हिरवाई..!
लेखनविषय:
काव्यरस
पक्षी हिरवे झाडे हिरवी हिरवे सारे झाले
हिरवाईने पाण्यालाहि हिरवे हिरवे केले!
रंगांचिहि अशी नशा की गुंतत गुंतत जावे
मुळचा आपुला रंग टाकुनि त्या रंगाचे व्हावे!
व्यक्तित्वाला उरू नये मग मुळचा कुठला रंग
व्यक्तित्वाने व्हावे त्याचा खराखुरा सत् संग!
आत्म दुजा अन देह वेगळा भलते बेचव कोडे
देहधारणा आत्मचि असता का हे वेडे चाळे?
आत्मरूप मी निसर्गदेहि हिरवा हिरवा झालो
मनी दाटता हिरवाई ती तुमच्या भेटि आलो
साज रोजचे टाकुनि द्या हो तुम्हिही उचला रंग
देवाजीच्या बागेमधला तुमचा एक अभंग
चला गड्यांनो हिरवाईला डोळे भरुनी पाहू
काही क्षण तरि आपुले नाही तिचेच होऊन राहू!

वाचने
9908
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
समर्पक आणि सुंदर.
बुवा मस्तंय कविता! छायाचित्रही समर्पक टाकलीत.
आत्म दुजा अन देह वेगळा भलते बेचव कोडे देहधारणा आत्मचि असता का हे वेडे चाळेही ओळ खूप आवडली. मला वाटते हे ज्ञानेश्वरांचे चिद्विलासवादी तत्वज्ञान आहे. वेदांती म्हणतात ब्रह्म आणि माया भिन्न आहेत. तर ज्ञानेश्वर म्हणतात माया ही देखील ब्रह्मच! बरोबर आहे ना?
जबरद्स्त कविता.
आगगाडीत लीवलीत काय? तसे असेल तर सलाम...
In reply to जबरद्स्त कविता. by खटपट्या
हरिहरेश्वरला आहे. हे मी लिहिलच नाहिये,तिथे त्या पावसानी हिरवाईला ही कविता दिली आणि तिनी मला!
In reply to हरिहरेश्वरला आहे. हे मी by अत्रुप्त आत्मा
____/\____
In reply to जबरद्स्त कविता. by खटपट्या
आगगाडीत लीवलीत काय? >>>
मी चुकुन आग लावलीत काय असे वाचले?
बाकी कविता सुरेख हो , आवडली.
सुंदर रचना आत्मुस!!
(पण एक सांगितल्याशिवाय रहावत नाही. रसभंग नाही करायचा तरीही; ते हिरवे पाणी हे रासायनिक खतांच्या अतिरेकाचे फळ आहे. युरीया घालायचा थांबवा शेतातुन अन गांडुळ खत वापरले तर ही नको असलेली पाण्याची हिरवाई जाऊन निव्वळ शंख पाण्यात हिरव्या छब्या पहात झाडे डोलु लागतील.)
छान कविता गुर्जी.
बरे झाले फोटो टाकले, नै तर काही लोकांनी, ऐका विशिष्ठ रंगाच्या वारंवार केलेल्या उल्लेखाकडे पाहून,
गुर्जीनी 'त्या विशिष्ठ रंगाचा' धर्म तर स्वीकारला नाही नं ? अशी राळ उठवली असती.
खूप छान जमलीय.
मस्तच हो गुर्जी.
कोकणात गेल्यामुळे चांगलीच त्रुप्ती होत असेल सध्या तुमची.
In reply to मस्तच हो गुर्जी. by प्रचेतस
@ चांगलीच त्रुप्ती होत असेल सध्या तुमची.>> कळलं आपणास काय म्हणायचय ते! :-\ दुत्त दुत्त! :-\
सुरेख कविता आणि फोटो!
