लानपन
तुह्य माह्य लानपनं
कसं गेलं मजाकीनं
येते यादं घळी घळी
नाई भुललो आजुनं
धुर्या वरच्या बोरीले
जातं व्हतो संगमंग
रखवाली पाह्यताचं
कशी आंगाले बिलंगं
माहा अक्षर खराबं
मारे मास्तरं म्हनूनं
रमे तुह्यं मनं कसं
तेचं अक्षर पाहूनं?
जत्री जायाचा जीवाले
बाई हरीक केवळा
कशी मांगस घेऊनं
खनं जरीचा पिवळा
टकं लाऊनं पाह्यसं
चिची वरं राघू मैना
कायं कयलं त्यातलं
तूह्या जीवाले सांगना?
जीवा वाटते राहूनं
व्हावं आजूनं लहानं
तूह्या संगचं खेऊनं
भागू मनाची तहानं
छान कविता!
मस्तं!
वर्हाळी वावरातला वारा....!
आम्ही
अप्रतिम!!
आवडली
मस्तच!
नेहमीप्रमाणेच छान!!
छान कविता.
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नटसम्राट... { असा नट होणे नाही ! }कविता आवडली.
वा वा!
सुर्रेख!
आवडली कविता.अजून वाचायला
छान
मस्त
आभार मानायला उशीर च झालाय!