सांज कोवळी येते का
गंध अाठवांचा घेऊन
उमटीत जाते मनी वेडी
हळवी स्वप्नसुरांची धून
पदर हा रातीचा ढळता
सांडे उरात चंद्र नभीचा
ओठानीच कसा चूंबावा
प्राण विरता रातराणीचा
झरे अशी गात्रागात्रातूनी
तू थरथरती पहाट ओली
विरून क्षितिजाच्या रेषा
आभाळ चुंबते धरा गाली
परशुराम सोंडगे,पाटोदा
sahitygandha(साहित्यगंधा).blogspot.com
prshuramsondge.blogsopt.comकाव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6770
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही कविता आवडली.
ही कविता आवडली.
कविता आणि हिरवीण (ती कोण आहे
नाव आहे की चित्रात, रेजिना
In reply to कविता आणि हिरवीण (ती कोण आहे by अभिजीत अवलिया
धन्यवाद. मला वाटले होते ते
In reply to नाव आहे की चित्रात, रेजिना by अभ्या..
शीर्षक वाचून भलतेच काही मनात
(No subject)
In reply to शीर्षक वाचून भलतेच काही मनात by प्रचेतस
ही कविता आवडली.