✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मातृभूमीला 'माँ' म्हणण्याची गरज का?

व
विवेकपटाईत यांनी
Wed, 04/13/2016 - 21:20  ·  लेख
लेख
उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् वर्ष तत् भारतं नाम भारती यत्र संततिः समुद्राच्या उत्तरेला आणि हिमाद्रीच्या दक्षिणेतल्या भू भागाला भारत असे म्हणतात. या भारतभूमीची संतति इथे निवास करते. अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. हे लक्ष्मणा, सुवर्ण लंकेचा राजा बनण्यापेक्षा अयोध्येत भरताच्या अधीन सेवक राहणे अधिक रास्त कारण माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा हि महान आहे. पुरातन काळापासूनच आपण आपल्या भरत भूमीला आई म्हणतो. युरोपियन लोक हि देशाला पितृभूमी म्हणतात. एकदा का देशाला आपण माता /पिता मानले कि देशात बंधुत्वाचे वातावरण आपसूक निर्मित होते. जिथे सोख्य असेल तिथे शांती, आणि समृद्धी हि आलीच प्रकृतीने हिमालयापासून समृद्रापर्यंत एक विशिष्ट भूभागाची रचना केली आहे. या भू-भागात अनेक भाषा-भाषी, पंथ आणि जातींचे लोक राहतात. एकाच राजाचे राज्य नेहमीच या भूभागावर राहील, हे संभव नाही. सत्तेसाठी युद्ध हे अटळ आहेच. आपल्या देशात सत्ता बदलली तरी लोकांवर जास्त अत्याचार होत नव्हते. कारण लोकांमध्ये बंधुत्व भाव आहे. आपले ऋषी-मुनि दूरदर्शी होते. धर्म आणि जातीच्या नावाने संपूर्ण भरत भूमीत राहणार्या लोकांना सांस्कृतिक दृष्ट्या एक सूत्रात बांधणे शक्य नाही हे त्यांना माहित होते. प्रत्येकाला त्याचीच भाषा, जाती आणि पंथ श्रेष्ठ वाटतो. पण देशाच्या मातीप्रती लोकांच्या मनात आत्मीयता उत्पन्न करणे शक्य होते. आपल्या ऋषींनी हेच केले. सकाळी म्हणण्याचे श्लोक म्हणजे प्रात:स्मरणची रचना केली. लोकांच्या मनात देशाची माती आणि तिथे जन्मलेल्या महापुरुषांप्रती आदर भाव जागृत करणे हाच दूरदर्शी ऋषींचा उदेष्य हेतू होता. उदा: गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती. नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु. महेन्द्रो मलय: सह्ये देवतात्मा हिमालय:. ध्येयो रैवतको विन्ध्यो गिरिश्चारावलिस्तथा. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका. पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका. रोज सकाळी प्रात:स्मरण केल्याचा परिणाम, लोकांच्या मनावर नकळत होतोच. घरात नळाच्या पाण्याने किंवा गावात विहिरीच्या पाण्याने, स्नान करत असताना आपण देशातील सर्व नद्यांच्या पाण्याने आंघोळ करण्याचा आनंद घेतो. यमुनेच्या पाण्यात स्नान करताना माझ्या मनात कावेरी नदीत स्नान करण्याची इच्छा उत्पन्न होते. सर्व पर्वतांचे आणि नगरांचे दर्शन घेण्यासाठी यात्रेची इच्छा होणारच. भरतभूमी वर जन्म घेणार्या आपल्या पूर्वजांप्रती आपल्या मनात आदर आणि श्रद्धा निर्माण करण्याचे काम हि आपल्या ऋषींनी केले. भारतभूमीत जन्म घेणारी महान विभूती मग ती स्त्री असो वा पुरुष, त्यांची स्मृती नेहमी आपल्याला राहावी म्हणून त्यांना हि प्रात:स्मरणात स्थान दिले. आयुष्यभर संघर्ष करून आपले उद्दिष्ट साध्य करणार्या आपल्या ५ महान स्त्रियांचे आपण रोज प्रात: स्मरण करतो: अहल्या द्रोपदी सीता तारा मंदोदरी तथा. पंचकन्या स्मरेनित्यं महापातक नाशनम्. तसेच पुण्यश्लोको नलो राजा... ‘अश्वत्थामा बलिर्व्यासो... सारांश अश्यारीतीने पुरातन ऋषींनी आपल्या मनात या देशाच्या माती आणि पूर्वजांच्या प्रती आपल्या मनात आदर आणि भक्तीभाव उत्पन्न केला. आज आपण आपल्या पूर्वजांची पूजा करतोच मन देशाच्या मातीला ‘भारत माँ’ संबोधून तिची हि पूजा करतो. जेंव्हा देशाचे राजकीय दृष्ट्या शेकडों तुकडे झालेले होते, त्याच वेळी आदी शंकराचार्यांनी देशाच्या चारी भागात चार मठांची स्थापना केली. चार धाम यात्रेची सुरवात बहुधा आदी शंकराचार्यांमुळेच सुरु झाली असेल. शाक्त पंथीयांनी देशात विभिन्न भागात (पाकिस्तान सहित) ५२ शक्तीपीठांची स्थापना केली. शैवांनी देशात विभिन्न प्रांतात १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना केली. जवळपास सर्व हिंदू तीर्थ क्षेत्री जैनांनी सुद्धा आपली मंदिरे उभारली. गुरु गोविंद जर काही काळ आणिक जिवंत राहिले असते तर निश्चित कन्याकुमारीला हि एक गुरुद्वारा बांधला असता. असो. आज हि विभिन्न स्थानांवर भरणार्या कुंभ मेळ्यात देशातील सर्व ठिकाणाहून यात्रेकरू येतात, सर्व पंथीय साधू सन्यासी, यात्री एकत्र बसून चर्चा करतात. अश्यारितीने देशातील सर्वपंथांनी, या मातीप्रती लोकांचे प्रेम, श्रद्धा आणि आदरण निर्माण करण्यात महत्वाचे योगदान दिले आहेत. देशाला मातृभूमी किंवा आई मानण्याने, देशात राहणार्या लोकांमध्ये बंधुभाव निर्माण होतोच या शिवाय एक राजनीतिक सत्ता स्थापन करण्यात हि यश येते. आपल्या देश्यात शेकडों चक्रवर्ती झाले. एकदा