अप्रतिम कविता आणि सुरेख फोटोज.. भारावुन टाकणारा निसर्ग तुम्ही शब्दात बांधलात :)
In reply to अप्रतिम कविता आणि सुरेख फोटोज by स्रुजा
जडभरत
@तर ज्ञानेश्वर म्हणतात माया ही देखील ब्रह्मच! बरोबर आहे ना? >> होय.बरोबर. पण तरिही हेतू भिन्न असणार. मला ज्ञानेश्वरांची भुमिका काहिही माहित नाही. मी म्हणतोय त्यापाठीमागे चार्वाकाचा देहात्मवाद हात जोडून उभा आहे. :)
--------------------------------------------------------------------------------------------------------------
स्पंदना
@सुंदर रचना आत्मुस!! >> धन्यवाद.
@(पण एक सांगितल्याशिवाय रहावत नाही. रसभंग नाही करायचा तरीही; ते हिरवे पाणी हे रासायनिक खतांच्या अतिरेकाचे फळ आहे. युरीया घालायचा थांबवा शेतातुन अन गांडुळ खत वापरले तर ही नको असलेली पाण्याची हिरवाई जाऊन निव्वळ शंख पाण्यात हिरव्या छब्या पहात झाडे डोलु लागतील.)>> अगदी खरे. आणि सहमतंही.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पगला गजोधर
@छान कविता गुर्जी.
बरे झाले फोटो टाकले, नै तर काही लोकांनी, ऐका विशिष्ठ रंगाच्या वारंवार केलेल्या उल्लेखाकडे पाहून,
गुर्जीनी 'त्या विशिष्ठ रंगाचा' धर्म तर स्वीकारला नाही नं ? अशी राळ उठवली असती.>>> ह्हा ह्हा ह्हा ! लिहिताना माझ्याही मनात तसेच काहिसे आलेले होते. पण फोटो टाकण्यामागे माझा उद्देश कवितेशी त्यांचा असलेला सांधा स्पष्ट व्हावा एव्हढाच होता. :)
-------------------------------------------------------------------
स्रुजा
@अप्रतिम कविता आणि सुरेख फोटोज.. भारावुन टाकणारा निसर्ग तुम्ही शब्दात बांधलात.>> होय . मि ही बांधलो गेलो त्याच्याशी. :)
----------------------------------------------------------------------------
बाकिही सर्व वाचक/प्रतिसादकांचे धन्यवाद. :)
छान छान
आत्मुदा सुरेख हिरवाई लेखणीतून उतरावलित बघा ---^---
In reply to गुरुजी लैइ भारी by लीलाधर
धन्यवाद रे लिल्या.
मस्तच आहे ही हिरवाई
"आल्हाददायक"
रचना आवडली.
दुसरा फोटो तर अप्रतिम.
निळ्या निळाई अवचित हे कृष्णजलद आले
सरसर थरथर त्यातून अमृतथेंब निमाले
तृषार्त तप्त विदग्ध व्याकुळ तेही सरले
मनसृष्टीचे गाभारे भरून फुलून गेले
पाननपानही आता गच्चहिरवे जहाले
मी हिरवा, तू हिरवी, हिरवे जग सारे ल्याले!
In reply to वा! क्या बात है! by एस
व्वाह्व्वा! मस्स्स्स्त!
In reply to वा! क्या बात है! by एस
हे ही
सुरेख
अलगद उतरली आहे काव्यात !!!
देवाजीच्या बागेमधला तुमचा एक अभंगमी कवीता ठार अडाणी अजून शोधतोय काही लिहिण्यायोग्य, अजूनतरी योग आला नाही !! जरी वेष बावळा अंतरी नाना (रंग) कळा वाल्या बुवांचा पंखा नाखु
वाह! मस्तच!
वा! वा! हिरवीगार कविता.
हिरवे पाणी सोडून बाकी सगळे आवडले !
काही क्षण तरि आपुले नाही तिचेच होऊन राहू!
छान रचना. आवडली.
सुरेख कविता बुवा
समर्पक आणि सुंदर.