पोवाडा मर्द मावळ्याचा
खण खण खणाण खण खण खण
खण खण खणाण खणाणखण वाजे तलवार
शिवाजीचा अवतरला अवतार
शत्रूंना दिले उत्तर बाणेदार
साथ दिली मावळ्यांनी भरपूर
अशा राजा शिवाजीस करूनी नमन
शाहिर सचिन बोरसे करतो पोवाडा
मर्द मावळ्याचा
जीर हा जी जी जी जी जी
...
अनेक युद्धे शिवाजी राजांनी खेळीले
अनेक किल्ले राजांनी जिंकीले
अनेक शत्रू त्यांनी मारीले
मराठी राज्य त्यांनी स्थापिले
शिवाजीमहाराज छत्रपती जाहले
याकारणे साथ दिली अनेकांनी
तानाजी, येसाजी, बाजी, सुर्याजी अशा शुरांनी
अहा
...
{ गद्य : यवनी सत्येच्या विरूद्ध लढाया करून शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात मराठी राज्य स्थापन केले.