लेख जरा घाइतच सेव्ह करतोय काही त्रुटी असू शकतात उगाच लगेच तुटून पडू नये. आणि घाइत का सेव्ह केला हा प्रश्न ही विचारु नये. हा केवळ पहिला भाग आहे दुसरा आणि तिसरा भाग लिहून झाल्या नंतरही लेख वाचला तरी चालेल.
अविश्वासाची कारण मिमांसा केल्या शिवाय विश्वासाच्या प्रक्रीयेस गती मिळणे कठीण असावे.
जून चालू घडामोडी धाग्यावर एका मिपा सदस्यने पुन्हा एकदा लव जिहाद या विषयावरची पोस्ट टाकली आहे. तसा हा विषय मिपावर एखाद दोनदा तरी परंपरावादी वि. पुरोगामी असा चघळून झाला असावा. एका बाजूस पुरोगाम्यांना हे कळत नाही की हिंदू मुस्लिम विवाह परंपरावाद्यांसाठी हा एक कल्चरल शॉक आणि प्रतिष्ठेचा विषय का असतो तर , दुसर्या बाजूस घटनाकारांनी भारतीय राज्यघटनेत असे आंतरधर्मीय विवाहाचे स्वातंत्र्य दिलेच कसे हे परंपरावाद्यांना कळत नसते. खरेतर मुस्लिम बहुसंख्य आहेत तिथे मुस्लिमेतर आपल्या मुलींच्या आंतरधर्मीय विवाह घडवले जाण्या बाबात काळजीत पडलेत हे समजता येते. पण जिथे मुस्लिमेतर लोकसंख्येने बहुसंख्य आहेत तिथेही मुस्लिमेतरच काळजीत दिसतात असे का होत असावे ? खरे म्हणजे अल्पसंख्य काळजीत असले पाहिजे तिथे बहुसंख्य काळजीत दिसतात हा विरोधाभास का असावा ?
हिंदू परंपरावाद्यांच्या बाजूने त्यांच्या भितीची सुरवात इतिहास काळापासून असल्याचे दिसेल. भारतात अक्रमण करणार्या तुरुकांनी आणि त्यांच्या वंशजांनी युद्धात यश मिळाल्या नंतर मुली पळवल्याचे प्रकार केले नसतीच आणि परंपरावाद्यां च्या मनातील बोचणीस काहीच आधार असणार नाही असे नसावे. इराक मधील याझिदी या मुस्लिमेतर अल्पसंख्यांक स्त्रीयांवर लैंगिक गुलामगिरी कशी लादली गेली याचा इतिहास अगदी ताजा म्हण्जे गेल्या दोन-चार वर्षातला आहे, त्यावरुन इतिहास काळाबद्दलचे हिंदू परंपरावादी बोचणीत तथ्य असू शकते की नाही याचा कुणाही सुज्ञ पुरोगाम्याने दुसर्या बाजूनेही विचार करुन पहाण्याची गरज असावी. तुम्ही भारतीय फाळणी पूर्व हिंदूत्ववादी संघर्षाचे साहित्य अभ्यासले तर हिंदूंच्या मुली पळवल्या जाताहेत हि उल्लेख पुन्हा पुन्हा दिसून येतात. त्याच वेळी मी जवाहरलाल नेहरुंची जी काही एखाद दोन पुस्तके वाचलीत ते ह्या विषयाला हात घालताना दिसत नाहीत. अशा जबरदस्तीने पळवून नेण्याच्या भिती ब्रिटीशोत्तर काळात कायदा व्यवस्थेची स्थिती सुधारल्या नंतर कमी होणे सहाजिक असावे. अशावेळी जे काही प्रेम विवाह होत त्यांनाही प्रतिष्ठेपोटी पळवून नेण्याच्या व्याख्येत सहजपणे खपवले जाणे सहाजिक असावे. दुसर्या बाजूला विधवा , परित्यक्ता पुर्नविवाहास अनुमती नसणे, विवाह करुन गेलेलीस धर्माबाहेर काढणे पण विवाहोत्सूकास धर्मात न स्विकारणे सारख्या अडचणींनी हिंदू धर्मीयांनी स्वतःस बांधून घेतले होते हे हिंदू धर्मीय परंपरावादी का कोण जाणे विसरत रहातात , या विषयावर हिंदू परंपरावाद्यांचे विचार बदलण्यात फार मोठा कालखंड निघून गेला. विधवा , परित्यक्ता पुर्नविवाहास अनुमती नसणे, विवाह करुन गेलेलीस धर्माबाहेर काढणे पण विवाहोत्सूकास धर्मात न स्विकारणे या सारख्या विषयावर गांधी नेहरुंसारख्यांनी आवाहने केली असती तरी अंधश्रद्धा आणि रुढींच्या बेड्यात अडकलेला अंधश्रद्ध समाज बदलण्याच्या स्थितीत होता का याची साशंकता वाटते.
एकीकडे विवाहसंबंधांच्या बाबत परस्पर अविश्वास तरीही भारताची घटना समिती बनताना तत्कालीन अप्रत्यक्ष निवडणूकीत काँग्रेसचा प्रभाव पडल्याने परंपरावादी दृष्टीकोणाचे प्रतिबिंब, घटना समिती आणि भारतीयय राज्यघटनेत पडण्यात अडचणी स्वाभाविक ठरतात. संदर्भ पृष्ठ ९४ परिच्छेद २रा तसे स्त्रीचे विवाहाबद्दलचे निवड-स्वातंत्र्य हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही संस्कृतीचा आपापला अंतर्गत गाभा असणे अभिप्रेत असल्यामुळे तसेच तत्वतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुलभूत आधिकर म्हणून स्विकार केल्या नंतर विवहाबाबतचे स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेत नाकारण्यात पॉइंट नव्हता. पण परस्पर अविश्वास आणि असुरक्षिततेची भावना शिल्लक असताना राज्यघटना अंशतः व्यावहारीक (प्रॅग्मॅटीक) असावयास हवी होती का ? कि अविश्वास शिल्लक नसल्याप्रमाणे घटनासमितीने घटना बनवली ते श्रेयस्कर, जेव्हा दोन्ही समाजाची मने या विषयावर व्यवस्थीत जुळून येईल तेव्हा इतिहास बहुतेक घटना समितीने भविष्याचा विचार करुन योग्य घटना बनवली असे म्हणेलही, पण मधल्या काळाचे काय ?
घटनेने स्वातंत्र्य दिले तर मागच्या शतकाच्या उत्तरार्धात स्त्री शिक्षणाचे प्रमाण कमी होते, बाल किंवा तरुण नाबालिक वयातील विवाहाचे आणि पालकांनी विवाह निर्णय घेण्याचे प्रमाण मोठे होते. तरीही तारुण्याच्या उंबरठ्यावर एखाद्या मुलीने परजातीय अथवा परधर्मीय जोडीदारा सोबत निघून जाण्याचा प्रयत्न केलाच तर तीला कागदोपत्राम्च्या अभावी १८ वर्षापेक्षा मोठ्या मुलीसही १८ वर्षाच्या पेक्षा लहान दाखवून वापस आणून समजावले जात असे तरीही हातातून निसटले तर आपल्या घरी अशी स्त्री नव्हतीच असे समजून तीला विसरले जात होते.
इस्वीसन २००० येता येता जातीयतेची धार कमी झाली मुलीला किमान स्वतःच्या जातीतला कुणि आवडलेला नाही ना हे थोडेफार विचारले जायला लागले अर्थात जाती बाहेर आणि प्रेम विवाह अजूनही अवघड होते पण २००० नंतर किमान मोठ्या शहरातून हि बंधने ढिली होऊ लागली असावीत . शक्यतोवर जातीत कर नाही तर किमान धर्मात कर असा परंपरावादी दृष्टीकोणाची प्रगती होत असताना पुरोगामीत्वाने एकदा जात सोडायचा विचार केला की मुला मुली समोर, जात आणि धर्म यात फारसा फरक रहात नाही . २००० च्या काळानंतर मुलीचे वय १८ झालेले नाही हे कागदोपत्री शालेय अॅडमिशनची कागदपत्रे बर्थसर्टीफीकेटच नव्हे तर वैद्यकीय चाचण्यांनीही वयाची निश्चिती करणे कायद्यास अधिक सुलभ झाले. तसे परंपरेतील पालकांसमोरच्या साशंकता दाट झाल्या आणि त्या लव जिहाद नावाने व्यक्त होऊ लागल्या आहेत. पण पंचाईत अशी की १८ वर्षे वय झालेल्याम्चे कायदेशीर अधिकार डावलताही येत नाहीत.
काठी तुटूही नये आणि समस्याही सुटाव्यात यासाठी दिशा काय असाव्यात ? याची चर्चा पुढच्या भागात करेन . क्रॉस युवर फिंगर्स.
* हिंदू मुस्लीम आंतरधर्मीय विवाह, (२)
* हिंदू मुस्लीम आंतरधर्मीय विवाह, (३)
वाचने
6841
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
Why is transliteration not working?
Control + enter करुन बघा.
In reply to Why is transliteration not working? by रविकिरण फडके
control + enter
In reply to Control + enter करुन बघा. by मराठी कथालेखक
लिप्यांतर करणारी स्क्रिप्ट लोड झाली नसेल
In reply to control + enter by रविकिरण फडके
रटाळ
__/|__ . बर्याचदा मते पटली
In reply to रटाळ by कपिलमुनी
किंचितही त्रासदायक मताला आणि
In reply to __/|__ . बर्याचदा मते पटली by माहितगार
शर्करावगुंठन!
In reply to किंचितही त्रासदायक मताला आणि by गवि
उलट आमचे प्रतिसाद गोग्गोड,
In reply to शर्करावगुंठन! by राही
किंचितही त्रासदायक मताला आणि
In reply to किंचितही त्रासदायक मताला आणि by गवि
माझा प्रतिसाद
In reply to किंचितही त्रासदायक मताला आणि by माहितगार
शीर्षक विषयास अनुसरुन तुमची मते मांडा.
In reply to माझा प्रतिसाद by कपिलमुनी
मागाजी मुळात मुसलमान, शीवसेना
काही मुद्दे
सुन्या सुन्या मैफलीत माझ्या
In reply to काही मुद्दे by गामा पैलवान
माहितगार,