रफाल - भाग २

लेखनविषय:
ह्या आधीचे रफाल भाग १ भाग २ – वारंवार पडणारे प्रश्न व अंततः प्रश्न १ – मोदी सरकारने वाटाघाटी केल्या नंतरची रफालची किंमत यूपीए सरकारने ठरवल्या पेक्षा जास्त आहे का. उ१- यूपीए सरकारच्या वेळेस सुरू झालेल्या वाटाघाटी पूर्णत्वास गेल्या नव्हत्या त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या वाटाघाटीतून उद्भवणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या वाटाघाटींच्या किमतीची आपण तुलना करू शकत नाही. वाटाघाटी ‘किमतीच्या अंदाजे आकड्यावर’ आधारलेल्या असतात. हा ‘किमतीचा अंदाजे आकडा’ नवीन नवीन मिळणाऱ्या माहिती नुसार बदलत राहतो.

रफाल - भाग १

लेखनविषय:
लेखनप्रकार
रफाल रफाल करार पार्श्वभूमी रफाल करारा बाबत बऱ्याच लोकांनी लिहिले आहे व त्याच्या बद्दल बरेच बोलले जात आहे. काँग्रेसने त्याला भ्रष्टाचाराचा करार असे म्हणत बोफर्सच्या रांगेत बसवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. संरक्षण खरेदी ही नेहमीच महागाची असते. ह्याचे कारण संरक्षणात वापरली जाणारी वेगवेगळी साधने, दारुगोळा, तोफा, विमाने इत्यादीचे तंत्रज्ञान हे अग्रणी असते व ते मिळायला अवघड.

मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल

मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल पुणे-नगर रोडवरील (राज्य महामार्ग क्र. २७) लोणीकंद भागात 'पुष्पानगरी' नामक कालोनीत माझा एक प्लॉट आहे (क्षेत्रफळ ३००० वर्गफूट, ५० गुणिले ६० फूट ). वाघोली पासून अंतर सहा किलोमीटर आहे. हा प्लॉट विकायची माझी इच्छा आहे. तरी याबाबतीत मार्गदर्शन हवे आहे.

गणपती बाप्पा मोरया,थोडे व्रत समजून घेऊ या!

लेखनप्रकार
पार्थिवगणेश म्हणजे पृथ्वीपासून-मातीपासून केलेला गणपती. हा तात्त्विक अर्थाने त्यांनाच आवश्यक ठरेल जे पार्थिव गणेश(हे पुरुषांनि करावयाचे) व्रत करतील..जे फक्त दिड दिवसाचेच असते. सध्या घरोघरी ते गणपती मंडळात चालतो तो गणेशोत्सव! टिळकांनी त्याकाळची गरज म्हणून चालू केलेला! ती वर्तमानकाळचीही गरज असली तर असू दे . आमची तक्रार नाहीच.फक्त गणपती मातीचा असावा की नाही? ही चर्चा या तात्त्विकतेमुळे गैरलागू होऊन बसते, हे ध्यानात घ्यावे. म्हणजेच ज्याला जो हवा तो गणपती हवे तितके दिवस बसवू द्यावा. किती दिवस बसवावा ? असा विचार केला तर धर्मशास्त्रानुसार ते पार्थिवगणेश व्रत असल्याने त्याची मुदत दीड दिवसच आहे.

अशीही एक गोष्ट

लेखनविषय:
लेखनप्रकार
अशीही एक गोष्ट कॅटीने रोहनकडे वळून बघितले आणि हसली. "Hey! I really mean it. I really love you." त्याने आर्जवी स्वरात तिला सांगितले. "Please Ron! It's over. Don't come after me." तिने त्याच्याकडे पाठ करताना म्हंटले; एक सिगरेट पेटवली आणि आपली बॅग घेऊन निघून गेली. रोहन तिच्या त्या मागे परत वळूनही न बघता तडातडा जाण्याकडे अवाक् होऊन बघत बसला. आणि का कोण जाणे त्याला मिताली आठवली. **** मिताली आणि रोहन एकाच शाळेत आणि मग पुढे बारावी पर्यंत एकाच कॉलेजमध्ये. त्यामुळे जाणे-येणे एकत्र. पक्की दोस्ती दोघांची. मिताली प्रचंड बडबडी. रोहन मात्र तसा कमी बोलणारा.