दिल्ली काबीज केली कि संपूर्ण देशाची सत्ता सहज प्राप्त होत होते हे आपण इतिहासात पाहिलेच आहे. आत्ताचेच उदाहरण घ्या. देशाला स्वतंत्रता मिळण्याच्या वेळी देशात ६०० पेक्षा जास्त राजे-महाराजे होते. त्यातील अधिकांश राजा-महाराजांनी स्व:खुशीने आपल्या राज्यांचे भारतात विलीनीकरण केले. तेथील जनतेने हि विरोध केला नाही. कारण विभिन्न राज्यात राहणारी लोक या देशाला ‘भारत माँ’ म्हणून ओळखत होते. भारतमाते प्रती त्यांच्या मनात श्रद्धाभाव होता. इस्लाम मध्ये देशाला मातृभूमी मानण्याची अवधारणा नाही. पण धर्मावर आधारित बंधुभावाची अवधारणा आहे. त्यांच्या मनात आपल्या गैर इस्लामिक पूर्वजांप्रती सम्मानाची भावननेला हि स्थान नाही. तेथील जनतेला एकत्र ठेवण्याचा कुठलाच दुआ उरलेला नाही. एकाच देशात राहणारे लोक, एकच धर्म मानणारे, पंथ, कबीला, जातीच्या नावावर एका दुसर्याच्या विरुद्ध लढत आहे. कोण स्वकीय आणि कोण परीकीय हे कळण्याची बुद्धी हि त्यांच्यात उरलेली नाही. जे लोक त्यांच्या कबील्याचे किंवा पंथाचे नाही, त्यांची हत्या करण्यात त्यांना काहीच वाईट वाटत नाही आहे. मग लहान मुले असो किंवा स्त्रिया सर्वांचाच वध होतो. लाखोंच्या संख्येने लोकांना आपली जन्मभूमी सोडून शरणार्थी बनावे लागले आहे. ह्या देशांचा संपूर्ण विनाश झालेला आहे. एकच धर्म मानणारे बंधुभावाने राहू शकतात, हि अवधारणा फोल ठरली आहे. गेल्या शतकात दोन विश्व युद्ध इसाई धर्म मानणार्या युरोपियन देशांत झाले. नेपाल हिंदू धर्मावलंबी असला तरी भारताशी त्याचे संबंध चांगले नाही. इस्लामी देशांची परिस्थिती तर आपण पाहताच आहोत.. ज्या देशांत त्यांची पूर्वजांना सम्मान दिल्या जातो, तेथील परिस्थिती वेगळी आहे. इराणी लोक आज हि अग्निपूजक जाल, रुस्तम, सोहराब यांचे तराणे गातात, तिथे शांती आहे. ५००० पेक्षा जास्त द्वीपसमूह आणि भारताप्रमाणे भिन्न-भिन्न जनजातीय असलेल्या इंडोनेशियात लोक एकत्र राहतात. रामायण आणि महाभारतातल्या कथांनी आणि चीनी परंपररेनी तिथल्या लोकांना एकत्र जोडलेले आहे. मिस्त्रच्या लोकांना आपल्या पिरामिड आणि त्यांना बनविणार्या पूर्वजांवर गर्व आहे. नील नदी प्रती त्यांच्या मनात आदर भाव आहे. परंतु आजकाल इस्लामी कट्टरता त्यांच्या मनात त्यांच्या पूर्वजांप्रती अनादर निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचेच परिणाम आज मिस्त्रचे लोक भोगत आहेत. १९४७ मध्ये भारताच्या ज्या भागात इस्लाम मानणारे लोकांची संख्या जास्त होती, तो भूभाग देशापासून वेगळा झाला त्याचे कारण हेच. पण हे इथेच थांबणार नाही, देशाच्या मातीप्रती आदर नसल्यामुळे पाकिस्तानचे भविष्यात आणखीन हि तुकडे होण्याची संभावना नाकारता येत नाही. आज तिथे अराजकतेचे वातावरण आहे. बलूच, पठाण, पंजाबी, शिया, सुन्नी सर्वच दुसर्याला आपले शत्रू समजतात. जर इस्लामी जगात शांतता प्रस्थापित करायची असेल तर मातृभूमीला आईचे स्थान देण्याची अवधारणा इस्लाम मध्ये समाविष्ट करावी लागेल. अर्थात हे कार्य इस्लामी विद्वानांच करावे लागेल. एकदा देशाला आई म्हंटले कि त्या भूमीत जन्म घेणार्या सर्व पंथीय आणि जातीय लोकांविषयी बंधुत्व भाव आपसूक निर्माण होतो. लोक एका दुसर्याला जाणण्याचा प्रयत्न करतात. देशात शांती प्रतिस्थापित होते. आज आपल्या देशाला ‘भारत माता’ म्हणण्याचा विरोध काही अतिशहाणे पुरोगामी करीत आहे. एक तर त्यांना इतिहासाचे ज्ञान नाही. होणार तरी कसे? अंग्रेजानी देशावर राज्य करण्यासाठी ‘फूट डालो राज करो’ च्या नीतीचे अवलंबन केले होते. त्या साठी त्यांनी आपल्या पुरातन इतिहासालाच खोटे ठरविले. हेतू आपल्या पूर्वजांप्रती आपली श्रद्धा नष्ट करणे. एकदा लोकांच्या मनात ते वेगवेगळे आहेत, हि भावना रुजविली कि त्यांच्यात दुही माजविण्यात यश येतेच. त्याच साठी देवासुर संग्राम म्हणजे आर्य आणि द्रविडांचे युद्ध. असा इतिहास शिकवणे सुरु केले. आज देशाला स्वत्रंत होऊन हि ७० वर्षे झाली तरी हि आपल्याला पूर्वजांचा खरा इतिहास शिकविला जात नाही. अंग्रेजानी त्यांच्या स्वार्थासाठी तैयार केलेला खोटा इतिहास शिकून तैयार झालेले अतिशहाणे आपल्या भूमीला ‘माता’ कसे मानणार. भारत मातेच्या बर्बादीचे नारे लावणारे त्यांचे हिरो झालेले आहे. या विद्वानांना एवढे हि कळत नाही, एकदा भारत माते विषयी आपली श्रद्धा नष्ट झाली तर या मातीचे शंभर तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. मग लिबिया आणि इराक सारखी आपली गत व्हायला कितीस वेळ लागेल. हे टाळायचे असेल, तर उद्यापासूनच आपल्या मुला-बाळांना प्रात: स्मरणीय श्लोक शिकवा. आपल्या देशातील नद्या, पर्वत, पवित्र सरोवरे, पुरातन ऋषी-मुनि, राजा-महाराजा, बादशाह आपले सणवार त्यांच्या मागच्या कहाण्या इत्यादी बाबत माहिती दिली तरी चालेल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
32632 वाचन

💬 प्रतिसाद (184)

प्रतिक्रिया

लेख आवडला. विचार करण्यासारखा आहे.

राघवेंद्र
Wed, 04/13/2016 - 22:16 नवीन
लेख आवडला. विचार करण्यासारखा आहे.
  • Log in or register to post comments

हं

mugdhagode
Wed, 04/13/2016 - 22:45 नवीन
बाबुल मोरा नैहर छूटोही जाय . एका मुसलमान नबाबानेच लिहिले आहे ना ? राजेमहाराजानेअ‍ॅ आपलॅ राज्ये सुखाने व भक्तिभावाने दिली हाही असाच एक भ्रम . भक्ती होती तर एकीकरणाला ४७ साल का यावे लागले ?
  • Log in or register to post comments

कुणीच सुखाने गादी त्याग करीत

विवेकपटाईत
गुरुवार, 04/14/2016 - 14:05 नवीन
कुणीच सुखाने गादी त्याग करीत नसतो. पण जनतेची इच्छा त्यांना माहित असते. शिवाय दिल्लीवर एक सम्राट बसणार होता बसणार होता.(आजच्या भाषेत लोकशाहीचा). शिवाय सांस्कृतिक दृश्या देश एकच होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

बहादूरशाह ची खंत

रमेश आठवले
गुरुवार, 04/14/2016 - 21:21 नवीन
बहादूरशाह हा शेवटचा मुगल राजा. त्याला पदच्युत करून ब्रिटीशांनी मंडाले,ब्रम्हदेश येथे कैदेत ठेवले होते व त्याचे तेथेच निधन झाले . तो जफर या टोपण नावाने शायरी करत असे. आपल्याला हिंदुस्तान मध्ये परत जाता येत नाही म्हणून खंत वाटून त्याने या पंक्ति लिहिल्या. कितना है बदनसीब जफर द्फ्न के लिये दो गज जमीन न मिली कु ए यार मे https://www.youtube.com/watch?v=_iPt023KdVQ या रफी साहेबांनी गायलेल्या गझल चे इंग्लिश भाषांतर तेथेच दिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

सारे जहाँ से अच्छा

तर्राट जोकर
Wed, 04/13/2016 - 23:07 नवीन
सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तान हमारा हम बुलबुले है इसकी ये गुलसिता हमारा ॥धृ॥ घुर्बत मे हो अगर हम रहता है दिल वतन मे समझो वही हमे भी दिल है जहाँ हमारा ॥१॥ परबत वो सब से ऊंचा हमसाय आसमाँ का वो संतरी हमारा वो पासबा हमारा ।२॥ गोदी मे खेलती है इसकी हजारो नदिया गुलशन है जिनके दम से रश्क-ए-जना हमारा ।३॥ ए अब रौद गंगा वो दिन है याद तुझको उतर तेरे किनारे जब कारवाँ हमारा ॥४॥ मझहब नही सिखाता आपस मे बैर रखना हिन्दवी है हम वतन है हिन्दोस्तान हमारा ॥५॥ युनान-ओ-मिस्र-ओ-रोमा सब मिल गये जहाँ से अब तक मगर है बांकी नामो-निशान हमारा ॥६॥ कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा ॥७॥ इक़्बाल कोइ मेहरम अपना नही जहाँ मे मालूम क्या किसी को दर्द-ए-निहा हमारा ॥८॥
  • Log in or register to post comments

