निवडणुकीचा रणधुमाळीत जिल्हा सांगली, शिराळा तालुक्यातील नाटोली परिसरात विरोधकांच्या पाडावासाठी भानामती!
हे शीर्षक असलेले बातमीपत्र दिगंबर शिंदे यांनी सांगलीहून पाठवले होते. (लोकसत्ता शनिवार. दि 25 फेब्रूवारी 2017, पुणे आवृत्ती, पान 8 - राज्यकारण) या बातमीत जणू काही किराणाभुसारी मालाच्या यादीची आठवण व्हावी अशी लांबलचक मागणी वाचून रंजन झाले...
खिळे ( 6 इंची नग) ९, लिंबू (आकार मोठा नग) २१, टाचण्या (१इंची?) नग २१, रंगीत बाटल्या ७ (श्रमपरिहारासाठी?), बिनशेडीचे नारळ नग ६, साड़ी? काळे कापड (२मीटर) ओटीचे साहित्य, शिजवलेला भात, कणकेचे पीठ ठेवायला दुर्डी, नावे असलेल्या चिठ्ठीच्या काळ्या बाहुल्या (नग) ६ (सर्व कंस माझे) अशी साज सामानाची ही तयारी नाडोल कांदे येथील म(म्ह)सोबा देवळाजवळ आडरानात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे! याची गरमागरम चर्चा अग्रभागी.... अशी बातमी ....
हे सर्व कोणाच्या विजयासाठी (का कोणास पराभूत करायला) केले गेले होते ते जिल्हा परिषदेच्या मंगळवारी मतदानाचा निकाल लागल्यानंतर समजून आले असेल. भानामतीची युक्ती खरोखर काही पदरात पाडून गेली का? याची माहिती, शिवाय ज्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या काळ्या बाहुल्यांना होत्या ती नावे न कळल्याने विरस झाला. डॉ दाभोळकरांच्या खुन्याला शोधायला पोलिस प्रमुखांनी भानामतीचा प्रयोग करून पाहिला होता असे वाचल्याचे स्मरते. भानामती प्रकार नेहमीच चक्रावून टाकतो.
सहज मूड आला आहे म्हणून हा भानामतीवरील धागा सादर.
काहींना आधीच्या धाग्यांना उपसून काढायची सुरसुरी आली तर नवल नाही!
रातीची काय गरज? असो... आपल्याला विरस झाला असे वाटले म्हणून दिलगीर आहे... सनसनाटी वरून आठवले... सर्वांग सुंदरी सनी लिओनीवर एकदा मिपाकरांनी जवळीक साधली होती... म्हणतात...
डॉ दाभोळकरांच्या खुन्याला शोधायला पोलिस प्रमुखांनी भानामतीचा प्रयोग करून पाहिला होता असे वाचल्याचे स्मरते.
नाही हो तो प्लँचेटचा प्रकार होता. जिज्ञासू लोकांना या विषयावरील चर्चा खालील लिंक वर वाचता येईल
डॉ दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी प्लँचेट चा वापर केला म्हणुन अंनिसने गुन्हा दाखल करणे योग्य कि अयोग्य?
http://aisiakshare.com/node/3036
http://www.maayboli.com/node/49918
काय हे काका, ओक काकांना त्यांचे जुने धागे लोकांनी उकरुन काढणे अपेक्षित होते. आणि इथे तुम्ही त्यांचा धागा पकडून तुमचे धागे (ते ही दुसर्या संस्थळावरील ;) ) उकरुन काढत आहात. =))
हो ना! मिपावरचा सरकता पट इतक्या वेगाने पुढे जातो की मागे होउन गेलेल्या सकस/ वादग्रस्त चर्चा नवीन लोकांसमोर येत नाहीत. पण कधी कधी धागे नव्याने उकरुन काढल्याने पुनर्प्रत्ययाचा आनंद ही मिळतो तर कधी नव्याने आकलन होते.
नमस्कार, आपण आशिष खैतान यांचा लेख वाचला तर त्यांनी 'प्लॅंचेट केले'असे म्हटलेले नाही. शिवाय दौंडला जाऊन ज्याने डॉ. नरेन्द्र दाभोळकरांच्या मृतात्म्याला बोलावून आडवे झोपून त्यादिवसात काय बोलले त्या माध्यम व्यक्तीला भेटून त्याचे चित्रिकरण एका वाहिनीवर दाखवले. त्यात जो असा मृतात्म्याला बोलावतो तो पोलिस खात्यात कामाला होता म्हणून पोलीस आयुक्त पोळांनी गुपचूप त्याच्या अनुभवातून काही तपास लागतो का हे पहायला चान्स घेतला होता. कारण डॉक्टरांची प्रतिष्ठा व लोकप्रियता प्रचंड होती. जनमानसावर त्यांच्या अकल्पित हल्ल्यातील मृत्यू अमान्य होता. शिवाय प्लॅंचेटचा प्रकार वेगळा आहे ते कसे ते ही सादर केले होते. असो.
प्रतिक्रिया
हॅतिच्या !
तो खेळ खेळायला
डॉ दाभोळकरांच्या खुन्याला
काय हे काका, ओक काकांना
हो ना! मिपावरचा सरकता पट
प्लॅंचेट कि भानामती?
पुराणांतली वानगी ....
माझ्या धाग्यांची उजळणी...
माझ्या धाग्यांची उजळणी...
माझ्या धाग्यांची उजळणी...
माझ्या धाग्यांची उजळणी...
बातमीदार शिंदे दिगंबर