ए पावसा !
थोडं थांबना .. मला जे सांगायचय
ते तुला कळतय का सांगना !
सारखच काय ते बरसायचं
सारखं आपलं भरायचं ,
आणि इथे येऊन सांडायचं
तुला नाहि का वाटत ,
थोडा आराम करावासा,?
आरामशीर ढगात बसुन
खालचा हिरवा गालिचा पहावासा ?
ए पावसा !
बास झालं बाबा आता , थोडं तरी ऐकना
तुझ्या मनात नक्कि काय आहे ? एकदा तरी सांगना !
ऐकलीस का कुजबुज कधी ,
“ साला किचाट करतो पाऊस
ह्याला कधीपण ढासळायची
कसली ती भारी हौस ?? “
मला तु आवडतोस
माझं काहिहि म्हणणं नै
पण मला नै आवडत ब्वॉ
तुला बोललेलं काइबाइ !
म्हणुन सांगते .. ऐकना
थोडसं रिप रिप कर आणि
थोडिशी विश्रांती घेना !
कळतो मला तुझा प्रॉब्लेम
तु भरलेल्या ढगांमध्ये कितीवेळ राहणार
मुंबैतल्या गर्दीसारखं तुलाहि तिथे
दाटिवाटित रहायला लागत असणार
अरे पण वेड्या
म्हणुन का तिथुन निसटुन तु
इथे जागा करणार ??
आधीच घामाचा वास त्यात
तु सगळं ओलं ओलं करणार !
तु बघतोस ना किती पाणि साचतं रस्त्यावर
ट्रेन सुद्धा वेळेवर येत नाहि फलाटावर
संध्याकाळ झाली कि तुला भारी चेव येतो
तु थोडीना घरी परतनार्यांची काळजी करतोस
ए पावसा !
खरच थोडसं थांबना .. तो अजुन घरी नाहि आलाय ,
निदान त्याच्यासाठी तरी .. माझं ऐकना !
प्लिझ !
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1753
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
वर्षम आठवला
इथे मुंबईत शहरात
पावसाचे मनोगत