मूठभर खजूर [उत्तरार्ध]
लेखनविषय:
- Read more about मूठभर खजूर [उत्तरार्ध]
- 48 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
मूठभर खजूर [पूर्वार्ध]
http://www.misalpav.com/node/33374
मूठभर खजूर [उत्तरार्ध]
मी आजोबांना विचारले, “मसूदने त्याची जमीन का विकली?”
“बायका!” हा शब्द आजोबांनी असा काही उच्चारला कि, बाई म्हणजे काहीतरी भयानक प्रकार आहे, असे वाटू लागले!
“मसूदने अनेक निकाह लावले! प्रत्येकवेळी त्याने दोनतीन एक्कर जमीन मला विकून टाकली!”
मी मनातल्या मनात चटकन हिशोब घातला. त्या हिशोबाने त्याने सुमारे नव्वदेक बायकांशी निकाह लावायला हवा होता. पण मला तर त्याच्या तीनच बेगमा दिसायच्या.