संध्याखंत
गोफातली एक जुनी चारोळी, प्राजू यांची 'सांज' आणि ऋषिकेशची 'झांज' ही कविता यांच्यापासून स्फुरलेली/बनवलेली/पाडलेली ही मिसळ-कविता 
"गायी परतुनि आल्या
अवचित झाली सांज
दीप लागू लागले
मंदिरी वाजे झांज
पिले बिलगती आईला
झाड आवरे पाने
क्षितिज लाजले किंचित
रेखीत रंगीत गाणे
सारे काही जिथल्या तिथे
मलाच नाही थारा
विश्व मानिते ज्याला मी
मग्न तो जगदाधारा"
रात्र येई गोकुळी
राधा करिते खंत
कान्हा दिसे ना का कुठे
रुपे जरी अनंत


छान कविता
मिसळ छानच जमली आहे.
अशीच झणझणीत कविता येऊ देत.
पिले बिलगती आईला
झाड आवरे पाने
क्षितिज लाजले किंचित
रेखीत रंगीत गाणे
या ओळी आवडल्या.
मस्तच..
सारे काही जिथल्या तिथे
मलाच नाही थारा
विश्व मानिते ज्याला मी
मग्न तो जगदाधारा"
या ओळी एकदम छान जमल्या आहेत.
- प्राजु
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
सायबा,
अरे नंदन सायबा,
लेका तू कविता केव्हापासून करू लगलास? तुका रे मेल्या खय कळता काव्यातलो?
असो..
गायी परतुनि आल्या
अवचित झाली सांज
दीप लागू लागले
मंदिरी वाजे झांज
या ओळी सुंदर...!
तात्या.
--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!
:)
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
फार सुंदर
अर्थगर्भ. नंदन, तुमच्या कसदार लेखणीला इतका थोडा पाझर का, हीच माझी तक्रार.
असेच
म्हणतो नंदन. सुंदर कविता
सुरेख
अप्रतिम कविता. खूप आवडली.
रात्र येई गोकुळी
राधा करिते खंत
कान्हा दिसे ना का कुठे
रुपे जरी अनंत
काय ओळी आहेत!
(रसिक) आजानुकर्ण
-- आजानुकर्ण
(माझा हा प्रतिसाद तुम्हांला अश्लील तर वाटत नाही ना?)
विशेष
शेवटची दोन कडवी विशेष आवडली. कविता छान आहे.
(आस्वादक)बेसनलाडू
वा! नंदन! तुझे अभिनंदन!
नंदनमधील काव्यगुण ह्या आधीही प्रकट झालेत. हे काव्यही सहजसुंदर झालेय.
धन्यवाद
मंडळी. आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुंदर कविता
नंदन,
कविता आवडली.......!!!
गायी परतुनि आल्या
अवचित झाली सांज
दीप लागू लागले
मंदिरी वाजे झांज
आणि
रात्र येई गोकुळी
राधा करिते खंत
कान्हा दिसे ना का कुठे
रुपे जरी अनं!!!
वरील ओळी विशेष आवडल्या !!! पुढील कवितेच्या प्रतिक्षेत.
खूप आवडली
रात्र येई गोकुळी
राधा करिते खंत
कान्हा दिसे ना का कुठे
रुपे जरी अनंत
वा! कविता फार आवडली, त्यात गुंफलेली ही सुंदर चारोळी मस्तच
-ऋषिकेश
ऋषिकेश
------------------
एक सुविचारः वाचाल तर वाचाल
आणि एक म्हणः जे पिंडी ते ब्रह्मांडी
सुंदर
कविता आवडली. अतिशय गोड आहे.
सोनाली