स्वतंत्र पाकिस्तानच्या

मृत्युन्जय
गुरुवार, 04/14/2016 - 15:04 नवीन
स्वतंत्र पाकिस्तानच्या (मुस्लिम राष्ट्राच्या ) निर्मितीसाठी जोरदार चळवळ उभारणारे ते हेच इक्बाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अगदी अगदी, अचूक पकडलेत. जसे

तर्राट जोकर
गुरुवार, 04/14/2016 - 17:17 नवीन
अगदी अगदी, अचूक पकडलेत. जसे पाकिस्तानला ५५ कोटी देणारे गांधी, लेडी माउंटबॅटनशी लफडी करणारे नेहरु इत्यादी सिलेक्टीव असतं ना शिकवलेलं अगदी तसंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

काय बोलता? म्हणजे कवी इक्बाल

मृत्युन्जय
Sun, 04/17/2016 - 23:04 नवीन
काय बोलता? म्हणजे कवी इक्बाल यांणी मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी केलीच नव्हती की काय? काय पण हा असहिष्णु लोकांचा खोटा प्रसार ब्वॉ. तुम्ही माझे डोळेच उघडलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

मी असं कधी म्हटलं?

तर्राट जोकर
Sun, 04/17/2016 - 23:14 नवीन
मी असं कधी म्हटलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

म्हणजे स्वतंत्र पाकिस्तानच्या

मृत्युन्जय
Wed, 04/20/2016 - 18:06 नवीन
म्हणजे स्वतंत्र पाकिस्तानच्या (मुस्लिम राष्ट्राच्या ) निर्मितीसाठी जोरदार चळवळ उभारणारे ते हेच इक्बाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अगदी अगदी. आधीच तर सांगितले

तर्राट जोकर
Wed, 04/20/2016 - 18:13 नवीन
अगदी अगदी. आधीच तर सांगितले ना, 'हो' म्हणून. परत परत का विचारताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

काय झाले की ती गांधी

मृत्युन्जय
Wed, 04/20/2016 - 18:16 नवीन
काय झाले की ती गांधी नेहरुंच्या कथांची ठिगळे का लावली तेच कळाले नाही. त्यामुळे कन्फ्युझ झालो ना मी. तर मग स्वतंत्र पाकिस्तानच्या (मुस्लिम राष्ट्राच्या ) निर्मितीसाठी जोरदार चळवळ उभारणारे ते हेच इक्बाल हे स्पष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

मुस्लिम राष्ट्र, पण वर

तर्राट जोकर
Wed, 04/20/2016 - 20:08 नवीन
मुस्लिम राष्ट्र, पण वर धाग्याचा सूर असा आहे की मुस्लिम राष्ट्र-बिष्ट्र काय मानत नाहीत म्हणून? आता कन्फुझ व्हायची पाळी माझी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

आता कन्फुझ व्हायची पाळी माझी. ;)

ईश्वरसर्वसाक्षी
Wed, 04/20/2016 - 20:37 नवीन
बहुत देर से कम्फुज हुये हो सर :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

इफ ओन्ली यु कुड हॅव

तर्राट जोकर
Wed, 04/20/2016 - 20:43 नवीन
इफ ओन्ली यु कुड हॅव अंडरस्टॅन्ड इट. असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरसर्वसाक्षी

अहो म्हणुनच तसे म्हणालो ना

ईश्वरसर्वसाक्षी
Wed, 04/20/2016 - 20:58 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

माझा प्रश्न तसाच राहिला. पण

मृत्युन्जय
गुरुवार, 04/21/2016 - 17:31 नवीन
माझा प्रश्न तसाच राहिला. पण चला तुमचे कन्फुझन दुर करुयात: Tarana-e-Milli (Urdu: ترانۂ ملی‎) or Anthem of the Community is an enthusiastic poem in which Allama Mohammad Iqbal paid tribute to the Muslim Ummah (nation) and said that nationalism in Islam was not recommended. He recognized all Muslims anywhere in the world as part of a single nation,[1][2] whose leader is Muhammad,the prophet of the Muslims. Iqbal wrote the poem a few years after writing a poem written in the same meter and rhyme scheme call Tarana-e-Hindi (More commonly known as Sare Jahan Se Accha). In this time, Iqbal's world view had changed dramatically, Tarana-E-Hindi is a patriotic song that glorifies the land of Hindustan (Modern day India, Pakistan and Bangladesh) and the people who live in it; it also suggests that people should not divided by religion and should instead be bonded by a common national identity. Tarana-E-Milli, on the other hand, argues that a global, Islamic community should come above all and even warns against a nationalistic world view. This reflects the dramatic change in Iqbal's views, and his support for the Muslim League and the Pakistan Movement [1][2][3]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

