Skip to main content

अशीही आणि तशीही

लेखक इनिगोय यांनी शुक्रवार, 22/03/2013 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
जन्म देता देता जन्म घेणारी शब्द नि अर्थ जुळवणारी उंचच उंच गर्दीमध्ये बोट घट्ट धरणारी चिंचा, बोरं, भोवरे, चेंडू गिरगिर, भिरभिर.. खुलणारी कधी रुजली हे न कळताही अंगोपांग बहरणारी कधी अंग चोरून बसणारी नको असतानाही असणारी काही आयुष्यभर दिसत, भासत हुलकावणी देत राहणारी उणे अधिक मांडता मांडता हातचा म्हणून राहणारी अन् ती.. आभाळागत सदैव जागी फक्त नजरेत सामावणारी जगणं-बिगणं सुरू असता 'का? कशासाठी?' हे सांगणारी उतरणीला लागत असता अंधूक झाल्या नजरेपुढे पुन्हा एकदा उजळत जाऊन विरामाकडे नेणारी ...नाती!
लेखनविषय:

वाचने 4241
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

'कोण बरं ती? ' असा प्रश्न मनात येता येता उत्तर मिळाल्यासारखं वाटत होतं - 'त्या' शब्दामुळे कविता अधिक उलगडली :-)

जगणं-बिगणं सुरू असता 'का? कशासाठी?' हे सांगणारी
अलबत!!

शब्दयोजना आणि प्रत्येक कडव्यातलं वेगळेपण छान आहे.. शेवट मस्त :)

नात्यांचा एवढा सुंदर परिचय करुन दिल्याबद्दल तुमचे 'आभार'.

वर वर हलकीफुलकी वाटणारी पण मनाला स्पर्शून जाणारी हि रचना आवडली.

नाती! अलगद जुळणारी सुलगत रहाणारी काळजात खोलवर रुतू पहाणारी रक्तांत खेळणारी आसवांत नहाणारी काटा बनुन कधी अहोरात्र खूपणारी मस्त हो इनिगोय! छान लिहिता तुम्ही.

" उतरणीला लागत असता अंधूक झाल्या नजरेपुढे पुन्हा एकदा उजळत जाऊन विरामाकडे नेणारी ...नाती! " खरे आहे !

शेवटचा शब्द येईपर्यंत काही समजलं नव्हतं. शेवटचा शब्द वाचल्यावर पुन्हा एकदा वाचली, अर्थ लागला अन आवडून गेली.