बर्याच तरूण मित्रमैत्रिणींच्या तोंडून नसरत फते अली खाँ ह्यांच्या 'अल्लाह् हू' विषयी ऐकले होते. सगळेच ऐकलेले केवळ कौतुकच होते, तेव्हा आज वेळ काढून मुद्द्दाम ते यूट्यूबवर पाहिले/ऐकले. हे संपूर्ण सुमारे पंचवीस मिनीटांचे सादरीकरण आहे. अगदी खरेच सांगतो-- कसेबसे शेवटपर्यंत पाहिले/ ऐकले. कारण जी स्तुति मी ऐकले होती, त्याचे कारण मला कुठेच सापडले नाही, तेव्हा 'आता काही सुंदरसे, आतून हलवणारे येईल, नंतर येईल' असे करत राहिलो. शेवट झाला आणि अत्यंत निराशाच पदरी पडली.
एखाद्या गायकाने/ गायिकेचे गाणे, माझ्या मते, नुसते ऐकावे. शक्यतोंवर डोळे बंद करून ऐकावे. उगाच व्हिज्यूअल्सचे डिस्ट्रॅक्शन नको. तेव्हा इथे तसेच करण्याचा प्रयत्न केला. आणि काहीही पदरात पडले नाही. जवळजवळ संपूर्ण वेळ सरगम, सुरांची कसरत हेच चाललेले होते असे वाटले. ह्या सुरांतून काहीतरी निश्चीत भाव पोहोचवायचे आहेत, ह्याचा गायकाला विसर पडला होता असे वाटले. स्वतःची गायनावरील हुकूमत दाखवावयास असे भक्तिपर गीत कशास हवे?
ह्या 'अल्लाह्' गीतावरून अर्थात आठवले साहिरचे 'अल्लाह् तेरो नाम'. मग यूट्यूबवरच केवळ गीताचा दुवा शोधला, आणि ते गीत पुन्हा एकदा ऐकले. हे मी कितीदा ऐकले आहे, आणि त्यात प्रत्येकवेळा तीच तीव्र सद्भावना जाणवली आहे, ह्याचा मला आता पत्ता नाही. 'ओ सारे जग के रखवाले, निर्बल को बल देनेवाले, बलवनों को दे दे ग्यान, सब को संमति दे भगवान, अल्लाह् तेरो नाम, ईश्वर तेरो नाम' -- साहिरचे लिखाण अनेकदा मीटरमधे नसायचे. त्यातून जयदेव ह्यांची कठीण चाल, त्यावरील हरकती (उदा. 'निर्बल को बल देने वाले' ह्यातील 'को' ज्या तर्हेने लांबवावा लागला आहे, तिथली खास लता टचची जागा)! सगळेच विलक्षण, थरथरून टाकणारे, आत कुठेतरी थेट गीताची भावना पोहोचवणारे! जयदेव ह्यांच्या अनेक गीतांतून चाल संथ पुढे चाललेली असते,म्हणजे शब्द विस्तारून, विखरून टाकलेले असतात. असे शब्दोच्चार जबाबदारीने व अगदी नेमके करणे हे तर लताचे एक वैशिष्ट्यच आहे. गीतात मागे कोरस आहे. कुठल्याही दुसर्या कोरस गीतात मी कोरस व मुख्य गायक/ गायिका ह्यांचा ओव्हरलॅप ऐकलेला नाही. ह्यात तो तसा आहे, आणि ही ह्या संगीतरचनेची अजून एक खुबी आहे. मागील काँट्राही लक्षणीय ठरावे.
दोन अल्लाह् गीतांत हा प्रचंड फरक मलाच जाणवला, की तो इतरही कुणास जाणवला आहे? बहुधा मीच आता म्हातारा होत चाललेलो असावो, ही शक्यता आहेच!
वाचने
6555
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
गाण्याची आवड वक्ती सापेक्ष
ह्म्म्म...
सहमत
In reply to ह्म्म्म... by सोत्रि
आया तेरे दरपे दीवाना
In reply to सहमत by पिवळा डांबिस
नाही!
अजुन एक वेगळा प्रयत्न
http://www.youtube.com/watch?v=Pt0nqbSJiEEइस्लाम!
सूफी, इस्लाम, ऋग्वेद आणि पंढरपूर
In reply to इस्लाम! by संजय क्षीरसागर
नासदीय सुक्त
In reply to सूफी, इस्लाम, ऋग्वेद आणि पंढरपूर by विसुनाना
खूप छान
In reply to सूफी, इस्लाम, ऋग्वेद आणि पंढरपूर by विसुनाना
सन्जयराव ..
In reply to इस्लाम! by संजय क्षीरसागर
ह्म्म...नुसरतफतेहअली यांचे हे
प्रतिसाद
वा!
प्रचंड अनुमोदन
In reply to वा! by पैसा
गैरसमज होतोय!
चर्चा करायचीच तर
In reply to गैरसमज होतोय! by पिवळा डांबिस
वाहवा!
In reply to चर्चा करायचीच तर by प्रदीप
प्रदीप : नुसरत आणि लता अशी तुलना होऊ शकत नाही