मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(( म्हणजे ))

छोटा डॉन · · जे न देखे रवी...
Taxonomy upgrade extras
"ओढ" म्हणजे काय ते १ आयडी उडवल्यावर लगेच दुसरा काढल्याशिवाय समजत नाही. "विरह" म्हणजे काय ते आपला आयपी ब्लॉक केला गेल्याशिवाय समजत नाही. "गेम" म्हणजे काय ते हिट्स वाढवुन सर्व्हरवर ताण आणल्याशिवाय समजत नाही "पराजय" म्हणजे काय ते तरीसुद्धा संकेतस्थळ चालु असल्याचे पाहिल्याशिवाय समजत नाही "दु:ख" म्हणजे काय ते आपला पानभर प्रतिसाद क्षणात उडवल्या गेल्याशिवाय समजत नाही. “सुख" म्हणजे काय ते दिवसातुन एकदातरी आंतरजालावर गजाल्या केल्याशिवाय समजत नाही. आधारीत : - म्हणजे आणि (म्हणजे) वास्तविक पाहता काव्य आणि विडंबन हा आमचा प्रांत न्हवे, पण आज कंट्रोल सुटला. हे आमचे विडंबनाचे पहिले नवजात अपत्य आमचे मानस गुरु "केशवसुमार शेठ" व आमचे परममित्र "केशवयात्री" यांना विभागुन अर्पण ..! आता यापुढे ह्याचा सांभाळ त्यांनीच करावा ..! ;)

वाचन 6974 प्रतिक्रिया 0