क्रिकेट मधे फास्ट बोलर्स च्या करीयर चा एक पॅटर्न असतो. सुरूवातीला प्रचंड वेग पण अंदाधुंद बोलिंग, नंतर काही दिग्गजांचे मार्गदर्शन मिळाल्यावर एका र्हिदम मधे सेटल होणे, मग प्रचंड फॉर्म चा काळ, बहुतांश प्रतिस्पर्धी टीम्स च्या विरूद्ध मॅचविनिंग परफॉर्मन्सेस, त्यानंतर एखादी दुखापत व नंतर होणारा खेळावरचा परिणाम. त्यामुळे मग कमी वेगाने पण इफेक्टिव्ह बोलिंग करण्याचा एक काळ आणि शेवटी निवृत्ती.
झहीर खान यातून गेला पण एकदम वेगळ्या क्रमाने. फास्ट बोलर करीयरच्या उत्तरार्धात जास्त वेगवान, जास्त आक्रमक व 'लीथल' होत गेला आहे असे क्वचितच पाहिले आहे.