आलमगीर स्वतः दक्षीणेत का उतरला ??
आलमगीर औरंगझेब तत्कालीन जगाच्या सारीपाटावर पहिल्या पाच शक्तीशाली सम्रांटांमधे गणला जायचा. मराठी राज्य जिंकण्याच्या ईर्षेने तो २७ वर्षे महाराष्ट्रात लढला आणि त्याचा शेवट देखील इथेच झाला हे आपण जाणतोच. पण तो स्वतः दक्षीणेत का उतरला याची समाधानकारक तर्कसंगती मला अजुन लागलेली नाहि.
कुरुंदकरांसारख्या विचारवंतांनी या विषयावर चांगलच विवेचन केलय, पण गुंता पुरा सुटलेला नाहि. मिपाकरांचे विचार ऐकावे म्हणुन हा चर्चा प्रपंच.
औरंगझेबाला महाराष्ट्र काहि अपरिचीत नव्हता. तरुण असताना तो मुघल साम्राज्याचा दक्षीणेचा सुभेदार होता. इथल्या भौगोलीक परिस्थीतीची त्याला जाणीव होती. आदिलशाही, कुतुबशाही वगैरे प्रबळ सत्ताच्या ताकतीचा त्याला व्यवस्थीत अंदाज होता. आपल्या वडिलांच्या मरणोत्तर मुघल सल्तनतीचं तख्त काबीज करायला तो दिल्लीला गेला तेंव्हा शिवजीचे स्वराज्याचे उद्योग सुरु झाले होते. पुढे त्याने खास शिवाजीचा बदोबस्त करायला म्हणुन मोहिमा धाडल्या. पण मिर्झाराजांव्यतिरीक्त कोणि काहि खास छाप पाडली नाहि, किंबहुना सर्वांना पराजयच पत्करावा लागला. मिर्झाराजेंनी मात्र शिवाजीला पुरतं नामोहरम केलं.
अफजलखानाला सैन्यासहीत गारद करणारा, शाइस्तेखानादी सरदारांना आपल्या युद्धकौशल्याने पराभूत करणारा, सुरतेवर मजल मारण्याइतपत योजना आखण्यात तरबेज असलेला, आरमाराची सुरुवात करणारा, सर्वात मुख्य म्हणजे अत्यंत प्रजाहितदक्ष आणि तेव्हढाच लोकप्रीय असा शिवाजीराजा औरंगझेबाला उमगला नसेल असं होऊ शकत नाहि. मिर्झाराजांशी पराजीत अवस्थेत तह करुन शिवाजीराजांनी आपलं २/३ राज्य औरंगझेबाच्या हवाली केलं. आग्र्याला शिवाजीला अटक झाली पण तिथुन तो निसटला. तरिसुद्धा शिवाजी प्रकरणाचा अंत होत आला आहे अशीच परिस्थीती होती, पण चमत्कार वाटावा तसं झालं नेमकं उलट. आणि जे झालं त्यात शिवाजी म्हणजे नेमकी किती अफाट ताकत आहे आणि ति त्याच्या मुलुखात-माणसांत कशी अद्वैताने भरली आहे याची कल्पना औरंगझेबासारख्या चाणाक्ष राजाला निश्चीत आलि असणार.
मिर्झाराजांशी तहानंतर शिवाजीकडे दोन दशक किल्ले देखील उरले नव्हते, त्याचे शिवाजीने दोन शतक बनवले, स्ट्रॅटीजीक डेफ्त म्हणावी अशी दक्षीण दिग्वीजय मोहीम राबवली. सर्वात कहर म्हणजे शिवाजीने आपला राज्याभिषेक करवुन घेतला आणि त्याला काशीच्या अत्यंत सन्माननीय पिठाचे आशिर्वाद लाभले. तत्कालीन राजकारण्यांच्या, त्यातल्या त्यात हिंदु सरदारांच्या नजरेत शिवाजी कितीही पराक्रमी असला तरी होता एक जमीनदाराचा मुलगा. पण राज्याभिषेकामुळे तो क्षत्रीय राजा झाला, आणि नाहि म्हणायला त्याचा परिणाम राजपूत सरदारांच्या मनावर कुठेतरी नक्की झाला असणार. प्रत्यक्ष शिवाजीचं व्यक्तीमत्व किती प्रभावशाली आहे याची कल्पना तर औरंगझेबाला होतीच, वर आता तो मान्यताप्राप्त, सिसोदीया क्षत्रीय म्हणुन राजा झाला. तेंव्हा कुठलाही राजपूत सरदार शिवाजीपुढे टिकाव धरेल याची शंकाच औरंगझेबाला असेल. तसंही शिवाजीपुढे मिर्झाराजांव्यतीरीक्त कोणाचं काहि चाललं नाहि. दिलेरखानासारखे सरदार कितीही लढवय्ये असले तरी आता त्यांची ताकत शिवाजीपुढे अपुरीच पडायची आणि राजकारणात तर ते शिवाजीच्या पासंगालाही पुरत नव्हते.
याच्या पुढची पायरी म्हणजे कुतुबशाही-आदिलशाही-शिवशाही अशी ग्रँड अलायन्स तयार होणार आणि उत्तरेकडील आक्रमणाला केवळ प्रतिकार करणार्या दक्षीणी फौजा आता उत्तरेवर आक्रमण करणार असं राजकारण, अगदी ताबडतोब नसलं तरी, अगदी स्वाभावीक होतं. तसं राजकारण शिजवणं शिवाजीला शक्य होतं. दक्षीणी फौजा अगदीच उत्तरेकडे नाहि सरकल्या तरी शिवाजीच्या प्रेरणेने उत्तरेत बंडाळी सुरु होतील आणि आपल्या पश्चात हे आव्हान पेलण्याची कुवत आपल्या कुठल्याच मुलात नाहि हे औरंगझेब जाणुन होता.
या सगळ्या पार्श्वभूमीवर औरंगझेबाने स्वराज्यावर निर्णायक वार करायचा निर्णय घेतला. पण हे आव्हान पेलणार कोण? जो दक्षीण जिंकेल तो आपला उत्तराधिकारी असं आमीष दाखवुन राजकुमारांना उत्तेजन द्यावं म्हटलं तर त्यांचा धसमुसळेपणा नवीन आफत निर्माण करायचा. सर्व तुर्की सरदार मनगटाने सशक्त असले तरी शिवाजीपुढे टिकाव न धरु शकणारे. शिवाय त्यांची गरज उत्तरेकडच्या मैदानात अधीक. राजपुतांमधे मिर्झाराजांच्या तोडीचा कोणी मोहोरा नाहि, शिवाय मिर्झाराजाला स्वत: आलमगीराने घातपाताने मारवले. तेंव्हा आलमगीर स्वत: मैदानात उतरणार हे ओघाने आलं. पण...
आलमगीर काहि नुसत्या भावनेच्या भरात कारभार करणारा माणुस नक्कीच नव्हता. दक्षीण मोहीमेचं एस्टीमेशन त्याने केलच असावं. पण हि मोहीम इतकी चिवट असणार हे जर त्याला लक्षात आलं असतं तर तो खरच दक्षीणेत उतरला असता काय? एक मत प्रवाह असा आहे कि शिवाजी जिवंत असेपर्यंत औरंगझेब दक्षीणेत यायला तयार नव्हता. पण शिवाजीराजा अकाली निवर्तला आणि हि संधी साधायलाच हवी असा निर्णय औरंगझेबाने घेतला. या दाव्यात कितपत तथ्य आहे ठाऊक नाहि.
शिवाजीने जे राज्य निर्माण केलं त्याचा प्रथमदर्शनी धोका आदिलशाहीला होता. पुढे कुतुबशाहीशी देखील शिवाजीचं वाजलच नसतं याची काहि खात्री नव्हती. तेंव्हा दक्षीणेच्या राजकारणाची शक्ती तिथेच मुरण्याची शक्यता होती आणि त्यामुळे उत्तर-दक्षीणेत एक समतोल साधता आला असता. अशा परिस्थीतीत औरंगझेबाने मुघल साम्राज्याचा पाया खिळखिळा होण्याची रिस्क पत्करुन दक्षीणेवर आक्रमण करण्याची काहिही गरज नव्हती. तरीही तो स्वतः दक्षीणेत का उतरला...
औरंगझेब धर्मवेडा म्हणण्याइतपत धर्मप्रेमी होता असं म्हणतात. तेंव्हा अत्यंत मोलाचं धर्मकृत्य करुन आपलं धार्मीक उत्तरदायीत्व पार पाडावं म्हणुन तो दक्षीणेत उतरला असं एक लॉजीक सांगतात. पण धार्मीक अंगाने देखील त्याची गरज उत्तरेतच अधीक होती. सह्याद्री जिंकायच्या नादात हिंदुकुश मोकळा सोडण्यात काहिच शहाणपण नव्हतं. मुघल फौजा फक्त शिवाजीशी लढायला म्हणुन राखीव नव्हत्या. त्या सतत कुठे ना कुठे युद्धात गुंतलेल्या असायच्या. मुघल साम्राज्य व्यवस्थीत स्थीरस्थावर झालेलं असलं तरिही लहान मोठ्या बंडाळ्या होतच असणार. तरिही औरंगझेब स्वत: दक्षीणेत उतरला... का?
कुरुंदकरांच्या मते अफजलखान वधाचेवेळी शिवाजीची एक चुक झाली. त्याला वाटलं कि अफजलखानाला मारलं तर औरंगझेब प्रसन्न होईल... शिया-सुन्नी वादाची याला पार्श्वभूमी होती, शिवाय स्वतः औरंगझेबाने अफझलखानाचा तडाखा भोगला होता. पण तसं झालं नाहि. अफझलखान खर्च झाला तरी शिवाजी वरचढ व्हावा हे औरंगझेब सहन करु शकला नाहि आणि त्याने शाइस्तेखानाला स्वराज्यावर आक्रमण करायला धाडलं. नेमकी अशीच चुक औरंझेबाने स्वराज्यावर आक्रमणाचेवेळी केली. आपण स्वतः दक्षीणेत उतरलो तर वेळप्रसंगी हिंदु-मुस्लीम वादावर दक्षीणी राजांची युती मोडता येईल असाही औरंगझेबाचा कयास असावा. पण तसं व्हायला फार उशीर लागला. त्याकरता औरंगझेबाला विजापुर जिंकावं लागलं. दक्षीणी युतीच्या अभेद्यतेची कल्पना औरंझेबाला असती तरी तो दक्षीणेत उतरला असता काय??
आलमगीराबद्दल फार काहि वाचनात आलं नाहि माझ्या. 'शहेनशाह' वाचलं आहे, पण ति आलमगिरावर लिखीत कादंबरी आहे, त्याच्या राजकारणाचं काहिच विवेचन नाहि त्यात (मला सध्यातरी आठवत नाहि त्याबद्दल). उपरोक्त चर्चाविषयावर प्रकाश टाकणारं काहि साहित्य माहित असल्यास अवष्य सुचवावे.
शेवटी प्रश्न उरतोच.... आलमगीर स्वत: दक्षीणेत का उतरला????
याद्या
17099
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
रोचक. धागा वाचत राहणार आहे.
दौलताबाद ला भेट दिल्यावर असा
आवडत विषय , जाणकारांनी अजून
१/२
सबका मालिक १ नसतो का ?
In reply to १/२ by manguu@mail.com
पण मग...
In reply to १/२ by manguu@mail.com
....
In reply to पण मग... by अर्धवटराव
त्याच्या मृत्यूने मोगलाई संपली नाहि
In reply to .... by manguu@mail.com
तसेही
In reply to त्याच्या मृत्यूने मोगलाई संपली नाहि by अर्धवटराव
हि लिस्ट वेगळाच डाटा दाखवते
In reply to तसेही by manguu@mail.com
मी ते गंमत म्हणून लिहिले
In reply to हि लिस्ट वेगळाच डाटा दाखवते by अर्धवटराव
ह्म्म्म
In reply to मी ते गंमत म्हणून लिहिले by manguu@mail.com
सद्य परिस्थितीत महाराष्ट्र
...शिवाजी महाराजांनी राज्य
In reply to सद्य परिस्थितीत महाराष्ट्र by भीमराव
हे राज्य चिरडने गरजेचे आहे हे आलमगीर जाणला असावा.
In reply to सद्य परिस्थितीत महाराष्ट्र by भीमराव
किंमत
In reply to हे राज्य चिरडने गरजेचे आहे हे आलमगीर जाणला असावा. by अर्धवटराव
किंमत किती द्यावी लागणार हे आधी कसे समजणार ?
In reply to किंमत by manguu@mail.com
हादिथ / हादिस (ज्यांना
हि एक थेअरी आहेच.
In reply to हादिथ / हादिस (ज्यांना by डॉ सुहास म्हात्रे
औरंगजेबाविषयी समग्र माहिती
जदुनाथ सरकारांचे 'औरंगझेब' वाचायचे आहेच.
In reply to औरंगजेबाविषयी समग्र माहिती by प्रचेतस
पुस्तक आउटडेटेड आहे. स्वतःला
In reply to औरंगजेबाविषयी समग्र माहिती by प्रचेतस
म्हणजे?
In reply to पुस्तक आउटडेटेड आहे. स्वतःला by मेघपाल
बरं, मग तुम्ही प्रौढ वयात
In reply to पुस्तक आउटडेटेड आहे. स्वतःला by मेघपाल
उत्तम धागा
अखेरीस नाईलाज होउन वृध्वत्वाकडे झुकलेला औरंगजेब दक्षिणेत उतरला.
In reply to उत्तम धागा by दुर्गविहारी
एक गोष्ट इथल्या चर्चेत आली
हि एक शक्यता आहे.
In reply to एक गोष्ट इथल्या चर्चेत आली by मनो
शहाजहानच्या मृत्यूपर्यंत
In reply to हि एक शक्यता आहे. by अर्धवटराव
हा पण एक नवीन डाटा पॉइण्ट...
In reply to शहाजहानच्या मृत्यूपर्यंत by मनो
तो अकबर भारतात नव्हताच. तो तिकडेच मेला.
In reply to हा पण एक नवीन डाटा पॉइण्ट... by अर्धवटराव
या ओळीत नमुद केलेला महाराणा कोण ?
In reply to तो अकबर भारतात नव्हताच. तो तिकडेच मेला. by manguu@mail.com
लै गमतीजमती आहेत
In reply to या ओळीत नमुद केलेला महाराणा कोण ? by माहितगार
@ मनो, तुम्हाला काही कल्पना आहे ?
In reply to लै गमतीजमती आहेत by manguu@mail.com
जोधपूर महाराणा अजीतसिंग,
In reply to @ मनो, तुम्हाला काही कल्पना आहे ? by माहितगार
औरंगझेबाने अफझलखानाचा तडाखा ?
होय.
In reply to औरंगझेबाने अफझलखानाचा तडाखा ? by एकुलता एक डॉन
औरन्गजेबाची दक्षिणेतली मोहीम
मराठ्यांचा इतिहास वाचण्याकरिता कृपया पुस्तक सुचवा
टोप्या विणण्यात गेली सत्तावीस वर्षे
असेच काहीसे जि एं नीही म्हटले आहे
In reply to टोप्या विणण्यात गेली सत्तावीस वर्षे by चित्रगुप्त
मलाही पडलेला प्रश्न.
अमरेंद्र ,
In reply to मलाही पडलेला प्रश्न. by अमरेंद्र बाहुबली
रोचक चर्चा! :-)
पानिपतास औरंगजेब कारणीभूत असू
In reply to रोचक चर्चा! :-) by राघव