Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मनिष on Tue, 05/29/2018 - 16:35
सगळ्या बापांसारखेच, आपल्या बापालाही काही कळत नाही याची खात्री पटल्यानंतर… मला ह्याच शाळेत का घातलं? फुटबॉल ऐवजी क्रिकेटला का नाही टाकलं? असे आरोप केल्यानंतर… बाप आहे ना, तो चुकतोच. आपल्यासारखा स्मार्ट तो मुळात नसतोच हे समजून चुकल्यानंतर… मग तू स्वतः बाप झाल्यावर, वैतागून पोरांना ओरडून झाल्यावर प्रेमाने जवळ घेतल्यानंतर… कधीतरी आठवेल का तुला लहानपणी तू शांत झोपल्यावर, कित्येकदा तुझ्या केसांमधून हात फिरवत, हळूच तुझी पापी घेऊन, तुला एकटक पहात असतांना भरून आलेले माझे डोळे. माझ्या गालांवरून ओघळणारे ते पाणी कधीतरी उतरेल का तुझ्या डोळ्यात, माझ्या हळव्या आठवणीने मी नसल्यानंतर? ~ मनिष (28/5/2018)

Submitted by यशोधरा on Tue, 05/29/2018 - 16:52

Permalink

आई गं.. बाबाची आठवण काढायला

आई गं.. बाबाची आठवण काढायला लावणारी कविता..
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Tue, 05/29/2018 - 17:07

Permalink

मस्तं..आवडली.

मस्तं..आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Tue, 05/29/2018 - 17:14

Permalink

जबरदस्त

मनाला चटका लावून गेली.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Tue, 05/29/2018 - 17:20

Permalink

बापाची रिअल व्यथा !

बापाची रिअल व्यथा !
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Tue, 05/29/2018 - 17:38

Permalink

ह्म्म्म...

चांगली आहे! Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by सत्यजित... on Tue, 05/29/2018 - 20:24

Permalink

वाह्...खासंच!

वाह्...खासंच! अतिशय सहज शब्दांत अत्यंत भावस्पर्शी!
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Tue, 05/29/2018 - 22:11

Permalink

चांगली आहे ...

चांगली आहे ...
  • Log in or register to post comments

Submitted by ss_sameer on Tue, 05/29/2018 - 23:08

Permalink

मस्त

बहोत खूब
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 05/30/2018 - 09:40

Permalink

बापजन्म

अनुभुती देत डोळे उघडणारे काव्य आनंदीत बापुस नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Wed, 05/30/2018 - 09:49

Permalink

मस्त..

पहिली चार कडवी जबरदस्त आवडली. त्यानंतरचे पाचवे मात्र संदीप खरेंनी लिहील्यासारखे वाटले. म्हणजे काटाकिरची मिसळ खाताना मधेच एक घास चितळ्यांच्या श्रीखंडाचा अला तर कसे वाटेल? तसे काहीसे वाटले. बाप म्हणजे अस्सल गावरान कोल्हापुरी मटन रस्सा असतो नुसता जाळ. पहिल्या घासात डोळ्यातन पाणी काढणारा. आमचा बाप असाच आहे, आणि तो जसा आहे तसाच आवडतो पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Wed, 05/30/2018 - 11:25

Permalink

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचेच

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचेच आभार! @ ज्ञानोबाचे पैजार - :-)
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Wed, 05/30/2018 - 11:32

Permalink

सुरेख!!

सुरेख!!
  • Log in or register to post comments

Submitted by पुंबा on Wed, 05/30/2018 - 14:10

Permalink

अप्रतीम.

अप्रतीम.
  • Log in or register to post comments

Submitted by खिलजि on गुरुवार, 05/31/2018 - 17:40

Permalink

असं काहीसं मी पण वागतो माझ्या

असं काहीसं मी पण वागतो माझ्या मुलांबरोबर . सुंदर कविता . सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Sun, 06/17/2018 - 17:14

Permalink

Bump...

आज father's day निमित्ताने वर काढतोय...
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3068 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com