मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संगीत

गीतबाधा

समीरसूर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम्हाला होतं का कधी असं? भूतबाधा व्हावी तशी गीतबाधा होते मला. एखादं गाणं कचकचून चावतं आणि त्याची बाधा होते. मग ते गाणं मला बरेच दिवस सोडत नाही. कित्येक दिवस मी फक्त तेच गाणं ऐकतो, म्हणतो, ओरडतो, कोकलतो, पुटपुटतो. शेवटी बायको वैतागून ते गाणं बंद करायला सांगते. तरी ते गाणं मला सोडत नाही. संपूर्ण गाणं त्यातल्या संगीताच्या एक-एक तुकड्यासकट तोंडपाठ झाल्याशिवाय मीदेखील त्या गाण्याला सोडत नाही. आधी गाणं मला बाधतं, मग मी गाण्याला बाधतो. एका वेळेस १५-२० वेळा आणि असं किमान ८ ते १० वेळा मी ते गाणं ऐकतो.

गेले मोदी कुणीकडे

anilchembur ·
स्वप्नांचा पाऊस पडे सारखा महागाईलाही पूर चढे विमान उडवीत चहूकडे गं बाई .... गेले मोदी कुणीकडे शिक्षण खोटे पदवी खोटी मंत्रीणबाई तुळशी झाली केजरीवालची पडता बिजली दचकून तीचा ऊर उडे गं बाई .... गेले मोदी कुणीकडे पैसा काळा आणू म्हणुनी ठोकूनी भाषण दाही दिशांनी चाय - गाय पे चर्चा करूनी मनकी बाता देश बुडे , गं बाई ...... गेले मोदी कुणीकडे चीनमध्ये झोपाळ्यावरुनी दाढीवाले बिंब बघूनी हसता संघ भगव्या रानी धर्म अफूचे ऊन पडे गं बाई ....

बालगंधर्व.... भाग - २ शेवटचा...

जयंत कुलकर्णी ·
लेखनप्रकार
खालील लेख वाचताना एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला हवी "त्या काळात एखाद्या कारकुनाचा पगार महिना ८ रुपये असायचा तर चांगल्या मास्तरांचा ३०-३५.'' बालगंधर्व.... भाग - १ पहिला... बालगंधर्व....

अवचिता परिमळू...

मनमेघ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अवचिता परिमळू । झुळकला अळुमाळु । मी म्हणे गोपाळू । आला गे माये ।। चांचरती चांचरती । बाहेरी निघाले । ठकचि मी ठेले । काय करु।। मज करा का उपचारू । अधिक तापभारू । सखी ये सारंगधरू । मज भेटवा का ।। तो सावळा सुंदरू । कासे पीतांबरू । लावण्य मनोहरू । देखियेला।। भरलिया दृष्टी । जव डोळा न्याहाळी । तव कोठे गेला वनमाळी । गे माये ।। बोधुनी ठेले मन । तव जाले अनेआन । सोकोनि घेतले प्राण । माझे गे माये ।। बाप रखुमादेवीवरू । विठ्ठल सुखाचा । तेणे काया-मने-वाचा । वेधियेले ।। रात्रीची जेवणे झाली, आवरा आवर करून मी झोपायला निघाले. अचानक कुठून तरी मंद सुगंध येऊ लागला. कशाचा बरं सुगंध आहे हां?

आप की आखों में कुछ .......!

१००मित्र ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आप की आखों में कुछ मेहेके हुएसे राज हैं आप से भी खूबसूरत आप के अंदाज हैं ! काय म्हणावं यार ह्या गाण्याबद्दल ! रेखाला सुरेख म्हणावं , कि विनोद मेहराला ! चित्रीकरणाची तारीफ करावी , की आर डी सारख्या संगीतकाराची ! किशोरच्या सूर्यप्रकाशासारख्या स्वच्छ ,उमद्या तरीही भाऊक अशा अस्सल मर्दानी आवाजाची तारीफ करावी कि लता बाईंच्या स्वर्गीय पण लाडिक (तशी त्यांची अशी लाडिक गाणी कमी आहेत) आवाजाची !

आज श्री. अरूण दाते ह्यांचा वाढदिवस....

