तंबाखू व सिगरेटचा विळखा कसा सोडवावा??????

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in जनातलं, मनातलं
23 Jun 2016 - 8:41 pm

मी अकरावीत असताना पहिल्यांदा सिगरेट ओढली,तेव्हा काही कीक वगैरे बसली नाही,मित्रांच्या आग्र्हाखातर मी पहील्यांदा सिगरेट ओढली होती,पुढे सिनिअर कॉलेजला गेल्यावर आठवड्यातून एकदा दोनदा सिगरेट ओढायचो, मग त्या सिगरेटची कीक बसायला लागली व ती हविहविशी वाटू लागली.हे सगळे चालू असतान खिशात पैसे कमी असायचे त्यामुळे आपोआपच व्यसनावर कंट्रोल होता.
पुढे कामाला लागल्यावर हे व्यसन पुन्हा चालू झाले ,घरच्यांना कळु नये म्हणून हॉल्स चघळत घरी जाणे हा प्रकार मी करायचो.घरी असताना तल्लफ आल्यावर माझी हालत पतली व्हायची ,आई वडीलांसमोर सिगरेट ओढने म्हणजे महापाप ,आपला मुलगा वाया गेला याचे त्यांना वाईट वाटूनये म्हणून मी माझी तल्लफ कंट्रोल करायचो.पुढे माझ्या मनाने सिगरेटचे व्यसम सोडायचे ठरवले ,परंतू अनेकदा रिलॅप्स होऊन ते परत परत चालूच राहिले.दरम्यानच्या काळात सरकारने सिगरेटच्या उत्पादनावर टॅक्स वाढवला व सिगरेट महाग झाली, तशी काही फुकाड्यांची पाचावर धारण बसली. माझा पगार बरा असल्याने माझा रोजचा पाच सिगरेटचा कोटा चालूच राहीला,निकोटीनची ठराविक मात्रा एकदा स्टेबल झाल्यानंतर आधि बसणारी कीक बसेनाशी होते व शरिर जास्त निकोटीनची मागणी करु लागते ,माझ्या बाबतीत हा प्रकार सुरु झाला व अडचणीला सुरवात झाली,घरी तल्लफ आल्यावर काय करायचे? ...अश्या वेळी फुकाडे मित्र मदतीला येतात ,त्यापैकीच एकाने मला तंबाखू चघळण्याचा सल्ला दिला.तंबाखु मळणे व नंतर ती चघळणे मला जरी थर्डक्लास लोकांचे व्यसम वाटत होते तरी एकदा ट्राय करुन बघु म्हणून मी तंबाखू खायला सुरवात केली .तंबाखूचे पाकीट व चूना खिशात बाळगता येतो, कधीही कुठेही खाता येते व फारसे कुणाला समजतही नाही,परिणामतः मी घरात देखील राजरोस तंबाखू खाउ लागलो.गेली तीन वर्षे मी तंबाखू खात आहे व कधीतरी सिगारेटही ओढतो.
मागच्या वर्षापासून मला हे व्यसन सोडायचे आहे असे मनाने घेतले आहे ,पण आता ते सुटता सुटत नाही आहे.तंबाखूची प्रत्येक पुडी शेवटची असे मी ठरवतो व यांत्रिक पद्धतीने पुड्या घेत राहतो,मला कँसर झाल्याची स्वप्न देखील पडतात.
मराठी आंतरजालावर अनेक अनुभवी मंडळी आहेत ,पैकी काहींना सिगरेट तंबाखू व्यसन कधीतरी असेलच व त्यांनी ते यशस्वीपणे सोडले असेल .माझे काही प्रश्न आहेत,
१ . तुम्हाला सिगरेट ,तंबाखूचे व्यसन कसे लागले ?
२.हे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले वा करता आहात?
३.पुन्हा व्यसन लागू नये यासाठी काय करता येईल?
४. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी कीती प्रमाणात यशस्वी होते?
५. तंबाखुमुक्त आयुष्याचे तुम्हाला झालेले फायदे काय आहेत?

जीवनमान

प्रतिक्रिया

तुम्ही कोणती तंबाखू चघळता? गाय छाप असेल तर लेटेस्ट पॅकिंग केव्हा चेंज झालेय? चुना कोणता वापरता? तंबाखू तोंडात कोणत्या भागात ठेवता? किती वेळ ठेवता? गिळण्याचा कधी प्रसंग आलाय का? असल्यास कसे वाटते? एक गाय छाप किती दिवस जाते? त्याशिवाय सकाळी प्रेशर येत नाही अशी अवस्था आहे का? चहा किंवा जेवण झाल्यावर आपसूक मळनियंत्र चालू होते का? ह्या सगळ्या प्रशनाची उत्तरे द्या मग आपण तुमच्या समस्येकडे बघू

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

23 Jun 2016 - 9:00 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

गायछाप जर्दा
लेटेस्ट पॅकींग आताच चालू झाले आहे
सुर्या चूना वापरतो
प्रेशर येण्यासाठी खावी लागते
बास..झाले समाधान ,आता जरा मार्गदर्शन करा ,मला सिरीयसली तंबाखू सोडायची आहे ,पण डिपेंडन्स जबर आहे ,काही अनुभव असल्यास सांगा

आनंदी गोपाळ's picture

23 Jun 2016 - 10:44 pm | आनंदी गोपाळ

आपोआप सुटेल. :)

रच्याकने:
हळूहळू सुटत नाही. काहींची अ‍ॅटॅक येऊनही सुटत नाही. लाथ मारून बंद करा. अन बंद ठेवा. नाही तर आपल्या जी मधे डी नाही असं म्हणून आयुष्यभर चघळत रहा. सिंपल.

रच्याकने २ :
विश्वाने व सर्व फुकाड्याम्नी/चघळ्यांनी लक्षात घ्यावे, की वास लपत नाही हॉल्सने. बायकोपासून तर मुळीच नाही. एकदा विडी तंबाकू सुटली, की इतरांचा वास किती घाण येतो ते समजून स्वत:ची रोज लाज वाटेल.

अहाहा
मी याचीच वाट पहात होतो.

मिश्या एक नंबर आहेत यांच्या.

माझ्यापण अशाच होत्या. यांना पाहील्यावर साफ केल्या...

आदूबाळा तो वरचा फोटो नीट बघ, नेटके नाही आठवला?

कोकणी's picture

24 Jun 2016 - 8:33 am | कोकणी

माझ्या माहीती प्रमाणे हे बाबा सिगारेट ओढतात. हे स्वतः डॉक्टर आहेत.
बरेचदा प्रवचनात सुद्ध्हा ओढतात असे ऐकले आहे.

श्रीगुरुजी's picture

23 Jun 2016 - 11:00 pm | श्रीगुरुजी

नानासाहेब,

तंबाखू, सिगरेटच्या व्यसनाचं नंतर बघूया. आधी मिपावर असंख्य डु आय तयार करून असभ्य आणि जातीयवादी प्रतिसाद लिहिण्याचं व्यसन सोडा. ते सोडलं तर इतर व्यसनं आपोआप सुटतील.

खटपट्या's picture

24 Jun 2016 - 3:31 am | खटपट्या

लोळ

जी गोष्ट करताना तुम्हाला सिग्रेट्सची आठवण एकदाही येत नाही अशी गोष्ट शोधा, आणि ती करत रहा.
शुभेच्छा.

वैद्यकीय सल्ल्याने वापरा. फायदा होतो हे पाहण्यात आहे. माझ्या एका बहिणीच्या नव-याची पूर्णपणे सुटलेली आहे. अर्थात मनावर कंट्रोलही तेवढाच पाहिजे.

निकोडर्म की काहीतरी नावाचे स्टिकर असते ना! मला फारसे माहित नाही, चौकशी करा.

चौथा कोनाडा's picture

25 Jun 2016 - 7:54 pm | चौथा कोनाडा

:-)
सिगरेट ओढण्याची अथवा तंबाखु चघळण्याची इच्छा झाली की निकोडर्मचे स्टिकर ओठाना घट्टट चटकवायचें; व्यसन महिन्याभरातखात्रीने सुटते.
(कृहघे)

रेवती's picture

27 Jun 2016 - 11:48 pm | रेवती

हौ फनी! :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Jun 2016 - 6:04 am | कैलासवासी सोन्याबापु

१ . तुम्हाला सिगरेट ,तंबाखूचे व्यसन कसे लागले ?

वयाच्या 15व्या वर्षा पासून व्यसन लागले, तालमीतुन बाहेर पडले की अंगावरली माती धुस्तोवर थंडीच्या महिन्यात घाण काकडा बसत असे तेव्हा आमच्या तालमीतल्या थंडाई घोटणाऱ्या भय्या ने एक दिवस 'गर्मी का बुटी' म्हणत एक चिमूट सरकवली होती हातात त्यानंतर साधारण एखाद वर्षाने लक्षात आले की बुआ आपण दिवसाला दोन विडे सहज लावतोय. ट्रेनिंगचे अकरा महिने तंबाखू पूर्ण बंद होता अन त्याचा डोज नसल्याने काही फरकही पडत नव्हता, तेव्हा व्यसन हे मेंटल असते त्याची शारीरिक गरज काहीच नाही हे पटले, तूर्तास मुजफ्फरपुरी किंवा बक्सरी पत्ती खातो बिहारची प्रसिद्ध (ही आपल्याकडे असते तशी सुक्की पत्ती नसते तर cure केलेली लांब लांब कापलेली ओलसर पत्ती असते अन किक फर्मास लागते)

२.हे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले वा करता आहात?

पहिले तर मी denial mode मध्ये होतो की बोआ आपल्याला व्यसनच नाही अन हे म्हणतानाच रोजचे एक पाकीट स्वाहा होऊ लागले होते, नंतर आपण करत असलेला वाय झेड प्रकार लक्षात आला अन मी 'हळू हळू' तंबाखू बंद करायचा प्रयत्न करू लागलो म्हणजे कधी रेशनिंग करीत असे तर कधी नियम घालत असे उदा ज्या दिवशी मटण खाईन त्याच दिवशी विडा मळेल इत्यादी, पण ते सगळे फेल असते , शेवटी मी शेगाव ला गजानन महाराजांसमोर सोडली तंबाकू !! त्यात कॅच होता म्हणजे आपण देवाला बोललो की 'आजपासून मी विडा मळणार नाही' आता गार एरिया मध्ये राहतो तरी तंबाकू गरजेचा वाटत नाही अजिबात, जर एखाद्या मित्राने घोटला तर एक चिमूट खातो पण रोजचे 12 विडे वगैरे बंद झाले आहेत अन आठवड्यात एखाद विडा वगैरे सूरु आहे, तो सुद्धा कंपनी म्हणून होतो तो नसल्यास पाचनचक्र गडबडले आहे वगैरे काहीच वाटत नाही आधीपासूनच. अमुक गोष्ट आपण सोडू शकतो हि खात्री आल्यावरच त्यात पडावे, चार आण्याचं काळीज असल्यास असल्याचा नाद न केलेलाच बारा

३.पुन्हा व्यसन लागू नये यासाठी काय करता येईल?

मला तरी असे काही सांगता येणार नाही वरती लिहिले आहे त्यात काही सापडले तर पहा

४. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी कीती प्रमाणात यशस्वी होते?

कल्पना नाही, वापरलेली नाही

५. तंबाखुमुक्त आयुष्याचे तुम्हाला झालेले फायदे काय आहेत?

कसं सांगू बुआ आधी तोटे काय झाले ते कळू दे ;)

व्यसन सोडण्यास शुभेच्छा!!

शेवटी मी शेगाव ला गजानन महाराजांसमोर सोडली तंबाकू !! त्यात कॅच होता म्हणजे आपण देवाला बोललो की 'आजपासून मी विडा मळणार नाही'

हेच एका मित्राच्या बाबतीत पाहीले आहे. व्यसनाचा अतिव पश्च्याताप झाल्यावर स्वामींच्या फोटो समोर शपथ घेतली. क्षणात सर्व व्यसने त्यागली. आता २० वर्षे दारु, सिगरेट, तंबाखु, मांसाहार या पासुन दुर आहे. दोन वर्षे कोरीयात केवळ बटाटे, भात याच्यावर काढली. तो सांगत नाही, पण प्रत्येक ठीकाणी स्वामींचा फोटो बतोबर असतो.

श्रद्धा आणी दृढ निश्चय याने व्यसन टाळता येते बहुतेक.

बाकी हळुहळु व्यसन सोडणारेही पहाण्यात आहेत. सुरवात निकोटीन्च्या गोळ्या किंवा पॅच वापरुन करतात, त्याने होरात येणारी तल्लफ कमी होते. मग हळु हळु निकोटीन गोळ्याही कमी करतात. हा उपाय थोडा खर्चीक आहे, व सक्सेस रेटही कमी आहे - कारण मन कधीतरी परत त्या व्यसनांकडे धाव घेतेच.

हार्ट अ‍ॅटॅक येउन सुद्धा सतत सिगरेट ओधणारेही पहाण्यात आहेत. कधी कधी मृत्युची भीतीही व्यसनाला दुर ठेउअ शकत नाही.

सचु कुळकर्णी's picture

24 Jun 2016 - 4:20 pm | सचु कुळकर्णी

कुठल्ल्या तालमित जात होता राजेहो, गोकुळवस्ताद रजपुतपुरा काय ?
तंबाखु खात होते तर मंग फुलछाप तर खाल्लि अशीलच ना :))
फार वर्षापुर्वि अकोल्याच्या एस.टि. स्टँड वर एक बोर्ड (चेतावनी) होता "चिमुट तोंडात टाकण्यापुर्वि विचार करा"
आता नाय पंचायत अरे बावा विचारचक्र सुरु करन्यासाठि तर खाउन राहिलो...असे खाणारे म्हनत.

चार आण्याचं काळीज असल्यास असल्याचा नाद न केलेलाच बारा
बराब्बर

सिरुसेरि's picture

24 Jun 2016 - 8:20 am | सिरुसेरि

प्रामाणिक कथन . तंबाखु खाणारे बरेचजण "तंबाखु खाल्ल्याने फूड पॉयझनींग होत नाही " असे समर्थन करतात . ते कितपत खरे आहे ? तंबाखु आणी बंबाखु मध्ये काहि फरक आहे का ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jun 2016 - 9:07 am | डॉ सुहास म्हात्रे

१. तुम्हाला सिगरेट, तंबाखूचे व्यसन कसे लागले ?

व्यसन लागले नाही. कारण सिगरेट व इतर प्रकारचा तंबाखू यांची "अन्न, पाणी आणि प्राणवायू" यांच्याइतकी आवश्यकता कधीच वाटली नाही !

सिगरेट ओढली आहे. काही वर्षे केवळ 'सोशल स्मोकर' होतो, म्हणजे पार्टी वगैरे च्या वेळेस सिगरेट ओढत असे... काही पार्ट्यांत अनेक पाकीटे संपवली आहेत :)

तंबाखू खाल्लेला आहे. किक बसूनही त्यात तसे फार आकर्षक असे काही वाटले नाही. तंबाखू खाऊन पिचकार्‍या मारणारे लोक पाहून नेहमीच गलिच्छ वाटते. तेव्हा ती सवय लागणे शक्यच नव्हते.

२. हे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले वा करता आहात?

जरूर पडली नाही कारण व्यसनच लागले नाही.

३. पुन्हा व्यसन लागू नये यासाठी काय करता येईल?

वर सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या तंबाखूच्या अभावाने माणूस मरत नाही. तेव्हा अशी गोष्ट अत्यावश्यक आहे असे वाटणे हे (अनावश्यक गोष्टींचा फुकाचा आधार शोधत फिरणार्‍या) कमकुवत मानसिकतेचे लक्षण आहे.

व्यसन लागलेच असले तर ते सोडण्याची सर्वात खात्रीची गोष्ट म्हणजे, "व्यसन सोडण्याचा प्रयत्न करू नका... ते फक्त आणि फक्त सोडा."

शारिरीक अवलंबित्व (अ‍ॅडिक्शन) निर्माण करणार्‍या गोष्टींचे (उदा : कोकेन) एका प्रमाणापेक्षा जास्त असलेले व्यसन पायरीपायरीने सोडण्याची गरज असू शकते. तंबाखू त्या गटात येत नाही. तेव्हा तो सोडण्याच्या (नसलेल्या) पायर्‍या तयार करू नका... तो सोडा, बस सोडा. उदा : या क्षणाला सर्व सिगरेट्स तोडून टाका. त्यांचे तुकडे व खायच्या तंबाखूची सर्व पाकीटे घराबाहेरच्या कचर्‍याच्या कुंडीत टाका. त्यानंतर परत त्यांना कधिही तंबाखूचा वापर (विकत घेऊन किंवा दुसर्‍याने दिला तरी) करू नका. व्यसन खरोखरच सोडायचे असले तर बस इतकेच करायचे आहे, बाकी सर्व गैरसमज / अंधविश्वास आहेत !

'हे पटत नाही' किंवा 'पटते आहे पण ते करण्याची अंगात धमक नाही' यापैकी काही असले तर, कमीत कमी तंबाखूला किंवा इतर कोणा व्यक्तीला दोष देण्याइतका अप्रामाणिकपणा दाखवू नका. :)

४. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी कीती प्रमाणात यशस्वी होते?

वर सांगितलेली थेरपी न जमण्याएवढे मन कमकुवत असले तर इतर कोणतीही थेरपी हि स्वतःची फसवणूक करणे आहे. पूर्णविराम !

५. तंबाखुमुक्त आयुष्याचे तुम्हाला झालेले फायदे काय आहेत?

मला स्वतःला व्यसन लागले नसल्याने स्वानुभव नाही. पण, अनेक रुग्णांच्या अनुभवाचा फायदा घेऊन खालील सर्वात महत्वाचा जीवनबदल करणारा फायदा असा...

व्यसन सुटल्यापासून दोन एक आठवड्यात "केळे आणि सफरचंद यांचा स्वाद वेगवेगळा असतो" हा आश्चर्यकारक शोध लागतो !

त्याबरोबर इतर अनेक फायदेही होतात, त्यातील काही असे :

अ) इतरांना तुम्ही गलिच्छ आहात असे वाटणे बंद होते (अर्थातच, इतर गलिच्छ सवयी नसल्यास ;) )

आ) व्यसनावर खर्च होणार्‍या पैश्याचा अनावश्यक व्यय थांबतो. तो उपयोगी गोष्टींसाठी किंवा बचतीसाठी वापरता येतो.

इ) व्यसनामुळे होणारी (पक्षी : पैशाचा अपव्यव करून विकत घेतली जाणारी) शारिरीक, मानसिक व भावनिक हानी थांबते.

ई) व्यसन सोडताना दाखविलेली मानसिक ताकद आत्मविश्वास वाढविते. हा आत्मविश्वास आयुष्यात अनेक वेळेस प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या कामी येतो.

इतरही बरेच फायदे आहेत. पण हे फायदे वाचून फरक पडत नसला तर इतर सर्व गोष्टी व्यर्थ आहेत... आणि व्यर्थ गोष्टीत रस नसल्याने इथेच थांबतो :)

सदानंद's picture

25 Jun 2016 - 12:05 pm | सदानंद

सुहास सर,
मी या अनुभवातून गेलोय ..जवळ जवळ 12-14 वर्षे तंबाकू खात होतो..
आधी "प्रयत्न" करून पाहिले. पण त्यामुळे व्यसन थांबत नाही.. अजून दृढ होते..
एक दिवस पुडी फेकली आणि परत निग्रहाने हात लावला नाही.. ते आज पर्यन्त..2 वर्षे होऊन गेलीत...
पण एक गोष्ट महत्वाची...अजून ती तलफ येत राहते.. कोणी खात असेल तर इच्छा होतेच होते...
निग्रहाने टाळणे हेच करतोय..