तुमच्या प्रश्नाचे उत्तर

तर्राट जोकर
गुरुवार, 04/21/2016 - 18:18 नवीन
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले की तुम्हाला. तराना-ए-मिली आणि पाकिस्तान मागणारे हेच ते इक्बाल. पण माझे कन्फुझन दूर होत नाही हे इंग्रजीतले परिच्चेद वाचून. जर मुस्लिम हे राष्ट्र ही संकल्पना मानतच नाहीत तर पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र कसे काय झाले? जर सगळ्या जगातले मुस्लिम हे एकाच इस्लाम राष्ट्राचे नागरिक आहेत तर मग जी काही मुस्लिम राष्ट्रे आहेत त्यांच्यातल्या आपसी आंतरराष्ट्रीय संबंधांमधे व गैर-इस्लामिक राष्ट्रांच्या आपसी आंतरराष्ट्रीय संबंधांमधे ठळक वा छुपे वा क्षुद्र असे फरक दिसून येतात का? कोणत्याही देशातल्या मुस्लिमांना मुस्लिम राष्ट्रांमधे विनापासपोर्ट प्रवेश मिळतो? असेच उठून जाऊन नागरिकत्व घेता येते? आता गांधी-नेहरुची साईडस्टोरीचे कारणः मोठी माणसे आयुष्यात खूप गोष्टी करतात, कित्येकदा त्या परस्परविरोधीही असतात. समर्थक वा विरोधक त्यांना हवे ते निवडतात. खर्‍या खोट्या घटनांचे आधार घेऊन गांधी-नेहरुंचे पद्धतशीर चारित्र्यहनन करुन ही माणसे मोठी नाहीच हे सिद्ध करण्यात अनेक दशके खर्ची पाडली आहेत काहींनी. इक्बाल ह्यांनी तराना-ए-हिंद आणि इतरही हिंदू-मुस्लिम एकीच्या कविता लिहिल्यात हे काही लोक सोयिस्कर विसरवू पाहतात. कारण त्यांनी पाकिस्तानची मागणी केली. जेव्हा ह्या कविता लिहिल्या तेव्हाची सामाजिक-राजकिय परिस्थिती व पाकिस्तान मागणीच्या वेळची वेगळी. बरं पाकिस्तान मागणीच्या मागे बरीच कारणे आहेत. असो. आता प्रश्न पडतो की तराना-ए-हिंद व नया शिवाला त्यांनी का लिहिले असावे? तुमच्याकडे उत्तर असेल तर बघा. मग पुढे बोलू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

कसे हवे तेवढेच वाचता हो

मृत्युन्जय
Mon, 04/25/2016 - 15:46 नवीन
कसे हवे तेवढेच वाचता हो तुम्ही तजो. स्पष्त लिहिले आहे की मुस्लिम काही राष्ट्र वगैरे मानत नाहित. मुळात अधिष्ठान आहे ते धर्माचे. राष्ट्र वगैरे नंतर येते जर ते धर्माधिष्ठित असेल तर. म्ह्णजे जर मुस्लिम राष्ट्र अस्सेल तर "राष्ट्र"या संकल्पनेचा विचार होउ शकतो. भारत / जर्मनी वगैरे देशांमध्ये नाही. मूळ मुद्दा फक्त तेवढाच आहे. बाकी तुमचे इतर प्रश्न त्या मूळ मुद्द्याला अनुषंगुन नसल्याने उत्तर देण्याची तसदी घेत आहे. तुम्ही ज्या मुद्द्याला प्रतिवाद करण्यासाठी इक्बालची कविता दिली त्या मुद्द्याला इक्बालनेच जोरदार सुरुंग लावला आहे ते बघा जरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

धन्यु तजो हे काव्य इथे दिल्या

चौथा कोनाडा
गुरुवार, 04/14/2016 - 19:55 नवीन
धन्यु तजो हे काव्य इथे दिल्या बद्दल ! विख्यात सावरकर साहित्य अभ्यासक अन सावरकर वादी ह.भ.प. श्री वा. ना उत्पात यानी इक्बाल यांचे हे काव्य हिंदुस्थानच्या प्रेमाच्या पोटी लिहिण्या एवजी मालकी हक्काच्या भावनेने लिहिले आहे असे खळबळ्जनक विधान केले होते असे काही वर्षापुर्वी वृत्तपत्रात वाचल्याचे आठवते. कोणी माहितगार यावर प्रकाश टाकू शकेल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

मझहब नही सिखाता आपस मे बैर रखना

ईश्वरसर्वसाक्षी
Wed, 04/20/2016 - 18:27 नवीन
मझहब नही सिखाता आपस मे बैर रखना पण ह्याच मझहब चा आधार घेउन ह्यांनि आणि जिनांनी पाकिस्तान चि संकल्पना उचलुन धरलि, ति संकल्पना जि रहमत अलि चौधरि ह्या तरुणाने मांडलि होति. ईक्बाल साहब के शायरी के तो हम हमेशा कायल रहे है. इसि गझल का एक नुक्ता लेकिन हिंदोस्ता के नाम कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा ॥७॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

मझहब नही सिखाता आपस मे बैर

तर्राट जोकर
Wed, 04/13/2016 - 23:12 नवीन
मझहब नही सिखाता आपस मे बैर रखना हिन्दवी है हम वतन है हिन्दोस्तान हमारा ॥५॥ युनान-ओ-मिस्र-ओ-रोमा सब मिट गये जहाँ से अब तक मगर है बांकी नामो-निशान हमारा ॥६॥ कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा ॥७॥ ह्या ओळी देशभक्तिवर बौद्धिकं घेणार्‍यांनी विशेष लक्षात घेण्याच्या आहेत. बाकी हिंदू-मुस्लिम, भारत, देशप्रेम आणि इतिहास ह्याबद्दल स्वातंत्र्य लढ्यापासून चार हात दूर राहणार्‍यांनी न बोललेलंच बरं. एवढं बोलुन मी खाली बसतो. जय हिंद! (लेख काथ्याकूटात नाही हे ध्यानात आहे)
  • Log in or register to post comments

