Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चित्रगुप्त on Mon, 06/20/2016 - 16:40
लेखनविषय (Tags)
वावर
संस्कृती
कला
धर्म
इतिहास
समाज
जीवनमान
राहणी
प्रवास
देशांतर
शिक्षण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आस्वाद
लेख
अनुभव
माहिती
विरंगुळा
. वरील चित्रः फोंतेनब्लो प्रासाद आणि संग्रहलय. संग्रहालये बघण्याची माझी आवड फार जुनी. म्हणजे अगदी वयाच्या पाचव्या -सहाव्या वर्षी सालारजंग म्युझियम बघितले, त्याची मनावर अमिट छाप पडली. पुढे शाळकरी वयात इंदुरातल्या म्युझियममध्ये जवळ जवळ रोजच जाऊ लागलो. (त्या काळातील आठवणी इथे वाचा) शिवाय मुंबईचे प्रिन्स ऑफ वेल्स अधून मधून बघायला मिळायचे. बडोद्यातली म्युझियमे बघून तर अगदी खुळावलो, आणि पुढे आपण नोकरी केलीच तर ती एकाद्या म्युझीयममधेच करायची असे वाटू लागले. या सर्व संग्रहालयात असलेली पाश्चात्य निसर्गचित्रे आणि संगमरवरी मूर्ती तेंव्हा मला फार आवडत. १९१६९ पासून इंदुरच्या आर्ट्स्कुलात शिकू लागल्यावर अनेक पाश्चात्त्य कलावंत ठाऊक झाले, आणि त्यांची मूळ चित्रे बघण्याची आस लागली. मध्ये अनेक वर्षे उलटली. दिल्लीतल्या (अलिकडेच जळून भस्मसात झालेल्या) नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये दहा वर्षे चित्रकार म्हणून नोकरी केली, नंतर अमेरिकन एम्बसीत प्रदर्शन अधिकारी म्हणून बराच काळ काम केले, त्यामुळे 'म्युझियम' या विषयाची बरीच माहिती झाली. या काळात जिथेही जाईन तिथली म्युझीयमे बघण्याचा छंद जोपासला. १९८४ साली तीन महिने अमेरिकेतली संग्रहालये बघणे आणि त्यात काम करणे हे घडून आले. नंतरच्या अमेरिका प्रवासांमधेही बरीच संग्रहालये बघितली. अलिकडे गेली आठ- नऊ वर्षे पॅरिस मधील अनेक संग्रहालये, रोम मधील व्हॅटिकन आणि अन्य म्युझीयमे बघण्याचा योग आला. अनेक फोटो काढून जमा झाले, परंतु त्यावर काही लिहीण्याचे मात्र जमले नाही. अलिकडेच प्रचेतस यांनी सुचवल्यावर हा उपद्व्याप करण्याचे ठरवले. पॅरिस मधील अनेक संग्रहालये ज्या इमारतींमधे आहेत, त्या इमारती म्हणजे एकेकाळचे वैभवशाली राजप्रासाद आहेत आणि ते सुंदर उद्यानांनी वेढलेले आहेत. विविध काळी विविध राजांनी आपापली भर घातल्याने काही शतकांनंतर त्यांना आजचे स्वरूप लाभलेले आहे. हा सर्व इतिहास जाणून घेत त्या इमारतींचे अवलोकन करणे हा सुद्धा एक आनंददायक अनुभव आहे. असो. नमनाला घडाभर तेल झाल्यावर आता प्रत्यक्ष विषयाला हात घालतो. १. फॉन्तेनब्लो (Fontainbleau ) : पॅरिसपासून अंतर ५५ किमी फ्रान्सच्या इतिहासातील अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार असलेला हा राजप्रासाद हा आठ शतके फ्रान्सच्या विविध राजे लोकांचे निवासस्थान राहिलेला आहे. १२ व्या शतकात या ठिकाणी एक किल्ला होता. या भागात घनदाट जंगल आणि भरपूर पाण्याचे झरे असल्याने फ्रेंच राजघराण्यातील लोक शिकारीसाठी इथे येऊन रहात.(यातील 'ब्लो' नामक झऱ्यावरूनच 'फॉन्तेनब्लो' हे नाव पडले ) फ्रांसचा राजा फ्रँक्वा-१ अथवा फ्रांसिस -१ (1494-1547) हा कलेचा आश्रयदाता असून याने प्राख्यात चित्रकार लिओनार्दो द विंची याला इटलीतून पाचारण केले. (त्यावेळीच लिओनार्दोने 'मोनालिसा' हे चित्र आपल्याबरोबर फ्रान्सला आणले) याच राजाने नवीनच शोध लागलेल्या अमेरिका खंडात फ्रेंच वसाहती स्थापन केल्या. राजा फ्रँक्वाचे तात्कालीन चित्रः . या राजाने तात्कालीन इटालियन रेनासां शैलीत एक नवीन प्रासाद बांधण्याचे काम ल ब्रेतों (Gilles Le Breton) या वास्तुविदावर सोपवले. इ.स. १५२८ च्या सुमारास या प्रासादातील राजाच्या निवासकक्षापासून प्रार्थनागृहापर्यंत पहुचणारी एक गॅलरी बांधण्यात आली. त्यासाठी इटालीतून खास वास्तुविद आणि चित्र-मूर्तीकार बोलावण्यात आले. १५३३ ते १५३९ या काळात उठावाच्या मूर्ती आणि सपाट चित्रे यांच्या संगमातून सजावटीचे काम पूर्ण झाले. या शैलीला 'फाँतेन्ब्लो स्कूल' असे नाव पडले. इटालियन रेनासां शैलीची फ्रान्समधील ही प्रारंभिक चित्रे आहेत. फ़्रेंक्वा-१ ची गॅलरी, त्यातील उठावाच्या मूर्ती आणि चित्रे: . . . प्रार्थनागृह (चॅपेल) . १५४० मध्ये प्रासादाभिवती विस्तीर्ण उद्यान बनवले गेले : . फ्रान्सिसच्या मृत्युनंतर हेन्री -२ आणि राणी कॅथेरीन द मेदिची यांनी घोड्याच्या नालेच्या आकाराचा जिना बनवला: . . (वरील दोन चित्रे जालावरून साभार) १५५२ चे सुमारास खालील दालनांवरील गच्चीवर भिंती, उंच खिडक्या, कलाकुसरयुक्त छत आणि कलात्मक सजावट केलेले नृत्यदालन (बॉलरूम ) बनवण्यात आले. या दालनाच्या एका टोकाला भव्य अग्निस्थान ( fireplace ) तर दुसर्‍या टोकाला नृत्याचे वेळी गायक-वादकांना बसण्याची गॅलरी आहे. नृत्यकक्षात प्रशांत आणि मी: . अग्निस्थान: . गायक-वादकांना बसण्याची गॅलरी: . या प्रासादात एकूण सुमारे १५०० दालने आहेत, अर्थात आपल्याला त्यापैकी फारच थोडी बघायला मिळतात. या दालनांखेरीज इथे नेपोलियन म्युझियम, चिनी वस्तुंचे संग्रहालय, नाट्यगृह अशा अनेक प्रेक्षणीय जागा आहेत. प्रासादाभोवती विस्तीर्ण उद्यान आहे. सर्वत्र जुनी चित्रे आणि संगमरवरी मूर्ती यांची रेलचेल आहे. राण्यांचे शयनकक्ष : . शाही जिन्यातील सजावटः . प्रासादातील काही शिल्पे: ..... ... लहानपणी वाचनात आलेल्या 'त्रिस्तनी राजकन्या' नामक एक गोष्टीची आठवण वरील बघून शिल्प आली. मदुराईच्या मीनाक्षी मंदिरातही असे शिल्प आहे, ते या निमित्तने आठवले. नेपोलियनचे सिंहासन आणि पलंग: ... नेपोलियन संग्रहालयातील काही वस्तू: नेपोलियनच्या बाळाचा पाळणा: . नेपोलियनच्या पिस्तुली: . नेपोलियनचा तंबू: . प्रासादाभोवतालीच्या उद्यानातील शिल्पे: . ... ... प्रासादाजवळचे तळे: . चौदाव्या लुईच्या काळात तळ्यात बनवलेला मंडपः . ही लेखमाला लिहिण्यास उद्युक्त करण्याबद्दल प्रचेतस यांना अनेक आभार. पुढील भागात पॅरिसच्या आणखी एकाद्या राजप्रासादाची सफर करूया. ----------------------------------------------------------------------------- फाँतेनब्लो विषयी काही उपयुक्त दुवे: http://www.musee-chateau-fontainebleau.fr/The-Park?lang=en https://en.wikipedia.org/wiki/Palace_of_Fontainebleau http://chateaudefontainebleau.fr/spip.php?page=sommaire&lang=en (क्रमशः)
  • Log in or register to post comments
  • 25169 views

प्रतिक्रिया

Submitted by तिमा on Mon, 06/20/2016 - 17:26

Permalink

उत्तम

एका संग्राह्य, उत्तम लेखमालिकेला सुरवात. सर्व छायाचित्रे आवडली.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 06/20/2016 - 17:37

Permalink

जबरदस्त लेखमाला चित्रगुप्तजी.

जबरदस्त लेखमाला चित्रगुप्तजी. एका मुरब्बी चित्रकाराच्या नजरेतून पाहिलेले हे संग्रहालय खरोखरी डोळे दिपवणारेच आहे. शाही जिन्यातल्या सजावटीखालील तुमचा फोटो अप्रतिम आलाय हो अगदी. सर्वच फोटो आवडले. आपणासोबत आमचे प्रशांतमालक पाहून नवल वाटले (म्हणजे प्यारिसात ते असतात बर्‍याचदा पण म्युझियममध्ये म्हणजे.....)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 06/20/2016 - 18:38

Permalink

छान !

आपली आवड़ आणि त्या निमित्ताने केलेली भटकंती आवडली. चित्र छान. त्रिस्तनी शिल्प महाराष्ट्रात कुठे आहेत का ? वल्ली सांगेलच. बाकी, शिल्प, प्रसाद, राजवाड़े, यांची छायाचित्र सुंदरच. प्रचेतस यांनी आपल्याला लिहायला उद्युक्त केल्याबदल त्यांचेही आभार. पुलेशु. अवांतर : आपला आणि प्रशांतचा फोटोही आवडला. प्रशांतला पॅरिस मधलं काय काय दाखवलं, सांगायला विसरु नका. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 06/20/2016 - 18:42

In reply to छान ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

त्रिस्तनी शिल्प

त्रिस्तनी शिल्प महाराष्ट्राततरी मी कुठे पाहिले नाही. मीनाक्षी देवी साउथ इंडियन. तिचेच असे शिल्प असते. जन्मजात ती त्रिस्तनी. तिला योग्य असा नवरा मिळाल्यावर जादाचा एक स्तन गळून जाइल असे काहीसे वरदान तिला असते अशी कथा वाचली होती पूर्वी.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 06/20/2016 - 18:39

Permalink

ह्या विषयावर लिहिते

ह्या विषयावर लिहिते झाल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद. सालारजंगमधलं व्हेल्ड रिबेकाचं संगमरवरी शिल्प अतिशय आवडीचं. केवळ तेव्हढं बघण्यासाठीच तिथं जावं. फोंतेनब्लो प्रासाद, तिथली चित्रं, तिथली शिल्पं खूपच सुंदर. सौष्ठव खूपच खुलवतात हे इटालियन शिल्पकार. नेपोलियनचे सिंहासन अगदीच साधे आणि लहानसे वाटले. पलंग मात्र अगदी राजेशाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on Tue, 06/21/2016 - 20:05

In reply to ह्या विषयावर लिहिते by प्रचेतस

Permalink

नेपोलियनचे सिंहासन अगदीच साधे

नेपोलियनचे सिंहासन अगदीच साधे आणि लहानसे वाटले. पलंग मात्र अगदी राजेशाही. अगदी हेच मनात आले माझ्या. ते सिंहासन बघून असे वाटले की एव्हढा मोठ्ठा राजा, भव्य प्रासाद आणि सिंहासन फारच साधे. तसच हे पण मनात आल की शिवाजी महाराजांच सिंहासन (वाचलेल्या वर्णनावरून) केव्हढं भव्य आणि शाही असेल. आपल्या राज्यकर्त्यांचा सर्व ठेवा आपल्याला जतन करून ठेवता आला असता तर किती नवीन गोष्टी कळल्या असत्या आपल्याला. बाकी लेख सुंदरच लिहिलाय. आणि बाकिच्यांनी म्हणल्याप्रमाणे चित्रकाराच्या नजरेतून कलाकृतींविषयी अजून थोडं सविस्तर वाचायला आवडेल. ते पुढील लेखांमधे येऊद्या. (शिल्पप्रेमी) सई
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Mon, 06/20/2016 - 18:54

Permalink

चित्र आणि शिल्प

यात काही कळत नसलं तरी जाणकार माणसाचं बोट धरून भ्रमंती करायला नेहमीच मजा येते. चित्रगुप्तकाकांबरोबर तशीच मजा येणार आहे याची खात्री आहे. पुभाप्र!
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Mon, 06/20/2016 - 19:12

Permalink

शिल्प चित्र व वाडे

शिल्प चित्र व वाडे या बरोबरच युरोपमधे अनेक जागी कारंजी बागा व पुषकर्णी यांची रेलचेल आहे..त्यातील एक फोन्तेनब्लो आपण स्वतः पाहिले व आपले प्रशांत यानाही दाखविले. आता मिपाच्या भाषेत ते काय इनो का काय त्याची बाधा झाली. फ्रान्स मधील अन्य अशाच जागा पाहिल्या असल्यास आम्हाला लेखातून का होईना तिथे जाता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Mon, 06/20/2016 - 20:53

Permalink

पहिल्या भागापासूनच ही लेखमाला

पहिल्या भागापासूनच ही लेखमाला जबरदस्त होणार याची खात्री झालीय. सुरेख! पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 06/21/2016 - 00:39

Permalink

अप्रतिम चित्रांनी भरलेला

अप्रतिम चित्रांनी भरलेला माहितीपूर्ण लेख ! अर्थात चित्रगुप्त संग्रहालयांवर लिहिताहेत म्हटल्यावर हे सर्व अपेक्षित होतेच. एका भन्नाट मालिकेची सुंदर सुरुवात ! पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Tue, 06/21/2016 - 08:21

Permalink

अगदी आवडत्या विषयावरची

अगदी आवडत्या विषयावरची लेखमालिका. वाखु साठवत आहे.चित्र आणि शिल्पांबद्दल अजून वाचायला आवडेल. पुभाप्र
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 06/21/2016 - 10:18

Permalink

एका आवडत्या विषयावरची मस्त लेखमाला....

पहिलाच भाग मस्त.... पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रन्गि पाउस on Tue, 06/21/2016 - 12:01

Permalink

एक गुप्त कट्टा

गेल्या वर्षी चित्रगुप्त काकांबरोबर Cathedrale Notre Dame आणि लूव्र एका चित्रकाराच्या नजरेतून बघितले ...आणि तो एक अविस्मरणीय अनुभव आहे .... मोनालिसा सोडून काहीही माहित नसलेले आम्ही (मी व माझे २ मित्र) त्या (गुप्त) कट्ट्या नंतर २ दिवस फक्त चित्रगुप्त काका आणि लूव्र ची त्यांची जानकारी ह्यावर बोलत होतो ...
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Tue, 06/21/2016 - 12:23

Permalink

सुरेख..

उत्तम माहिती आणि मस्त फोटो, या लेखमालेत लुव्र येईलच, मात्र पुढे रोम, व्हॅटिकन बद्दलही स्वतंत्रपणे लिहावे ही विनंती. पुढील लेखांच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Tue, 06/21/2016 - 12:26

Permalink

वा

खूप छान विषय आहे, तुमची माहिती पण छान. तरीही चित्रकाराच्या नजरेतून अजून आस्वाद असायला हवा होता. आणि शैली अधिक विस्ताराने हवी, अशी विनंती करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Tue, 06/21/2016 - 12:45

Permalink

सगळ काही अगम्य व अदभूत वाटत.

सगळ काही अगम्य व अदभूत वाटत.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 06/21/2016 - 14:17

Permalink

थोडासाच

पुण्यसंचय असल्याने राजा,नालजिना आणि शिल्पी दिसली. बाकी मालीका पुढे पुढे रोचक होत जाणार हे नक्की. दर्दी माणसाकडून बारकावेच सम्जत नाहीत तर बघण्याची दृष्टी मिळते हे नुलकर काका आणि लेणी महंताकडून अनुभवले आहे. वाचक नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Tue, 06/21/2016 - 15:59

Permalink

सुरेख

लेख आवडला. छायाचित्रं आणि सोबतची माहितीही खास. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Tue, 06/21/2016 - 16:04

Permalink

नव्या मालिकेचे स्वागत. पहिल

नव्या मालिकेचे स्वागत. पहिल भाग सुरेख झालाय. फोटू पाहून मन भरले! छतांवरचं काम नुसतं पहात रहावं. दोनदा प्यारीसला जाऊनही असले कांही पाहिले नाही, पुढे ठाऊक नाही. त्यामुळे अश्याच छान ठिकाणांचा परिचय करून द्यावा ही विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Tue, 06/21/2016 - 19:14

Permalink

लेख आणि चित्रे दोन्ही आवडले.

लेख आणि चित्रे दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Wed, 06/22/2016 - 12:06

Permalink

अतिशय सुंदर परीचय.

सर्व फोटो अप्रतिम. त्याकाळात किती असंख्य कलाकार या सुंदर कलाकृतीं घडवण्यासाठी राबले असतील.युरोपात हे सगळे खूप चांगल्या रितीने जतन केले आहे. मागे उरळी कांचनजवळील भुलेश्वर मंदीर पहावयास गेलो होतो. एव्ह्ढया अप्रतिम मुर्ती, पण तुटलेल्या अवस्थेत पाहून वाईट वाटले. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

Submitted by इशा१२३ on Wed, 06/22/2016 - 14:02

Permalink

वाखु साठवली.अप्रतिम फोटो आणि

वाखु साठवली.अप्रतिम फोटो आणि रोचक माहिती. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by इशा१२३ on Wed, 06/22/2016 - 14:02

Permalink

वाखु साठवली.अप्रतिम फोटो आणि

वाखु साठवली.अप्रतिम फोटो आणि रोचक माहिती. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by इशा१२३ on Wed, 06/22/2016 - 14:02

Permalink

वाखु साठवली.अप्रतिम फोटो आणि

वाखु साठवली.अप्रतिम फोटो आणि रोचक माहिती. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Wed, 06/22/2016 - 21:56

Permalink

सुंदर.

सुंदर.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 06/22/2016 - 22:15

Permalink

वा!

सुंदर! हे फोटो म्हणजे डोळ्यांना मेजवानी आहे अगदी! त्यात तुम्ही इतके सुरेख वर्णन केलंय की क्या कहने!
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on गुरुवार, 06/23/2016 - 23:07

Permalink

फार छान वाचतो आहे पुभाप्र

फार छान वाचतो आहे पुभाप्र
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on गुरुवार, 06/23/2016 - 23:07

Permalink

फार छान वाचतो आहे पुभाप्र

फार छान वाचतो आहे पुभाप्र
  • Log in or register to post comments

Submitted by उल्का on गुरुवार, 06/23/2016 - 23:26

Permalink

खूप छान!

अप्रतिम फोटो आहेत सर्व. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by साधा मुलगा on Sat, 06/25/2016 - 19:42

Permalink

सुंदर आणि अप्रतिम! पॅरिस शहर

सुंदर आणि अप्रतिम! पॅरिस शहर आणि आजूबाजूचा परिसर याबबत माहिती घ्यायला आवडेल. मागे पेठकरकाकांचा आणि आणखी एका ताईंचा/ काकूंचा या शहराच्या सफरी विषयी लेख वाचला होता. पुढील भागाच्या प्रतीक्षेत!
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on गुरुवार, 11/18/2021 - 20:45

In reply to सुंदर आणि अप्रतिम! पॅरिस शहर by साधा मुलगा

Permalink

@ साधा मुलगा: पॅरिस शहर आणि आजूबाजूचा परिसर याबाबत

@ साधा मुलगा: पॅरिस शहर आणि आजूबाजूचा परिसर याबाबत लिहीण्याचे राहून गेले होते, ते आता हाती घेण्याचा विचार आहे. पुढील एक-दीड महिना मी रोज या परिसरात भटकंती करणार असल्याने आता ते जमण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 06/25/2016 - 19:49

Permalink

सुंदर! वाखु साठवलीय.

सुंदर! वाखु साठवलीय.
  • Log in or register to post comments

Submitted by निशाचर on Sat, 06/25/2016 - 20:24

Permalink

सुंदर फोटो!

पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 08/25/2016 - 11:05

Permalink

मजा येणार.

शिल्प आणि तैलचित्र मनाला फार लुभावतात. चित्रकलेचे तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे चित्रकाराच्या नजरेतून शिल्पाचे विश्लेषण करणे, रसग्रहण करणे जमत नाही. पण शिल्पाचे, तैलचित्राचे तपशिल पाहताना कलाकाराच्या कलेने थक्क व्हायला होतं. हि लेखमाला आमच्या रसिक मनाला शिल्पाची माहिती, इतिहास इत्यादी साज चढवून आनंदाची उधळण करणार ह्यात शंका नाही. शुभेच्छा..!
  • Log in or register to post comments

Submitted by नारायणी on Fri, 05/05/2017 - 21:43

Permalink

फोटोस दिसत नाहीत.

मला बरेच्से फोटो दिसत नाहीत. मी क्रोम वापरत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Fri, 11/03/2017 - 22:59

Permalink

दिसत आहेत का फोटो ?

मला बरेच्से फोटो दिसत नाहीत. मी क्रोम वापरत आहे.
आता दिसत आहेत का फोटो ?
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com