और तुम्हारे कंधे का तील..
लेखनविषय:
काव्यरस
तुझ्या नजरेतलं लाडीssक आमंत्रण स्विकारून,
गालावरच्या मिरीमिठाचा तो खरखरीत स्पर्श अनुभवत,
थोsडं खाली उतरलं की तुझ्या खांद्यावरचा तो एक धीटसा तीळ, खुणवून बोलवणारा.
त्याला आंजारायचं गोंजारायचं आणि मग तुझ्या पाठीवरून अजून खाली जायचं.
कंबरेवरच्या जुन्या व्रणांवर हळूच ओठ टेकवले की उमटणारी थरथर मुरवून घ्यायची अंगभर..
आणि मग ओठांनीच जोडत बसायचे तुझे सगळे तीळ.
अगदी निवांत...
जर थकले तर क्षणभर विसावायला असतोच की तुझ्या खांद्यावरचा तो हक्काचा तीळ..
....
मधेच मान वर करून पहावं तर मिशीतल्या मिशीत हसत
आभाळभर मायेनं मलाच निरखणारा तू..
किती गोड चित्र असतं हे माहितीये?
....
चंद्रमाधवीच्या एकशे सोळा रात्रींना एखादा तीळ उगीच नाही काही भारी पडत ...
(गुलज़ारच्या एका देखण्या कल्पनेचा विस्तार करायचा प्रयत्न)
वाचने
5496
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
जीवघेणे....!
In reply to जीवघेणे....! by प्रचेतस
:)
आवडलं
खूपच सुंदर!
एहसास....
इश्क..
In reply to इश्क.. by कर्नलतपस्वी
वाह कर्नलसाहेब!
कहर!
तुषार काळभोर, कॉमी, चांदणे
In reply to तुषार काळभोर, कॉमी, चांदणे by प्राची अश्विनी
हो, पण..
In reply to हो, पण.. by तुषार काळभोर
इथं थोडी चर्चा झालीय.
मेरा कुछ सामान
चंद्रमाधवीच्या एकशे सोळा रात्रींना
हे कुठून वाचलंय? मलाही लिंक
म स्त च