पुत्र व्हावा ऐसा गुंडा...
पुत्र व्हावा ऐसा गुंडा...
ह्याचा कवीला जो काही अर्थ अपेक्षित असेल तो असेल.. पण आमच्या लेकरानी शब्दशः घ्यायचा ठरवला आहे. आणि तो बहुदा "गुंडा" सिनेमाच्या हिरो सारखा "गुंडा" हा असावा.. असो..
तर..आमचे सुपुत्र झोपेतुन उठतात तेच मुळी बटन दाबुन मशिन चालु केल्या सारखे.. एकदम धो धो एनर्जी कोसळायला सुरवात होते. तिथुन पुढे दिवसभर ती तशीच कोसळणार असते. दम दिल्या सारखा हाका मारत सुटतो..चावतो..उड्या मारतो..बोचकारतो..लाथा मारतो आणि वर "हा हा" करुन हसतो.. जोवर त्याला बाहेर नेत नाही तोवर हे सगळं चालु असतं..बर गप गुमान नेईल तिकडं जावं तर तसं नाही..पायानी आम्च्या पोटाला लाथा मारुन (घोड्याला कसं पायानी वळवतात्..तस्सचं..), हातानी दिशा दाखवत... "इक्कं..तिक्कं..ऊंम्म... नाईईई.." असं बोंबलत हवं तिकडे नेतो.. खाली सोडलाच तर तरा तरा रांगत जाऊन भांडी खाली पाड.. टिव्ही ओढ्..कचरा खा.. झाडु चोख..खिडक्याशी गाडी गाडी करुन बोटं अडकवुन घे..असले उपद्व्याप चालु होतात.
त्याच्या सोबत नक्की खेळावं काय हेच आम्हाला कित्येकदा समजत नाही.त्याच्या खेळण्यां सोबत आम्हीच अर्थहीन खेळ सुरु करतो म्हणजे तो समोर बसुन शांत पणे काही तरी करेल.. पण तो ढुंकुनही पहात नाही.
दिवसभर आम्ही सोबत नसतो. आजी एकटी कंटाळुन जाते.म्हणुन मग टीव्ही.. तर आता त्याला सगळ्या मालिकांचे टायटल साँग्स आवडयला लागलेत. होम मिनिस्टर तर ऊड्या मारुन पहातो (कारण त्यात बर्याचदा टाळ्या वाजवतात, बॉल चे खेळ असतात..) पण ह्या वेळ घालवण्याला काही अर्थ नाही. तो अजुन चालत (आणि मुद्द्याचं) बोलत नसल्याने इतक्यात त्याला पाळणाघर / प्ले ग्रुप मध्ये टाकु नये असं मत आहे.
पोरगं रोज नवीन काही तरी शिकतय.. अक्कल "एक्स्पोनेन्शीयली" वाढत चालली आहे. तेवढ्याच स्पीडनी आमची बुद्धी तोकडी पडत चालली आहे. त्याला खेळायला द्यावं तरी काय? त्याच्या सोबत "काऊ काऊ ये.." च्या शिवाय अजुन काय खेळावं? "केस कुठयत केस? कान कुठय कान" च्या पुढे काय शिकवावं? त्याच्या learning मध्ये भर पडेल असं काय करावं?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हम्म...
चालत आणि बोलत नाही म्हणजे एक
बिचार्यांची विधात्याने फटका
गवि..
चालणं बोलणं वगैरे हे
ह्या पुस्तकां साठी अत्यंत
अतिशय उत्तम पुस्तकं
Expecting वाल्या पहिल्या
धन्यवाद गवि.
काही अपवाद ...
एकदम मान्य..
"घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती" हे
चालत नाही अजुन.. रांगतो...>>>
अगदी !
पळत्या पोराची गालावर पापी मिळणं आणखी अवघड. त्यामुळे अशा वेळी गालासाठी अडून न राहता जो काही हातात सापडेल त्या भागाची पप्पी घेऊन टाकावी.:) :) जबरा.. पण हल्ली त्यासाठी पण पोरांना आणाभाका घाल्याव्या लागतात हो, वेळच नसतो कार्ट्याना लाड करुन घ्यायला पण : (पळत्या पोराची गालावर पापी
भारी आणि खुसखुशीत प्रतिसाद !
गविंचे षटकार
जिने बहोत मजा है,तु जिले जरा.....
अहो.. धमाल मस्ती म्हणजे काय?
अशा प्रचंड एनर्जीवाल्या
पोरं
हा हा
माझाही पोरगा नुंगी..नुंगी
हॅ हॅ.. आमचं पोरगं कोकी कोकी
सल्ला नाही पण सत्य सांगतो .
नुसता त्याला वेळ द्या..
उपाय छान आहेत. पण थोडासा
व्यस्त..
एक आयडीया आहे.
हो.. असं माझ्याही लहानपणी
अगदी खरं.
Be with him .......+++11111
बापरे सगळे डॅडी च हिरीरीने
हाहा..
.
मग काय मॉमीझनी नोकरी करु नये
करु दे त्याला जे करायचय ते
कै च्या कै सल्ला वाटेल पण
+१११११११११११११११११११११११.
+१११
पोरांचा विषय निघाल्याने राहवलं नाही!
असे अनेक महिने
यशाची गुरुकिल्ली.
माझ्यासाठी फायदेशीर धागा !
@ उपास
पुस्तकं आणि इतर गोष्टी
माझे दोन पैसे
तुमचा पोरगा तुमच्या वर भलताच
आई म्हण्ते मी पण लानपणी खुप
मॉमीज अनुभव