(मुलिंनी धरु नये अबोला)
लेखनविषय:
काव्यरस
आमचे परम मित्र व मिपावरचे जगप्रसिध्द कवीवर्य मा रा रा संदिपचंद्र रावजी चांदणे साहेब यांची क्षमा मागुन
माझे हे काव्य पुशप रसिक वाचकांच्या चरणी सविनय सादर करतो.
पेरणा अर्थातच
(मुलिंनी धरु नये अबोला)
मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्यांना अडचणीत आणू नये
त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो
आपली आधाशी नजर दुकानात दिसणार्या (आणि न दिसणार्या) प्रत्येक वस्तूवरुन फिरवू नये
मुलांच्या खिशात असलेल्या एकमेव शंभराच्या नोटेचे हिशेब ढासळू लागतात
मोबाईलची रिंग वाजली की आपली जागा सोडून लांब जाउ नये
मित्रांशी पंगा घेउन मुले तुमच्या बरोबर आलेली असतात
जावे दूरवर फिरायला, उगाच फालतु कारणे सांगु नयेत,
वरवर नाही म्हणताना तुम्हाला मनातून उकळ्या फुटलेल्या असतातच
इमान राखावं पल्सरशी, उगाच बुलेट कडे व्यर्थ पाहू नये
उफाळून आलेल्या भावना, पल्सरच्या आरशात दिसतात याचे भान राखावे
- उखळात कांडणे
वाचने
18058
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
फक्त एवढेच वाटते की...
उपेक्षा मुलांची कुठेही नसावी
मुलींची मुलांशी गोड गट्टी असावी
नसलेल्या सौंदर्याचा नको गर्व त्यांना
मुलांचे स्मरण असो टवळ्यांना
- चलदूर अंघोळकर
In reply to विडंबन म्हणून बरे आहे by ज्ञानोबाचे पैजार
हसुन हसुन लोळलो. :=))
कवितेचे, नावांचे आणि प्रतिक्रियेचेही विडंबण.... सर्वच अप्रतिम !!
तुमच्या कल्पनाशक्तीला आमचा मनापासुन दंडवत !!
In reply to विडंबन म्हणून बरे आहे by ज्ञानोबाचे पैजार
हहपुवा.
=)) मी पैला लिहायचं राहिलं का पैजारबुवा!
अगागागागा!!!!
पैजारबुवा, मुजरा घ्या!
- ज्ञानोबांच्या पैजाराचे पैजार (अंघोळकरांचा प्रसाद)
पैजारबुवा! =)) =))
कवितेचं ठीक आहे, त्यावरच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचही विडंबन ठीकच आहे, पण =)) =))
"चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! मेलो! =))
उखळातलं कांडण तुफान झालंय!!
Sandy
In reply to आरारारारारा! by चांदणे संदीप
"चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! मेलो! =))+१ पैजारबुवांना ही सिद्धी प्राप्त आहे. मागे एकदा त्यांनी आशु जोग यांच्या प्रतिसादाचं विडंबन करून खाली "पशु रोग" अशी सही केली होती!
In reply to "चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! by आदूबाळ
@"पशु रोग" ››› 

=)) जबरदस्त.
तुफान ... जबरी..
=))))))
अरारारारारा, =))
पैजारबुवा रॉक्स =))
जब्रा!! :)
खतरनाक विडंबन =))))
ह्या ह्या ह्या =))
मुलांनी मुलींशी अबोला धरुन फुकटचा भाव खाऊ नये,
त्यांच्या मनात, हा बरा की तो, असा विचार चालू असतो
डेटवर असतांना उगाच मित्रांशी फोनवर बोलत बसू नये,
कामधाम सोडून मुली तुमच्या बरोबर आलेल्या असतात
ती सोबत असता उठसूठ पल्सरला ब्रेक मारू नये,
असले जुने पुराणे फंडे मुली पुरत्या ओळखून असतात
ती ऑनलाइन असता व्हाट्सअपवर बोलावे, बळेच टायपायला वेळ लावू नये,
वरवर बिझ्झी आहे म्हणताना तुमच्या मन में लड्डू फुटत असतातच
आपली तीक्ष्ण नजर तिच्या स्वप्नाळू नजरेत गुंफू नये,
स्वतःवर ताबा ठेवण्याच्या तिच्या प्रयत्नांचे इमले मग कोसळू लागतात
इमान राखावं एकीशी, उगाच इथे तिथे गळ टाकू नये,
तुमच्यासाठी ती कुणी एक असते, त्या एकीसाठी तुम्ही सारं जग असता, याचे भान राखावे
- भावना सांडणे
In reply to ह्म्म, by नीलमोहर
क्या बात!!!!!!!!!!!!!! भावना सांडणे पण जबरदस्त :)
In reply to ह्म्म, by नीलमोहर
लैच भावना सांडणारी कविता.
अक्षरशः शब्द न शब्द काळजाला भिडला.
रच्याकने :-
डेटवर असतांना उगाच मित्रांशी फोनवर बोलत बसू नये,
कामधाम सोडून मुली तुमच्या बरोबर आलेल्या असतात
हे सोडून बाकी सारे पटले.
पैजारबुवा,
In reply to ह्म्म, by नीलमोहर
जबरदस्त निमो!
In reply to ह्म्म, by नीलमोहर
याला विडंबन नाही म्हणणार . नवी कविता म्हणून पाहते.
In reply to ह्म्म, by नीलमोहर
लय भारी. बाडीस
मूळ विडंबन पण मस्त!!!!!!!!!!
:)
दंडवत स्वीकारा पैजारबोवा!!
दंडवत घ्या प्रभूजी :)
केवढे 'अबोली'चे फुलणे झाले आज. :)
सं - दी - प
ढबोल्या इतके नाही आवडले पण....मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्यांना अडचणीत आणू नये
त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो
हे अगदी पटले...... आमच्याइथे हे लागू आहे. त्यामुळे यापुढे अबोला धरणे बंद.... :))
पुन्हा एकदा दंडवत पैजारबुवा!
मस्तच
वाचुन हासणे अन् हासून ते लोळणे
मग लोळता लोळता पोट का दुखावे?
मी ओळखून आहे सारे......
डोळ्यांत पापण्यांना मग का पुर यावा?
मिटताच पापण्यांना का पैजारबुवा दिसावा?
हे चित्र जीवघेणे हरती इथे मिपाणे
मी ओळखून आहे सारे .......
ज्ञानोबांचे पैजार यांच्या मूळ कवितेपेक्षा अर्थात ज्ञा पै यांचीक्षमा मागून नीलमोहर यांची कविता खूप आवडली.श्र्वेता24 यांचेही म्हणणे नाही पटले मुलींनि मुलांशी अबोला धरू नये का तर म्हणे मुलांच्या डोक्यात म्हणे विराट म्हणजे क्रिकेट ई० चे विचार चालू असतात( केवढा मोठा task नाही?) आणि मूली काम सोडून तुमच्या बरोबर आलेल्या असतात हे बरोबर नाही , हे बरोबरच आहे ,कारण एखादीच अशी असेल भाग्यवान जिला घरात काम सांगितले जात नाही, अगदी एकुलती एक असो किंवा चारातली एक घरकाम डोक्यावर आसतेच काही नाहीतर घर आवरून स्वच्छ नीटनेटके ठेवणे ही बहुतेक घराघरांत मुलीचीच जबाबदारी मानली जाते. मुलाची नाही .
विडंबन म्हणून बरे आहे