व्यसन लागताना कुणाला विचारलत का की आता मी सिगारेट ओढु का किंवा तंबाखु खावु का? मग आता बंद करताना का बरे मित्र , नातेवाईक आठवतात.

फक्त आणि फक्त तुमच्या मनाबवर ताबा हवा बाहेरील कोणत्या ही साधनांचा , उपायांचा आधार हे फक्त आपले आपण करुन घेतलेले मनाचे समाधान असते.
बाकी गजानान महाराजांच्या दरबारी जावुन तंबाखु सोडणे (ज्यांची प्रतिमा ही नेहमी चिलीम ओढणारी अशी दाखवतात) हा केवढा विरोधाभास.

अवांतर :- तंबाखुमुळे कर्करोग होतो म्हणाताय तर कित्येकांना वयाची नव्वदी पार केलेले पाहिले आहे जे दररोज सारखी तंबाखु आणि चहा बीडीवर दिवस काढतात. तेव्हा उगाचा कसले ताण नको.

शुभेच्छा!

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Jun 2016 - 10:20 am | कैलासवासी सोन्याबापु

बाकी गजानान महाराजांच्या दरबारी जावुन तंबाखु सोडणे (ज्यांची प्रतिमा ही नेहमी चिलीम ओढणारी अशी दाखवतात) हा केवढा विरोधाभास.

अहो त्यांचे व्यसन वायले त्यांना चिलीम सुद्धा साधी नाही गांजाची असे, पण ते निमित्तमात्र होते मुख्य व्यसन पंढरीचा विठू लेकुरवाळा होता, इथे कोण भक्तिरसात डुंबायला तंबाखू चोळतोय! म्हणून आम्हा पामरांसाठी तंबाखू विडी सिगारेट गांजा वाईटच मानतो आम्ही ! शिवाय विरोधाभास असो वा कसेही असो हा आमच्या वैयक्तिक श्रद्धेचा भाग झाला, अन श्रद्धा म्हणले की थोडा विरोधाभास थोडी अतार्किकता येतेच ओघाने :)

प्रकाश घाटपांडे's picture

28 Jun 2016 - 9:19 am | प्रकाश घाटपांडे

:)

कैलासवासी's picture

24 Jun 2016 - 9:18 am | कैलासवासी

तुम्हाला सिगरेट ,तंबाखूचे व्यसन कसे लागले ?

वयाच्या 22 व्या वर्षी सिगारेट वढायला सुरवात केली, मित्रांमध्ये मी एकटा पीत नव्हतो, पोरांनी शिव्या घालू घालू सवय लावली, नेहमीचे वाक्य, काय होत नाय दिन्या वढ बिन्दास्त. मग सकाळ, दुपार, संध्याकाळ काळ संपत होते पण सिगारेट काय संपेना. प्रेशर येत नाय म्हणून वढायची हे नवीन कारण त्यात वाढले. जेवण केल्यावर सिगारेट ओढल्यापर्यंत जेवण न केल्यासारखे वाटू लागले. साथ अजून सुटली नाही. दिवसाला 5 व्हायच्या आत्ता 1 वर आलोय ती पण रात्री जेवल्यावर.

२.हे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले वा करता आहात?

मित्रांना शिव्या घालतो, एकटा असल्यावर ओढणे टाळतो. अधून मधून बातम्या येतात की सिगारेट मुळे caner होत नाही, थोडा आत्मविश्वास वाढतो.

३.पुन्हा व्यसन लागू नये यासाठी काय करता येईल?

स्वतःवर नियंत्रण.

झुरका मारला आणि पुन्हा त्या वाटेला गेलो नाही!

वडील सिग्रेट ओढतात. त्या सिग्रेटीत एवढं असतं तरी काय ते बघूयात म्हणून एक दिवस घरात कोणी नसताना एक अर्धवट राहिलेली सिग्रेट घाबरत घाबरत पेटवली आणि बाबा घेतात तसला मस्त झुरका मारला की, आणि जी काय वाट लागलीये! ठसकून उसकून हैराण, मळमळ, उलटीचे फीलिंग, डोळ्यातून पाणी, डोके गरगरून चक्कर सगळे प्रकार १५ मिंटात झाले! :( तेव्हा जी फेकून दिली ती कायमची.
वडिलांचे एक मित्र चेनस्मोकर. ते एकदा मला म्हणाले "आयुष्यात सिग्रेटला कधीही हात लावू नकोस! या व्यसनाने माझे जेवढे नुकसान केले आहे तेवढे कशानेही झाले नाही. माझी तब्बेत तर खराब झालीच परंतु यात जेवढा पैसा मी बरबाद केला त्यात मी अँबेसिडर मेंटेन करु शकलो असतो! त्यामुळे या वाटेला तू चुकूनही जाऊ नकोस!!"

आता मागे वळून बघताना असं वाटतं, या सगळ्याचा फायदा असा झाला की कॉलेजात असताना जे टिपिकल यात अडकण्याचं वय असतं त्यावेळी मला याचं काहीच वाटत नव्हतं आणि धोके आधीच माहीत होते!:)

वरती डॉक्टर म्हणतात तसे सोडायचे तर तडकाफडकी व्यसनापासून फारकत घ्यायची अन्यथा जमत नाही.
कोणासाठी तरी सोडू, बायका मुलांसाठी सोडू असले काही नसते. त्यांच्यासाठी सुरु केली होतीत का? मग त्यांचा काही संबंध नसतो. तुम्हाला मनापासून वाटत असले तर सोडा, फक्त तुमच्यासाठीच तुम्ही ते करत असता हे लक्षात ठेवा म्हणजे मग कोणतीही लंगडी कारणे सुचत नाहीत!
तुम्ही एकट्याने व्यसन सोडू शकत नसलात तर व्यसनमुक्ती केंद्राची मदत घ्यावी त्याने उपयोग होत असावा असे वाटते.

भाते's picture

24 Jun 2016 - 10:26 am | भाते

मी (सोमवार ते शुक्रवार) दिवसाला ४-५ शिगरेटी पीत होतो. व्यसन असल्यामुळे विकांताला सुध्दा १-२ लागायच्या. नंतर रोजचे प्रमाण २ वर आले. याआधी दोनदा सिगरेट सोडायचा अयशस्वी प्रयत्न केला होता. पहिल्या वेळी ७-८ महिने आणि दुसऱ्या वेळी आठवडाभर ? सिगरेट सोडली होती. सिगरेट सोडायची इच्छा तर प्रबळ होती. आंजावर शोध घेतला असता जे काही उपाय मिळाले ते खुपच हास्यास्पद होते. आधी एखादी तारिख नक्की करा, आजूबाजूच्या मित्रांना हे सांगा, तंबाखूविरहित सिगरेट प्या, इतर पर्याय शोधा वैगरे. याने काहीही होत नाही.
इथे एक घाव दोन तुकडे हेच योग्य आहे. मी सिगरेट सोडली ती अचानकपणे, आधी न ठरवता वैगरे. उद्यापासुन सिगरेट बंद असे मनाशीच ठरवले. त्यावेळी सुदैवाने उन्हाळ्याचे दिवस होते. सिगरेट प्यायची तलफ आली कि अर्धा लिटर थंड पाणी प्यायचो. पोटात गार पाणी गेल्यामुळे अर्धा तास सिगरेट प्यावीशी वाटायची नाही. परत अर्ध्या तासाने तलफ आली की पुन्हा अर्धा लिटर थंड पाणी. पहिल्या दिवशी ३ वेळा, दुसऱ्या दिवशी २ दा आणि तिसऱ्या दिवशी १ दा अर्धा लिटर थंड पाणी प्यायले. बस, सुटली माझी सिगरेट. नंतर कधीही सिगरेट प्यायलेली नाही. आज सव्वा वर्ष झाले. आधी दुपारी जेवण झाल्यावर, मित्रांबरोबर फुकणारा मी, आता मला आजूबाजूला कोणी फुकत असेल तरी त्या धुराने त्रास होतो.
दिवसाला एक पाकिट संपवणारे, आता सिगरेटच्या किंमती वाढल्यामुळे परवडत नाही म्हणुन, दिवसाला ८-१० कप चहा पिणारे लोक आजूबाजूला बघितले आहेत. सुदैवाने मला त्याची गरज भासली नाही.
वरती इतरांनी दिलेले सल्ले सुध्दा अवश्य विचारात घेता येतिल.

याच क्षेत्रात एका ग्रुपबरोबर थोडे काम करत असल्याने लिहित आहे.
तंबाखू आणि सिगरेट हे व्यसन तुमच्या डोक्यात असते.याचे उदाहरण सांगते.
आमचा एक जुना पेशंट आहे.गेली दहा वर्ष दिवसाला वीस पंचवीस सिगरेटी आणि तंबाखूचे व्यसन आहे.त्याला निरनिराळे पॅचेस,च्युइंगगम सगळे देऊन झाले.पण हा बाबा निरनिराळ्या कारणांनी रिलॅप्स व्हायचा. बायकोच आजारी,धंद्यातला ताण,कधी नुसतं दुकानात बसतो मग टाइमपास म्हणून गुटखा खातो काय काय कारणं.
मध्ये दात सुजलाय म्हणून आला.त्याच्या खालच्या छोट्या दाढेभोवती फ्लाॅवरच्या भाजीचे तुरे असतात तशी ग्रोथ दिसली.ताबडतोब बायप्सीला पाठवला.आणि बेक्कार असा स्क्वॅमस सेल कार्सिनोमा निघाला.तिथे डायग्नोज झाल्यावर चक्कर येऊन काय पडला.देव देव सुरु झाले.यच्चयावत पॅथीचे डाॅक्टर उपचाराला लागले.
नुकताच त्याचा जबडा काढला आहे.भेटायला आला तेव्हा सोबत त्याचा हेच सर्व करणारा भाऊ होता.त्याने याचे बघून सर्व व्यसन सोडले एका क्षणात.आता हात लावायची हिंमत नाही.
सांगायचा उद्देश असा की मूर्तिमंत भिती समोर उभी राहिल्यावर एका क्षणात व्यसन सुटले.
जरा टाटा कँसर हाॅस्पिटलच्या ओरल आणि लंग कँसर डिपार्टमेंटला भेट देऊन या.तंबाखू सिगरेट काय वाट्टोळे करते आयुष्याचे बघा.आपोआप व्यसन सुटेल.जमले तर एखाद्या गरजुचे बील भरुन या येता येता.अशा पाॅझिटिव्ह गोष्टी व्यसनमुक्तीला नक्की मदत करतात.

