लानपन
लेखनविषय:
तुह्य माह्य लानपनं
कसं गेलं मजाकीनं
येते यादं घळी घळी
नाई भुललो आजुनं
धुर्या वरच्या बोरीले
जातं व्हतो संगमंग
रखवाली पाह्यताचं
कशी आंगाले बिलंगं
माहा अक्षर खराबं
मारे मास्तरं म्हनूनं
रमे तुह्यं मनं कसं
तेचं अक्षर पाहूनं?
जत्री जायाचा जीवाले
बाई हरीक केवळा
कशी मांगस घेऊनं
खनं जरीचा पिवळा
टकं लाऊनं पाह्यसं
चिची वरं राघू मैना
कायं कयलं त्यातलं
तूह्या जीवाले सांगना?
जीवा वाटते राहूनं
व्हावं आजूनं लहानं
तूह्या संगचं खेऊनं
भागू मनाची तहानं
वाचने
2943
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
छान कविता. लिहा अजून!
मस्तं!
वर्हाळी वावरातला वारा....! अप्रतिम, नाजुक!
In reply to वर्हाळी वावरातला वारा....! by संदीप डांगे
शब्दाबाहेर नाही...
आज्ञाधारक नाखु
मस्त.... छान वाटली कविता....
कविता खूप आवडली.
तिसरी चौथीत असताना झाडावर दगड मारून पाडलेली बोरेही आठवली :-) .
आवळ्ळी!
नेहमीप्रमाणेच छान!!
फार दिवसांनी तुमची कविता वाचायला मिळाली.. आणखी लिहा :)
कविता आवडली.
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नटसम्राट... { असा नट होणे नाही ! }कविता आवडली.
मस्तच!
सुर्रेख!
आवडली कविता.अजून वाचायला आवडतील.गोडवा आहे तुमच्या भाषेत.
★★★☆☆
तीन स्टार
छान वाटलं वाचताना
आभार मानायला उशीर च झालाय! क्षमस्व! आमचे ओबडधोबड दोन शब्द ऐकून(वाचून,समजुन)घेता आणि वरून कौतुक ही करता!
धन्यवाद!
छान कविता!