त्यातून दणादण दोरा काढून भराभर पुड्या बांधल्या जात. जर दोन किलो पेक्षा मोठी मागणी असेल तर धान्य सरळ पिशवीमध्येच ओतले जायचे. महिन्याचे दोन किलो तेल किटली मध्ये ओतले जायचे. हे तेल पण एका मोठ्या पिंपातून काढून किटलीत यायचे.
गुळाच्या भेल्या असत. त्या फोडायला एक पहार आणि पाच किलोचे माप असे. योग्य तेव्हढा गुळ फोडून कागदात बांधला जायचा.
दोरा बांधलेल्या या पुड्या पिशव्यात भरून मी त्या सायकल च्या हँडल अडकवायचो. एका बाजूला तेल भरलेली किटली. आणि हळूहळू चालत घरी याचो. पिशवी मध्ये मेणकागदाच्या पॅकेजिंग मधला बिस्किटाचा पुडा अगदी अलगदपणे वर ठेवलेला असायचा.
घरी आल्यावर सगळे किराणामालाचे सामान डब्यात भरले जायचे. काही पितळी डबे होते, काही पारले बिस्किटांचे होते. सगळे जिन्नस जागच्या जागी जात. मग कागदांचा एक छोटा ढीग त्यावरच्या बातम्या वाचून झाल्या की परत रद्दीमध्ये जायचा. दोर्यांचा एक मोठा गुंडाळा असे त्याला सगळे दोरे बांधून ठेऊन दिले जायचे. हेच दोरे मला पतंग उडवताना मिळायचे.
आता या सगळ्यात प्रश्न असा आहे की
यात प्लास्टिक कुठे होते?
कुठे आवश्यक होते?
अचानक कसे इतके प्लॅस्टिक आवश्यक झाले आणि आपण इतके यात गुरफटून बसलो?
प्रतिक्रिया
खूप छान , बऱ्याच जणांच्या
अगदी खरे आहे
"तू फारच शाणा आणि आज्ञाधारक
वाह. मस्त लिहीलंय.
धन्यवाद
प्लॅस्टीक राहूद्या हो. लिहिलय
तो काळ
छान आठवणी.
बहुदा
आम्हि कोणच्याही घरात किंवा दुकानात घुसत असु
छान लिहिलतं
धन्यवाद
छान वर्णन केलंयत.. जुन्या
वा
वा
८० च्या उत्तरार्धात दूरदर्शन
शक्य आहे ...
छान!
हुबेहुब असेच
मस्तच लिहीलंय..
वा! जुन्या आठवणी जाग्या
हा प्रतिसाद सगळ्यात जास्त
+१… पटतंय.
>>
छान लिहिलंय!
छान नॉस्टॅलजीक वास नाकात
आणि महत्वाचं.. हे सामान घेऊन
सहमत..
अगदी सहमत! गुळाचे खडक अजूनही
तो पुडे मोजून उतरवून जमिनीवर
सुंदर वर्णन... बऱ्याच आठवणी
होय
धन्यवाद !
tumhi nashik road che ahat ka
यानुषंगाने घडलेला एक किस्सा
खुपच छान !!!
हा हा हा
हि क्लायंट साईडची समस्या आहे
व्हतय काय की आपण प्रतिक्रिया
मस्त लेख.
छान लिहिलंय...तुम्ही नाशिकचे
स्वतः च्या अंतर्मना च्या
सोमनातथ भाऊ
स्वतः च्या अंतर्मना च्या आरश्यात डोकावून बघा नक्की आपण सगळे लहानपणी एवढे आदर्श वागत होतो का ? कधी तरी वाणसमान आणताना चाराने आठाणे ढापले असतील ना !!!!असलं काही करायची आम्हाला गरजच नव्हती कारण केलेल्या कामाचा मोबदला मिळायचा ना. पण ते पैसे अशा वायफल गोष्टींसाठी खर्च करायची हिंमत व्हायची नाही. कदाचित गरजेच्या वेळी हेच पैसे उपयोगी पडतील याची जाणीव असायची. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बाकीची मुलं गारेगार, बॉबी, चिक्की करल्याशा गोळ्या मधल्या सुटीत खायची व त्याचं मलापण खूप वाईट वाटायचं. पण अशा गोष्टी खरेदी करुन पैसे वाया घालवायचे नाहीत हा आजोबांचाच दंडक व आम्ही दोघी बहीणी तो मुकाट पाळत असू. आज ते बरोबर होतं असं नक्की वाटतं. मला असं वाटतं की, तुम्ही काय, मी काय आपले बालपण हे फार खर्चिक नसेल गेले व गोळ्या, चॉकलेट, पैसे यांची आजच्यामुलांप्रमाणे चैनी करता आली नसली तरी बालपण छान गेले.चाराने आठाणे ढापले असतील ना
हा कायाप्पा वर व्हायरल झालाय
हेच लिहायला आलेलो
मस्त आठवणी . सामान आणण्याची
५० ग्रॅम म्हणजे छटाक. सहसा
अर्धा छटाक --२५ ग्रॅम
उत्तम
Pagination