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
वाढदिवसानिमित्ताने त्यांचे अभिष्ट-चिंतन. मला आवडलेली त्यांची गाणी.... १. ह्या जन्मावर ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे. https://www.youtube.com/watch?v=ky0osqfJPDE २. भेट तुझी माझी स्मरते https://www.youtube.com/watch?v=9NE4elqxG3Q ३. दिवस तुझे हे फुलायचे https://www.youtube.com/watch?v=T4t-Gc4YoBI ४. स्वरगंगेच्या काठावर्ती वचन दिले तू मला https://www.youtube.com/watch?v=ma6dgjGF9SI आणि ५. येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील https://www.youtube.com/watch?v=RYcuTXiQkDw

कहे कबीरा (४) - निर्भय निर्गुन गुन रे गाऊँगा

मनमेघ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
निर्भय निर्गुण गुण रे गाऊँगा । काव्य म्हणून पाहता पहिल्याच ओळीत 'निर्गुणाचे गुण गाणे' असा वरवर विरुद्ध वाटेल असा शब्दप्रयोग आहे. निर्गुण! ज्याला काहीच गुण नाहीत असा एक अर्थ आणि जे सत्व,रज, तम या गुणांच्या पलिकडचे आहे असे असा दुसरा अर्थ. दोन्ही अर्थ त्या निर्गुणाच्या बाबत योग्यच आहेत, पण मला दुसरा अर्थ जास्त चपखल वाटतो. गुण गाणे ही क्रियाही त्रिगुणांच्या प्रभावातली.हे म्हणजे 'तितिर्षुर्दुस्तरं मोहात् उडुपेनास्मि सागरम्' म्हणजे दुस्तर असा समुद्र छोट्या होडीने पार करण्याची इच्छा बाळगण्यासारखे आहे. पण हे काम मी 'निर्भय' होऊन करीन. भय ही एकूणच सर्वार्थाने मनुष्याला खाली खेचणारी भावना आहे.

कहे कबीर (३)- उड जायेगा हंस अकेला

मनमेघ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
उड़ जाएगा हंस अकेला। जग दर्शन का मेला ।। धृ ।। जैसे पात गिरे तरुवर के । मिलना बहुत दुहेला । ना जानू किधर गिरेगा । लग्या पवन का रेला ।। 1 ।। जब होवे उमर पूरी । जब छूटेगा हुकुम हुजूरी । जम के दूत बड़े मजबूत । जम से पड़ा झमेला ।।2 ।। दास कबीर हर के गुण गावे । वा हर को पार न पावे । गुरु की करनी गुरु जाएगा । चेले की करनी चेला ।। 3 ।। - तसं समजायला सोपं असं हे निर्गुणी भजन. आत्म्याला पक्ष्याची आणि देहाला पिंजऱ्याची उपमा अनेक काव्यातून दिसते. कबीरांनीही पक्ष्याची उपमा दिली आहे. मग ते हंसच का म्हणाले असावेत? हंसचं उलट केलं की सहं (अपभ्रंशाने सो$हं) होतं.

‎निर्गुणी भजने‬ (भाग १)

Anand More ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मला गाण्यातलं फार कळत नाही. रागांची नावं वगैरे तर अजिबातच नाही. शाळेत संगीताच्या तासाला मी दाणी बाईंचा फार आवडता विद्यार्थी असावा. कारण रागाची नावे, त्यांची लक्षणगीते, ते कधी म्हणावेत याचे संकेत, या किंवा अश्या सारख्या सर्व प्रश्नांना तोंडी परीक्षेत मी केवळ एकच उत्तर देत असे, 'आठवत नाही'. त्यामुळे माझी तोंडी परीक्षा लवकर आटपायची आणि लेखी पेपर तर माझ्या पुढे बसलेल्या मुलाचा तपासला की माझे मार्क आपोआप ठरायचे. त्यामुळे बाईंच्या आयुष्यातील अनेक मौल्यवान क्षण मी वाचवले आहेत याची मला खात्री आहे. पण माझ्या मते मी उत्तम कानसेन आहे. सूर मला मोहात पाडतात.

मरण!

DEADPOOL ·
"अरे का तापलायेस माझ्यावर? या निष्ठुर जगातल्या लोकांनी दिलेले चटके कमी आहेत का! तु तरी घे एकदाचा जीव माझा!" म्हातारा आकाशकडे पाहुन बडबडत होता.