मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बालगीत

बालगीते

वपाडाव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी लहान म्हणजे अगदीच शिशुमंदीरात शिकत असताना जुन्याश्या कॅसेट प्लेयरवर (टेप रेकॉर्डर) बाल गीते ऐकत असे. उत्तरा केळकर यांच्या स्वरधारा ह्या अल्बममधील गाणी होती ती. शाळेतुन घरी आलो की उचकपाचक करायला सुरुवात व्हायची. आईला ही घरघर पसंत नसे. ती मग टेप रेकॉर्डर चालु करुन देई. मग पुढचा अर्धा-एक तास हा बाल गीते ऐकण्याचा कार्यक्रम चालायचा. मी ही गाणी तब्बल तीन-चार वर्षे तरी ऐकली असावीत . त्यानंतर माझ्या लहान बहिणीने सुद्धा ऐकली. पण काळाच्या ओघात जसं CDचं चलन वाढलं, हे कुठेतरी मागे पडलं. माझ्या संग्रही ती कॅसेट आता नाहीये.

शाळेतले झुरळ

अमित करकरे ·
काव्यरस
एकदा एका झुरळाने घेतला, शाळेमध्ये प्रवेश; सर्वात पुढच्या बाकावर बसले, घालून कोरा गणवेश. बाई येताच उडी मारुन, ते चाळू लागले मस्टर; घाबरुन जाऊन, फेकून मारले, बाईंनी त्याला डस्टर. झुरळाच्या पाठीत धपकन बसला, भलताच जोरात दणका; तुटला बहुदा कमरेचा त्याच्या, दुसरा – तिसरा मणका. सुसाट त्याने गाठली, समोरच्या भिंतीमधली भेग; शिक्षण राहू दे बाजूला, आपली लांबूनच बरी भेट!!

ढेकणांचा अड्डा

अमित करकरे ·
काव्यरस
ढब्बूनानांच्या बिछान्यातले, एकूण एक ढेकूण भरल्या पोटी, जरा पहुडले, सतरंजीला टेकून पडल्या पडल्या ढेकूण करती, सुखदु:खाच्या गप्पा फारच वाईट रात्री आल्या, आपल्यावरती यंदा झोपत नाहीत पूर्वीसारखे, ढब्बूनाना सध्या अर्ध्या-सोंडी उठती ढेकूण, भलताच झाला वांदा आधीच घोरणे, ऎकुन त्यांचे, दडपून जाई छाती त्यातून हर्बल पेस्ट-कंट्रोलची, सदैव राही भीती तरिही नाना बरे, कितीही आली संकटे जरी दिवसागणती त्यांची वाढे, जाडी-ढब्बी ढेरी भरल्या वजनी कुशी बदलणे, नाही राहिले सोपे नानांना मुळी कळतच नाही, आम्ही चावलो कोठे पुरेत गप्पा, झोपा आता, ढेकणोबा भरती रागे गोंधळ तुमचा ऎकून नाना, खाडकन झाले जागे

डासाचे गाणे

अमित करकरे ·
काव्यरस
डासाची आई काळजीने विचारी, का रे माझ्या बाळा? माणसांच्या कानाशी गुणगुणण्याचा, तुला का बरं कंटाळा? डास म्हणाला, मी जेव्हा-जेव्हा, कानाशी गुणगुणतो जो-तो फटके मारुन मला लांब लांब घालवतो फुकट असूनही ऎकत नाही कोणीच माझं गाणं लागेल ना अशाने माझ्या करियरला कायमचंच टाळं ठरलं आता, डायरेक्ट गाठायचा सारेगमप चा सेट सादर करायचं गाणं घेऊन मान्यवरांची भेट भेट वगैरे ठीक आहे, पण जपायला सांगे आई पल्लवीमुळे प्रेक्षक वाजवती सदानकदा टाळी

मोबाईल फोन

दत्ता काळे ·
लेखनविषय:
त्या गावांत चौघेजण चौघांकडेही मोबाईल फोन वेगवेगळे हॅण्डसेट, अन् वेगवेगळे रिंगटोन कायम कामात असतात ते त्यात फारसा 'चेंज' नाही एकाच गावात असूनसुध्दा भेटण्यासाठी 'रेंज' नाही बोलतात, भेटतात फोनवरच एसेमेसमधून पडते गाठ "हाय.. हॅलो .. कसं काय" (हे फोनलादेखील झालंय पाठ) एके दिवशी एकजण वैतागूनच गेला फार गप्पा मारु, भेटू तरी काहीतरी करु यार त्याने मग सगळ्यांना एके दिवशी एसेमेस केले दिवस ठरवला, रानात गेले फोनसुध्दा फेकून दिले गप्पा झाल्या, खूप हिंडले, हसले, खेळले, खूप रडले, वेळाचेही नव्हते भान मजा केली त्यांनी छान. . . . . . . . . . . . . . . . . .

उंदीरमामा आणि मनीमावशी -

विदेश ·
लेखनविषय:
काव्यरस
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ऐकू आली फोनची रिंग - कुणीच नाही फोनपाशी उंदीरमामा बिळापाशी ! उंदीरमामा हसले मिशीत , टेबलावरती चढले खुषीत - फोन लावला कानाला जोरात लागले बोलायला - " उंदीरमामा मी इकडे ; कोण बोलतय हो तिकडे ? " - विचारले मामानी झटकन उत्तर आले की पटकन- " मी तुमची मनीमावशी, कालपासून आहे उपाशी ." - मनीमावशी भलती हुषार , टुणकन मामा बिळात पसार !!

व्याख्याच व्याख्या

स्पा ·
काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या. बघा आवड्तायेत का? अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर

बंडूच्या स्वप्नातच येते -

विदेश ·
लेखनविषय:
बंडूच्या स्वप्नातच येते स्वर्गामधुनी छान परी झोपेमधला हीरो बंडू मौजमजा धम्माल करी ।१। खात ‘ बुढ्ढीका बाल ’ शंभर बंडू होतो लालीलाल चोखत लॉलीपॉप शंभर बंडू करतो पहा कमाल ।२। ट्वेंटी-ट्वेंटित बंडू ऐटित ठोकी शतके चार बळी दहाही घेऊन करतो शत्रूला बेजार ।३। खुशालचेंडू मिळवी बंडू गुण शंभरपैकी शंभर निकालात ना कधीच सोडी तो अपुला पहिला नंबर ।४। ऑलिंपीक वा एशियाड ती असो कोणतीही स्पर्धा प्रतिस्पर्ध्यांची उडवी बंडू क्षणात भलती त्रेधा ।५। बंडू वरचढ ठरतो नेहमी - खेळ असो मारामारी कुस्तीमध्ये डाव बंडुचा धोबीपछाडच भारी ।६। मारी शाळेला तो बुट्टी स्वप्नामधला बंडू देतो अभ्यासा तो सुट्टी खेळत विट्

चिरंजीव चिंटू

डावखुरा ·
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम

बॉडी डबल

मृत्युन्जय ·
बॉडी डबल हा शब्द पहिल्यांदा वाचनात आला तेव्हा माझ्यासारखे जे बोडीने डबल आहेत त्यांच्यासाठी हा शब्द वापरत असावेत असा माझा ग्रह झाला होता. मंदाकिनिचा कुठलातरी चित्रपट होता आणि मित्राने सांगितले बॉडी डबल आहे. मी असले चित्रपट का बघतो असे विचारु नका. असाही हा प्रश्न विचारायचा हक्क फक्त असले चित्रपट न बघितलेल्या लोकांना आहे. (हे अकबर बिरबलाची गोष्ट आहे ना की मोत्यांना हात लावायचा हक्क फक्त वारा न सरलेल्या माणसांना आहे त्या धर्तीवर वाचावे) अस्मादिक बराच काळ विचारात पडले होते की मंदाकिनी काही इतकी डबल नाही आहे.