रोबोटमय जगाने लावला माणसाचा पुर्नशोध
काव्यरस
- Read more about रोबोटमय जगाने लावला माणसाचा पुर्नशोध
- 5 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
रोबोट्सनी जग जिंकले होते
माणूस इतिहास जमा झाला होता.
पण रोबोट्सना
पोट नव्हते, त्वचा
झाकण्याची गरज नव्हती
आकांक्षा नव्हत्या
त्यांचे अर्थशास्त्र ठप्प झाले
आता पुढे काय असा प्रश्न पडला
जेव्हा त्यांना मिसळपावच्या
अर्काईव्हमध्ये माहितगारची
एक जुनी कविता आढळली
मग त्यांनी पोट असणारे
त्वचा झाकाविशी वाटणारे
आकांक्षा असणारे
जन्म मृत्यू असणारे
रोबोट बनवले
असा लावला रोबोटमय जगाने
माणसाचा पुर्नशोध