जिन्गल बेल's picture

24 Jun 2016 - 1:00 pm | जिन्गल बेल

__/\__
+1

महेश हतोळकर's picture

24 Jun 2016 - 1:29 pm | महेश हतोळकर

एक नं प्रतीसाद.
बाकी मला स्वतःला कसलेही व्यसन नाही (दारू, तंबाखू, सिगारेट इ.). पण आजवर व्यसन सुटलेले फक्त २ जण पाहिलेत कारण त्यांचीच इच्छा होती व्यसन सोडायची. त्यामुळे मनापासून तयारी असेल तरच व्यसन सुटते, नाही तर नाही हेच खरं.

रेवती's picture

24 Jun 2016 - 4:36 pm | रेवती

प्रतिसाद आवडला. खूपच व्यवहार्य आहे.

या विषयातील तज्ञ व्यक्तिंशी सल्लामसलत करून योग्य तो निर्णय घ्या. हाताची पाची बोटे सारखी नसतात त्यामुळे इथल्या एकाला लागू झालेला उपाय तुम्हाला लागू होईलच असे नाही. सतत वेगवेगळे उपाय करून ते वर्क आउट नाही झाले तर फ्रस्ट्रेशन यायची शक्यता जास्त. त्यापेक्षा व्यवस्थित स्वतःचे मूल्यमापन करून घेऊन तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली उपाय करने उत्तम. शुभेच्छा!

शाम भागवत's picture

24 Jun 2016 - 3:13 pm | शाम भागवत

हाताची पाची बोटे सारखी नसतात त्यामुळे इथल्या एकाला लागू झालेला उपाय तुम्हाला लागू होईलच असे नाही.

सहमत

गामा पैलवान's picture

24 Jun 2016 - 12:05 pm | गामा पैलवान

टफि,

विषय निघालाच आहे तर माझ्या व्यसनाची चित्तरकथा ऐकवतो.

इथे इंग्लंडमध्ये दुपारचं जेवण (=लंच) भारतातल्यासारखं भारदस्त नसतं. साधं स्यांडविच असतं. म्हणून सुरुवातीस इथे आलो तेव्हा दुपारचं जेवण झाल्यावर अर्धा लिटर कोक ढोसल्याखेरीज पोट भरलेलं वाटंत नसे. एके दिवशी कोकाकोलात कोकेन असतं असा लेख वाचनात आला आणि अस्मादिकांना व्यसन लागल्याची जाणीव झाली.

हे व्यसन तितकसं गंभीर नव्हतं. नकळत लागलं होतं. आणि आपल्याला व्यसन लागलं आहे याची गंधवार्ताही नव्हती. पण जेव्हा ध्यानी आलं तेव्हा ताबडतोब सोडलं. कसलीही अडचण आली नाही.

नंतर काही महिन्यांनी स्प्राईट प्यायचा नाद लागला. त्याची आंबटशी चव आवडू लागली. रोजचा अर्धा लिटरचा रतीब सुरू झाला. मात्र लंचच्या वेळेस हवा असा शरीराचा आग्रह नव्हता. याखेपेस देखील व्यसन लागल्याची जाणीव नव्हती. एके दिवशी बाटलीवरचं लेबल वाचत होतो. त्यात दिसलं की प्रॉडक्ट ऑफ कोका कोला अॅड कंपनी. मग काय, उरलेलं सांगायलाच पाहिजे का ! स्प्राईटला धुडकावून लावायला एक क्षण पुरेसा होता. पूर्वानुभव होताच ना पाठीशी ! ;-)

सांगायचा मुद्दा काये की शीतपेयांचंही व्यसन लागू शकतं.

आ.न.,
-गा.पै.

बोका-ए-आझम's picture

27 Jun 2016 - 9:46 pm | बोका-ए-आझम

तुम्हाला कॅफिन म्हणायचंय का? कारण ते असतं. एका कोकच्या कॅनमधून नक्कीच दीड कप काॅफीएवढं कॅफिन जात असणार पिणाऱ्याच्या शरीरात. कोकेन ही जरा अतिशयोक्ती वाटतेय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jun 2016 - 8:20 am | डॉ सुहास म्हात्रे

कोका कोलात इ स १९२९ पर्यंत कोकेन होते ! ...मात्र, आता ते नसते.

१८८५ च्या अधिकृत माहितीप्रमाणे कोका कोलात "कोकाची पाने आणि कोला नट्स" असे दोन "मेडिसिनल घटक" नोंदवलेले आहेत, पण त्यांचे प्रमाण नोंदवलेले नाही. कोका कोला हे नाव त्याच मूळ दोन घटकांवरून ठेवले होते.

कोकेन विरुद्ध तया होत असलेल्या जनमतामुळे १८९१ पासून कोकेनचे प्रमाण कमी करत ते अत्यंत कमी अंश (mere trace) इतके कमी केले गेले. अत्यंत कमी अंश म्हणजे नक्की किती ते गुलदस्त्यातच होते. मात्र, "कोका कोला" या "ट्रेड नेम" वरचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी कंपनीला कोकेनचा "ट्रेस" कायम ठेवणे जरूरीचे वाटले. १९०२ पर्यंत हा अंश दर द्रव औंसामागे १/४०० ग्रेन (१ ग्रेन = ०.०६४७९८९ ग्रॅम) इतका कमी केला गेला.

कोका कोला हे पेय १९२९ पासून संपूर्णपणे कोकेन-विरहित झाले आहे.

संदर्भ : http://www.snopes.com/cokelore/cocaine.asp

अप्पा जोगळेकर's picture

24 Jun 2016 - 12:08 pm | अप्पा जोगळेकर

तुम्हाला खरोखर व्यसन सोडायचे आहे की काहीतरी करुन स्वतःचा टीआर्पी वाढवायचा आहे ?
खरोखर सोडायचे असेल तर व्यसनमुक्ती केंद्रात जा.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

24 Jun 2016 - 12:30 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

ट्यार्पी वाढवायला मी राजकीय् धागे काढले असते,
आता व्यसन डोक्यावरुन जायला लागले आहे ,वर लिहिले तसे आरोग्याची काळजी आहेच,म्हणुन हा प्रपंच .प्रतिसादकर्त्यांचे आभार.

नेत्रेश's picture

24 Jun 2016 - 1:18 pm | नेत्रेश

व्यसन सोडायचे असेल तर एका क्षणात, आत्ताच्या आत्ता.

लगेचच जवळचा, इकडे तीकडे लपवलेला, सर्व मुद्देमाल (तंबाखु, सिगरेट, ईत्यादी) या क्षणी कचर्‍याच्या कुंडीत फेकुन या व परत त्याचा वीचार करु नका. अगदीच असह्य्य झाले तर ग्लास भर पाणी प्या. या पेक्षा जास्त काही विचार करु नका. आपल्याला कसले व्यसन होते ते विसरुन जा. विशय संपला

एखादा चांगला छंद लावून घ्या आणि तलफ आली की त्यात मन घाला.

दादा कोंडके's picture

24 Jun 2016 - 9:19 pm | दादा कोंडके

:)

अनुप ढेरे's picture

24 Jun 2016 - 1:37 pm | अनुप ढेरे

अजया यांचा प्रतिसाद आवडला. तोंडाच्या कँसर झालेल्यांचे फोटो बघून कपाळात येतात. सिगारेटच्या पाकिटांवर ८०% भाग व्यापणार्‍या चित्रांना सिगारेट कंपन्यांचा यासाठीच विरोध असतो. त्या फोटोंचा परिणाम होतोच.

शंतनु _०३१'s picture

24 Jun 2016 - 1:45 pm | शंतनु _०३१

एकदम बंद करा, तल्लफ , विथड्रॉवल सिम्प्टम हे सगळे मनाचे खेळ आहेत . स्वतः ठराव नि एकदम बंद करा.

जोपर्यंत आपल्या माणसाला आपल्या व्यसनाची कल्पना नसते तो पर्यंत आपल्या मनात व्यसनाविषयी अपराधी पणा ची भावना असते, ह्याच भीतीचा मला सिगारेट सोडायला उपयोग झाला

एकदा माझे महिन्याचे बजेट पुरते बोंबले होते, पुढचे १५ दिवस सिगारेट विना काढायचे ऐवजी आपण सिगारेट विकत घेऊ शकत नाही असा विचार करत होतो.
दिवसाच्या ४ गरम झटक्यात बंद झाल्या. वर काहीही त्रास झाला नाही. पण स्वतःशी प्रामाणिक राहाव लागत.
वोलेट मध्ये ( तिचा / पिल्लू) चा फोटो लावा जेणेकरून सिगारेट साठी पैसे काढताना त्यांचा विचार मनात येतील... !
जोपर्यंत आपल्या माणसाला आपल्या व्यसनाची कल्पना नसते तो पर्यंत आपल्या मनात व्यसनाविषयी अपराधी पणा ची भावना असते, हीच भीती चाही मला सिगारेट सोडायला उपयोग झाला

पी. के.'s picture

24 Jun 2016 - 2:38 pm | पी. के.

२००१ ते २०१६ पित होतो सिगारेट...
विश्वास नाय बसणार तुमचा पण लास्ट बजेट मध्ये दर वाढल्या पासून बंद केली सिगारेट.
आता पैसे वाचवून ITC चे शेअर घेतोय.

प्रसाद गोडबोले's picture

24 Jun 2016 - 2:57 pm | प्रसाद गोडबोले

गांजा प्या . सिगारेट वरील आसक्ती आपोआप कमी होईल !

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Jun 2016 - 3:17 pm | कैलासवासी सोन्याबापु

कॉमेंट पण तिसऱ्या चवथ्या चिलमीचा बार भरून ओढल्यावर सुचलेली दिसते :D

(कृ ह घ्या)

शाम भागवत's picture

24 Jun 2016 - 3:22 pm | शाम भागवत

तस झाल तर काही दिवसांनी "गांजाचा विळखा कसा सोडवावा??????" असा धागा येईल.

प्रसाद गोडबोले's picture

24 Jun 2016 - 4:26 pm | प्रसाद गोडबोले

"गांजाचा विळखा कसा सोडवावा?"

गांजा विळखा घालत नाही , उलट सगळ्याच बंधनातुन मुक्त करतो ! ब्रह्मानंदी लागली टाळे तेथे देहा कोण सांभाळी ह्या अवस्थेची प्राप्ती करण्याचा गांजा हा अत्यंत सुलभ उपाय आहे !!

सुबोध खरे's picture

27 Jun 2016 - 7:25 pm | सुबोध खरे

मार्कस ऑरेलियस साहेब
एकीकडे तुम्ही म्हणता आहेत की "गांजा हा निकोटिन पेक्षा कितीतरी सौम्य व्यसन आहे". तुम्ही त्याचा शास्त्राधार ही देता.
गांजा विळखा घालत नाही , उलट सगळ्याच बंधनातुन मुक्त करतो ! ब्रह्मानंदी लागली टाळे तेथे देहा कोण सांभाळी ह्या अवस्थेची प्राप्ती करण्याचा गांजा हा अत्यंत सुलभ उपाय आहे !!
आणि यावर कुणी तुम्हाला म्हणाले की हा प्रतिसाद गांजा पिऊन लिहिला असावा तर लगेच तुमचा अहं दुखावतो आणि तुम्ही वादात उतरता -- ते स्वमतांध दांभिकता वगैरे लिहिले( ते म्हणजे नक्की काय ते मला कळत नाही)अध्यात्म हाही माझा विषय नाही.
हे दुटप्पी वर्तन कशासाठी?
मला एक सांगा आपल्या म्हणण्याप्रमाणे जर गांजा हे "सौम्य" व्यसन आहे तर तुम्हाला एवढा संताप का आला?
बऱ्याच लोकांनी आपण तंबाखूचे व्यसन केले होते करीत होतो/ आहोत हे स्वच्छ पणे लिहिले पण कुणीही गांजाचे/ चरसचे व्यसन लिहिलेले नाही.
याचे कारण कळेल का?
याचा अर्थ असा आहे की सामान्य माणसाला गांजा हे एवढे साधे व्यसन नाही हे माहीत आहे
शास्त्रीय माहिती अर्धवट प्रमाणात सादर केली की काय होते याचे आपण दिलेले उत्तम उदाहरण आहे.
आपल्या गाडीचा चालक गांजा पिऊन गाडी चालवत असेल तर त्याला आपण नोकरीवर ठेवाल काय?
नाही.
कारण स्पष्ट आहे --
Specific Damages Associated with Marijuana Use

Dangers in the immediate effects of marijuana include distortions of time and space perceptions and impaired coordination, all of which may be contributing to the increased risk of traffic accidents recently discovered.

Particularly important for students to know about is the creation of difficulty thinking or problem solving and impairment of memory and learning. These difficulties can last for as long as four weeks after drug use.
गांजा पिऊन माणसाचे काळ आणि अवकाश याच्या आकलनशक्तीचे बारा वाजतात आणि माणसाचे मेंदू आणि स्नायू यांचे संतुलन राहत नाही. यामुळे नोकरीवर अशा माणसाला कोणी ठेवत नाही.
Marijuana changes the structure of sperm cells, deforming them. Thus even small amounts of marijuana can cause temporary sterility in men. Marijuana use can upset a woman’s menstrual cycle.
Marijuana smoke contains 50% to 70% more cancer-causing substances than tobacco smoke
आपल्या माहितीसाठी असे अनेक दुवे आहेत
http://www.drugfreeworld.org/drugfacts/marijuana/the-harmful-effects.html
गांजा/ चरस मुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वात बदल होतो आणि एखाद्या गंभीर समस्येला तोंड देण्याची त्याची क्षमता नक्कीच कमी होते.
(दुर्दैवाने अशी परिस्थिती नसल्याने तंबाखूच्या व्यसनाला लोक गंभीरपणे घेते नाहीत)
तेंव्हा साप म्हणू नये धाकला या उक्तीप्रमाणे गांजाचे व्यसन साधे मुळीच नाही त्यामुळे त्याचे उदात्तीकरण करू नका.
तेंव्हा गांजा हे सौम्य व्यसन आहे म्हणून उगाच कौतुक करू नका.
गांजा पिऊन प्रतिसाद दिला हे म्हटल्यावर आपल्या शेपटीवर पाय पडला याचा साधा अर्थ असा आहे की अंतर्मनात गांजा हे चांगले व्यसन नाही हे तुम्ही स्वतः स्वीकारलेले आहे. उगाच अध्यात्माचा मुलामा नको तिथे कशाला?

शाम भागवत's picture

27 Jun 2016 - 10:04 pm | शाम भागवत

@खरे साहेब
प्रतिसाद आवडला.

आनंदी गोपाळ's picture

27 Jun 2016 - 11:00 pm | आनंदी गोपाळ

जियो भाई. इस्कू बोल्ते पर्फेक्ट उत्तर. च्याय्ला आमच्यात इतका पेशन्स नाही सम(ज)वून सांगायचा.

प्रसाद गोडबोले's picture

28 Jun 2016 - 1:29 pm | प्रसाद गोडबोले

सर्वप्रथम सविस्तर प्रतिसाद आणी संविधानिक मार्गाने चर्चा करायला सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद :)

यावर कुणी तुम्हाला म्हणाले की हा प्रतिसाद गांजा पिऊन लिहिला असावा तर लगेच तुमचा अहं दुखावतो

आपण माझे प्रतिसाद नीट वाचलेले दिसत नाहीत . माझा मत असे आहे की जे काही बोलायचे आहे ते प्रतिसादा विषयी त्यातील मुद्द्यांविषयी बोलावे , प्रतिसाददात्याविषयी नये . " पाणी पिवुन प्रतिसाद लिहिला आहे" असे जरी लिहिले असते तरी ते खटकण्या सारखेच आहे . , दुसरी गोष्ट अहं दुखावण्याचा प्रश्न येत नाही , माझी मते माझ्या पाशी तुमची तुमच्या पाशी ! मी कोणालाही माझी मते मान्य करा असा आग्रह केलेला नाही , पण लेखन सोडुन लेखकावर टीका करणाची जी मनोवृत्ती मिपावर आलेली आहे तिला ठेचलेच पाहिजे ! ह्यात काहीही दुट्टप्पी वर्तन नाही !!

तुम्हाला एवढा संताप का आला?

प्रतिसाद आणी मुद्दा सोडुन तो प्रतिसाद कोणी दिला त्या व्यक्तीवर टीका करणे स्कोरसेटलिंग करणे हे प्रकार पाहुन संताप आला . "गांजा हे अत्यंत भयंकर व्यसन आहे , आणी तुम्ही करता तसे समर्थन अत्यंत्य निद्य आहे " असा प्रतिसाद सोन्याबापुंनी दिला असता तर मला अजिबात राग आला नसता कारण ते त्यांचे मत आहे , पण त्यांनी असा प्रतिसाद सोडुन माझ्यावर वैयक्तिक टीका केली जे माझ्या मते अत्यंत निद्य आहे !! असो ह्या विषयावर खाली सविस्तर चर्चा होवुन फायनल मत निघाले आहे :)

आपण दिलेले दोन्हीही सम्दर्भ हे एकक्कल्ली व्यसन निर्मुलन मोहीमेला वाहुन घेतल्या लोकांचे आहेत असे माझे मत आहे . आपण ग्यॅरंटी देता का की निर्व्यसनी माणुस हमखास ८०-९० वर्षे जगेल आणि वृधाप्यकाळाने मरेल ?
व्यसने करा अथवा नका करु , death ist upon thou !!

गांजाचे व्यसन साधे मुळीच नाही त्यामुळे त्याचे उदात्तीकरण करू नका , तेंव्हा गांजा हे सौम्य व्यसन आहे म्हणून उगाच कौतुक करू नका.

मला वाटते कि मला माझे मत मांडायचा अधिकार आहे , तुम्हाला माझे मत निन्द्य त्याज्य वाटत असेल तर आपण जरुर त्या मताचा निशेष आणि खंडन करावे ( अर्थातच व्यक्तिगत टीका न करता ). माझ्या मते हाच सुसंस्कृत प्रगल्भ समाजातील चर्चेचा मार्ग आहे . दुसर्‍याला त्याचे मत मांडुनच न देणे , किंव्वा मांडु नको असा हट्ट करणे हे काही मला तरी पटत नाही.
राहता राहिला प्रश्न उदात्ती करणाचा , मी इतके अध्यात्मिक लेख लिहिलेत , ते वाचुन कोणी देवा धर्माला लागल्याचे ऐकीवात नाही ( अर्थातच तशी अपेक्षाही नाही ) , मग एक दोन असले प्रतिसाद दिले तर समाज लगेच माझे मत ऐकुन गांजाडी बनेल असे आपणाला का वाटते ? ( अर्थातच अशी अपेक्षाही नाही ). इतके सीरीयसली घेत जाऊ नका माझे प्रतिसाद , लेख , मिपा आणी इन्जनरल आंतर्जाल/. बहुतांश लोकं इथे मनोरंजन करायला येतात आणि नेट बंद कि विषयही बंद करतात, हे सारे आभासी विष्व आहे अशी एकदा खुणगाठ मनाशी बांधली की जास्त त्रास होत नाही .

गांजा पिऊन प्रतिसाद दिला हे म्हटल्यावर आपल्या शेपटीवर पाय पडला याचा साधा अर्थ असा आहे की अंतर्मनात गांजा हे चांगले व्यसन नाही हे तुम्ही स्वतः स्वीकारलेले आहे. उगाच अध्यात्माचा मुलामा नको तिथे कशाला?

शेपटीवर पाय वगैरे काय ? व्यक्तिगत टिप्पण्णी मुळे मला धक्का बसला . व्यक्तिगत टिप्पणी मिपावरील चर्चा , काथ्याकुंटांना अनुकुल नाही असे माझे मत आहे बस्स इतकेच . आणि एकक्कल्ली स्वमतांधता ही गांजा सिगारेट दारु अशा सगळ्याच व्यसनांपेक्षा गंभीर मानसिक व्यसन आहे असे माझे मत आहे. मी लाईफ लिबर्टी आणि पर्स्युट ऑफ हॅप्पीनेस वर विश्वास ठेवणारा माणुस आहे , कोणाच्याही नॉन सेडिस्टीक वैयक्तीक आनंदाच्या आड येणाचा कोणालाही अधिकार नाही असे माझे स्पष्ट मत आहे ( अमेरिकेत कित्येक ठिकाणे आता गांजा डीक्रिमिनलाईझ , मिसडिमीनर होत आहे :) ).

बाकी अध्यात्माचा मुलामा वगैरे काहीही हां . व्यसने करा अथबा नका करु , मरणे अटळ आहे म्हणुनच म्हणालो की यावद्जीवं सुखं जीवेत . ऐश करा आणि करु द्या :)

कळावे.

सीझर मार्कस ऑरेलियस अ‍ॅन्टोनियस ऑगस्टस्
Vi Veri Veniversum Vivus Vici

बाळ सप्रे's picture

28 Jun 2016 - 6:46 pm | बाळ सप्रे

"गांजा हे अत्यंत भयंकर व्यसन आहे , आणी तुम्ही करता तसे समर्थन अत्यंत्य निद्य आहे " असा प्रतिसाद सोन्याबापुंनी दिला असता तर मला अजिबात राग आला नसता कारण ते त्यांचे मत आहे , पण त्यांनी असा प्रतिसाद सोडुन माझ्यावर वैयक्तिक टीका केली जे माझ्या मते अत्यंत निद्य आहे

स्वमतांध दांभिक म्हणणे ही कुठल्या मुद्द्यावर टीका झाली???

लोका सांगे ब्रह्मज्ञान....

प्रसाद गोडबोले's picture

29 Jun 2016 - 12:29 pm | प्रसाद गोडबोले

स्वमतांध दांभिक म्हणणे ही कुठल्या मुद्द्यावर टीका झाली???

बाळ , हुशार आहेस हां , स्वमतांध दांभिक हा उल्लेख नको आहे तर तुच दुसरा शब्द सुचव ना !!
जो माणुस स्वतःचाच मुद्द्यावर अडुन बसलाय , व दुसर्‍याला मत मांडायचाही अधिकार नाही असे म्हणतो त्याला काय म्हणावे ?

बाळ सप्रे's picture

29 Jun 2016 - 1:48 pm | बाळ सप्रे

दुसर्‍याला मत मांडायचाही अधिकार नाही असे म्हणतो त्याला काय म्हणावे ?

तुम्ही गांजा पिउन प्रतिसाद लिहिलाय असे म्हणणे म्हणजे "तुम्ही तुमचे मत मांडू नका" असा अर्थ कसा काय घेतलात बुवा?? तुम्हाला मत मांडण्यापासून कोणी अडवलय ???

आणि 'स्वमतांध दांभिक'ला प्रतिशब्द शोधून मुद्द्यावर प्रतिवाद होणार नाहीये. तो वैयक्तिक शेराच असेल.

प्रसाद गोडबोले's picture

29 Jun 2016 - 3:26 pm | प्रसाद गोडबोले

अरे बाळा ,

मुद्दा क्र. १ : तुला 'स्वमतांध दांभिक'ला प्रतिशब्द सापडलेला नाही हे स्पष्ट दिसुन येत आहे
मुद्दा क्र. २ : "तुम्ही तुमचे मत मांडू नका" अशा अर्थाचे किमान २ - ४ प्रतिसाद ह्या धाग्यावर आहेत , पण वाचले तर सापडतील ना , घाईघाईत स्कोर सेटल करायचे म्हणल्यावर कसे सापडतील बाळा . जरा चर्चा नीट वाच .
मुद्दा क्र. ३: तुम्ही गांजा पिउन प्रतिसाद लिहिलाय हा प्रतिसाद सरळ सरळ वैयक्तिक टीका झाली की जे सुध्दा अयोग्य आहे.
मुद्दा क्र. ४ तो वैयक्तिक शेराच असेल- असे जर तुम्ही म्हणत असाल तर परत सांगतो , जसास तसे उत्तर देणे ही सर्वमान्य नीती आहे , कोणी जर वैयक्तिक टीका करत असेल तर त्याने तशाच प्रतिसादाची अपेक्षा ठेवावी !

आता महत्वाचा मुद्दा : बाळा , तुला नक्की कशावर टीका करायची आहे ? मी जशास तसे उत्तर दिले त्यावर की गांजावर की मत मांडण्याच्या स्वातंत्र्यावर ?

बाळ सप्रे's picture

29 Jun 2016 - 3:39 pm | बाळ सप्रे

तुम्ही दुसर्‍याच्या प्रतिसादांवर वैयक्तिक प्रतिसाद म्हणून आरडाओरडा करता पण स्वतः देखिल स्वमतांध दांभिक अशा प्रकारचे शेरे मारून वैयक्तिक शेरेबाजीच करता. आणि हे सगळे करताना मूळ मुद्द्यांना सोयीस्कररीत्या बगल देता..

बाळ सप्रे's picture

29 Jun 2016 - 3:41 pm | बाळ सप्रे

"तुम्ही तुमचे मत मांडू नका" अशा अर्थाचे किमान २ - ४ प्रतिसाद ह्या धाग्यावर आहेत

आणि अशा अर्थाचा प्रतिसाद आढळला नाही.. तुम्ही ओढूनताणून तसा अर्थ लावता आणि 'वैयक्तिक शेरबाजी' असा आरडाओरडा करता..

प्रसाद गोडबोले's picture

29 Jun 2016 - 3:57 pm | प्रसाद गोडबोले

अशा अर्थाचा प्रतिसाद आढळला नाही.

अरे बाळा , सांगितले ना की स्कोर सेटलिंग करायचे म्हणुन प्रतिसाद देण्या आधी धागा चर्चा नीट वाच पाहु , पण तु काही ऐकतच नाहीस : आता हे दोन प्रतिसाद पहा पहा

गांजाचे व्यसन साधे मुळीच नाही त्यामुळे त्याचे उदात्तीकरण करू नका.
तेंव्हा गांजा हे सौम्य व्यसन आहे म्हणून उगाच कौतुक करू नका.

http://www.misalpav.com/comment/852061#comment-852061

त्यामुळे हे गांजा समर्थन वगैरे बालीशपणा आवरा आता.

http://www.misalpav.com/comment/851728#comment-851728

ह्या दोन्ही प्रतिसादात तुम्ही स्वतःचे मत मांडु नका अशा अर्थाची विधाने स्प्ष्ट लिहिलेले आहे !

जरा निवांत पणे वाच आणि मग चर्चेला ये हं !

तुम्ही दुसर्‍याच्या प्रतिसादांवर वैयक्तिक प्रतिसाद म्हणून आरडाओरडा करता पण स्वतः देखिल स्वमतांध दांभिक अशा प्रकारचे शेरे मारून वैयक्तिक शेरेबाजीच करता.

वैयक्तिक शेरेबाजीला उत्तर शेरेबाजीनेच दिले जाईल !

आणि हे सगळे करताना मूळ मुद्द्यांना सोयीस्कररीत्या बगल देता..

तुला मुद्दा अजुन कळालेलाच नाहीये रे बाळा . मुद्दा असा आहे की मी म्हणलो की गांजा प्या म्हणजे सिगारेट वरची आसक्ती कमी होईल. ज्याला पटतय त्याने स्विकारावे , पटत नाही त्याने नाकारावे , निन्द्य वाटते त्याने प्रतिसादावर टीका करावी , पण ज्याने प्रतिसाद दिला त्याच्यावर टीका कशाला ? तशी टीका केल्यास जशास तसेच उत्तर दिले पाहिजे !

आता तरी कळाला का मुद्दा ???

बाळ सप्रे's picture

29 Jun 2016 - 4:08 pm | बाळ सप्रे

आता तरी कळाला का मुद्दा

वैयक्तिक शेरा वगैरे शोधण्यात तुम्ही तुमच्या प्रतिसादात मुद्द्यावर (इतरांनी खोडून काढलेल्या तुमच्या मुद्द्यावर) कुठे भाष्य दिसतय का ते पहा..

प्रसाद गोडबोले's picture

29 Jun 2016 - 4:37 pm | प्रसाद गोडबोले

तुम्हाला हवे असलेले २ संदर्भ मिळाले ना ! ओके .

इतरांनी खोडून काढलेल्या तुमच्या मुद्द्यावर

परत सांगतो - गांजा प्या म्हणजे सिगारेटवरील आसक्ती कमी होईल हे माझे वैयक्तिक मत आहे , ते खोडुन वगैरे काढायचा प्रश्नच येत नाही , ज्यांना अमान्य आहे ते अमान्य म्हणतील माझी त्याला काहीही हरकत नाही कारण त्यांना त्यांची मते बाळगण्याचे पुर्ण स्वातंत्र्य आहे !!

धनंजय माने's picture

29 Jun 2016 - 4:49 pm | धनंजय माने

प्रतिसाद आवडला. विनोदी वाटला.
धाय मोकलुन हसलो. =))

प्रसाद गोडबोले's picture

29 Jun 2016 - 5:16 pm | प्रसाद गोडबोले

हुश्श , किमान एकाला तरी हसु आले =))))

अनुप ढेरे's picture

29 Jun 2016 - 4:57 pm | अनुप ढेरे

त्याचं काये की मिपावर जे नवखे नाहीत ते एनीवे तुम्हाला सिरियसली घेत नाहीत. पण काही नवखे बळी पडू शकतात. म्हणून डॉ. खर्‍यांनी तुमचा प्रतिवाद केला. त्याबद्दल त्यांच अभिनंदन! बाकी तुमची कुस्ती चालू द्या.

बाळ सप्रे's picture

29 Jun 2016 - 5:01 pm | बाळ सप्रे

एनीवे तुम्हाला सिरियसली घेत नाहीत

यावर वैयक्तिक हल्ला म्हणून तुमच्याशी कुस्ती होउ शकते गिर्जा/प्रगो/ऑरेलियस यांची :-)

प्रसाद गोडबोले's picture

29 Jun 2016 - 5:14 pm | प्रसाद गोडबोले

एनीवे तुम्हाला सिरियसली घेत नाहीत

अरे बाळा , लेखन न वाचता किती प्रतिसाद देणार आहस्स आनि किती वेळा तोंडावर पडणार आहेस ?

हे वाच मीच स्वतःच्या प्रतिसादात काय लिहिले आहे ते -

इतके सीरीयसली घेत जाऊ नका माझे प्रतिसाद , लेख , मिपा आणी इन्जनरल आंतर्जाल/. बहुतांश लोकं इथे मनोरंजन करायला येतात आणि नेट बंद कि विषयही बंद करतात, हे सारे आभासी विष्व आहे

http://www.misalpav.com/comment/852206#comment-852206

बाकी अनुप ह्यांच्या - नवखे लोक माझे प्रतिसाद वाचुन गांजाला बळी पडतील हा आशावाद ( की निराशावाद) आवडला गेला आहे ! लैच भारी !!

बाळ सप्रे's picture

29 Jun 2016 - 5:29 pm | बाळ सप्रे

तुम्ही सांगितल्यामुळे तुम्हाला लोक सिरीयसली घेत नाहीत ..

लोल :-))))

प्रसाद गोडबोले's picture

29 Jun 2016 - 5:41 pm | प्रसाद गोडबोले

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ !

फायनली पटले ना बाळा तुला की कुस्ती व्यक्तिगत टिप्पणीवर होती अन्य कशावर नाही ते !!

बाकी मिपा आणी सारेच अंतर्जाल हे आभासी विश्व आहे , ते जास्त सीरीयसली घेवु नये . मी सांगितले म्हणुन असेल किंव्वा अन्य कोणी सांगितले म्हणुन असेल त्याने काही फरक पडत नाही! !

कुणी सांगण्याचा फरक पडत नाहीच पण हे आभासी विश्व वगैरे असण्याबरोबर प्रतिसादांवरूनही लोक ठरवू शकतात कोणाला किती सिरीयसली घ्यायचं ते .. हेही लक्षात येतं की मुख्य मुद्दे संपले की 'वैयक्तिक शेरे' या मुद्द्यासाठी कसे मुद्दे शोधले जातात..

प्रसाद गोडबोले's picture

29 Jun 2016 - 6:34 pm | प्रसाद गोडबोले

उगी उगी हं बाळा !

तु काही धागा वाचायला तयार नाहीस , उगाचच प्रतिसाद पाडत सुटला आहेस , तुला कुठे सारखे शोधुन शोधुन संदर्ब्ह काढुन द्यायचे ! धाग्याव्र किमान २ दा "प्रतिसाददात्याने गांजाच्या चिलीम चे ४ बार लाऊन प्रतिसाद टंकले आहेत" अशी वैयक्तीक शेरेर्बाजी झालेली आहे आणि म्हणुनच इतका धुरळा उडाला होता, शिवाय कितीही चुकीचा मुद्दा मांडला तरी वैयक्तिक शेरेबाजी केली जाऊ नये ह्यावर एकमतही झाले आहे ! नीट लक्ष देवुन वाचलेस तर सापडेल ही !

लक्ष देवुन वाचं हं ...उगी उगी !

बाळ सप्रे's picture

29 Jun 2016 - 6:59 pm | बाळ सप्रे

हा हा हा हा ..
सगळं वाचलं.. तुम्हीही लिंका पुरवल्यात.. त्यामुळे .. यू आर प्रूव्हींग माय पॉइंट... तुम्हाला त्या शेरेबाजीवरच केवळ आरडाओरडा करण्यात जास्त रस आहे.. मूळ तुमचा मुद्दा (प्रो गांजा) निकालात निघाल्याने त्यावर बोलण्यासारखे काही राहीलेले नाही..

शिवाय कितीही चुकीचा मुद्दा मांडला तरी वैयक्तिक शेरेबाजी केली जाऊ नये

असे म्हणूनही 'त्यानी आधी शेरेबाजी केली म्हणून मी' असं म्हणत स्वतः देखिल तेच चालू ठेवताय..

प्रसाद गोडबोले's picture

29 Jun 2016 - 7:06 pm | प्रसाद गोडबोले

. मूळ तुमचा मुद्दा (प्रो गांजा) निकालात निघाल्याने त्यावर बोलण्यासारखे काही राहीलेले नाही..

अरे बाळा - गांजा प्या म्हणजे सिगारेटवरील आसक्ती कमी होईल हा मुद्दा नाही , ते वैयक्तिक मत आहे आणि म्हणुनच ते खोडुन काढायचा प्रश्नच येत नाही असे वरच लिहिले आहे की !!

असे म्हणूनही 'त्यानी आधी शेरेबाजी केली म्हणून मी' असं म्हणत स्वतः देखिल तेच चालू ठेवताय..

जशास तसेच उत्तर दिले जाईल ह्यावर आम्ही ठाम आहोत ! ज्यांनी वैयक्तिक शेरेबाजी थांबवली त्यांचाशी चर्चा थांबली आहे !

बाळ सप्रे's picture

30 Jun 2016 - 10:58 am | बाळ सप्रे

त्यांचाशी चर्चा थांबली आहे

शेरेबाजीवर चिकाटीने मते मांडताना मूळ मुद्द्यावर चर्चा थांबवली आहे हे वाचून अंमळ मौज वाटली..
म्हणजे गांजागौरवार्थ अध्यात्मिक मुद्दे अजून आहेत तर ;-)

प्रसाद गोडबोले's picture

30 Jun 2016 - 1:13 pm | प्रसाद गोडबोले

उगी उगी हं बाळा

सुबोध खरे's picture

28 Jun 2016 - 7:47 pm | सुबोध खरे

@मार्कस ऑरेलियस
टिपिकल गोल प्रतिसाद
सर्व प्रथम आपला " गांजा प्या . सिगारेट वरील आसक्ती आपोआप कमी होईल !" हा प्रतिसाद अस्थानी होता.
आपल्या एखाद्या अध्यात्माच्या धाग्यावर जर गंभीर चर्चा चालू असताना कुणी जर हे सर्व थोतांड आहे धर्म ही अफूची गोळी आहे. चार पैशाची अफू खा-- देव,परमेश्वर सर्वांचे विराट दर्शन होईल असा प्रतिसाद टाकला असता तर आपला जळफळाट झाला असता.
यानंतर आपण शास्त्रीय आधार देत गांजा कसा "साजूक" आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. यावर मी आपले शास्त्रीय विवेचन अर्धवट आहे हे दाखवल्यावर आता प्रतिसादात शास्त्रीय आधाराचे नाव न काढता मानभावीपणे फक्त "लेखन सोडुन लेखकावर टीका करणाची जी मनोवृत्ती मिपावर आलेली आहे तिला ठेचलेच पाहिजे ! ह्यात काहीही दुट्टप्पी वर्तन नाही !! " असे म्हणून नमुद्द्याचा कात्रज करण्याचा प्रयत्न करता आहात.
निदान चूक झाली ती मान्य करण्याचा बापूसाहेबांचा प्रामाणिकपणा आपण दाखवला असतात पण नाही. "जितं मया" हेच म्हणणे.
शेवटी आपण ग्यॅरंटी देता का की निर्व्यसनी माणुस हमखास ८०-९० वर्षे जगेल आणि वृधाप्यकाळाने मरेल ?हे मला आव्हान कशासाठी देता?
गॅरंटी आपल्याला आपल्या स्वतःच्या देहाबद्दल देता येईल का? मग मी त्रयस्थ माणसाच्या बद्दल का आणि कशी गॅरंटी देणार? केवळ आपला मुद्दाच बरोबर आहे हे सिद्ध करायला हा तिसराच मुद्दा घुसडत आहेत आणि वर "चर्चा" करण्याचा आव आणता आहात?
गांजा प्यायल्यामुळे पायाला गॅंगरिन झालेले किती रुग्ण आपण पाहिले आहेत? "गांजेकसा" ना समाजात काय किंमत मिळते हे तर सर्वाना माहीत आहे
हे सर्व यावद जिवेत सुखं जिवेत मध्ये एक तर जिवंत राहायला पाहिजे आणि ते सुद्धा सुखाने जगले पाहिजे
ऋणे कृत्वा -- यात गांजा पिणार्याला कर्ज ही कोण देणार?
उगाच अमेरिकेत डीक्रिमिनलाईझ , मिसडिमीनर होत आहेत हा आव कशासाठी? तेथे तर बंदूकच काय पण मशीनगन पण ठेवणे हा कायदेशीर अधिकार आहे? उगाच समर्थन करण्यासाठी अमेरिकेची शेंडी कशासाठी धरता?
सर्वात मूळ मुद्दा या प्रकरणात हा आहे की लोक गंभीर चर्चा करत असताना " गांजा प्या . सिगारेट वरील आसक्ती आपोआप कमी होईल !"हा अस्थानी प्रतिसाद टाकण्याची आपली वृत्ती. काही झालं तरी माफी मागणार नाही हा दंभ आणि वर त्याचे समर्थन करायला स्वमतांध दांभिकता इ मोठे मोठे शब्दांचे डोंगर आणि मग त्यावर असे शब्दांचे अवडंबर रचून शास्त्रीय आधार, अमेरिकेची भलामण वगैरे करून मीच बरोबर कसा हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न.
असो
आपल्याला अजून काही सांगावे ही माझी लायकी मुळातच नव्हती किंवा नाही.
इति लेखन सीमा.

प्रसाद गोडबोले's picture

29 Jun 2016 - 12:26 pm | प्रसाद गोडबोले

" गांजा प्या . सिगारेट वरील आसक्ती आपोआप कमी होईल !"

हेच हेच ते ! तुम्ही सेन्सॉरिंग का करता ? प्रत्येकाला स्वतःचे मत मांडायचा अधिकार आहे आहेच्च !

सर्वात मूळ मुद्दा या प्रकरणात हा आहे की लोक गंभीर चर्चा करत असताना " गांजा प्या . सिगारेट वरील आसक्ती आपोआप कमी होईल !"हा अस्थानी प्रतिसाद टाकण्याची आपली वृत्ती. काही झालं तरी माफी मागणार नाही हा दंभ आणि वर त्याचे समर्थन करायला स्वमतांध दांभिकता इ मोठे मोठे शब्दांचे डोंगर आणि मग त्यावर असे शब्दांचे अवडंबर रचून शास्त्रीय आधार, अमेरिकेची भलामण वगैरे करून मीच बरोबर कसा हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न.

आणि एकदा का तुम्ही हे मत बनवले की तुम्हाला दुसरे मत मान्य होणे अशक्यच आहे , किमान दुसर्‍याच्या मत स्वातंत्र्याचा आदर करा , असे म्हणत होतो पण तेही तुम्हाला जमत नाहीये . न जमो . तुम्ही तुमचे मत बाळगायला आणि मांडायला जसे मोकळे आहात तसेच मीही आहे . आता हे तुम्ही मान्य करा अथवा नका करु !!

इति लेखन सीमा.

हेच जर आधी म्हणाला असतात की "तुमचे मत चुकीचे आहे आणि निंद्य आहे , बस्स इति लेखन सीमा ", तर इतके वाद विवाद करायची गरजच पडली नसती !!

सुबोध खरे's picture

29 Jun 2016 - 1:40 pm | सुबोध खरे

परत तेच
मीच बरोबर.
जितं मया.
हे सोडून दिले असते हो पण गांजाचे व्यसन तितके धोकादायक नाही हा संदेश गेला असता म्हणून हा प्रपंच.
बाकी आपल्या मताशी मला काही घेणे देणं नाही.

प्रसाद गोडबोले's picture

29 Jun 2016 - 3:21 pm | प्रसाद गोडबोले

बाकी आपल्या मताशी मला काही घेणे देणं नाही.

हेच सांगायचा प्रयत्न करतोय की आपल्या मताशी मला काही घेणे देणं नाही हे आधी म्हणाला असत्तात तर इतका वाद विवाद झाला नसता.

तुम्ही तुमचे मत मांडायला स्वतंत्र आहात , अन मी माझे मत मांडायला स्वतंत्र आहे !!

धनंजय माने's picture

28 Jun 2016 - 7:56 pm | धनंजय माने

प्रगो, नक्की काय गोंधळ होतोय समजत नाही. पण अत्युच्च पातळीवर चे विरोधाभासी प्रतिसाद आपल्याकडून येत असतात.
ओशो पकडणार असाल तर रामदास तुकाराम यांना सोडा. कारण ओशो काय सांगतो ते भुलावं असं असलं तरी त्यातून हाती काही लागेल याबाबत संशय आहे. नुसते शाब्दिक बुडबुडे आहेत. उगाच 'संक्षि'प्त काहीतरी गोलमाल करण्यात पॉइंट नाही.

प्रसाद गोडबोले's picture

29 Jun 2016 - 12:31 pm | प्रसाद गोडबोले

ओशो काय सांगतो ते भुलावं असं असलं तरी त्यातून हाती काही लागेल याबाबत संशय आहे.

अमान्य असले तरीही आपल्या मताचा आदर आहे , तुम्हाला तुमची मते बाळगण्याचे पुरण स्वातंत्र्य आहे आणि मलाही !!
पण आपण जर आपल्या मताची सक्ती करत असाल , अन दुसर्‍याला मत मांदुनच देणार नसाल तर तर ते हास्यास्पद आहे !!

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

24 Jun 2016 - 4:45 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

@ मार्कस ,इथे एकजण मदद मागत असताना तुम्ही गांजाचे समर्थन का करत आहात,कृपया असे प्रतिसाद टाळावेत.

प्रसाद गोडबोले's picture

24 Jun 2016 - 5:07 pm | प्रसाद गोडबोले

अहो सिंथेटिक फिलॉसॉफर राव , तुम्ही पण जोशी आहात काय ? अभ्यास न करता उगाचच काहीही विधाने करुन असे सारखे सारखे किती वेळा तोडावर पडणार ?

सर्वप्रथम हा चार्ट पहा सोशल हार्म व्स पर्सनल हार्म
गांजा हा निकोटिन पेक्षा कितीतरी सौम्य व्यसन आहे !!!
a

शिवाय आमच्या गुरुदेवांनीही काय सांगुन ठेवले आहे हेच आम्ही सांगत आहोत :

असो.
काळजी घ्या.

आनंदी गोपाळ's picture

24 Jun 2016 - 7:25 pm | आनंदी गोपाळ

सौम्य आहेच, शिवाय गांजा-भांग व तत्सम पदार्थ 'अध्यात्मिक' उन्नती/साक्षात्कार्/चमत्कार वगैरे घडवून आणणारे आहेत, तेव्हा अ‍ॅबसोल्यूटली समर्थनीय.

प्रसाद गोडबोले's picture

24 Jun 2016 - 8:14 pm | प्रसाद गोडबोले

'अध्यात्मिक' उन्नती/साक्षात्कार्/चमत्कार

करेक्ट.
देऊळ चित्रपटामधील एक अप्रतिम वाक्य आठवले-" आपण म्हणजे काळाच्या पटलावरील एक ठिपका आहोत ठिपका !"
आपले अस्तित्व इवलेसे आहे, आपल्या असण्या नसण्याने , कर्म करण्याने की न करण्याने, जगाला काहीही शष्प फरक पडत नाही,
हे उपजे आणि नाशे । तें मायावशें दिसे ।
एर्‍हवीं तत्त्वता वस्तु जें असे । तें अविनाशचि ॥ १०५ ॥

गांजाचा ह्या अनुभवाप्रत पोहचायला उपयोग होतो आणि एकदा का ही अवस्था प्राप्त झाली की व्यसन असे काही रहातच नाही ~~

धनंजय माने's picture

24 Jun 2016 - 8:44 pm | धनंजय माने

हे सीरियसली लिहिलंय?

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Jun 2016 - 9:10 pm | कैलासवासी सोन्याबापु

किमान गांजा पिऊन तरी लिहिलं असेल असं वाटतं भैबा

धनंजय माने's picture

24 Jun 2016 - 10:06 pm | धनंजय माने

उ पढने के बाद हम ही चक्कर खा गया ससुरा!

प्रसाद गोडबोले's picture

26 Jun 2016 - 12:48 pm | प्रसाद गोडबोले

सोन्याबापु ,

धनंजय माने हा बहुतेक आमच्या एका जुन्या मित्राचा डु आय डी आहे , हे एकदा कन्फर्म झाले की त्यांना सविस्तर उत्तर देवु.

पण तुमच्यासारख्या स्वमतांध एककल्ली लोकांची कीव वाटते. पण त्यात तुमचा दोष नाही, ही मनोवृत्ती फार जुनी आहे. ह्या मनोवृत्तेने व्यसनांपेक्षा जास्त नुकसान केले आहे जगाचे.

स्वामी विवेकानंदांनीही असल्या एककल्ली लोकांशी भेट झाल्याचा उल्लेख त्यांच्या प्रवचनात करुन ठेवला आहे आहे.
( सम्दर्भ : कर्मयोग प्रवचने : परोपकार म्हणजे स्वतःवरच उपकार : पान क्र. ७६-७९)

असो.
स्वमतांधतेला इलाज नाही !

धनंजय माने's picture

26 Jun 2016 - 3:09 pm | धनंजय माने

मित्राचा ड्यू आयडी वगैरे बरोबर आहे.
मुद्दा हा आहे की आपल्याला कुठल्याही पातळीवर असलो तरी चुकीचे समर्थन करता येत नाही/येणार नाही.

मी अनेकदा चुकलो असलो तरी त्या चुकीचे समर्थन करणं हे चूक आहे आणि जे लार्जर स्केल वर आणि नैतिक दृष्ट्या योग्य आहे तेच समोर मांडले गेले पाहिजे.
सर्वसामान्यांना जे पचेल रुचेल आणि किमान रूढ़ पायवाट न सोडता जे करता येईल ते करणं हेच सांगितलं गेलं पाहिजे.
आपण दासबोध वाचता, सिद्ध झाला म्हणून साधना कराविशी न वाटणं, स्वैर वागणं अज्जीबात अपेक्षित आणि स्विकारार्ह नाही हे आपल्याला ठाऊक असेलच.

जर गांजा खाऊ शकत असाल तर इतर अनेक नको ते पदार्थ (ज्याची मोठी यादि होऊ शकते) ते खायला काय प्रत्यवाय? तेही खावं.