बाकी हिंदू-मुस्लिम, भारत,

मृत्युन्जय
गुरुवार, 04/14/2016 - 15:06 नवीन
बाकी हिंदू-मुस्लिम, भारत, देशप्रेम आणि इतिहास ह्याबद्दल स्वातंत्र्य लढ्यापासून चार हात दूर राहणार्‍यांनी न बोललेलंच बरं थोडक्यात म्हणजे १९४७ नंन्तर जन्मलेले सगळे याबद्दल काहिही भाष्य करण्यास नालायक असे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

आयत्या पिठावर रेघोट्या

तर्राट जोकर
गुरुवार, 04/14/2016 - 17:15 नवीन
आयत्या पिठावर रेघोट्या काढणार्‍यांबद्दल आहे हो ते. आणि तिथे लिहलंय स्पष्ट, स्वातंत्रय लढ्यापासून चार हात दूर राहणार्‍यांनी म्हणजे नक्कीच १९४७ नंतर जन्मलेल्यांबद्दल नाही हे आपल्यासारखे जाणकार नक्कीच ओळखू शकतात. जन्मायच्या आधीच चार हात दूर राहाय्ची कला कुणाला अवगत असेल तर सांगा, महोदय. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

स्वातंत्रय लढ्यापासून चार हात

मृत्युन्जय
Wed, 04/20/2016 - 18:38 नवीन
स्वातंत्रय लढ्यापासून चार हात दूर राहणार्‍यांनी पण स्वातंत्रय लढ्यापासून चार हात दूर राहणारे आता उरलेत कुठे मग? स्वातंत्र्याला ७० वर्षे झाली. तुमच्या म्हणण्या चा मतितार्थ असा होतो की त्यावेळेस स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होउ शकत असुनही सहभागी न झालेल्या लोकांनी त्याबद्दल बोलु नये. आता असे लोक म्हणजे १९४७ च्या आधी १५ वर्षे जन्मलेले. ज्यांचे वय आज जिवंत असेल तर ८७ असेल. अश्या नक्की कोणत्या व्यक्तींबद्दल तुम्ही बोलत आहात ते आधी स्पष्ट करा मग. थोडक्यात म्हणजे असे लोक की जे: १. आज ८७ च्या वरचे आहेत आणी २. ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेला नाही आणी ३. हिंदू-मुस्लिम, भारत, देशप्रेम आणि इतिहास ह्याबद्दल बोलतात. असे माझ्या माहितीत कोणी नाही, मिपावर देखील नाही मग तुम्ही हे वक्तव्य (मिपावर जाहीरपणे केले आहे म्हणून विचारतोय हा) नक्की कुणाला उद्देशुन केले हे जाणुन घ्यायची उत्सुकता आहे म्हणुन विचारतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

व्यक्तींबद्दल नाही,

तर्राट जोकर
Wed, 04/20/2016 - 21:16 नवीन
व्यक्तींबद्दल नाही, संघटनांबद्दल आहे. देशात अशा काही संघटना आहेत ज्या स्वातंत्र्य युद्धात तर कातडी बचावू धोरण ठेवून होत्या स्वातंत्र्य मिळाल्यावर आम्हीच मोठे देशभक्त अशी मिजाशी करत फिरत असतात आणि दुसर्‍यांची देशभक्ती किती ह्याचे मोजमाप करण्याचे फुक्कट धंदे करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

कम्युनिस्ट होते असे.

बोका-ए-आझम
गुरुवार, 04/21/2016 - 09:25 नवीन
१५ आॅगस्ट १९४७ या दिवशी त्यांनी ' ये आजादी झूठी है ' असं म्हणणारी पत्रकं लावायचा प्रयत्न केला होता असं घरातल्या मोठ्या (आणि त्यावेळी कळत्या वयाच्या) लोकांकडून ऐकलेलं आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत आहात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

ज्या स्वातंत्र्य युद्धात तर

तर्राट जोकर
गुरुवार, 04/21/2016 - 10:56 नवीन
ज्या स्वातंत्र्य युद्धात तर कातडी बचावू धोरण ठेवून होत्या स्वातंत्र्य मिळाल्यावर आम्हीच मोठे देशभक्त अशी मिजाशी करत फिरत असतात आणि दुसर्‍यांची देशभक्ती किती ह्याचे मोजमाप करण्याचे फुक्कट धंदे करतात. जे असं करतात त्यांच्याविषयी मी बोलत आहे. तुम्ही ज्यांच्याविषयी बोलत आहात ते असे करत असतील तर तसं समजा. तसेही कमुनिस्टांची निष्ठा देशाशी नाही असं काही लोक म्हणतात ब्वॉ तरी तुम्ही कमुनिस्टांचे उदाहरण देताय म्हणजे कमालच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

‘‘चीनो अरब हमारा हिंदूस्ताँ

सुधीरन
गुरुवार, 04/14/2016 - 20:56 नवीन
‘‘चीनो अरब हमारा हिंदूस्ताँ हमारा मुस्लिम हैं हम वतन हैं सारा जहाँ हमारा तौहीद की अमानत सीनों में है बाकी आसां नहीं मिटाना नामों निशां हमारा दुनिया के तबकदों में पहला वो घर खुदा का हम उसके पासबां हैं वो पासबां हमारा तेगों के साये में हम पलकर जवां हुए हैं खंजर हिलाल का है कौमी निशां हमारा मगरिब के वादियों में गूँजे अजा हमारी थमता नहीं था किसी से सैल-ओ रवा हमारा बातिल से दबनेवाले ऐ आस्मां नहीं हम सौ बार कर चुका है तू इम्तेहां हमारा ऐ गुलिस्ताने अंदलुस वो दिन है याद तुझको था तेरी डालियों में जब आशियां हमारा ऐ आब- रूद -ए गंगा वो दिन है याद तुझको उतरा तिरे किनारे जब कारवाँ हमारा ऐ मौजे दजला तू भी पहचानती हैं हमको अबतक तेरे दरया अफसाना ख्वा हमारा ऐ अर्दे पाक तेरी हुरमत पे कट मरे हम है खू तेरी रगों में अबतक खुआ हमारा सालारे कारवाँ है मिरे हिजाज इस नाम से से है बाकी आरामे जां हमारा इकबाल का तराना बाँग-ए-दरा हो गया होता है जादा पामाया फिर कारवां हमारा’’
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

उपरोल्लिखित कविता ही कवी

सुधीरन
गुरुवार, 04/14/2016 - 20:59 नवीन
उपरोल्लिखित कविता ही कवी इक्बाल यांची रचना म्हणून सांगितली जाते, खरे आहे का ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीरन

मौक्तिके अशीच बरसू द्या

lakhu risbud
Sun, 04/17/2016 - 21:06 नवीन
इक़्बाल स्वतःच्याच गाण्याची चोरी करणारा जगातील बहुतेक एकमेव शायर असावा. १९०४ मध्ये सारे जहान से अच्छा लिहिले. टागोरांना १९१४ च्या सुमारास नोबेल मिळाला. त्या द्वेष भावनेने पछाडूनच स्वतंत्र पाकिस्तान राष्ट्राची कल्पना पुढे आणली. https://www.youtube.com/watch?v=Qq6fxGUhYXw बाकी आपल्या गहन ज्ञानातून आणि सखोल अभ्यासातून ,विचारांची मौक्तिके अशीच बरसू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

का ??

अर्धवटराव
Wed, 04/13/2016 - 23:38 नवीन
बाकी हिंदू-मुस्लिम, भारत, देशप्रेम आणि इतिहास ह्याबद्दल स्वातंत्र्य लढ्यापासून चार हात दूर राहणार्‍यांनी न बोललेलंच बरं.
हि असहिष्णुता का ?
  • Log in or register to post comments

If you are sitting outside

तर्राट जोकर
गुरुवार, 04/14/2016 - 00:01 नवीन
If you are sitting outside and not analysing these things you should not ask this question
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

and who decides this ?

अर्धवटराव
गुरुवार, 04/14/2016 - 04:16 नवीन
शिवाय देशप्रेम, इतीहास वगैरे विषय इतके मूलगामी आहेत कि प्रत्येकाला प्रत्येककाळी त्याविषयी काहिनाकाहि ममत्व आणि महत्व वाटणारच. त्याविषयी अमुक व्यक्तीने (किंवा व्यक्तीसमुहाने) बोलु नये म्हणजे फारच झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

देशप्रेम, इतीहास वगैरे विषय

तर्राट जोकर
गुरुवार, 04/14/2016 - 09:28 नवीन
देशप्रेम, इतीहास वगैरे विषय इतके मूलगामी आहेत कि प्रत्येकाला प्रत्येककाळी त्याविषयी काहिनाकाहि ममत्व आणि महत्व वाटणारच
हेच ज्यांना पटत नाही त्यांनी बोलणे संयुक्तिक नाही. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

म्हणजे कोणि ??

अर्धवटराव
गुरुवार, 04/14/2016 - 11:49 नवीन
:ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

पूर्ण वाक्य आहे हो. तरीबी

तर्राट जोकर
गुरुवार, 04/14/2016 - 11:56 नवीन
पूर्ण वाक्य आहे हो. तरीबी 'कोणी' असं विचारताय ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

खरच कळत नाहिए

अर्धवटराव
Fri, 04/15/2016 - 00:18 नवीन
स्वातंत्र्य लढ्यापासुन अंतर राखुन असणार्‍यांना देशप्रेमाचा कळवळा का येऊ नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

But if you have enough

DEADPOOL
Mon, 04/18/2016 - 21:45 नवीन
But if you have enough dignity and punctuality you should answer this question!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

And who are you to decide my

तर्राट जोकर
Mon, 04/18/2016 - 21:57 नवीन
And who are you to decide my dignity and punctuality?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

छान लेख... बाबी विचार

उगा काहितरीच
Wed, 04/13/2016 - 23:49 नवीन
छान लेख... बाबी विचार करण्यायोग्यच आहेत.
  • Log in or register to post comments

..

mugdhagode
गुरुवार, 04/14/2016 - 07:02 नवीन
दोन मुसलमान राष्ट्रे लढतात. दोन ख्रिस्चन राष्ट्रे लढतात. आमचा धर्म बघा किती शांत. हेही असेच भोंगळ विधान आहे. जगाच्या पाठीवर हिंदु राष्ट्रे आहेतच कुठे ? भारत वगळता इतर नेपाळ , कंबोडिया वगैरे अगदीच किरकोळ आहेत... जर शेजारी शेजारी दोन तुल्यबळ व वाद असणारी हिंदु राष्ट्रे असतीच तर तीही आपापसात लढलीच असती.
  • Log in or register to post comments

