सोबतीण भाग - २

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
26 Jul 2016 - 1:24 pm

सोबतीण - भाग १

क्षण दोन क्षण वाट बघून अपर्णाने तिला हलवले."पृथा काय झाल ग? बोल की."

पृथाने गोंधळून अपर्णाकडे बघितल आणि म्हणाली,"अपर्णा आपण या बागेतून निघूया का?"

आता फक्त सहा वाजले होते. आजूबाजूला आता मुलांची खूपच गर्दी झाली होती. ओरडा-आरडा चालू होता. कोणी पडून रडत होत... कोणी मोठ्याने हसत होत... कोलाहल होता बागेत. त्यामुळे अचानक पृथाला बागेतून निघायची घाई का झाली ते अपर्णाला कळेना.

"का ग? काय झाल पृथा?" तिने गोंधळून पृथाला विचारल.

"अपर्णा मलाना गावाहून आल्यापासून झाडांच्या बाजूला जावस पण वाटत नाही ग. त्यात आता अंधार व्हायला लागला आहे. चल न. please. आपण स्टेशनवर जाऊन बसू. चालेल न तुला?" पृथा म्हणाली.

अपर्णा हसत म्हणाली. "हो चालेल की. स्टेशन म्हणजे माझ दुसर घरच आहे ग. चल."

आणि दोघी स्टेशनवर आल्या. लेडीज डबा जिथे येतो तिथे दोघी एका बाजूच्या बाकावर बसल्या. तोवर पृथा पण सावरली होती. त्यामुळे बसल्यावर अपर्णाने विचारायच्या अगोदर तीच बोलायला लागली.

"अपर्णा कोकणात इतकी झाड असतात न आणि तीसुद्धा मोठी मोठी की आता मला झाड नकोशी झाली आहेत." पृथा बोलत काहीतरी होती आणि तिचे डोळे दुसरच काहीतरी सांगत होते. अपर्णाच्या ते लक्षात आल.

"पृथा माझ्याशी नको खोट बोलूस. काय आहे ते खर सांग बघू. आपली मैत्री अलीकडची असेल. पण मी तुला थोड तरी ओळखायला लागले आहे. समजल?" अपर्णाने पृथाचा हात धरला आणि प्रेमाने थोपटत म्हणाली.

मग मात्र पृथाचा बंध तुटला. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आल. अपर्णाचा हात घट्ट धरत ती म्हणाली,"अपर्णा आम्ही गावाला पोहोचलो ना तेव्हा आजीची तब्बेत खूप खालावली होती. तिचा माझ्यावर खूप जीव होता ग. त्यामुळे तिने मला बघायचा ध्यास घेतला होता. आम्ही पोहोचलो तेव्हा अशीच संध्याकाळ झाली होती. मी तिच्याच जवळ होते. रात्री तिच्याजवळ झोपले होते.

रात्री कधीतरी मला जाग आली तर आजी जागीच होती. मी तिला विचारल,"काय झाल आजी? झोप नाही येत का तुला?"

त्यावर ती म्हणाली,"पिटू माझ एक काम करशील?" तिच्या आवाजात आर्जव होत. मी म्हणाले,"आजी अस काय विचारतेस? हक्काने सांग की."

ती महाली,"नाही मी विचारते त्याच उत्तर दे."

मी हसून म्हणाले,"सांग आजी. तू म्हणशील ते काम करेन मी."

तिला एकदम हायस झाल अस मला वाटल. तिचा चेहेरा उजळला. खोलीतल्या त्या कमी प्रकाशातसुद्धा मला ती हसली ते दिसलं ग. ती म्हणाली,"पिटू आपल्या आमराईमध्ये ते दोन माड आहेत न, तिथे जाऊन एक असोला नारळ ठेवशील का? आणि म्हणावं मी मुद्दाम नाही केल काही. माड सुद्धा तोडणार होते ते माझ्या भीतीमुळे. कोणाला त्रास द्यायचा हेतू नव्हता माझा. पण आता ते माड कधीच नाही तुटणार. फक्त जे काही आहे ते माझ्याबरोबरच जाऊ दे. माझ्या मुला-नातवंडाना त्याचा त्रास नको.... करशील एवढ?"

मी चक्रावून गेले होते. पण तिचा स्वर इतका आर्जवी होता की मी हो म्हणाले. म्हंटल,"आजी उद्या सकाळीच जाईन मी तिथे." त्यावर ती म्हआली,"उद्या कोणी बघितला आहे ग? तुझ्याचसाठी थांबले आहे मी. आत्ताच जातेस का?"

मी सहज घड्याळाकडे बघितल. तर तिने विचारल,"भिती वाटते आहे का?"

मी हसले. म्हणाले,"नाही ग. पण मला कुठे माहित आहे माड कुठे आहेत. म्हणून विचार करत होते सकाळी दगडू बरोबर जाईन."

"नको नको. तू आताच जा. अग सोप आहे. मागच्या दारातून बाहेर पड आणि सरळ जा. मोजून पंधरा पावलांवर आहेत ते माड." ती आग्रही स्वरात म्हणाली.

मी म्हणाले,"आजी अग तू म्हणतेस असोला नारळ ठेव तिथे. इतक्या रात्रि मी असोला नारळ कुठे शोधु ग?"

त्यावर तिने म्हंटल,"या खोलीच्या दाराच्या मागे मी आज सकाळीच ठेऊन घेतला आहे. पिटू, कर ग एवढं माझ्यासाठी." तिचा आवाज इतका आर्जवि होता की मला नाही म्हणावेना.

"बर." म्हणून मी उठले आणि तो दारामागचा नारळ घेऊन मागिल दाराशी आले. एकुलता एक मिणमिणता दिवा दारावर होता. मी हळूच दार उघडल. पण ते जून दार कुरकुरलच. मी दचकून अंदाज घेतला. पण आई आणि बाबा प्रवासामुळे खूप दामले होते. त्यामुळे त्याना जाग आली नाही. दगडूसुद्धा मला दिसला नाही तिथे. बाहेर गार वार सुटल होत. बाहेर येऊन मी मागे दार ओढून घेतल आणि आमराईमद्धे शिरले. आजी म्हणाली होती सरळ जायचं. जेम-तेम पंधरा पावलं. मी सरळ चालायला लागले. आणि खरच मोजून पंधरा पावलांवर दोन माड उभे होते. त्यांच्या खोडाला आलेला बाक असा विचित्र होता की जणूकाही कोणीतरी कमरेत वाकून नमस्कार करते आहे असे वाटेल. पण मग मी फार विचार करत उभी नाही राहिले. कारण जरी माझा भूतावर विश्वास नव्हता तरी अधाऱ्या रात्री एकटीने अशा झाडांमध्ये उभ राहायची हौस देखील नव्हती.

मी त्यातल्या एका माडा जवळ गेले आणि हातातला नारळ खाली ठेवला. मग आजीने जे म्हणायला सांगितल होत ते आठवत तसच मनात म्हणायचा प्रयत्न केला. म्हंटल,'माझी आजी एक सरळ साधी स्त्री आहे. तिने आयुष्यात कधीच कोणालाही दुखावलं नाही. तर मग या वयात येऊन ती का कोणाला त्रास देईल मुद्दाम. तरीही तिच्या हातून जर कोणी दुखावलं गेल असेल तर मी तिच्या बाजूने माफी मागते. तिच म्हणण आहे की जे काही आहे ते तिच्याबरोबर जाव.' मग मला अजून काही सुचल नाही आणि मी मागे वळले आणि चालू लागले.

मी चार-पाच पावलं पुढे गेले असेन आणि अचानक मला मागून काहीतरी सळसळल्याचा आवाज आला; म्हणून मी मागे वळून बघितल. वाटल त्या माडाला टेकून कोणीतरी उभ आहे. त्या जाणीवेने माझी गाळण उडाली अपर्णा.... खूप घाबरले मी. तशीच वळून घराकडे पळायला लागले... पण तेवढ्यात मला खर्जातला एक आवाज एकू आला "जोवर माड पडणार नाहीत तोवर कोणालाही काही होणार नाही; माईला निरोप द्या..... एवढा." त्यानंतरच मला काही आठवत नाही ग. कारण मी धावताना अडखळले होते आणि तिथेच पडले होते."

"बापरे! एकूणच थरारक प्रकार आहे हा. मग? पुढे?" अपर्णाने पृथाला विचारले.

"मग पुढे काय.... मला जाग आली तेव्हा मी घरात होते. आई, बाबा आणि दादा माझ्या बाजूला होते. मी जागी झालेली बघितल्यावर आईने पाणी दिल आणि विचारल,"तू अशी रात्री बेरात्री बाहेर का गेली होतीस? काही साप-विंचू चवल असत तर? आणि ओरडलीस का अशी मोठ्याने? आम्हाला तर कळलंच नाही काय झाल ते. तुझा आवाज होता म्हणून आजीच्या खोलीत गेलो; तर आजी म्हणाली तू बाथरूमला जाते म्हणून बाहेर पडलीस. तुला शोधायला लागलो तेव्हा दादाला तू घराबाहेर मागच्या पडवी जवळ बेशुद्ध पडलेली दिसलीस. त्यानेच आत आणल हो तुला. काय झाल ग पिटू?"

सगळे आजीवर रागावतील म्हणून मी काहीच बोलले नाही. म्हंटल,"मला साप दिसला आणि घाबरून बेशुद्ध पडले. दमले आहे; झोपते." आई, बाबा आणि दादा पण दमलेलेच होते. मग फार चर्चा न करता आम्ही सगळे झोपलो. मी आईजावळच झोपले. सकाळी आम्ही उठलो आणि आजीच्या खोलीत गेलो तर आजी गेली होती." एवढ सांगून पृथा बोलायची थांबली.

अपर्णा पृथाकडे बघत बसली होती. ती काहीच बोलेना तेव्हा न राहून पृथाने म्हंटल,"अपर्णा तुला मी खोट सांगते आहे अस वाटत का?"

त्यावर अपर्णा लगेच म्हणाली,"नाही पृथा. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे."

"thank you अपर्णा. खर सांगू मी हा माझा अनुभव कोणालाच सांगू शकत नव्हते ग. आईला सांगितला असता तर ती घाबरली असती. बाबा आणि दादाने विश्वास ठेवला नसता. त्यामुळे माझी फार फार कुचंबणा होत होती ग. तुझ्याशी बोलून खूप बर वाटल मला. पण ते काय असेल ग अपर्णा?"

"ते म्हणजे काय पृथा?" अपर्णाने विचारले.

"तेच ग. मला ते जे काही दिसलं ना त्या माडाजवळ आणि ते जे काही एकू आल विचित्र खर्जात! काय असेल ते?" पृथाने मनात उत्तर माहित असूनही विचारले. कारण तिच्या मनात जे होत ते तस नाही अस अपर्णाने म्हणावं अशी कुठेतरी पृथाला इच्छा होती.

अपर्णाने क्षणभर पृथाकडे निरखून बघितल आणि म्हणाली,"पृथा तुला माहित आहे ते काय होत. तरीही सांगते... तो काशाच होता. तो तिथे नारळाच्या आशेने आला होता आणि अचानक त्याचा मृत्यू ओढवला. त्यामुळे त्याचा आत्मा तिथेच त्या माडाखाली अडकला आहे. तुझ्या आजीच्या ते लक्षात आल म्हणा किंवा काशाने त्याची जाणीव करून दिली असेल म्हणा... पण म्हणूनच तुझ्या आजीने ते माड तोडू दिले नाहीत. आणि तू आजीतर्फे माफी मागितल्यावर त्यानेही सांगून टाकले की त्याचा राग तुमच्या कुटुंबावर नाही. पण जीव मात्र त्या माडात अडकला आहे. त्यामुळे जोवर ते माड आहेत तोवर काही प्रश्न नाही."

अपर्णा जे सांगत होती तेच खर तर पृथाच्या मनात होत. त्यामुळे ती म्हणाली,"किती perfect जज्ज केलीस ग सिचुएशन. मला वाटल होत की आता माझ काही खर नाही. पण आता तू म्हणते आहेस तर मनाला एक दिलासा मिळतो आहे की जे काही आहे ते तिथे गावाला आणि त्या माडामध्ये आहे. त्याचा आमच्याशी इथे काहीही संबंध नाही. पण तुला कस लक्षात आल हे?"

त्यावर अपर्णा हसली. म्हणाली,"तुम आम खाओ पृथा गुटली क्यो गिनती हो?"

पृथाला ती काय म्हणते आहे ते नाही कळल. मनावरच ओझ बोलल्यामुळे उतरल होत. त्यामुळे ती परत पूर्वीसारखी पृथा झाली होती. ती अपर्णाच्या मागे लागली. "तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय अपर्णा. सांग न मला."

अपर्णा म्हणाली,"तू मागे लागते आहेस म्हणून सांगते ह. तू मला हे सगळ सांगायला सुरवात का केलीस? कारण मी तुला म्हणाले की माझा भूतावर विश्वास आहे. right?"

आता पृथाला आठवलं की मुळात तिने अपर्णाला तिचा अनुभव सांगायला सुरवात केली होती कारण अपर्णाने म्हंटल होत की तिचा भूतांवर विश्वास आहे. आणि त्याबरोबरच ती म्हणाली होती की तिला त्याचा अनुभव देखील आला आहे. मग मात्र पृथाची उत्सुकता जागी झाली.

ती अपर्णाच्या मागे लागली,"ए तू म्हणाली होतीस की तुला भुताचा अनुभव आला आहे आणि ते तू मला सांगशील. सांग न मला काय झाल नक्की? सांग न मला."

अपर्णा घड्याळाकडे बघत म्हणाली,"पृथा, आज नको. पुन्हा कधीतरी. बघ तरी. सात वाजले सुधा. तुला उशीर होईल उगाच. मुख्य म्हणजे माझ्या मनाची अजून तयारी नाही ग झाली तुला हे काही सांगायची. त्याचे काय परिणाम होऊ शकतात ते देखील मला माहित नाही."

"होऊ दे उशीर. मी आईला सांगितल आहे तुझ्याबरोबर आहे ते. सातच तर वाजले आहेत. एरवीच्या दिवशी आपण ओवर टाईम साठी थांबलो तर यावेळी ऑफिस मधून बाहेर पडतो. आणि दादा येणार आहे मला स्टेशन वर घ्यायला. सांग न मला. आणि सध्या मीच असा अनुभव घेतला आहे की तुझ्या अनुभवाचा माझ्यावर काय परिणाम होणार आहे ग? तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस. पण अशी उत्सुकता लावून सोडून देऊ नये ग." अस म्हणून पृथा अपर्णाच्या मागे लागली.

आणि अपर्णाने सांगायला सुरवात केली.

कथा

प्रतिक्रिया

स्पा's picture

26 Jul 2016 - 1:31 pm | स्पा

भारीच

राजाभाउ's picture

26 Jul 2016 - 1:43 pm | राजाभाउ

छान. पुभाप्र.

एस's picture

26 Jul 2016 - 1:47 pm | एस

मागच्या भागांच्या लिंका दिल्यास चांगले होईल. हा भाग छान. पुभाप्र.

ज्योति अळवणी's picture

26 Jul 2016 - 3:36 pm | ज्योति अळवणी

दुवा दिला आहे धाग्यात आता.

हा ही भाग सुंदर जमलाय.

sandeepn's picture

26 Jul 2016 - 2:49 pm | sandeepn

.

नाखु's picture

26 Jul 2016 - 3:35 pm | नाखु

वेग आणि ओघ राखला आहे.

पुभाप्र.

स्वगतः (स्पाराय्ण गाळपांनी छान म्हटलंय हे लक्ष्यात ठेवा बर का? अता जिम्मेदारी वाढली)

पण अशी उत्सुकता लावून सोडून देऊ नये>>>>> मीपण हेच म्हणतो, आता लवकर पुढचा भाग लिहा बघू.... कथा खूप छान जमलीये.

बरखा's picture

26 Jul 2016 - 5:23 pm | बरखा

"वेग आणि ओघ राखला आहे." अगदी नाखु सारखच झालय.

किसन शिंदे's picture

26 Jul 2016 - 5:26 pm | किसन शिंदे

दोन्ही भाग वाचले, उत्सूकता वाढली आहे.

पुभाप्र

अभिजीत अवलिया's picture

26 Jul 2016 - 10:13 pm | अभिजीत अवलिया

सांगा सांगा पटकन सांगा

खटपट्या's picture

26 Jul 2016 - 10:54 pm | खटपट्या

मस्त. पुभाप्र.

रातराणी's picture

26 Jul 2016 - 11:53 pm | रातराणी

Scared smiley face

नीलमोहर's picture

27 Jul 2016 - 11:47 pm | नीलमोहर

छान लिहिताय
पुभाप्र

भाग्यश्री कुलकर्णी's picture

28 Jul 2016 - 2:11 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्तच. उत्सुकता वाढलीये.