Skip to main content

रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी गुरुवार, 02/10/2014 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली... इथे अपेक्षित काय आहे ?? आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात. तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन) १. मी क्लासिक ३५० का घेतली ?? अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते) ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च २. क्लासिक ३५० चे फ़ायदे ?? अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो) क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते. ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते) ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही ३. क्लासिक ३५० चे तोटे ?? १. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे. २. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते ३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे) ४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स ५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही ६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत. मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)

वाचने 150746
प्रतिक्रिया 648

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

ऑन लाईन केलात तर नो क्लेम बोनस मिळणार नाही.
अस काही नाहीयं. ऑनलाईन घेताना NCB सेल्फ डिक्लेर करायचा असतो. किती वर्ष क्लेम नाही घेतला ते. त्यावर इन्शुरन्स कॅल्कुलेट होतो. ते नंतर वेरीफाय करतात. मिस्मॅच असेल तर जास्तीचा क्लेम ऑफिस ला येऊन भरायला लावतात. ऑन्लाईन इन्शुरन्स चा काही प्रॉब्लेम होत नाही फक्त कंपनी चा रेकॉर्ड चांगला हवा.

जवळपास ३ महिन्यांच्या वेटींगनंतर काल थंडरबर्ड ३५० एक्स घरी आली. ट्युबलेस टायर्स, अलॉय व्हिल्स, फ्लॅट हॅन्डलबार ही प्रमुख वैशिष्ट्ये. गाडी चालवायला एकदम मख्खन आहे. a

In reply to by प्रचेतस

अभिनंदन ट्युब्लेस टायर आणि पुढे आणि मागे डिस्क ब्रेक्स हि सुरक्षिततेच्या दृष्टीने फार महत्त्वाची उपलब्धी आहे. बाकी जर ABS आणि फ्युएल इंजेक्शन असते तर अजूनच उत्तम झाले असते असे वाटते.

In reply to by सुबोध खरे

धन्यवाद. एबीएस द्यायला हवेच होते. बहुधा पुढच्या वर्षीच्या मॉडेलपासून सुरु होतील असे वाटतेय. फ्युएल इंजेक्शन ५०० सीसी क्षमतेच्या व्हर्जनला दिले आहे.

In reply to by प्रचेतस

हा धागा कधी कसा दिसला नाही ते! प्रचेतस सर, हार्दिक अभिनंदन, जबरी खरेदी, ही गाडी माझ्या विशलिस्ट मध्ये आहे राव. जब्बर गाडी, जब्बर फीचर्स, तुमचे खूप खूप अभिनंदन.

In reply to by प्रचेतस

आफ्टर मार्केट ड्युएल चॅनेल ए बी एस (जर आणि जेंव्हां) उपलब्ध होईल तेंव्हा ते लावूनच घ्या. पावसाळ्यात तेल सांडलेल्या किंवा वाळू असलेल्या रस्त्यावर त्याचा नक्की फायदा होतो हा स्वानुभव आहे. (होंडा युनिकॉर्न आणि बजाज डॉमिनार या माझ्या कडे असलेल्या दोन्ही गाड्यात हा फरक नक्की जाणवतो)

पिंची मध्ये चिन्मय डांगरे नावाचा अवलिया मॅकेनिक आहे. बुलेटपासून ते हार्ले सगळी काम मस्त करतो. तिकडे ए बी स टाकू शकता

महिंद्रा अँड महिंद्रा जावा बाईक्स चे पुनरुज्जीवन करणार हो! मध्यप्रदेश इथल्या पिथमपूर प्रकल्पात होणार निर्मिती. .

In reply to by जेम्स वांड

ट्विन सिलेंडर आणि ३५० सीसी असेल तर किंमत अडीच लाखाच्या पुढे जाइल . महिन्द्राची मोजो चा परफॉर्मन्स चांगला आहे , पण किंमत जास्त असल्यने फ्लोप गेली अहे . बजाज च्या गाड्या तुलनेने स्वस्त आहेत आणि २ लाख हून अधिक किंमत असल्यास आंतरराष्ट्रीय ब्रंडची स्पर्धा असेल

In reply to by कपिलमुनी

पण, जर त्यांना थेट रॉयल एन्फिल्डला कंपेटिशन द्यायची असेल तर त्यांना प्रायजिंग स्पर्धात्मक ठेवावेच लागेल. एनफिल्ड जश्या गाड्या बनवते ते मुद्दाम टोर्क कमी ठेवतात, हायवे क्रुजिंग, क्रॉस कंट्री डोळ्यासमोर ठेऊन, महिंद्राला जर अख्खा एक प्लांट/लाईन/फ्लोर जावाला समर्पित करायचा असेल तर त्यांना ही बाब लक्षात घ्यावीच लागेल, कारण 'इन इट्स ओन क्लास' रॉयल एनफिल्डला स्पर्धाच नाहीये अन मार्केट कॅपचर जबरी आहे. सेल्स फिगर्स पाहून चक्रावून जायला होतं त्यांच्या.

In reply to by सतिश पाटील

मंडळात आपले स्वागत आहे आत मस्त ट्रिप चा वृत्तांत येउद्या

In reply to by सतिश पाटील

रॉयल परिवारात आपलं हार्दिक स्वागत!