लेख पटला नाही-

विशाखा पाटील
गुरुवार, 04/14/2016 - 09:17 नवीन
लेख पटला नाही- १. ऋषी- मुनी दूरदर्शी होते, तर जातीपातीची उतरंड का तयार होऊ द्यावी? बरे ती आधीच तयार झाली असेल असे मानले तर ती मोडीत काढण्यासाठी का काम केले नाही? २. या भूभागावरच्या किती लोकांना हे श्लोक येत होते ? किती लोकांना ती संधी मिळत होती? कळणे अजून दूरच. ३. राजेमहाराजांनी स्वखुशीने विलीनीकरण केलेले नाही. तसे असेल तर सरदार पटेल यांचे काम सोपे होते, असेच म्हणावे लागेल. ४. इराणमध्ये शांतता ? - असली तरी, प्रत्येक देशाचे प्रश्न वेगळे असतात, त्याला एकच धार्मिक भिंग लावून बघता येत नाही.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद आवडला.

मराठी कथालेखक
गुरुवार, 04/14/2016 - 11:47 नवीन
प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील

असं का व्हावं

अर्धवटराव
गुरुवार, 04/14/2016 - 11:59 नवीन
१. ऋषी- मुनी दूरदर्शी होते, तर जातीपातीची उतरंड का तयार होऊ द्यावी?
डिव्हिजन ऑफ लेबर
बरे ती आधीच तयार झाली असेल असे मानले तर ती मोडीत काढण्यासाठी का काम केले नाही?
पर्यायी डिव्हिजन ऑफ लेबर तयार होतच असते.
या भूभागावरच्या किती लोकांना हे श्लोक येत होते ?
श्लोकाचा इसेन्स आपापल्यापरिने प्रत्येकाला माहित होता. माहित असतो.
किती लोकांना ती संधी मिळत होती? कळणे अजून दूरच.
संधीची काय गरज. मुक्या, बहिर्‍यांसाठी सुद्धा हा इसेन्स कामात येतो.
राजेमहाराजांनी स्वखुशीने विलीनीकरण केलेले नाही
तसं त्यांनी करणं अपेक्षीत पण नाहि. एकदा जनताच राजा झाली कि तिची राजीखुषी महत्वाची.
.तसे असेल तर सरदार पटेल यांचे काम सोपे होते, असेच म्हणावे लागेल.
सरदारांना यशाची १००% खात्री होती. जनतेचं मन त्यांना कळत होतं. बाकी त्यांचं काम तेच करु जाणे.
इराणमध्ये शांतता ? - असली तरी, प्रत्येक देशाचे प्रश्न वेगळे असतात, त्याला एकच धार्मिक भिंग लावून बघता येत नाही.
एकदम खरं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील

विशाखा ताई, समाजात नेहमीच दोन

विवेकपटाईत
गुरुवार, 04/14/2016 - 14:10 नवीन
विशाखा ताई, समाजात नेहमीच दोन प्रवाह असतात, एक तोडणारे आणि एक जोडणारे. बाकी या लेखाचा जातीपातीशी काही हि संबंध नाही. तरीही जगात प्रत्येक समाजात जाती वेगवेगळ्या स्वरुपात तैयार होतात आणि नष्ट हि होतात. आत्ताचेच घ्या. काही वर्षांपासून सरकारी कार्यालयात अधिकर्यांसाठी वेगळे मूत्रीघर बांधल्या जातात आहे. IAS नावाची एक नवीन श्रेष्ठ जाती तैयार झाली आहे. सामान्य जनतेला संस्कृत नव्हती येत तरी कथा कहाण्यातून त्याना देशाबाबत माहित मिळायची. एखाद्या ८०-९० वर्षांच्या गावकर्याला विचारा, आपल्या पूर्वाजान्प्रती त्याची माहिती तुमच्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील

तुम्ही ज्या शब्दांना मराठी

पुंबा
गुरुवार, 04/21/2016 - 12:34 नवीन
तुम्ही ज्या शब्दांना मराठी प्रतिशब्द मिळत नाही ते शब्द तयार का हो करता? मुत्रीघर???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

हम्म

पैसा
गुरुवार, 04/14/2016 - 10:07 नवीन
लेखातल्या बर्‍याच मतांबद्दल वेगवेगळी मते आणि चर्चा सतत चालू असतात. सगळेच पटले असे नाही. पण काही प्रमाणात ओके.
  • Log in or register to post comments

लब्बाड

तिमा
गुरुवार, 04/14/2016 - 11:29 नवीन
आपल्या देशातली जनता लब्बाड आहे. एकदा माँ म्हटलं की सगळे गुन्हे पोटांत घेते ती माँ! म्हणून भारतमाता म्हणायचं आणि वाट्टेल तसं वागायचं. हेच पिता म्हटलं, तर तो शिक्षा करेल ना.
  • Log in or register to post comments

हे टाळायचे असेल, तर

मराठी कथालेखक
गुरुवार, 04/14/2016 - 11:50 नवीन
हे टाळायचे असेल, तर उद्यापासूनच आपल्या मुला-बाळांना प्रात: स्मरणीय श्लोक शिकवा. आपल्या देशातील नद्या, पर्वत, पवित्र सरोवरे, पुरातन ऋषी-मुनि, राजा-महाराजा, बादशाह आपले सणवार त्यांच्या मागच्या कहाण्या इत्यादी बाबत माहिती दिली तरी चालेल.
म्हणजे एकाच धर्माचे गुणगाण इंतरांनी करावे असेच म्हणायचे आहे तर !!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा