✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रकाश

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Sat, 06/23/2018 - 04:14
त्या हातांचे मेहंदीभरले तळवे तळव्यांमध्ये दिवा दिव्यात तेल तेलावर वात वातीचा प्रकाश अन् प्रकाश थेट चेहर्‍यावर . . . प्रकाशाचा वेगच अफाट |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२२/०६/२०१८)

प्रतिक्रिया द्या
2101 वाचन

💬 प्रतिसाद (6)

जव्हेरगंज साहेबांनी 'मि. का.'

हरवलेला
Sat, 06/23/2018 - 05:24 नवीन
जव्हेरगंज साहेबांनी 'मि. का.' हा आयडी हॅक करून हि कविता लिहिली की काय ?
  • Log in or register to post comments

मस्त..

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 06/23/2018 - 11:36 नवीन
समोरुन गोलंदाज धावत येतो आहे, राईट हँड, ओव्हर द विकेट, यॉर्कर टाकायचा प्रयत्न केला, फलंदाजाला अंदाज आला होता, त्याने टप्पा पडायच्या आधिच बॅटने चेंडू सीमापार केला, आणि सहा धावा फलंदाजाच्या खात्यात जमा, . . . . क्रिकेटचा नादच बेकार... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

तुम्ही तुमच्या मराठी

एस
Sat, 06/23/2018 - 18:18 नवीन
तुम्ही तुमच्या मराठी कवितांवरील ऊर्दूचा प्रभाव किंचित कमी करून पहा असे सुचवेन. मेहंदीभरले तळवे वगैरे एकदमच खटकतंय मराठीत. बाकी आशय पोहोचला.
  • Log in or register to post comments

-१

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 06/25/2018 - 10:03 नवीन
असे काही करण्याची आवश्यकता नाही असे मला वाटते. कविता म्हणजे काही सिनेसंगीत नाही की संगीतकाराने ठरवलेल्या चालीवर गीत बांधायचे. कविता स्फुरलेली असते. त्या मुळे ती जशी आहे तशीच असावी. तिच्यावर भाषेची किंवा इतर कोणतीही बंधने लादली जाउ नयेत. दोन किंवा अधिक भाषांमधे कविता असायला काय हरकत आहे? आतिफ अस्लमच्या "तेरा होने लगा हू" या गाण्या मधे येणारे "Shining in the shade in sun like, A pearl upon the ocean, Come and feel me.. How feel me" हे शब्द कुठेही खटकत नाहीत. "लोग क्या कहेंगे?" असा विचार करत कविने कविता लिहू नये, किंबहूना असा विचार करत कविता पाडणारा कवी नव्हेच. अर्थात हे माझे व्यक्तीगत मत आहे. तरी सुध्दा एक अल्पसा संस्कृतप्रचूर प्रयत्न. त्या हस्तांचे कुर्वकयुक्त करतल करतलात दिपक दिपकात तेल तेलात तैलमाला तैलमालेची ज्योती ज्योतीचा प्रकाश अन प्रकाश थेट मुखमंडलावर . . . . . प्रकाशाचा वेगच अतिशिघ्र पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

सुंदर कविता मिका शेठ !

प्रसाद गोडबोले
Sat, 06/23/2018 - 20:11 नवीन
सुंदर कविता मिका शेठ ! पण ह्यावर तांब्यासांप्रदायिक विडंबन येवु शकते असे सुचवुन काडी सारत आहे =))))
  • Log in or register to post comments

मस्त मिकाशेठ

नाखु
Sun, 06/24/2018 - 22:48 नवीन
समोरुन घडामोडी धागा तेवत येतो आहे, कधी भलामण करणारा,कधी विखार ओकणारा, वाचकाने विचार टाकायचा प्रयत्न केला, (हुकुमी) प्रतिसादीला अंदाज आला होता, त्याने मुद्दा पचनी पडायच्या आधिच अवांतराने मुद्दा अगदी धागापार केला, आणि पुन्हा हवा प्रतिसादीच्या भात्यात जमा, . . . . राजकारणाचा नादच बेकार...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा