वरील चित्रः फोंतेनब्लो प्रासाद आणि संग्रहलय.
संग्रहालये बघण्याची माझी आवड फार जुनी. म्हणजे अगदी वयाच्या पाचव्या -सहाव्या वर्षी सालारजंग म्युझियम बघितले, त्याची मनावर अमिट छाप पडली.
पुढे शाळकरी वयात इंदुरातल्या म्युझियममध्ये जवळ जवळ रोजच जाऊ लागलो. (त्या काळातील आठवणी इथे वाचा) शिवाय मुंबईचे प्रिन्स ऑफ वेल्स अधून मधून बघायला मिळायचे. बडोद्यातली म्युझियमे बघून तर अगदी खुळावलो, आणि पुढे आपण नोकरी केलीच तर ती एकाद्या म्युझीयममधेच करायची असे वाटू लागले. या सर्व संग्रहालयात असलेली पाश्चात्य निसर्गचित्रे आणि संगमरवरी मूर्ती तेंव्हा मला फार आवडत. १९१६९ पासून इंदुरच्या आर्ट्स्कुलात शिकू लागल्यावर अनेक पाश्चात्त्य कलावंत ठाऊक झाले, आणि त्यांची मूळ चित्रे बघण्याची आस लागली.
मध्ये अनेक वर्षे उलटली. दिल्लीतल्या (अलिकडेच जळून भस्मसात झालेल्या) नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये दहा वर्षे चित्रकार म्हणून नोकरी केली, नंतर अमेरिकन एम्बसीत प्रदर्शन अधिकारी म्हणून बराच काळ काम केले, त्यामुळे 'म्युझियम' या विषयाची बरीच माहिती झाली. या काळात जिथेही जाईन तिथली म्युझीयमे बघण्याचा छंद जोपासला. १९८४ साली तीन महिने अमेरिकेतली संग्रहालये बघणे आणि त्यात काम करणे हे घडून आले. नंतरच्या अमेरिका प्रवासांमधेही बरीच संग्रहालये बघितली.
अलिकडे गेली आठ- नऊ वर्षे पॅरिस मधील अनेक संग्रहालये, रोम मधील व्हॅटिकन आणि अन्य म्युझीयमे बघण्याचा योग आला. अनेक फोटो काढून जमा झाले, परंतु त्यावर काही लिहीण्याचे मात्र जमले नाही. अलिकडेच प्रचेतस यांनी सुचवल्यावर हा उपद्व्याप करण्याचे ठरवले.
पॅरिस मधील अनेक संग्रहालये ज्या इमारतींमधे आहेत, त्या इमारती म्हणजे एकेकाळचे वैभवशाली राजप्रासाद आहेत आणि ते सुंदर उद्यानांनी वेढलेले आहेत. विविध काळी विविध राजांनी आपापली भर घातल्याने काही शतकांनंतर त्यांना आजचे स्वरूप लाभलेले आहे. हा सर्व इतिहास जाणून घेत त्या इमारतींचे अवलोकन करणे हा सुद्धा एक आनंददायक अनुभव आहे. असो. नमनाला घडाभर तेल झाल्यावर आता प्रत्यक्ष विषयाला हात घालतो.
१. फॉन्तेनब्लो (Fontainbleau ) : पॅरिसपासून अंतर ५५ किमी
फ्रान्सच्या इतिहासातील अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार असलेला हा राजप्रासाद हा आठ शतके फ्रान्सच्या विविध राजे लोकांचे निवासस्थान राहिलेला आहे. १२ व्या शतकात या ठिकाणी एक किल्ला होता. या भागात घनदाट जंगल आणि भरपूर पाण्याचे झरे असल्याने फ्रेंच राजघराण्यातील लोक शिकारीसाठी इथे येऊन रहात.(यातील 'ब्लो' नामक झऱ्यावरूनच 'फॉन्तेनब्लो' हे नाव पडले ) फ्रांसचा राजा फ्रँक्वा-१ अथवा फ्रांसिस -१ (1494-1547) हा कलेचा आश्रयदाता असून याने प्राख्यात चित्रकार लिओनार्दो द विंची याला इटलीतून पाचारण केले. (त्यावेळीच लिओनार्दोने 'मोनालिसा' हे चित्र आपल्याबरोबर फ्रान्सला आणले) याच राजाने नवीनच शोध लागलेल्या अमेरिका खंडात फ्रेंच वसाहती स्थापन केल्या.
राजा फ्रँक्वाचे तात्कालीन चित्रः
या राजाने तात्कालीन इटालियन रेनासां शैलीत एक नवीन प्रासाद बांधण्याचे काम ल ब्रेतों (Gilles Le Breton) या वास्तुविदावर सोपवले. इ.स. १५२८ च्या सुमारास या प्रासादातील राजाच्या निवासकक्षापासून प्रार्थनागृहापर्यंत पहुचणारी एक गॅलरी बांधण्यात आली. त्यासाठी इटालीतून खास वास्तुविद आणि चित्र-मूर्तीकार बोलावण्यात आले. १५३३ ते १५३९ या काळात उठावाच्या मूर्ती आणि सपाट चित्रे यांच्या संगमातून सजावटीचे काम पूर्ण झाले. या शैलीला 'फाँतेन्ब्लो स्कूल' असे नाव पडले. इटालियन रेनासां शैलीची फ्रान्समधील ही प्रारंभिक चित्रे आहेत.
फ़्रेंक्वा-१ ची गॅलरी, त्यातील उठावाच्या मूर्ती आणि चित्रे:
प्रार्थनागृह (चॅपेल)
१५४० मध्ये प्रासादाभिवती विस्तीर्ण उद्यान बनवले गेले :
फ्रान्सिसच्या मृत्युनंतर हेन्री -२ आणि राणी कॅथेरीन द मेदिची यांनी घोड्याच्या नालेच्या आकाराचा जिना बनवला:
(वरील दोन चित्रे जालावरून साभार)
१५५२ चे सुमारास खालील दालनांवरील गच्चीवर भिंती, उंच खिडक्या, कलाकुसरयुक्त छत आणि कलात्मक सजावट केलेले नृत्यदालन (बॉलरूम ) बनवण्यात आले. या दालनाच्या एका टोकाला भव्य अग्निस्थान ( fireplace ) तर दुसर्या टोकाला नृत्याचे वेळी गायक-वादकांना बसण्याची गॅलरी आहे.
नृत्यकक्षात प्रशांत आणि मी:
अग्निस्थान:
गायक-वादकांना बसण्याची गॅलरी:
या प्रासादात एकूण सुमारे १५०० दालने आहेत, अर्थात आपल्याला त्यापैकी फारच थोडी बघायला मिळतात. या दालनांखेरीज इथे नेपोलियन म्युझियम, चिनी वस्तुंचे संग्रहालय, नाट्यगृह अशा अनेक प्रेक्षणीय जागा आहेत. प्रासादाभोवती विस्तीर्ण उद्यान आहे. सर्वत्र जुनी चित्रे आणि संगमरवरी मूर्ती यांची रेलचेल आहे.
राण्यांचे शयनकक्ष :
शाही जिन्यातील सजावटः
प्रासादातील काही शिल्पे:
.
.
.
लहानपणी वाचनात आलेल्या 'त्रिस्तनी राजकन्या' नामक एक गोष्टीची आठवण वरील बघून शिल्प आली. मदुराईच्या मीनाक्षी मंदिरातही असे शिल्प आहे, ते या निमित्तने आठवले.
नेपोलियनचे सिंहासन आणि पलंग:
.
नेपोलियन संग्रहालयातील काही वस्तू:
नेपोलियनच्या बाळाचा पाळणा:
नेपोलियनच्या पिस्तुली:
नेपोलियनचा तंबू:
प्रासादाभोवतालीच्या उद्यानातील शिल्पे:
.
.
प्रासादाजवळचे तळे:
चौदाव्या लुईच्या काळात तळ्यात बनवलेला मंडपः
ही लेखमाला लिहिण्यास उद्युक्त करण्याबद्दल प्रचेतस यांना अनेक आभार.
पुढील भागात पॅरिसच्या आणखी एकाद्या राजप्रासादाची सफर करूया.
-----------------------------------------------------------------------------
फाँतेनब्लो विषयी काही उपयुक्त दुवे:
http://www.musee-chateau-fontainebleau.fr/The-Park?lang=en
https://en.wikipedia.org/wiki/Palace_of_Fontainebleau
http://chateaudefontainebleau.fr/spip.php?page=sommaire&lang=en
(क्रमशः)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
25211
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम
जबरदस्त लेखमाला चित्रगुप्तजी.
छान !
त्रिस्तनी शिल्प
In reply to छान ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ह्या विषयावर लिहिते
नेपोलियनचे सिंहासन अगदीच साधे
In reply to ह्या विषयावर लिहिते by प्रचेतस
नेपोलियनचे सिंहासन अगदीच साधे आणि लहानसे वाटले. पलंग मात्र अगदी राजेशाही.अगदी हेच मनात आले माझ्या. ते सिंहासन बघून असे वाटले की एव्हढा मोठ्ठा राजा, भव्य प्रासाद आणि सिंहासन फारच साधे. तसच हे पण मनात आल की शिवाजी महाराजांच सिंहासन (वाचलेल्या वर्णनावरून) केव्हढं भव्य आणि शाही असेल. आपल्या राज्यकर्त्यांचा सर्व ठेवा आपल्याला जतन करून ठेवता आला असता तर किती नवीन गोष्टी कळल्या असत्या आपल्याला. बाकी लेख सुंदरच लिहिलाय. आणि बाकिच्यांनी म्हणल्याप्रमाणे चित्रकाराच्या नजरेतून कलाकृतींविषयी अजून थोडं सविस्तर वाचायला आवडेल. ते पुढील लेखांमधे येऊद्या. (शिल्पप्रेमी) सईचित्र आणि शिल्प
शिल्प चित्र व वाडे
पहिल्या भागापासूनच ही लेखमाला
अप्रतिम चित्रांनी भरलेला
अगदी आवडत्या विषयावरची
एका आवडत्या विषयावरची मस्त लेखमाला....
एक गुप्त कट्टा
सुरेख..
वा
सगळ काही अगम्य व अदभूत वाटत.
थोडासाच
सुरेख
नव्या मालिकेचे स्वागत. पहिल
लेख आणि चित्रे दोन्ही आवडले.
अतिशय सुंदर परीचय.
वाखु साठवली.अप्रतिम फोटो आणि
वाखु साठवली.अप्रतिम फोटो आणि
वाखु साठवली.अप्रतिम फोटो आणि
सुंदर.
वा!
फार छान वाचतो आहे पुभाप्र
फार छान वाचतो आहे पुभाप्र
खूप छान!
सुंदर आणि अप्रतिम! पॅरिस शहर
@ साधा मुलगा: पॅरिस शहर आणि आजूबाजूचा परिसर याबाबत
In reply to सुंदर आणि अप्रतिम! पॅरिस शहर by साधा मुलगा
सुंदर! वाखु साठवलीय.
सुंदर फोटो!
मजा येणार.
फोटोस दिसत नाहीत.
दिसत आहेत का फोटो ?