✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

और तुम्हारे कंधे का तील..

प — प्राची अश्विनी, Sun, 06/25/2023 - 20:27
तुझ्या नजरेतलं लाडीssक आमंत्रण स्विकारून, गालावरच्या मिरीमिठाचा तो खरखरीत स्पर्श अनुभवत, थोsडं खाली उतरलं की तुझ्या खांद्यावरचा तो एक धीटसा तीळ, खुणवून बोलवणारा. त्याला आंजारायचं गोंजारायचं आणि मग तुझ्या पाठीवरून अजून खाली जायचं. कंबरेवरच्या जुन्या व्रणांवर हळूच ओठ टेकवले की उमटणारी थरथर मुरवून घ्यायची अंगभर.. आणि मग ओठांनीच जोडत बसायचे तुझे सगळे तीळ. अगदी निवांत... जर थकले तर क्षणभर विसावायला असतोच की तुझ्या खांद्यावरचा तो हक्काचा तीळ.. .... मधेच मान वर करून पहावं तर मिशीतल्या मिशीत हसत आभाळभर मायेनं मलाच निरखणारा तू.. किती गोड चित्र असतं हे माहितीये? .... चंद्रमाधवीच्या एकशे सोळा रात्रींना एखादा तीळ उगीच नाही काही भारी पडत ... (गुलज़ारच्या एका देखण्या कल्पनेचा विस्तार करायचा प्रयत्न)

प्रतिक्रिया द्या
5468 वाचन

💬 प्रतिसाद (15)

जीवघेणे....!

प्रचेतस
Sun, 06/25/2023 - 21:26 नवीन
जीवघेणे....!
  • Log in or register to post comments

:)

प्राची अश्विनी
Sun, 06/25/2023 - 21:49 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आवडलं

तुषार काळभोर
Sun, 06/25/2023 - 21:57 नवीन
मस्त जमलीये. गालावरील मिरीमीठ प्रकार आवडला! आणि चंद्रमाधवीही! मूळ गाणं छान आहेच. पण तेव्हाही एक सौ सोलह चांद की राते म्हणजे काय ते कळलं नव्हतं.
  • Log in or register to post comments

खूपच सुंदर!

कॉमी
Sun, 06/25/2023 - 21:58 नवीन
खूपच सुंदर !
  • Log in or register to post comments

एहसास....

कर्नलतपस्वी
Mon, 06/26/2023 - 06:14 नवीन
आवडली. पल दो पल की थी मुलाकातें, उतने में ले गयी मेरा दिल, एक सौ सोलह चाँद की रातें, एक ये तेरे काँधे का तिल।
  • Log in or register to post comments

इश्क..

कर्नलतपस्वी
Mon, 06/26/2023 - 06:33 नवीन
इश्क ही इबादत है इश्क ही शहादत है सच पुछो, बाकी सब झुठ इश्क ही इनायत है फिर चाहे भगवान की ..... या माशूका की.... गर ना हो तो कयामत ही कयामत है.
  • Log in or register to post comments

वाह कर्नलसाहेब!

प्राची अश्विनी
Tue, 06/27/2023 - 07:26 नवीन
वाह कर्नलसाहेब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

कहर!

चांदणे संदीप
Mon, 06/26/2023 - 13:05 नवीन
सुंदर कल्पनाविस्तार! सं - दी - प
  • Log in or register to post comments

तुषार काळभोर, कॉमी, चांदणे

प्राची अश्विनी
Tue, 06/27/2023 - 07:21 नवीन
तुषार काळभोर, कॉमी, चांदणे संदीप, कर्नलतपस्वी, मनापासून धन्यवाद!
  • Log in or register to post comments

हो, पण..

तुषार काळभोर
Tue, 06/27/2023 - 17:26 नवीन
ते एकशे सोळा रात्रींचं काय गूढ आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

इथं थोडी चर्चा झालीय.

प्राची अश्विनी
Wed, 06/28/2023 - 07:57 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

मेरा कुछ सामान

प्राची अश्विनी
Wed, 06/28/2023 - 07:58 नवीन
मेरा कुछ सामान
  • Log in or register to post comments

चंद्रमाधवीच्या एकशे सोळा रात्रींना

तुषार काळभोर
Wed, 06/28/2023 - 18:31 नवीन
थोडी शोधाशोध केल्यावर एक सौ सोलाह चांद की रातें, यामागील अर्थ कळला. चित्रपट पाहिलेला नाहीये. एक नायिका नायकाच्या सहवासात चार महिने व्यतीत करते. म्हणजे एकशे वीस दिवस. चार अमावस्या सोडून राहिल्या चंद्राच्या एकशे सोळा रात्री. असा विचार ते एक गुलजारच करू जाणोत.
  • Log in or register to post comments

हे कुठून वाचलंय? मलाही लिंक

प्राची अश्विनी
Wed, 06/28/2023 - 19:05 नवीन
हे कुठून वाचलंय? मलाही लिंक द्याल का? कारण प्रत्यक्ष गुलजार नी हे सांगितलेलं मी तरी ऐकलं नाही. मी एक त्यांची मुलाखत ऐकलेली आठवते ज्यात ते म्हणाले होते की सहज सुचलेला आकडा आहे तो. पण आता मलाही ती मुलाखत कुठे पाहिलेली ते आठवत नाही.
  • Log in or register to post comments

म स्त च

केदार पाटणकर
Wed, 09/06/2023 - 15:01 नवीन
जे लिहिले आहे ते फार मस्त आहे. काबिले तारीफ. इष्कने निकम्मा कर दिया गालिब, वरना...
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा