✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अनफेअर चेस !

स
संजय क्षीरसागर यांनी
Tue, 04/21/2020 - 12:18  ·  लेख
लेख
या वर्षीच्या बुद्धिबळ स्पर्धेत काहीही करून त्याला हरवायचंच असं सर्वांनी ठरवलं. बुद्धिबळ त्याच्यासाठी फक्त तर्काचा खेळ होता, इज्जतीचा नाही. प्रतिस्पर्ध्याच्या सुरेख चालीला सुद्धा तो दाद द्यायचा. त्याच्या चाली निर्विवाद होत कारण फोकस कायम प्रश्नावर असे, स्वतःवर नाही. सामन्यात दहाव्या चालीनंतर प्रतिस्पर्धी एक मोहरा गमावून बसला आणि सतराव्या चालीनंतर इतकी कोंडी झाली की डाव हरण्याकडे झुकू लागला. अचानक चेसक्लॉक बंद पडलं ! पंचांनी सामना रद्द केला. निर्वाणीच्या क्षणी करायची ही खेळी पूर्वनियोजित होती, हे फक्त त्याच्या लक्षात आलं. तीन वर्षांनी पुन्हा स्पर्धा ठरली. तो आला, त्यानं चेसक्लॉककडे पाहिलं. तीन वर्षापूर्वीचा बोर्ड जसाचातसा मांडला ........ आणि शांतपणे आठरावी चाल केली. बोर्डच्या बाहेर, पंचाना शह बसला !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
8842 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

+1

ज्योति अळवणी
Tue, 04/21/2020 - 12:24 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

संजय क्षीरसागर
Tue, 04/21/2020 - 12:29 नवीन
ही कथा शशक स्पर्धेसाठी नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी

+1

Cuty
Tue, 04/21/2020 - 12:44 नवीन
त्याच्या चाली निर्विवाद होत कारण फोकस कायम प्रश्नावर असे, स्वतःवर नाही. >> पंचलाईन !
  • Log in or register to post comments

प्रश्न सुटेल किंवा नाही

संजय क्षीरसागर
Tue, 04/21/2020 - 13:34 नवीन
हे कायम परिस्थितीवर अवलंबून आहे, पण त्यात न अडकता तो सोडवायचा प्रयत्न करणं हे कौशल्य आहे. जे चेसमध्ये तेच जीवनात; त्यामुळे या अँगलनं चेस खेळणारी व्यक्ती प्रगल्भ होत जाते. प्रत्येक हार ही प्रतिस्पर्ध्याकडून काही तरी शिकायची संधी आहे; त्याच्या बुद्धीमत्तेला दाद देण्याचा अवसर आहे. आपलं कौशल्य वाढवत नेण्याची ती संधी आहे. कथेचं म्हणाल तर पंच लाईन सगळ्यात शेवटी आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Cuty

इथल्या दुष्ट लोकांनी

मोदक
Tue, 04/21/2020 - 13:33 नवीन
इथल्या दुष्ट लोकांनी तुमच्यावर तीन वर्षे लेखनसंन्यास लादलेला होता का..? ;)
  • Log in or register to post comments

+1

उन्मेष दिक्षीत
Tue, 04/21/2020 - 15:18 नवीन
  • Log in or register to post comments

+1

उन्मेष दिक्षीत
Tue, 04/21/2020 - 15:19 नवीन
  • Log in or register to post comments

+1

उन्मेष दिक्षीत
Tue, 04/21/2020 - 15:20 नवीन
  • Log in or register to post comments

वाह!

राघव
Tue, 04/21/2020 - 15:35 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments

मस्त

Marathi_Mulgi
Tue, 04/21/2020 - 18:22 नवीन
+१
  • Log in or register to post comments

एकाच खेळीत शह आणि मात देखील !

शेखरमोघे
Tue, 04/21/2020 - 23:50 नवीन
एकाच खेळीत शह आणि मात देखील !! छान !!
  • Log in or register to post comments

इतक्या अचूक प्रतिसादाची

संजय क्षीरसागर
Wed, 04/22/2020 - 22:06 नवीन
अपेक्षाच नव्हती ! धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखरमोघे

बरेच काही सांगणारी पण

कानडाऊ योगेशु
Wed, 04/22/2020 - 01:33 नवीन
बरेच काही सांगणारी पण "संक्षिप्त" अशी कथा. : )
  • Log in or register to post comments

सर, पूर्वीचं विसरून जावा आता.

सौंदाळा
Wed, 04/22/2020 - 21:22 नवीन
सर, पूर्वीचं विसरून जावा आता. तुमचे पुढील कसदार लिखाण वाचण्यास उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments

ही सुद्धा एक सकस

संजय क्षीरसागर
Wed, 04/22/2020 - 22:20 नवीन
शशक आहे ! मिपा आणि शशकाच्या धोरणाविरूध्द नसतांनाही ती स्पर्धेसाठी अस्विकृत केली गेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

शशक ला टाका +१

OBAMA80
गुरुवार, 04/23/2020 - 06:54 नवीन
शशक ला टाका +१
  • Log in or register to post comments

शशकसाठी पाठवली होती, पण

संजय क्षीरसागर
गुरुवार, 04/23/2020 - 07:55 नवीन
संपादक मंडळानं कथा अस्विकृत केली आहे. जर या कथेला, विजयी कथेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाले तर त्याचा अर्थ काय होईल असा विचार मनात येतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: OBAMA80

नाव कळल्यावर स्पर्धेत घेणार

कंजूस
गुरुवार, 04/23/2020 - 08:59 नवीन
नाव कळल्यावर स्पर्धेत घेणार नाहीत. ----- मला वाटतं रामे / विमे यापैकी एकाने बुद्धिबळावर अशीच एक कथा लिहिली आहे. -------- बाकी वजीर,घोडे,,उंट यापेक्षाही प्यादी,राजा (क्वीन)
  • Log in or register to post comments

अर्थात !

संजय क्षीरसागर
गुरुवार, 04/23/2020 - 09:15 नवीन
आता कथा स्पर्थेत नाही आणि कथेलाही स्पर्धा नाही ! शेवटी अभिव्यक्ती हा एक विचार आहे, तो जनमानसात पोहोचला की झालं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

आता कथा स्पर्थेत नाही आणि कथेलाही स्पर्धा नाही !

स्वलिखित
गुरुवार, 04/23/2020 - 20:54 नवीन
अवघडय .. मडकं कच्चय अजून ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

+1

भीमराव
गुरुवार, 04/23/2020 - 10:20 नवीन
+1 संदर्भासह कथा स्पष्ट‌ समजली. एवढंच म्हणतो, नर का क्या बडा? समय बडा बलवान. भिलन‌ लुटी गोपीया, वही अर्जुन वही बाण.
  • Log in or register to post comments

समय तो एक आभास है ।

संजय क्षीरसागर
गुरुवार, 04/23/2020 - 12:14 नवीन
हम समयसे पार है, समय तो एक आभास, जज्बा है तो उफलेगा, जुनूं कर देगा मात |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

इथे असे केले तर

आयर्नमॅन
गुरुवार, 05/21/2020 - 22:20 नवीन
पुनर्जन्म म्हटले जाते असे ऐकून आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा