✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(मुलिंनी धरु नये अबोला)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Sun, 12/25/2016 - 09:39
आमचे परम मित्र व मिपावरचे जगप्रसिध्द कवीवर्य मा रा रा संदिपचंद्र रावजी चांदणे साहेब यांची क्षमा मागुन माझे हे काव्य पुशप रसिक वाचकांच्या चरणी सविनय सादर करतो. पेरणा अर्थातच (मुलिंनी धरु नये अबोला) मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो आपली आधाशी नजर दुकानात दिसणार्‍या (आणि न दिसणार्‍या) प्रत्येक वस्तूवरुन फिरवू नये मुलांच्या खिशात असलेल्या एकमेव शंभराच्या नोटेचे हिशेब ढासळू लागतात मोबाईलची रिंग वाजली की आपली जागा सोडून लांब जाउ नये मित्रांशी पंगा घेउन मुले तुमच्या बरोबर आलेली असतात जावे दूरवर फिरायला, उगाच फालतु कारणे सांगु नयेत, वरवर नाही म्हणताना तुम्हाला मनातून उकळ्या फुटलेल्या असतातच इमान राखावं पल्सरशी, उगाच बुलेट कडे व्यर्थ पाहू नये उफाळून आलेल्या भावना, पल्सरच्या आरशात दिसतात याचे भान राखावे - उखळात कांडणे

प्रतिक्रिया द्या
17996 वाचन

💬 प्रतिसाद (30)

विडंबन म्हणून बरे आहे

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 12/25/2016 - 09:45 नवीन
फक्त एवढेच वाटते की... उपेक्षा मुलांची कुठेही नसावी मुलींची मुलांशी गोड गट्टी असावी नसलेल्या सौंदर्याचा नको गर्व त्यांना मुलांचे स्मरण असो टवळ्यांना - चलदूर अंघोळकर
  • Log in or register to post comments

जबरदस्त हो पैजारबुवा !!

शार्दुल_हातोळकर
Sun, 12/25/2016 - 10:13 नवीन
हसुन हसुन लोळलो. :=)) कवितेचे, नावांचे आणि प्रतिक्रियेचेही विडंबण.... सर्वच अप्रतिम !! तुमच्या कल्पनाशक्तीला आमचा मनापासुन दंडवत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

हहपुवा.

प्राची अश्विनी
Sat, 09/24/2022 - 08:10 नवीन
हहपुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

=))

पैसा
Sun, 12/25/2016 - 09:48 नवीन
=)) मी पैला लिहायचं राहिलं का पैजारबुवा!
  • Log in or register to post comments

अगागागागा!!!!

हतोळकरांचा प्रसाद
Sun, 12/25/2016 - 10:28 नवीन
अगागागागा!!!! पैजारबुवा, मुजरा घ्या! - ज्ञानोबांच्या पैजाराचे पैजार (अंघोळकरांचा प्रसाद)
  • Log in or register to post comments

आरारारारारा!

चांदणे संदीप
Sun, 12/25/2016 - 14:32 नवीन
पैजारबुवा! =)) =)) कवितेचं ठीक आहे, त्यावरच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचही विडंबन ठीकच आहे, पण =)) =)) "चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! मेलो! =)) उखळातलं कांडण तुफान झालंय!! Sandy
  • Log in or register to post comments

"चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो!

आदूबाळ
Sun, 12/25/2016 - 15:30 नवीन
"चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! मेलो! =))
+१ पैजारबुवांना ही सिद्धी प्राप्त आहे. मागे एकदा त्यांनी आशु जोग यांच्या प्रतिसादाचं विडंबन करून खाली "पशु रोग" अशी सही केली होती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

@"पशु रोग" ›››

अत्रुप्त आत्मा
Mon, 12/26/2016 - 05:28 नवीन
@"पशु रोग" ››› Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

=)) जबरदस्त.

पद्मावति
Sun, 12/25/2016 - 16:10 नवीन
=)) जबरदस्त.
  • Log in or register to post comments

=))=))

संजय पाटिल
Sun, 12/25/2016 - 18:15 नवीन
तुफान ... जबरी..
  • Log in or register to post comments

=))))))

अजया
Sun, 12/25/2016 - 20:45 नवीन
=))))))
  • Log in or register to post comments

अरारारारारा, =))

प्रचेतस
Sun, 12/25/2016 - 22:27 नवीन
अरारारारारा, =)) पैजारबुवा रॉक्स =))
  • Log in or register to post comments

जब्रा!! :)

खेडूत
Sun, 12/25/2016 - 22:30 नवीन
जब्रा!! :)
  • Log in or register to post comments

खतरनाक विडंबन =))))

प्रसाद गोडबोले
Mon, 12/26/2016 - 03:24 नवीन
खतरनाक विडंबन =))))
  • Log in or register to post comments

ह्या ह्या ह्या =))

अत्रुप्त आत्मा
Mon, 12/26/2016 - 05:25 नवीन
ह्या ह्या ह्या =))
  • Log in or register to post comments

ह्म्म,

नीलमोहर
Mon, 12/26/2016 - 11:00 नवीन
मुलांनी मुलींशी अबोला धरुन फुकटचा भाव खाऊ नये, त्यांच्या मनात, हा बरा की तो, असा विचार चालू असतो डेटवर असतांना उगाच मित्रांशी फोनवर बोलत बसू नये, कामधाम सोडून मुली तुमच्या बरोबर आलेल्या असतात ती सोबत असता उठसूठ पल्सरला ब्रेक मारू नये, असले जुने पुराणे फंडे मुली पुरत्या ओळखून असतात ती ऑनलाइन असता व्हाट्सअपवर बोलावे, बळेच टायपायला वेळ लावू नये, वरवर बिझ्झी आहे म्हणताना तुमच्या मन में लड्डू फुटत असतातच आपली तीक्ष्ण नजर तिच्या स्वप्नाळू नजरेत गुंफू नये, स्वतःवर ताबा ठेवण्याच्या तिच्या प्रयत्नांचे इमले मग कोसळू लागतात इमान राखावं एकीशी, उगाच इथे तिथे गळ टाकू नये, तुमच्यासाठी ती कुणी एक असते, त्या एकीसाठी तुम्ही सारं जग असता, याचे भान राखावे - भावना सांडणे
  • Log in or register to post comments

क्या बात!!!!!!!!!!!!!! भावना

ग्रेंजर
Mon, 12/26/2016 - 11:43 नवीन
क्या बात!!!!!!!!!!!!!! भावना सांडणे पण जबरदस्त :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

वाचून ड्वाळे भरुन आले

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 12/26/2016 - 14:19 नवीन
लैच भावना सांडणारी कविता. अक्षरशः शब्द न शब्द काळजाला भिडला. रच्याकने :- डेटवर असतांना उगाच मित्रांशी फोनवर बोलत बसू नये, कामधाम सोडून मुली तुमच्या बरोबर आलेल्या असतात हे सोडून बाकी सारे पटले. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

जबरदस्त निमो!

अजया
Tue, 12/27/2016 - 17:44 नवीन
जबरदस्त निमो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

मस्त नीलमोहर

श्वेता२४
Fri, 09/23/2022 - 17:00 नवीन
याला विडंबन नाही म्हणणार . नवी कविता म्हणून पाहते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

लय भारी. बाडीस

प्राची अश्विनी
Sat, 09/24/2022 - 08:11 नवीन
लय भारी. बाडीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

मूळ विडंबन पण मस्त!!!!!!!!!!

ग्रेंजर
Mon, 12/26/2016 - 11:43 नवीन
मूळ विडंबन पण मस्त!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

:)

रातराणी
Tue, 12/27/2016 - 12:57 नवीन
:)
  • Log in or register to post comments

दंडवत स्वीकारा पैजारबोवा!!

सूड
Tue, 12/27/2016 - 14:34 नवीन
दंडवत स्वीकारा पैजारबोवा!!
  • Log in or register to post comments

दंडवत घ्या प्रभूजी :)

विशाल कुलकर्णी
Tue, 12/27/2016 - 15:45 नवीन
दंडवत घ्या प्रभूजी :)
  • Log in or register to post comments

हे..हे..हे...

चांदणे संदीप
Fri, 09/23/2022 - 16:45 नवीन
केवढे 'अबोली'चे फुलणे झाले आज. :) सं - दी - प
  • Log in or register to post comments

ढबोल्या इतके ......

श्वेता२४
Fri, 09/23/2022 - 17:02 नवीन
ढबोल्या इतके नाही आवडले पण....मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो हे अगदी पटले...... आमच्याइथे हे लागू आहे. त्यामुळे यापुढे अबोला धरणे बंद.... :))
  • Log in or register to post comments

:))))

प्राची अश्विनी
Sat, 09/24/2022 - 08:12 नवीन
पुन्हा एकदा दंडवत पैजारबुवा!
  • Log in or register to post comments

मस्तच

कर्नलतपस्वी
Sat, 09/24/2022 - 11:27 नवीन
मस्तच वाचुन हासणे अन् हासून ते लोळणे मग लोळता लोळता पोट का दुखावे? मी ओळखून आहे सारे...... डोळ्यांत पापण्यांना मग का पुर यावा? मिटताच पापण्यांना का पैजारबुवा दिसावा? हे चित्र जीवघेणे हरती इथे मिपाणे मी ओळखून आहे सारे .......
  • Log in or register to post comments

ज्ञानोबांचे पैजार यांच्या

nutanm
Mon, 09/26/2022 - 01:40 नवीन
ज्ञानोबांचे पैजार यांच्या मूळ कवितेपेक्षा अर्थात ज्ञा पै यांचीक्षमा मागून नीलमोहर यांची कविता खूप आवडली.श्र्वेता24 यांचेही म्हणणे नाही पटले मुलींनि मुलांशी अबोला धरू नये का तर म्हणे मुलांच्या डोक्यात म्हणे विराट म्हणजे क्रिकेट ई० चे विचार चालू असतात( केवढा मोठा task नाही?) आणि मूली काम सोडून तुमच्या बरोबर आलेल्या असतात हे बरोबर नाही , हे बरोबरच आहे ,कारण एखादीच अशी असेल भाग्यवान जिला घरात काम सांगितले जात नाही, अगदी एकुलती एक असो किंवा चारातली एक घरकाम डोक्यावर आसतेच काही नाहीतर घर आवरून स्वच्छ नीटनेटके ठेवणे ही बहुतेक घराघरांत मुलीचीच जबाबदारी मानली जाते. मुलाची नाही .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा