वारी आणि मी...
महाराष्ट्रात जन्माला येऊन आषाढीची वारी माहित नसणारा माणूस विरळाच. त्यातही मराठी माणसाला, विशेषत: माझ्यासारख्या सोलापूरकडे आजोळ असणा-या माणसाला वारीबद्दल आकर्षण नसणं म्हणजे सच्च्या क्रिकेटप्रेमीला सचिनची खेळी लाईव्ह पाहण्याबद्दल आकर्षण नसण्याइतकंच अशक्य. लहानपणी दोन तीनदा गावी वारी पाहिली, तेव्हापासूनच तिचा एक भाग होण्याची इच्छा मनात घर करून होती. ४ वर्षांपूर्वी या इच्छेला मूर्त स्वरूप मिळालं. कॉलेजमधल्या एका मित्राने वारीतल्या वैद्यकीय शिबीराला स्वयंसेवक म्हणून येण्याबद्दल विचारलं, आणि तेव्हापासून दरवर्षी वारीला जाण्यास सुरूवात झाली.
ठाण्याच्या काही डॉक्टर मंडळींनी एकत्र येऊन सामाजिक सेवेच्या हेतूने "सह्याद्री मानव सेवा मंच (SMSM)" या संस्थेची स्थापना १९८२ साली केली. ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी भागातल्या दुर्बल समाजासाठी वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी अनेक उपक्रम ही संस्था चालवते. २७ वर्षांपूर्वी या डॉक्टरांना जाणवले की आषाढीच्या वारीत सहभागी होणा-या ब-याचशा व्यक्ति वय वर्ष ५० किंवा त्यावरील असतात. ही वारी या वारक-यांच्या प्रतिकारशक्तीची जणू परिक्षाच असते. वाईट हवामान, पाण्याचा अभाव, संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव अशा अनेक अडचणींना यांना सामोरं जावं लागतं. तेव्हापासून वारीमार्गावर SMSM दोन वैद्यकीय शिबीरं आयोजित करते. पहिलं शिबीर दिवेघाटापासून सासवडपर्यंत असतं. पुणे ते सासवड हा वारीमार्गातला सर्वात कठीण आणि मोठा टप्पा वारक-यांना एका दिवसात पार करायचा असतो. त्यातच मधल्या दिवेघाटातल्या चढणीच्या रस्त्यामुळे ब-याच लोकांना पाय दुखणे, स्नायू आखडणे, श्वसनाचे त्रास असे त्रास होत असल्यामुळे दिवेघाटानंतर पहिलं शिबीर सासवडमध्ये घेतलं जातं. तर वारीच्या अखेरच्या टप्प्यात नातेपुते आणि माळशिरसमध्ये शिबीराचा दुसरा टप्पा घेतला जातो.
यंदा चवथ्या वर्षी वारी याचि देहि याची डोळा अनुभवायला मिळाली. वारक-यांचा उत्साह, प्रतिकूल परिस्थितीतही विठोबाच्या दर्शनाची त्यांची आस, उन्हापावसाची तमा न बाळगता डोक्यावर तुळशी वृंदावन आणि खांद्याला सामानाची पिशवी घेऊन चालणा-या बायका, तर टाळ मृदुंगाच्या गजरात भगवा झेंडा खांद्यावर घेऊन जाणारे वारकरी, मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बायकामंडळींची चालणारी स्वयंपाकाची गडबड, ओळखीपाळखीची तमा न बाळगता निस्सीम मनाने एकमेकांना मदत करणारे वारकरी, वारीमागून साफ़सफ़ाई करत जाणारे काही वारकरी, सगळंच अप्रतिम.
वैद्यकीय शिबीरात तर भन्नाट अनुभव येतात. एक ५५-६० वर्षांची माऊली शिबीरात आली, तेव्हा तिचा पाय घोट्याजवळ फ़ाटून आतलं हाड तुटलं होतं आणि मांस अक्षरश: बाहेर आलं होतं. इमरजन्सी केस म्हणून डॉक्टरांनी तिथल्याच एका टेंपोला ऑपरेशन थिएटर बनवून इलाज केला. तशाही परिस्थितीत तिचा उत्साह मात्र दांडगा. पायाला अपघात कधी झाला विचारलं तर म्हणाली, झाले ५-६ तास. आणि तशा स्थितीत ही माऊली तेवढं अंतर पायी चालत आली. दिंडीच्या गाडीत बसून यायचंस, या डॉक्टरांच्या सल्ल्यावर "पायी वारी केली न्हाई तर इठोबा कसा पावणार आमाला?" या तिच्या उत्तराने सगळ्यांनाच निरुत्तर केलं.
दुस-या एका काकांना त्यांच्या दिंडीतल्या इतर मंडळींनी उचलून शिबीरात दाखल केलं. रक्तातली साखर प्रचंड कमी झाल्यामुळे त्यांना चक्कर आली होती आणि ते जवळपास बेशुद्धीत होते. ताबडतोब सलाईन लावलं, आणि ५-१० मिनीटांत ते शुद्धीवर आले. "कोणती दिंडी चाललीये?" या प्रश्नाला दिंडी क्रमांक सांगितल्यावर, "आवं माजी दिंडी गेली की पुढं निघून" असं म्हणत हातात टोचलेली सुई खेचून बाहेर काढली आणि आपल्या दिंडीला सामील व्हायला हे काका पळत सुटले. हे आणि असे बरेच अनुभव शिबीरात आले.
असो. वारीला जाण्याची इच्छा असलेल्या पण काही कारणास्तव न जमलेल्या मंडळींकरीता हा धागा. सोबत फ़ोटू आहेतच.
पुंडलिक वरदे हरि विठ्ठल ।
डॉक्टर मंडळींची बस..
तपासणीसाठी बसलेली डॉक्टर मंडळी..
आम्ही पडीक कामगार..
सह्याद्री मानव सेवा मंच चा कंपू.
शिबीराची पूर्वतयारी
चिमुरडी माऊली आणि तिची सेवा.
सह्याद्री मानव सेवा मंचाचे मुख्य आधार - ठाण्याचे डॉ. सापटणेकर.
सलाईन विभाग
वैद्यकीय कचर्याची विल्हेवाट.
ही अशीच फुकट वेळेतली फोटूग्राफी..
मॅक्रो चा मोह आवरला नाही.
या फोटूसाठी विशेष धन्स टू सौरभ उप्स अन स्पावड्या.. :)
अजून काही मॅक्रो..
आणि बोके..

शिबीराची पूर्वतयारी
सलाईन विभाग
वैद्यकीय कचर्याची विल्हेवाट.
मॅक्रो चा मोह आवरला नाही.
या फोटूसाठी विशेष धन्स टू सौरभ उप्स अन स्पावड्या.. :)
आणि बोके..

वर्गीकरण
प्रतिक्रिया
स्तुत्य उपक्रम..
हाहाहा नक्की..
_/|\_
धन्यवाद.
यप्प... नक्कीच. बोलव आठवणीने.
हे आवडले एकदम. अभिनंदन.
+१
सहि रे
पाहुनी सेवा खरी
एकदम सहि
वारी आणि मी.
हरि विठ्ठल
भन्नाट
आदिजोशी तो मेडीकल कचरा आहे.
आदरयुक्त प्रणाम.
चांगला उपक्रम आहे.
@ यशोधरा , सुधीर , नि३ -
सगळा कचरा गोळा करून सोबत आणून
सगळा कचरा गोळा करून सोबत आणून इकडे त्याची शास्त्रीय विल्हेवाट लावणंयाचे कारण कळाले नाही. निव्वळ विल्हेवाट लावण्यासाठी मुंबईपर्यंत कचरा वागवण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. प्रत्येक शिबीराच्या जवळपास एखादे प्राथमिक आरोग्य केंद्र असणार आहे. त्यांच्याकडे वैद्यकीय कचर्याची विल्हेवाट लावण्याची सिस्टीम तयार असेलच (अशी आशा आहे!) तुम्ही फक्त त्यांना तुमचा कचरा सप्रेम भेट द्यायचा. आणखी निश्चिततेसाठी एखाद्या आरोग्य मंत्र्याकडून / तत्सम अधिकार्याकडून वारीमार्गावरील कोणत्याही प्रा.आ. केंद्राला "असा कचरा विनातक्रार स्वीकारण्याचा विनंतीवजा आदेश" बनवून घ्या.अजून एक मार्ग
नक्की येईन.
नक्की.
मस्तच.
_/\_
__/\__/\__/\__
अतिशय स्तुत्य उपक्रम
ग्रेट!
उत्तम...
छान..
+१