राजयोग - १३

लेखनविषय:
लेखनप्रकार
विजयगढचा किल्ला एका महाकाय डोंगरावर आहे. जंगल किल्ल्याच्या जवळपास जाऊन संपतं. अजस्त्र कातळातला, निळ्या आकाशाला खिजवत उभा असलेला तो किल्ला रघुपतीला जंगलातून बाहेर पडल्या पडल्या समोर दिसला. जंगल झाडावेलींनी पूर्णपणे झाकलेलं तर किल्ला चारीबाजूंनी अभेद्य दगडांनी वेढलेला होता. जंगल सावध तर किल्ला जागरूक. जंगल वाघाप्रमाणे पाय जवळ घेऊन दिमाखात बसलेलं तर किल्ला सिंहाप्रमाणे आयाळ फुलवून मान तिरकी करून उभा! जंगल जमिनीला कान लावून प्रत्येक बारीकसारीक आवाज टिपतंय तर किल्ला जणू नजर रोखून क्षितीजाच्या पार पहातोय. रघुपतीला पाहताच टेहेळणी बुरुजावरचे पहारेकरी सावध झाले. शंख वाजू लागले.

अ का पेला - A cappella

अ का पेला - A cappella हे नाव तसे जुनेच म्हणजे १५ व्या शतका पासून अस्तित्वात आहे. इटालियन भाषेतील हे नाव म्हणजे प्रार्थनेचे गाणे कुठल्याही वाद्याशिवाय एकटयाने किंवा समूहाने म्हणायचे असते. तसेही आपल्या संस्कृती मध्ये प्रार्थनेचे पाठ कुठल्याही वाद्याशिवाय म्हणले जातात. २० व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत नव्या पद्धतीने हा प्रकार प्रचलित झाले. या मध्ये शाळा -कॉलेजमधील विदयार्थी समुहात गाणी म्हणु लागली. वाद्याऐवजी टाळ्या, पायाचा ठेका याचा वापर सुरु झाला.

आंतरजालावरचा वावर अधिक सुलभ, आनंददायी व उत्पादक बनवणार्‍या उप-प्रणाल्या (एक्सटेन्शन्स व अ‍ॅप्स)

लेखनविषय:
आजच्या जीवनावश्यक गोष्टींची यादी केली तर त्यात आंतरजालाची निवड नक्कीच होईल, असे म्हणतात. यातला विनोदाचा भाग सोडला तरी आंतरजालाने आपल्या जीवनात फार महत्वाचे स्थान बनवले आहे आणि त्याच्याशिवाय जगण्याची कल्पना आपल्याला सहन होणार नाही, यात संशय नाही. खानपानच्या वेळांमध्ये तीन-चार तासांचा अवधी आपण सहजपणे पेलतो पण "तेवढा सलग वेळ डेस्कटॉप-लॅपटॉप-टॅब-मोबाईल इत्यादीमध्ये तोंड न खुपसता घालवल्याला किती दिवस झाले? " या प्रश्नाचे उत्तर सहजा-सहजी देता येणार नाही, नाही का?!

माझे नेहरवायण १

लेखनप्रकार
* लेखाची लांबी अधिक असल्याने, ठळक मुद्द्यांच्या द्रूत वाचनासाठी अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात प्रतिसाद देण्यापुर्वी पूर्ण लेख वाचणे अभिप्रेत असावे. __/\__ विविध कारणांनी विविध ठिकाणी आस्था असतात , तशी अगदी शालेय वयात असताना वाचलेल्या नेहरू लिखित डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथा बद्दल आस्था आहे. तसे नेहरू लिखित दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया अद्यापही कॉपीराईटेड असावे पण कुठूनसे बऱ्याच वर्षांनंतर डिस्कव्हरी ऑफ इंडियाची पीडीएफ हाती आली.
Subscribe to मत