मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"मिसळ"णारी कोण कोण??? - इस्ट कोस्ट मध्ये??

प्राजु · · काथ्याकूट
नमस्कार मंडळी, आता जरा उन्हाळा मस्त चालू झाला आहेच इथे... तर आपणही जबरदस्त मिसळकट्टा भरवू. काय म्हणता?? इस्ट कोस्ट ला कोण कोण आहे?? छोट्या डॉनची बहीण शोभाव्या अशा वरदाबाई कट्टा भरवायचं पिल्लू सोडून आता स्वतःच 'जमणे अवघड आहे असे सांगताहेत." तेव्हा आता ही जबाबदारी आपण सगळे मिळून घेऊ.. कसं?? इस्ट कोस्ट ला मी, शितल, संदीप चित्रे, चतुरंग.. आणखी कोण कोण आहे?? केव्हा जमूया, कुठे जमूया?? कोणाच्या घरी की एखाद्या बीच वरच जमायचं?? इस्ट कोस्ट वाले तुम्हाला काय वाटतं? सगळ्यांचं मत घेऊन निर्णय घेऊ? घरी जमायचं असेल तर सगळ्यांसाठी कोल्हापूरी मिसळ मी करण्याची जबाबदारी घेते?? काय गं शितल.. तू करशील ना मदत? - प्राजु

वाचन 28234 प्रतिक्रिया 0