टच मी नॉट
रविवार सकाळ.
अनयाची वाट बघत होतो.
नेमके कशासाठी येणार होते ते माहीत नव्ह्ते पण अंदाज करु शकत होतो.
अत्यंत तल्लख बुद्धीची अनया.
दोन इयत्ता पुढे.
ठरल्या वेळी माय लेकी हजर.
झळालले चेह्रेरे सगळे काही सांगुन गेले.
आई ने सुद्धा फाफट पसारा न लावता मुद्द्याच्या विषयाला हात घातला. पर्समधुन मेडल काढले.
होमी भाभा गोल्ड(रंग) दाखवले.
"ऑसम. ये तो होना ही था.अभिनंदन"
सर, तुमच्या मार्ग दर्शनाशिवाय शक्यच नव्हते.
"मी निमित्तमात्र. सगळी मेहेनत तिची. नेक्स्ट स्टॉप एन्. टी.एस. टॉप ५, राइट अनया."
अनया ने मान डोलावली.
अनया सरांच्या पाया पडुन आशिर्वाद घे.
अनया च्या चेहेर्यावर किंचित ढग.
" नको पाया पडायची गरज नाही. लेट अस शेक हँड्स अँड सील द पार्टनरशिप, ओके"
मी हाथ पुढे केला.
अनया ढीम्म उभी.
आई ने आवाज दिला, अनया....
आता अनया चा नाईलाज होता,
अंग चोरुन तिने हाथ पुढे केला, मी तो हातात घेउन थोपटला.
वॉश रुम कुठे, अनया चा पुढचा प्रश्न.
मी दिशा दाखवली.
"बेसीन वर डिसेन्फेक्टंट आहे. साबण वापरायची गरज नाही."
अनया चा चेहेरा खुलला.
........................
सर राग नाही आला ना.
" नाही बॉ. राग कशाला. काहीही चु़क नाही तिची"
जरा जास्तच होतय सर, हे म्हणत होते सायकिअॅट्रीस्ट दाखवुया.
"काही ही गरज नाही"
सर, शाळेतुन आली की पहिल्यांदा आंघोळीला जाते.तीला तिच्या कुठल्याही वस्तुला हाथ लावलेला चालत नाही. आम्हाला सवय झाली आहे, पण पाहुणे आले की अवघड होते. विषेशतः लहान मुले आली तर पंचाईत होते. आणि त्यांना समजावुनन सांगता सांगता नाकी नउ येतात. आणि मग ओ.सी.डी,सायकीअॅट्रीस्ट च्या हलक्या आवाजात चर्चा सुरु होतात. कंटाळा आलाय, काय करावे ते कळत नाही. बोलते सर्वांशी पण लांबुन. तसा कुणाचा अपमान पण करत नाही.पण एका हद्दीच्या बाहेर काहीही नाही.
"ज्याला तुम्ही प्रॉब्लेम म्हणता ते तिच्या खाती नॉर्मल आहे आणि ते तुम्ही करत नाही म्हणुन ती तुम्हा सर्वांना ओ.सी.डी. माझ्या लहानपणी क्रिकेट खेळुन आल्यावर हात धुल्या शिवाय जेवणे हा नेहेंमीचा कार्यक्रम. गटारात गेलेला बॉल काढुन त्याच हाताने जेवणे वॉज वेरी नॉर्मल.आज त्याचा विचार करुन शहारे येतात. काहीही काळजी करुन नका.
शाळेत होणारे विविध हेल्थ कॉन्शसनेस चे कार्यक्रम,मीडीया "जर्म फोबिया बंबार्ड्मेंट" काही मुले टोटॅलिटी मधे स्विकार करतात. उगाच कुठल्या तरी डॉक्टर कडे नेउन प्रॉब्लेम वाढवु नका. जे आहे ते आहे त्याचा हसत स्विकार करा,आपोआप जाईल हे."
हे फार खंतावतात हो, मेडल मिळाल्यावर तिला कवेत घ्यायचे होते पण तिने फक्त शेक हँड केला. ही चे पुढे कसे काय होणार ह्याची फार काळजी आहे हो. समवयस्कांबरोबर मिसळायला नको का?
"तिला नाही मिसळायचे, तर सो बी ईट."
पण सर..
"काहीही फर॑क पडत नाही. अहो इतर पालकांना मिसळायचे प्रॉब्लेम असतात आणि त्यातुन मुलांना कसे वाचवायचे हे त्यांना कळत नाही, तुमचा कोलॅटरल बेनिफिट समजा आणि शांत रहा.सो फार शी कॅन कॅरी हर सो कॉल्ड ओ.सी.डी इट इज ओके"
..............
वॉश रुम चा दरवाजा उघडला, अनया बाहेर आली. मी आत गेलो, कपाटातुन एक इंटरनॅशनल ब्रँड चे ३ बाटल्यांचे पॅक आणले,आणि तिच्या हाती स्वाधीन केले.
अनया चा चेहेरा उजळला, "थँक यु सर"
मी अनयाला विचारले एक गणित घालु,?
तिने मान डोलावली.
5 raised to (x-a).(x-b).(x-c) till (x-z) ची वॅल्यु काय?
अनया ने एक सेकंद विचार केला आणि उत्तर दिले 1.
"बादशाहो तुस्सी ग्रेट हो, पॅकेट संपले की सांग आणखी एक पाठवतो"
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ग्रेट सर ग्रेट. तुमचा या कड
वा!
हा प्रश्न फक्त एवढ्यापुरता
सुगम संगीत!!! शब्द आवडला!!
?
तुम्ही लिहिलेलं पटकन 'गमलं'.
भारी..!!
या कथेत वेगळीच छटा दिसली. तो
हो
__/\__
सर...
सोप्पं उत्तर आहे ....
अर्थ
क्या बात है
Ok
अनया ला जे वाटते ते खरे.
अनया ला जे वाटते ते खरे. तुमच्या फ्रेम ऑफ रेफेरन्स शी तिला काहीही घेणे देणे नाही. मला योग्य वाटते ते मी करणार, त्याचा तुम्हाला काहीही त्रास आहे का? मग गप्प बसा आणि लक्ष देउ नका.हे अनयामध्ये असलेल्या मोठ्या समस्येचे पहिले लक्षण असले तर ? मोठ्या समस्या छोट्या असताना त्यांचे निराकरण तुलनेने बरेचसे सोपे आणि यशस्वी असते. मोठी समस्या असणारच नाही असे वरवरचा अंदाज पुढे भारी पडू शकतो. त्यामुळे, सामान्य व्यवहारापेक्षा फार वेगळा व्यवहार एखाद्या मोठ्या समस्येकडे निर्देश करत नसल्याची खात्री करून मगच त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल.कोष उलगडून फुलपाखरु
आवडलं
अव्हिएटर आठवला....
संस्कारक्षम वयातल्या
प्रतिसाद आवडला.
+१
+ 1
हा.. हा.. हा..
तुम्ही खुप पॉझिटिव्हली पाहीलत
अपेक्षा
आम्हाला सवय झाली आहे, पण
आपण चांगलेच आहात गुर्जी पण
मस्तं आहे लेख. अजून साइड
हम्म.
प्रभू सरजे आहे ते आहे त्याचा
म्हणूनच मला उलट ही एक
+१
अशी एकलकोंडी मुलं( जर हा मनोविकार नाही असे निदान झाले तर) फक्त संशोधनासारख्या क्षेत्रात टिकू शकतात.हे दोनएक दशकांपूर्वी शक्य होते. पण... आधुनिक संशोधनात "स्वतःला प्रयोगशाळेत बंद करून संशोधन करणारा एकांडा संशोधक" हे समिकरण आता जुने झाले आहे. उच्च प्रतीचे आधुनिक संशोधन करण्यासाठी "अनेक (बर्याचदा अनेक देशांत विखुरलेल्या) संशोधकांचे आणि त्यांना मदत करणार्या तंत्रज्ञांचे मोठे गट" कार्यरत असतात. त्यामुळे अश्या विविध विषयांचे आणि विविध पात्रतेचे तज्ञ एकत्रितपणे काम करत असलेल्या गटांचे यशस्वी नेतृत्व करू शकेल अश्या "उत्तम प्रबंधक" असलेल्या संशोधकालाच यश मिळते आणि त्याचे नाव प्रबंधावर सर्वप्रथम असते. महत्वाच्या विषयावरचा एकांड्या लेखकाचा शास्त्रिय प्रबंध भूतकालात जमा झालेला आहे.सुगम आणि शास्त्रीय दोन्ही
हल्लीच्या मुलांची नाटके वाढत
हा ना भावड्या.