ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ३
इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ३
रात्री झोपताना सकाळी ७:०० चा अलार्म लावला होता. पण हॉटेलच्या अगदी जवळ असलेल्या व रुमच्या बाल्कनीतून समोरच दिसणाऱ्या चर्चच्या घंटानादाने सकाळी ६:०० वाजताच झोपमोड झाली. अजून थोडावेळ झोपायचा प्रयत्न केला पण तो सपशेल अयशस्वी ठरला, नुसतं लोळत पडण्याचा पण कंटाळा आला तसा उठून बाल्कनीत जाण्यासाठी दरवाजा उघडला, बाहेर गारठा एवढा होता कि प्रतिक्षिप्त क्रियेने ज्या वेगात तो उघडला त्याच्या दुप्पट वेगात परत बंद केला. फोनच्या स्क्रीनवर बघितलं तर ॲक्युवेदर कैरोचं तापमान १०º C आणि रियल फील १२º C दाखवत होतं. साडेसहा वाजले होते. आयता चहा मिळण्यासाठी सात पर्यंत थांबावे लागले असते म्हणून ब्रश करून पँट्रि मध्ये गेलो आणि स्वतःच इलेक्ट्रिक केटल मधे पाणी उकळवून एका मग मध्ये ते पाणी, टी बॅग्ज व शुगर क्युब्स घातले आणि परत रुममध्ये येऊन व्हॉट्सॲपवर आलेले मेसेजेस बघत आरामात (आता सवयीचा झालेला कोरा) चहा पीत बसलो. ८ वाजता पिक-अप होता पण ७:२५ लाच तयार होऊन मी कॉमन रूम मध्ये कोणी आहे का बघायला बाहेर पडलो. तिथे मेहमूद एकटाच कुठल्यातरी आधी झालेल्या फुटबॉल मॅचचे हायलाईट्स बघत बसला होता. त्याला फुटबॉल आणि बास्केटबॉल ह्या त्याच्या व्यक्तिमत्वाला शोभणाऱ्या खेळांमध्ये विलक्षण रस होता. आजच्या माझ्या कार्यक्रमाची त्याला पूर्वकल्पना होती. उद्या म्हणजे २७ फेब्रुवारीच्या माझ्या अलेक्झांड्रीया टूर साठी मी त्याला कार बुक करून ठेवायला सांगितली. मग आमच्या अवांतर गप्पा चालू असताना पावणे आठला बेल बॉय मला पिक-अप करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला तिथे घेऊन आला. माझ्याशी हस्तांदोलन करून “माझं नाव मोहम्मद, मी तुमचा आजच्या टूर साठीचा ईजिप्तोलॉजीस्ट गाईड आहे.” अशी त्याने स्वतःची ओळख करून दिली आणि आपण तयार असाल तर निघायचं का? अशी विचारणा केली. मी तयार असून आपण लगेच निघायला माझी काहीच हरकत नसल्याचे त्याला सांगितले. मेह्मुदने नाश्ता करून निघा असे सुचवले त्यावर माझ्या आजच्या पॅकेज मध्ये ब्रेकफास्ट, लंच सगळं इन्क्लुसिव्ह असल्याचे मोहम्मदने त्याला सांगितल्यावर त्याचा निरोप घेऊन आम्ही खाली उतरलो. जवळच पार्क केलेल्या चकचकीत काळ्या रंगाच्या KIA ‘RIO’ ह्या कोरियन मेड सेडान मध्ये करीम नावाचा ड्रायव्हर आमची वाट बघत बसला होता. माझ्यासाठी कारचा मागचा दरवाजा उघडा धरून मी आत स्थानपन्न झाल्यावर गाडीला पुढून वळसा घालून मोहम्मद, करीमच्या शेजारच्या सीट वर जाऊन बसला. (ईजिप्त मध्ये लेफ्ट हँड ड्राईव्ह गाड्या आहेत.) गाडी सुरु झाल्यावर त्याने मला आजचा कार्यक्रम कसा असेल ह्या विषयी माहिती देताना, सर्वप्रथम आपण ब्रेकफास्ट साठी थांबणार असून त्यानंतर सक्कारा चा स्टेप पिरॅमिड बघून पुढे मेम्फिस चे ओपन एअर मुझीयम. त्यानंतर गिझाचे पिरॅमिडस पाहून झाल्यावर ‘द ग्रेट स्फिंक्स’. नंतर लोकल रेस्टॉरंट मध्ये पारंपारिक ईजिप्शियन जेवण करून पपायरस इंस्टिट्यूटला भेट आणि शेवटी परफ्युम फॅक्टरीला भेट देऊन हॉटेल वर ड्रॉप ऑफ. सर्वसाधारणपणे जवळ असल्याने गिझा पासून सुरुवात होते पण सक्कारा आणि मेम्फिस येथे नंतर वाढत जाणारी पर्यटकांची गर्दी टाळण्यासाठी हा क्रम सुचवला आहे, हा क्रम तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बदलू शकता असे सांगितले. पपायरस इंस्टिट्यूट आणि परफ्युम फॅक्टरी येथे भरमसाठ किमतीच्या वस्तू विक्रीसाठी असून आपण केलेल्या खरेदीवर मिळणाऱ्या कमिशन साठी ह्या ठिकाणी नेण्यात येत असल्याची कल्पना मला मेहमूदने दिलेली होती, पण पपायरस कसे तयार करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता होती त्यामुळे मी त्याला हाच क्रम कायम ठेव, पण मला परफ्युम फॅक्टरीला भेट देण्यात स्वारस्य नसून पपायरस इंस्टिट्यूट झाल्यावर थेट हॉटेलवर ड्रॉप करण्यास सांगितले. हॉटेल ते सक्कारा हे अंतर ३३ किलोमीटर्स असून तेथे पोहोचण्यासाठी अंदाजे ४५ मिनिटे लागणार असल्याचे गुगल मॅप्स दर्शवत होता. थोडं पुढे गेल्यावर एका रेस्टॉरंट समोर नाश्ता करण्यासाठी करीमने गाडी थांबवली. त्या दोघांचा नाश्ता सकाळीच झालेला असून मी येथे काहीतरी खाऊन घ्यावं असं मोहम्मद म्हणाला. जेमतेम सव्वाआठ वाजत होते, एकतर विशेष भूक पण नव्हती आणि आजचा जो भरगच्च कार्यक्रम होता त्यावरून दुपारचे जेवण उशिरा होईल ह्याचा अंदाज येत होता. त्यामुळे थोड्यावेळाने खाऊ असा विचार करून मी त्याला पार्सल घेता येईल का? असे विचारल्यावर तो हो म्हणाला आणि तेथे चांगल्या मिळणाऱ्या ४-५ पदार्थांची नावे सांगून ह्यापैकी तुम्हाला काय खायला आवडेल असे विचारता झाला. त्याने सांगितलेल्या पदार्थांत एकच नाव परिचयाचे होते ते म्हणजे फलाफेल सँडविच. हा प्रकार काल रात्री खाल्ला होता आणि मुख्य म्हणजे आवडलाही होता म्हणून मी त्याला तेच पार्सल आणायला सांगितले. थोड्याच वेळात तो परत आला आणि पार्सलची पिशवी माझ्या हातात दिली ज्यामध्ये सँडविचचा बॉक्स, पाण्याच्या २ छोट्या बाटल्या, ओरिओ कुकीज आणि मॅंगो ज्यूसचा कॅन होता. पुन्हा प्रवास सुरु झाला, काही वेळाने शहरी भाग संपून ग्रामीण भाग सुरु झाला. कालव्याला समांतर असलेल्या रस्त्यावर छोटी मोठी घरे होती, पण रस्त्यात कुठेही टाकलेला कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, जनावरांचे मल-मुत्र, उकिरडे ह्या सगळ्याच्या एकत्रित परिणामाने हा परिसर गलीच्छ वाटत होता. लवकरच वस्ती संपून वाळवंटी प्रदेश लागला. सक्काराची हद्द सुरु होते त्याठिकाणी एका पोलीस चेकपोस्टवर ड्रायव्हरचे लायसन्स आणि ईतर कागदपत्रे, गाईडचे ओळखपत्र व डिकी उघडून गाडीची तपासणी झाली. तिथून थोडंच पुढे असलेल्या तिकीट काउंटरवर जाऊन मोहम्मद माझं १२० पाउंडसचं एन्ट्री टिकेट घेऊन आला.










भन्नाट चालली आहे सफर. उत्तम
In reply to भन्नाट चालली आहे सफर. उत्तम by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद डॉक्टर
In reply to धन्यवाद डॉक्टर by टर्मीनेटर
नक्की लिहा. सविस्तर वर्णन
In reply to नक्की लिहा. सविस्तर वर्णन by डॉ सुहास म्हात्रे
_/\_
फार सुंदर व ओघवत्या शैलीतील
In reply to फार सुंदर व ओघवत्या शैलीतील by एस
धन्यवाद एस.
खूपच मस्त सफर... ते कर्तृश
In reply to खूपच मस्त सफर... ते कर्तृश by लोनली प्लॅनेट
धन्यवाद लोनली प्लॅनेट.
ह्याची देही ह्याची डोळा
In reply to ह्याची देही ह्याची डोळा by प्रचेतस
धन्यवाद प्रचेतसजी.
In reply to ह्याची देही ह्याची डोळा by प्रचेतस
+१
In reply to +१ by निशाचर
धन्यवाद निशाचर.
एकदम मजा आली !
In reply to एकदम मजा आली ! by चौकटराजा
धन्यवाद चौकटराजा.
हा सचित्र भाग आवडला.
In reply to हा सचित्र भाग आवडला. by अनिंद्य
धन्यवाद अनिन्द्यजी
अप्रतिम !!!
In reply to अप्रतिम !!! by निनाद आचार्य
धन्यवाद चार चार नव्वद.
खूपच छान भाग
In reply to खूपच छान भाग by श्वेता२४
धन्यवाद श्वेता२४.
ते कर्तृश कुठे मिळेल भारतात
बहुतेक तरी सोनारा कडून ऑर्डर देऊन बनवून घ्यावे लागेल.
वाह मस्तं चाललीय सफर. लेखन
In reply to वाह मस्तं चाललीय सफर. लेखन by पद्मावति
धन्यवाद पद्मावातिजी...
मस्त सफर!
In reply to मस्त सफर! by यशोधरा
धन्यवाद यशोधराजी.
चित्रे, वर्णन, लेखनशैली, सारे काही .......
In reply to चित्रे, वर्णन, लेखनशैली, सारे काही ....... by सुधीर कांदळकर
धन्यवाद सुधीरजी.
सुन्दर
In reply to सुन्दर by सुबोध खरे
धन्यवाद सुबोधजी.
एक नंबर .....
In reply to एक नंबर ..... by II श्रीमंत पेशवे II
धन्यवाद श्रीमंत पेशवे.
In reply to धन्यवाद श्रीमंत पेशवे. by टर्मीनेटर
खरंय
In reply to खरंय by II श्रीमंत पेशवे II
तुम्ही ग्रेट पिरॅमिड आतून
In reply to खरंय by II श्रीमंत पेशवे II
पेशवे साहेब, या भागाला
In reply to पेशवे साहेब, या भागाला by बोलघेवडा
पिरॅमिड्स फेरोंचे आणि फेरो हे
In reply to पिरॅमिड्स फेरोंचे आणि फेरो हे by प्रचेतस
+१
भारी ट्रिप झाली आहे.
धन्यवाद कंजूसजी. आपल्या प्रवासास शुभेच्छा.
भन्नाट प्रवास लेखन आणी फोटो
In reply to भन्नाट प्रवास लेखन आणी फोटो by सिरुसेरि
धन्यवाद सिरुसेरिजी.
टर्मिनेटर साहेब. फार छान
In reply to टर्मिनेटर साहेब. फार छान by बोलघेवडा
धन्यवाद बोलघेवडाजी.
पेशवे साहेब, या भागाला
In reply to पेशवे साहेब, या भागाला by बोलघेवडा
पिरॅमिड संकुलात मंदिरेही
तेवढा हयरोग्लीफिक लिपीचा चार्ट टाका
In reply to तेवढा हयरोग्लीफिक लिपीचा चार्ट टाका by दुर्गविहारी
हयरोग्लीफिक लिपीचा चार्ट
छान
In reply to छान by रुस्तुम
धन्यवाद रुस्तुमजी. ईजिप्त
मस्त माहिती आणि फोटो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Boudi Sopner Sundori... ;)In reply to मस्त माहिती आणि फोटो... by मदनबाण
धन्यवाद मदनबाणजी.
वा एक सुंदर लेखमाला.
In reply to वा एक सुंदर लेखमाला. by विजुभाऊ
@ विजुभाऊ - आपले मनःपूर्वक आभार _/\_
भन्नाट फोटो आणि प्रवास वर्णन.
स्वतःच्या नजरेतून
Fyi: पुढील भागांतले फोटो दिसत नाहीयेत.
@ गोरगावलेकर, बिपीन सुरेश सांगळे, अथांग आकाश